नशिबाचा खेळ - ( भाग - 3 )

Destiny


      सगळीकडे एकचं गोंधळ चालला होता. नवरी मुलगी पळून गेली, असा हॉल मध्ये नुसता गोंधळ चालू होता, मी पण रूम मध्ये माझी तयारी करत होतो, मी धावत चं बाहेर गेलो, गंधाली मेकअप करायला पार्लर वाल्या मुलीबरोबर रूम मध्ये गेली होती, आणि त्या रूमच्या पाठच्या दरवाजा ने पळून गेली होती, त्यात पार्लर वाली पण तिची मैत्रीण चं होती, तिने ही ह्या सगळ्या प्रकारात गंधाली ची साथ दिली होती.

       खूप गोंधळ झाला, मी गंधाली च्या आई - बाबांना ओरडून बोललो, मला सांगायचं ना आधीच तुमच्या मुलीचं असं काहीतरी बाहेर लफडं होत ते, तर ते बिचारे रडून बोलू लागले, आम्हाला ह्यातलं काहीच माहिती नव्हत. त्यांना सुद्धा ह्या गंधाली च्या प्रेम प्रकरणाची  काहीच माहिती नव्हती, तिचे बाबा तर बिचारे माझे पाय धरून रडू लागले, आम्हाला माफ करा बोलू लागले.

      तिची आई पण रडतं होती खूप, भाऊ पण बिचारे खजिल झाले होते. मी पण अक्षरशः रडकुंडीला आलो होतो, भरलेला हॉल हळू हळू एक तासात खाली झाला, माझी बहीण पण रडतं होती. भाओजीं मला समजावत होते, कि आता काय करायचं ती गेली ऐन वेळी दगा देऊन. तो सजलेला हॉल, ती लग्नाची उत्सुकता, सर्वच एका क्षणात संपली होती.

        हताश होऊन आम्ही सगळेच घरी निघालो. मी फेमस वकील  असल्यामुळे  खूप मोठी मोठी मंडळी लग्नाला आली होती, आणि त्या सर्वांसमोर  गंधाली ने मला मान खाली घालायला लावली होती. सर्व चं मला समजावत होते, झाले ते झाले त्या तुमचा काय दोष असं बोलत होते.  बहीण पण त्या दिवसानंतर अजून दोन दिवस राहून पुन्हा सासरी गेली, पुन्हा मी एकटाच उरलो घरात.

       पण मी त्या सगळ्या प्रकारानंतर स्वतःला कोंडून घेतले. एवढं होपलेस वाटत होत कि घरातून बाहेर पडायला पण नको वाटत होत, कोणीतरी बाहेर गेल्यावर बिल्डिंग मधलं विचारेल लग्नाबद्दल, कोणीतरी काहीतरी बोलेल असं चं सारखं वाटत राही. मी आठ दिवस बाहेर चं गेलो नाही, दुध सुद्धा आणायला गेलो नाही बाहेर. घरात बसून विचार चं करत असायचो कि आई - वडील देवाने लवकर हिरावून नेले. आता कुठे जरा सुखं येईल असं वाटत असताना हे घडलं.

      मी झाल्या प्रकाराने खचलो होतो, पण मग मी लग्न कधीच  न करण्याचा निर्णय घेतला. मनात  सारखं वाटू लागलं कि माझं चं नशिब खराब आहे. दोन - तीन महिने गेले -  ह्या सगळ्यातून बाहेर यायला, मग मी ठरवलं आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करूयात, म्हणजे ह्या सगळ्याचा विसर पडेल, आणि त्यामुळे स्वतः ला कामात एवढं झोकून दिल कि आज ला मी माझ्या प्रदेशातला सर्वात मोठा वकील आहे.

     मी केसेस घेत गेलो, जिंकत गेलो, खूप प्रसिद्धी मिळत गेली, बरेचदा क्लाइंट विचारायचे सर तुमचे लग्न नाही का झाले मी नाही अजून असं बोलून विषय संपवायचो, पण कोर्टात जोडप्यांच्या केसेस बघून नेहमीच वाटायचं कि मी एकटाच आहे.

      कालांतराने मला ही वाटू लागलं किती दिवस अजून एकट्याने जेवण करून स्वतः चं खाणार, रोज तेच तेच कंटाळवाण रुटीन, घरी आल्यावर जेवण करणे, टीव्ही बघणे, वाटल तर जेवण करणे  नाहीतर  एकटाच बाहेर जाऊन हॉटेल मध्ये जेवून यायचो. एकटयाने हा गाडा ओढण्याचा आता कंटाळा येऊ लागला. मग वाटू लागल कि आता आपल्याला साथी ची गरज वाटत नाही आहे पण उतारवयात कोणाची तरी साथ असावी असं वाटू लागलं, पण ह्या सगळ्यात लग्नाचं वय निघून गेलं होत.

     आणि एक दिवस तुझे एक दूरचे नातेवाईक माझ्याकडे एक केस घेऊन आले होते त्यांची केस संपेपर्यंत त्यांची आणि माझी चांगलीच ओळख झाली होती, त्यांनी मला हे तुझं स्थळ सुचवलं, ते बोलले पण त्यांची परिस्थिती खूप हलाखिची आहे, सहा मुली चं आहेत, वडील खूप दारू पितात. आई चं घरकाम करून घरं चालवते. म्हणून मग मी म्हंटल कि माझ्यामुळे कोणाचं तरी भल होणार असेल तर जाऊन भेटूया त्या मुलीला म्हणून तुला भेटायचं ठरवलं.

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत पुढे सीमा काय निर्णय घेते ते )

      

🎭 Series Post

View all