डेस्टिनी एक प्रेम कथा भाग १

This is the story about a rich girl called Shivani and how her life changes due to destiny

डेस्टिनी एक प्रेम कथा

भाग १

“ओम जय जगदीश हरे .. ओम जय जगदीश हरे” .. पहाटे पहाटे मधुर आवाजाने घरातल्या सगळ्यांना जाग  येऊ लागली . तिने पांढरा आणि सिल्वर स्टोन वर्क केलेला नाजूक वर्क असलेला अनारकली  ड्रेस घातला होता .. गळ्यात डायमंड  चा नेकलेस ..नेकलेस ला मॅचिंग लांब इअर  रींगज  , हातात ब्रेसलेट .. पायात नाजूक अंकेट्स .. त्याला एक छोटेसे घुंगरू आहेत .. ती जशी चालते .. तसा कानामध्ये एक मधूर आवाज  .. छन .. कधी  छुम .. कधी बांगड्याचा छन छन असा आवाज येत होता ..

 सकाळी उठून देव घरात प्रसन्न  आणि स्मित हास्यने तिने पूजा केली .. देवाला नमस्कार केला आणि मग तिच्या रूम मध्ये गेली .. नाजूक , सुंदर , तितकीच हळवी , शांत , अशी हि आपली शिवानी   सरंजामे .. सरंजामे घराण्यातली लाडाने वाढलेली लेक .. सरंजामे घराण्यातले अर्धे बिझनेस तर शिवानी   च्या नावाने होते .. शिवानी   टेस्टाइल , शिवानी   इण्डस्ट्री .. तसा शिवानी   ला दोन सक्खे भाऊ आहेत एक प्रथम  आणि एक पराग  . दोघा  भावांचा बहिणीवर खूप जीव .. तिने तोंडातून शब्द बाहेर काढायच्या आधी वस्तू तिच्या समोर हजर असायची ..

आई बाबांच्या पश्चात दोन्ही भावांनी तिला प्रेमाने वाढवले आणि घरचा बिझनेस पण उत्तम सांभाळला.

शिवानी शहरातल्या सगळ्यात मोठ्या कॉलेज ला जात होती .. तिला न्यायला आणायला कार विथ ड्राइवर असायचा .. मोठ्या बिझनेस ची अर्धी मालकीण आणि घराण्यातली एकुलती एक मुलगी असल्याने तिला दोन्ही भावांनी एकदम बंदोबस्तात ठेवले .. तिला नॉर्मल मुलींसारखे जग बघायला मिळालेच नाही ..  ठरलेल्या ठिकाणी जायचे, यायचे  .. तेही बॉडीगार्ड आणि गाडी बसून  .

जसा मोती एखाद्या शिंपल्यात असतो तशी ती  शिंपल्यातच होती  ..

 कधी कधी ना त्या शिंपल्यातून बाहेर पडावेच  लागते.. तिची हि वेळ बहुदा आता आली होती

प्रथम   आणि पराग  ने आपल्या बहिणीचा विवाह त्यांच्या वडिलांचा मित्र पटेल इंडस्ट्री चा मुलगा शर्विल पटेल जवळ ठरवला  .. फॅमिली फ्रेंड्स असल्यामुळे लहानपणा पासून शर्विल आणि शिवानी  एकत्र खेळलेले होते .. पुढे शर्विल शिकायला म्हणून अमेरिकेला गेला होता ते तो पाच वर्षांनी परत आला होता .. शर्विल मध्ये खूप फरक पडला होता ..

उंच , गोरा पान , हँडसम आणि श्रीमंतीची चमक शर्विल च्या चेहऱ्यावर लगेच दिसायची ..

अमेरिकेवरून आला म्हणून पटेल अंकल नि पार्टी ठेवली  तिथे शर्विल आणि शिवानी  ने  एकमेकांना पाच वर्षा नंतर पहिले .. दोघे एकमेकांना पाहतच बसले .. प्रथम  आणि पराग  च्या लगेच लक्षात आले आणि त्यांनी त्याच पार्टीत दोघांची एंगेजमेंट डिक्लेअर केली  ..

शिवानी तर खूप खुश होती .. लहान पणा पासून शर्विल तिला माहित होता .. त्याची फॅमिली पण माहित होती .. त्यांच्या स्ट्स्टस ला मॅच होत होते .. शिवाय शर्विल हँडसम दिसत होता .. शिवानी ला त्याचा चेहरा आठवून आठवून लाजायला होयचे ..

हे सगळे इतके लवकर झाले .. महिना भरात  एगेजमेंट झाली ..

 शिवानीच्या आनंदाला गगन ठेंगणे पडले होते .

एक फुल जे नव्याने उमलले होते ते शर्विल जवळ लग्न ठरल्याने सुगन्धित होत होते ..

 घरात लगीन सराई  सुरु झाली . एक दिवस सकाळी शर्विल ने प्रथम ला कॉल केला .

शर्विल " प्रथम .. आज माझ्या फ्रेंड्स बरोबर पार्टी आहे .. मी शिवानी ला घेऊन जाऊ का ?"

प्रथम " अरे विचारतोस काय ? तुमची एंगेजमेंट झालीय .. आता लवकरच लग्न होणार आहे .. गो .. गो .. ह्याव सम फन .. तू शिवानी ला कॉल कर "

शर्विल " ठीक आहे .. मी कॉल करतो तीला "

शर्विल ने शिवानी ला कॉल केला

शर्विल " हाय शिवानी .."

शिवानी " हॅलो  शर्विल "

शर्विल " शिवानी .. माझ्या बरोबर बाहेर यायला आवडेल का तुला ?"

शिवानी लाजून काहीच बोलत नाही

शर्विल " अग .. बोल ना .. आज माझ्या मित्र  मैत्रिणीसोबत पार्टी आहे .. तू येशील का  माझ्या बरोबर ?"

शिवानी ने मान हलवून हो म्हणून उत्तर दिले

शर्विल " मला फोन वरून कसे कळणार कि तू हो म्हणतेय का नाही म्हणतेय .. बोलून सांग ना राणी "

शिवानी " हमम.. येईल मी "

शर्विल " थँक्स यु .. सो स्वीट ऑफ यु .. उम्मम हा .. "

शिवानी पुन्हा लाजली

शर्विल " मी संध्याकाळी ५ वाजता तुला घ्यायला येतो .. तयार राहा .. आणि हो माझ्या ऑफीस मधून एक जण येईल त्याच्या बरोबर मी एक ड्रेस पाठवलाय तो घाल "

शिवानी " हमम.. "

शर्विल " तुझा आवाज ऐकायला माझे कान तरसलेत .. माझ्याशी तरी मोकळे पणाने बोल ना .. बोलशील ना .. का  संसार मुक्याने ने करायचाय "

शिवानी " नाही .. "

शर्विल " बरं .. चल . संध्याकाळी भेटू "

शिवानी " हमम .. "

शर्विल " लव्ह यु "

एगेजमेंट होऊन सुद्धा शिवानी त्याच्याशी फार  काही बोलत नव्हती ..

तेवढयात शर्विल च्या ऑफीस मधून कोणीतरी ड्रेस घेऊन आलाच .

शिवानी संध्याकाळ च्या तयारीला लागली .. शर्विल ने मस्त ब्लॅक पार्टी वेअर गाऊन पाठवला होता .. शिवानी च्या अंगावर तर तो अजूनच खुलला होता ..

संध्याकाळी शर्विल तिला घ्यायला आला .. शिवानी ला पाहून तर बघतच बसला .. एक टक .. तिच्या सुंदर डोळ्यांमध्येच हरवला ..

शर्विल " हाय .. कातिलाना अंदाज .. तू बोलली नाहीस ना तरी तुझी नजर खूप आहे घायाळ  करायला .. "

शिवानी डोळ्यांनीच त्याला घायाळ करत होती.

शर्विल ने तिच्यासाठी कार चे दार उघडले .. ती पण मोठ्या दिमाखात कार च्या पुढच्या सीट वर बसली ..

दोघे पार्टीत गेले .. दोघे एकमेकांना इतके शोभून दिसत होते कि पार्टीतल्या सगळ्यांच्या नजरा दोघांवर टिकल्या होत्या .

शर्विल च्या सगळ्या मैत्रिणी त्याला चिडवत होत्या .. खूप सुंदर बायको आहे शर्विल ..

शिवानी आज अशी पहिल्यांदाच पार्टीत गेली होती .. बाकीच्या मुली एकदम बिनधास्त वागत होत्या आणि हि एकदम बावरली होती . ती आलीच होती मुळात शर्विल साठी .

शर्विल ची नजर शिवानीवर खिळून होती आणि तो खूप बेचैन झालाय हे शिवानीला पण दिसत होते आणि ती लाजत होती ..

पार्टी झाल्यावर शर्विल तिला घरी सोडायला आला .. आधी तो उतरला त्याने तिच्यासाठी कार चे दार उघडले .. ती बाहेर आली .. त्याला बाय करून निघाली तर

शर्विल " शिवानी  .. एक मिनिट "

शिवानी  चालता चालता थांबली

शर्विल तिच्या पुढे आला .. तिच्या  कपाळावर त्याने किस केले " तू खुश आहेस ना .. "

शर्विल चा प्रेम पूर्वक स्पर्श आज तिला पहिल्यांदाच झाला होता .. तिने डोळे मिटले आणि मान  हलवून त्याला सांगितले " हो ".  ती आत  निघून गेली

शर्विल तिच्याशी कसा वागतोय हे प्रथम  खिडकी  तुन पाहत होता .. .. हे पाहून प्रथम  एकदम खुश झाला .. माझ्या  बहिणीला शर्विल सारखा जोडीदार शोधून मिळणार नाही .. किती छान वागवतो  .. तो  मनोमन खुश,समाधानी झाला .

बोल बोलता लग्न दोन दिवसांवर आले .. शिवानी  च्या हातावर आज मेहंदी काढून झाली .. घरात खूप धावपळ चालू होती . एकुलत्या एका  बहिणीच्या लग्नाची   तयारी दोघे भाऊ जोरदार करत होते. मोठं मोठ्या डिझाईनर ने डिझाईन केलेला   लग्नाचा लेहंगा ऑर्डर केला  होता  .. जुलऱी घेणे चालू होते .. घरात पाहुण्यांची रेलचेल होती ..

 लग्न  एक डेस्टिनेशन वेडिंग होते त्यामुळे आज  ते लोक त्यांच्या लग्नाच्या  डेस्टिनेशन ला निघणार होते म्हणजे आजचाच दिवस फक्त शिवानी कडे होता ..

ज्या  घरात ती लहानपणा पासून राहिली होती ते घर आता तिला परके होणार होते ..  शिवानी चे डोळे सारखे भरून येत होते . दोन्ही  भावांना ती आज पाहून  घेत होती .. दोघे भाऊ सुद्धा आपली बहीण आता घरातून कायमची जाणार यामुळे मनातून थोडे दुखी होते पण कोणच कोणाला आपले दुःख दाखवत नव्हते ..

शेवटी निघायच्या  आधी प्रथम    आणि पराग   दोघे तिला भेटायला तिच्या रूम  मध्ये आले .. तेव्हा मात्र कोणालाच भावनांना  बांध घालता  आला नाही .. तिघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली ..

शिवानी  " दादा .. आई बाबांच्या पश्चात तुम्ही दोघांनी माझी आई वडिलांसारखीच काळजी घेतलीत .. एवढे प्रेम केलेत माझ्यावर कि मला त्यांची  कमी कधीच जाणवली नाही .. दादा मी नाही राहू शकणार तुमच्या शिवाय ?"

प्रथम  " अग  वेडा बाई .. तू कुठे लांब चाललीय ? आपला शर्विल लहान पणा पासून तू ओळखते त्याला ..  मुख्य म्हणजे किती काळजी घेतो तुझी .. घेतो ना ?मग आता रडायच नाही .. एक विसरू नकोस .. आम्ही दोघे तुझ्या पाठी सदैव आहोत .. "

पराग   " आणि हो शिवानी  .. लग्न जरी झाले तरी हे घर तुझेच आहे .. तू कधीही आणि केव्हाही या घरात यायचं.. आम्हाला पण आता हे घर खायला उठणार आहे .. " पराग  चे डोळे पुन्हा भरून आले

शिवानी " दादा .. मग आता मला वाहिनी आण लवकर .. "

तसे तिघे रडता रडता हसले ..

सरंजामेंच्या  च्या बंगल्यातून गाड्या निघाल्या आणि डेस्टिनेशन वेडिंग च्या इथे आल्या ..

शिवानी चे घर सुटले होते .. थोडी घाबरली होती .. आता नवीन जीवन सुरु होणार होते .. एक प्रकारची हुरहूर लागली होती तिच्या जीवाला .. आपले घर सोडून कायम साठी शर्विल ची होण्या साठी  ती घरातून निघाली होती .. भीती वाटत होती लाज येत होती .. नववधूच्या मनातली कोलाहल जशी लग्न घटिका जवळ येते तशी वाढतच जात होती .

ठरल्या प्रमाणे आणि सरंजामे आणि पटेल घराण्याला शोभेल असे डेकोरेशन आणि हळदी समारंभ दणक्यात आणि आनंदात पार पडला .

दुसऱ्या दिवशी सकाळी लग्न लागले कि शिवानी सरंजामे हि मिसेस शर्विल पटेल होणार होती .

आज त्यांचे लग्न होते ..

शर्विल राजबिंडा  दिसत होता .  मोतिया रंगाची शेरवानी त्यावर मरून फेटा .. पायात मोजडी आणि हातात तलवार .. चेहऱ्यावर नवऱ्याचे तेज ..

हातात हार घेऊन शर्विल मोठ्या हौसेने  शिवानीची वाट बघत  मंडपात उभा होता ..

तेवढयात कानात कोणीतरी त्याला काहीतरी सांगितले आणि तोच हार तिथेच कुस्करून टाकून तो तिथून तरातरा निघून गेला .

©शीतल महामुनी माने

आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा हाच तुमचा आशीर्वाद आम्हाला असे समजू.

🎭 Series Post

View all