डेस्टिनी एक प्रेम कथा भाग ६

in this part shivani and viraj gets married and stay happy forver

भाग ६

विराजने दार उघडले आतमध्ये गेला....दार उघडायच्या आवाजाने शिवानीच्या छातीत चर्र झाले.

शिवानी घाबरतच रडतच"मी सही करायला तयारआहे....माझी सगळी इस्टेट मी तुमच्या नावावर करायला तयार आहे.....मी...माझ्या दादाला घेऊन कुठेतरी लांब निघून जाईल.....पुन्हा तोंड नाही दाखवणार.....प्लिज मला.. माझ्या दादाला सोडा.....त्याला खूप लागलय.......मी पाया पडते.....”शिवानी विराजच्या पायाला हात लावते"प्लिज डॉक्टरांना बोलवा..."

विराज"शिवा.....मी वीरा.....घाबरू नकोस....मी तुला,तुझ्या भावला घेऊन जायलाआलोय....घाबरू नकोस"तिला मिठीत घेऊ लागला.

शिवानीने हात झिडकारला"हात लावू नको मला......मी तू सांगशील तिथे सही करायला तयार आहे....माझ्या दादाला काही करू नकोस.

विराज"शिवानी इट्स मी विराज.....लूक at मी."

शिवानीने घाबरतच मान वर करून बघितले......तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या...

"विराssss.....तू......."शिवानी जोराने रडायला लागली...तिच्या गळ्यातून आवाज निघत नव्हता..

“ए राजा,आता रडायचं नाही...मी आलोय...परागआहे माझ्याबरोबर...पोलिसांना घेऊन आलोय आम्ही.सगळे ठीक होईल....तू शांत हो“म्हणत तो तिच्या कपाळावर किस करू लागला....

************

"तुम्ही असं का केलेत?तुमच्या म्हणण्यानुसार सगळं सुरू होतन मग किडनॅपपिंग...?तीआता माझ्याशी लग्न नाही करणार?"   

कोणीतरी बोलत होते.पराग त्या रूमच्याबाहेर थांबून काय आणि कोण बोलतय हे ऐकू लागला.

"इडियट,मी तुला प्रेमाचं नाटक करायला सांगितलं होत जेणेकरून ती तुझ्यासोबत लग्नाला तयार होईल,तिची व तिच्या भावांची सगळी प्रॉपर्टी आपल्या नावे करून घेता येईल..पणतुला ते जमलंच नाही....तुझ्याबाकीच्या लफड्यांबद्दल तिला कळलं अन ती भर मांडवातून पळून गेली....."-ती व्यक्ती

"पण ती परत आल्यानंतर मी तिच्याशी लग्न करणार होतो,प्रथमने हे लग्न फिक्स केलं होत,मग तुम्ही त्याला का किडनॅप केला?"-

दुसरा"शटअप..माझी इतक्या वर्षांची मेहनत तू पाण्यात घालवली असतीस..म्हणून मला हे सगळे करावे लागले. तुला तुझ्या रागावर कंट्रोल आहे का?त्या हिराबाईला मारायची काय गरज होती?सगळा गोंधळ झाला.मी प्रथमला शिवानीच्या विरोधात चांगले भडकवले होते तो तिला आणायला त्या भिकारड्यामुलाच्या घरी चालला होता....त्याच्यामागे माणसे लावून जसा त्याच्या बापाला मारले ना कार ऍक्सीडेन्ट मध्ये त्यालापण मारणार होतो.तू मूर्ख तुझ्यामुळे तो अर्ध्या रस्त्यातून परत फिरला.

माझ्या माणसांनी मला लगेच अपडेट केले.त्याला तिथून पोत्यात टाकून उचलला....दोन दिवस त्याला गोदामात बांधून ठेवला होता....शिवानी घरातून बाहेर पडेना मग त्याच्या बंगल्यावर नजर ठेवली....पराग बाहेर पडला तेव्हाच तिला घरातून किडनॅप केले....आता बघ तिच्या अर्धमेल्या भावाला बघून कशी सही करते बघ ती...."

पहिला माणूस"त्या हिराबाईने मला ड्रग्स घेताना पहिले,माझे फोन वरचे बोलणेपण ऐकले.मी वॉशरूम मधून बाहेर येईपर्यंत ती माझ्या टेबलवरची फाईल,CDघेऊन पळाली....

दुसरा माणूस"काय?इडियट?ती फाईलआणि CDहरवलीस का तू?"

पहिला"होना...साली म्हातारीने कोणाला देऊन मेली काय माहित?"

दुसरा"फाइलचे माहित नाहीपण मरायच्या आधी प्रथमला फोनकरून सांगून मेली ती...म्हणूनतर प्रथम लगेच माघारी फिरला"

पहिला”शिवानीपण माझी,तिची प्रॉपर्टीपण माझी"

दुसरा"घाई करू नकोस.....अजून बरेच काम बाकी आहे....प्रथम,पराग दोघांचा ऍक्सीडेन्ट करायचा म्हणजे त्यांच्या नावावर असलेली प्रॉपर्टीची एकमेव मालकीण शिवानीअसेल.एकदा का असे झाले कि शिवानीपण तुझी आणि तिची प्रॉपर्टीपण तुझी."

पहिला”डॅड....आय लव हर....तिला मारूया नको..."

दुसरा"बरं बाबा.....तिला जिवंत ठेवू जोपर्यंत तुझे मन भरत नाही तोपर्यंत..."

 परागने हे सगळे ऐकले.

**************

विराजने प्रथमच्या चेहऱ्यावर गार पाणी शिंपडले..प्रथम शुद्धीत येऊ लागला.

शिवानी"दादा..हा विराज आहे..आपल्याला सोडवायला आलाय तो"

विराज"शिवानि हे कायआहे?कोणआणि का करतय सगळे?तुझ्या जीवावर का उठलेत हे लोक....तू का...."

शिवानी"सांगते....अगदी पहिल्या पासून सांगते

नवीन संसाराची स्वप्न उराशी बाळगून मी शर्विलबरोबर लग्न करण्यासाठी माझे घर सोडले.मनातून खूप खुश होते.....शर्विल सारखा प्रेमळ,काळजी घेणारा,मला समजून घेणारा साथीदार मला लाभला म्हणून मीअंबेमातेचे मनोमन आभार मानत होते..प्रथमदादा,परागदादा किती करत होते लग्नसाठी...सगळे खुश होते.मी मनोमन माझ्या सुखी संसाराची स्वप्न पाहत होते.

उद्या लग्न होणार या विचाराने माझी झोप गेली..झोप येईना म्हणून बाहेर गॅलरीत आले..तर... मला कसलातरी आवाज आला..कोणीतरी कुजबुजतंय..तोआवाज शर्विलचा होता.मी जरा पुढे होऊन वाकून बघितले तर हो शर्विलच..शर्विल त्याच्या मित्रा बरोबर..कारच्या बोनेटवर त्याचा मित्र ड्रग्स काढून त्याला देत होता...माझ्यासमोर शर्विलने त्याच्या नाकात ते टाकले अगदी सराईत असल्यासारखा..

त्याचा मित्र बोलत होता"साल्या शनाया को भी ऐसेही फसाया ना तुने...साले..चिकने चेहरेका बराबर फायदा उठताहै रे तू?"

शर्विल"मार दिया सालीको..मुझे ब्लँकमेल करने लगीथी वो शनाया!ऊसदिन पार्टीमें मुझे धमकी दे रही थी..कि मैं जाके तेरीअसलीयत शिवानीको बताऊंगी..फिर क्या करता उसे मरनाहि पडा....शिवानीकि बातहि अलग है..ऐसा फुल है जिसको कब सुंगलू ऐसा हुआ हैं...शी इज सो हॉट..कैसे शरमाती है.....मेरी जान जाती है"

मित्र"ओयहो...जाएगी कहा...अबतो तेरे बाहोमे जल्दीही आयेगी.तेरा मन भरगया कि मेरे पास भेज देना.माल एकदम कडक है"

शर्विलने रागाने त्याची कॉलर पकडली"साले..शिवानी मेरी है."

मित्र"साले..आगया अपनी औकातपे..भूल गया क्या....शनायाकि बॉडीको ठिकाने लगानेमे क्याक्या मदत कि है"

शर्विल"हा तो ठीक है..उसके कितने पैसे चाहिये वो बोल....शादीके बाद  मै बहुत मालदार बनने वाला हूं..शादीके बाद शिवानीभी मेरी और उसकी प्रॉपर्टीभी मेरी....फिर उसके भाई है ना....मैं ऊन दोनोंको मार दूंगा....तो सौ करोड किअकेली मालकीन शिवानी होगी..."

मित्र"साले आजतक जोभी किया मिलकर किया....मुझे कमसेकम १ करोड तो दे दे."

शर्विल"ठीकहै..शादीके बाद देदूंगा..भिकारी रो मत"

शर्विलच्या तोंडातून सुटणारे एकेक शब्द मला जिव्हारी लागत होते..मी खूप घाबरले..माझ्याशी प्रेमाचं नाटक करतोय हे समजून चुकले होते.मी पहिले दादाला फोन लावला..दादा म्हणला शर्विल मित्रांना बॅचलर पार्टी देतोय त्यातच तो बसलाय....आवाजावरून असे वाटले कि तो शुद्धीत नाहीये...मी परागदाला फोन केला तर परागदादा काहीतरी वस्तू राहिली म्हणून आणायला गाडी चालवत होता.त्याच्याबरोबर शर्विलचे मित्र होते..त्याच्याशीहि बोलता आले नाही..माझ्या पायाखालीची जमीन सरकली होती.शर्विलचे एकेक शब्द माझ्या मनावर घाव करत होते..हे लग्न काही करून थांबवावे लागणार होते....शर्विल चे मनसुभे पूर्णन होण्यासाठी हे लग्न न होणे हा एकच मार्ग दिसत होता..

रात्रीचे१२वाजून गेले होते..मीरात्रीत पळून जाऊ शकत नव्हते..मी सकाळ कधी होतेय त्याची वाट बघत होते.

प्रथमदादा,परागदादा याच्या अवतीभोवती शर्विलने त्याचे मित्र..मित्र कसले गुंड ठेवले होते..सगळ्या खबऱ्या त्याला मिळत होत्या...मलाही पळायला चान्स मिळत नव्हता..शेवटी मी लग्नाचा ड्रेस अंगावर चढवला....मेकअप वाली मला मेकअप करू लागली..एकेक दागिना माझ्या अंगावर चढत होता मी आतून तुटत होते..मला घाबरलेली बघून दादाला वाटले मी घर सोडून जाणार म्हणून दुःखी आहे..त्यानेपण दुर्लक्ष केले...शेवटी मंडपात जायची वेळ आली.शर्विलचे मित्र स्टेजवर शर्विलबरोबर होते..मी हॉलच्या मागच्या दारातून कशीतरी बाहेर पडले......बाहेर चालतआले,एका रिक्षेत बसले.....त्याला म्हटले मला इथून कुठेतरी लांब....लांब सोड.....त्यारिक्षेवाल्याने मला त्या टेकडीच्याजवळ सोडले..

शर्विलचे ते रूप बघून हादरले होते....वाटले मी मेल्यावर शर्विल भावांना काही करणार नाही,माझी सगळी प्रॉपर्टीपण माझ्या भावांकडे राहील..निर्धार केला...या टेकडीवरून खाली दरीत उडी मारायची..

पण नशिबात काही वेगळेच होते..मला वाचवायला विराज तिथे आला.....माझे आयुष्यच बदलले..विराजने मला पुन्हा स्वप्न बघायला शिकवले...विराज ने मला घराचा आसरा तर दिलाच पण खरं प्रेमपण आयुष्यात असते..पैशा शिवायहि माणूस सुखी राहू शकतो हे शिकवले..

बोलताना शिवनीच्या डोळ्यांत भीती,अश्रू वाहत होत.ती कोणत्या महासंकटाचा सामना एकटी मोठ्या धीराने करत होती हे तीच तिलाच माहित होते.नकळत का होईना विराज ने त्याच्या प्रेमाने फुंकर घालून तिच्या जखमा बऱ्या केल्या होत्या.

विराज"शिवानी तू काळजी करूनको,शर्विलच्या विरोधात पुरावे मिळाले आहेत.त्याला,त्याच्या वडिलांना आता लवकरच अटक होईल..

*************

पराग"वा....अंकल....वा.....खूप चांगले नाटक केलेत तुम्ही......अंकल माझ्या वडिलांचे मित्र बनून त्यांचा केसाने गळा कपलात....माझ्या आईबाबांचा ऍक्सीडेन्ट केलात तुम्ही...अंकल.....किती लहान होतो आम्ही तिघे....शिवानी तर फक्त ५ वर्षांची होती..तिला पोरकी केलीत तुम्ही.....

तेवढयात शर्विलने त्याला मागून ओढले"तुझ्या भावाला,बहिणीलातर वरती पोहचवलेचआता तुझी बारी.....शर्विलने परागचा गळा पकडला.....पराग एकेक श्वासासाठी तडफडू लागला.

 शर्विल"ह्याला नरकात पाठवायची वेळ आलीय "

तेवढयात विक्रम दारात पुस्तूल शर्विलवर रोखून"सोड त्याला..नरकाततर आता तुम्ही बापलेक जाणार आहेत.. सोड त्याला"

पोलीस आलेले बघून शर्विलने त्याला खाली ठेवले आणि पळायला लागला..

*********

विक्रमने शर्विलच्या माणसांना अटक करून घेतली.शर्विल,त्याचे वडीलहि  ताब्यात होते.

"दादा,हे काय झालं?दादा...शिवानी तू ठीक आहेस न..काय हालत केली माझ्या फुलासारख्या बहिणीची..."-पराग.

शर्विलला समोर बघून शिवानीच्या मस्तकाची आग तळपायात गेली.वीज संचारल्यासारखी पुढे गेली शर्विलची कॉलर पकडून"बघितलेस..विजय नेहमी सत्याचाच होतो.....लहानपणापासून एकत्र खेळलो....अंकल मी तुम्हला डॅडच समजत होते...लाज वाटली नाहीअसे आमच्याशी वागताना.

विराज पुढे गेला"सोड त्याला..त्याचे काय करायचे ते पोलीस बघतील ...त्याच्या विरुद्धचे सगळे पुरावे पोलिसांना दिलेत मी..."

शिवानीने शर्विलला कानाखाली मारली"जा मर.....माझी बद्दूवाआहे तुला.....तुझे तोंड पण दाखवू नकोस"

पराग"दादा,अंकलनेआईबाबांनापण मारले.."

प्रथम "हो ते कळलं मला हिराबाई कॉल करून सांगत होत्या"

पराग”अंकल जो बिझनेस रन करत होते तोपण  डॅडचाच आहे....डॅड महिनाभर भारतबाहेर जाणार होते म्हणून पॉवर ऑफ ऍटर्नी अंकलच्या नावाने करून गेले होते..अंकलला वाटले सगळी प्रॉपर्टी त्यांना मिळेल.डॅडनीं अर्धी प्रॉपर्टी तिघांच्या नावावर आधीच करून ठेवली होती म्हणून हि प्रॉपर्टी वाचली.सगळी प्रॉपर्टी त्यांना पाहिजे म्हणून तिघांना मारणार होते.

पोलीस त्या दोघांना घेऊन गेले..

शिवानी,प्रथमला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले.दोनएक दिवसांनी शिवानी,प्रथम बरे झाले.विराज स्वतःतिची काळजी घेत होता..

विराजचे घरातले शिवानीला बघायला हॉस्पिटलला आले.

विराजच्या आईने शिवानीच्या डोक्यावर हात फिरवला..मायेन चौकशी केली..शिवानी हक्कानी आई म्हणून विराजच्या आईच्या कुशीत गेली.प्रथम,पराग दोघांचे डोळे पाणावले.लहानपणापासून शिवानी या आईच्या मायेसाठी तरसली होती..

***********

विराजला नोकरी नाही?इतका स्वाभिमानी कि शिवानीच्या कोणत्याही कंपनीत काम करायलाही तयार नाही..

पराग"अरे पण तू नोकरी करायला पाहिजे असे काहीनाही..शिवानीच्या नावावर आलरेडी ३ कंपनी आहेत.शिवानी तू जरी लग्न झाले तरी काम सोडू नकोस...तू यातिन्ही कंपनीची MD म्हणून रुजू हो..तोपर्यंत विराजला त्याचे जे स्वप्न पूर्ण करायचेय ते पूर्ण करूदे..

आई"हो नक्कीच.एवढी शिकलेय ती..तिने नक्कीच तिच्या या जवाबदाऱ्या स्वीकाराव्या असे मलाही वाटते...

प्रथम "हो पण तुझे नक्की काय स्वप्न आहे ते तरी सांग"

विराज"मी IPSची परीक्षा दिलीय..बघूया पास होतोय का ते?"

प्रथम"मग ठीक आहे....सिलेक्शन नाहीच झाले तर दोघांनी तुमचा बिझनेस सांभाळा...काही लागले तरआम्ही आहोतच"

शर्विल,अंकलला जन्मठेपेची शिक्षा झाली.हिराबाईंचा खून..शनायाचा खून, प्रथमच्या आईवडिलांचा ऍक्सीडेन्ट असे चार्जेस त्यांच्यावर लागले.

शिवानी,विराजचे प्रथम,परागने धुमधडाक्यात लग्न लावून दिले.

लक्ष्मीच्या पाउलांनी शिवानी विराजच्या घरात खरी पत्नी बनून आली.फुलांच्या वर्षावात शिवानीचे विराजच्या घरात स्वागत झाले..छतावरची त्यांची रूम जिथे त्यांनी त्यांच्या आयुष्याचे सोनेरी क्षण सोबत घालवले होते,त्यांचीआवडती जागा सजवलेली होती.खऱ्यार्थाने आज त्यांच्या वैवाहिक जीवनाची सुरूवात होणार होती..

विराजने खोलीचे दार बंद केले...विराजने तिला मागूनच मिठी मारली.

विराज"शिवानी..तू माझ्या नशिबात आलीस आणि माझे नशीबच बदलले ग..सगळे छान होतंय..थँक्स फॉर कमिन्ग इन माय लाईफ"

शिवानी"ए..यु आर माय डेस्टिनी....अंबेमातेने तुला माझ्यासाठी पाठवलंय...तिनेच आपल्या दोघांना भेटवलंय .."

विराज"माझ्या बरोबर हनिमूनला येणार का?"

शिवानी"पण..तू तर म्हणालास कि तुला जोपर्यंत नोकरी लागत नाही तोपर्यंत आपण...

विराजने तिच्या ओठांवर बोट ठेवले..

विराज”तू  इतक्या जवळअसलीस तर मी काय बोललो मला नाही आठवत.”तो तिच्या कानाशी कुजबुजला..

“आपल्या नात्याला पुढे न्यायला तयार आहेस?"...तो तिच्या खांद्यावर हनुवटी ठेवत कानात हळूवार बोलला...

"I loveyouVira”....ती वळतच मिठीत शिरली.

विराज-“मी IPSपरीक्षा पास झालो,सिलेक्शन झालंय माझं"...तो शिवानीच्या डोळ्यात बघत बोलला..तिच्या गालावर किस केल.

शिवानी"खरंच?तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते....

"अरे माझी अलकाकुबल..my sweetheart,तू एका IPSऑफिसरची बायकोआहेस."..त्याने तिला मिठीत घट्ट ओढून घेतले.

https://www.youtube.com/watch?v=i41V8FoZYZI&ab_channel=ishwaripati

 (लिंकक्लीककरूनगाणेऐका)

पुढेकाय सगळाआनंदीआनंद.नैनितालला मस्त हनिमूनला गेले.नवीन आयुष्याला सुरुवात केली.

शिवानी,वीराची प्रेमाची डेस्टिनी त्यांना मिळाली.कर भला तो हो भला

समाप्त!!

©शिल्पा सुतार

🎭 Series Post

View all