डेस्टिनी एक प्रेम कथा भाग २

In this part shivani runs away from marriage

डेस्टिनी एक प्रेम कथा

भाग २

क्रमश : भाग १

आकाश स्वच्छ  निळाशार,नजर जाईल तिथवर हिरवीगार  छोटी मोठी पहाड पसरली होती जसे काही सृष्टीने हिरवा शालू पांघरला आहे.कुंकू लाल रंगाचा फुल डायमंड वर्क केलेला घागरा,लाल प्लेन ओढणी त्याला हेवी डायमंड वर्क असलेली बॉर्डर डोक्यावरून घेतली होती,मेहंदीच्या  हातात डायमंड सोन्याचे जडाऊ कड्यांमध्ये अधून मधून डोकावणाऱ्या काचेचा बांगड्या,फुलांनी वेढलेला केसांचा आंबडा,अंगावर हेवी दागिने,एका मोठ्या  पहाडावर नववधूच्या रुपात  डोळ्यात अश्रू,ती उभी  होती.पुढे पाऊल टाकणार तेवढयात  मजबूत हातांनी तिचा हात पकडत तिला जोरात स्वतःकडे ओढले.अचानक झाल्यामुळे ती त्याच्या छातीवर जाऊन आदळली.त्या स्पर्शाने घाबरत ती भीतीनेच डोळे वर करत त्याच्याकडे बघायला लागली..

"त....तू ???"...ती 

"ओळखपत्र दाखवायला वेळ नाहीये आता"...त्याने तिचा हात घट्ट पकडला आणि तिला घेऊन पळू लागला. तिला घेऊन पळत होता तसे त्याला दोन धिप्पाड माणसं तिचा  पाठलाग करताना  दिसले. आजूबाजूला बघत त्याने तिला एका खडकाच्या मागे ओढत  दोघंही लपले.

"तू........को...."..ती

"अगं बाई,थोड्या वेळ शांत राहशील,ते लोकं बहुतेक तुलाच शोधत आहेत"...त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला.ते 10मी तसेच उभे होते.वारंवार त्याची नजर तिच्या हिरव्या डोळ्यात हरवत होती,काहीतरी कनेक्शन त्याला जाणवत होते.तिच्या डोळ्यातले पाणी त्याला नकोसे वाटत होते. 

"काय करत होती तिथे??"..तो

"तू कोण??काय करत होता तिथे?"...ती

"आत्महत्या करायला आलो होतो"...तो

"मग करना,माझ्या मागे का पडला आहेस?"..ती

"स्वर्गात जायची सोय करतोय, गुंडांपासून मुलीला वाचवणे पुण्याचे काम असते, ते करतो आधी"..त्याने तिचा हात ओढला आणि झाडा झुडपातून वाट काढू लागला.

"अगं फास्ट,मी बॉलिवूडचा सलमान दिसतो काय तुला,ढीश्युं ढीश्युं करायला,बघितले नाही काय ते सांड??"..तो

पळत  रेल्वेस्टेशनला एक ट्रेन  दिसली, दोघेही त्यात चढले...त्याने सुटकेचा श्वास सोडला.

"ती लोकं तुझ्या मागे पडली होती, इतका माल"...तो

"माल?"...ती

"एकटी बाई खुली तिजोरी असते बाई ग आणि हे इतके दागिने घालून हिंडतियेस,चोर मागे पडणारच ना?"

ट्रेनमध्ये  लोकं तिच्याकडेच  बघत होते.तिला अवघडल्यासारखे वाटत होते.त्याच्या ते लक्षात आले आणि तो तिच्या पुढे येऊन उभा राहिला.

शिवानी  मांडवातून  पळत तिथे पहाडावर पोहचली होती.जे तिने बघितले ऐकले होते,सगळं आठऊन तिच्या डोळ्यात अश्रू दाटत होते.ती पडणारच होती की त्याने तिला वाचवले होते.

शर्विल आणि शिवानीचे भाऊ तिला शोधण्यात आकाशपाताळ एक करत होते,पण ती तिथून पळून जाण्यात यशस्वी झाली होती.

आता संध्याकाळ झाली होती.ट्रेन थांबली तसे ते उतरले.जवळच एक बीच होता, दोघेही तिथे येऊन बसले. थोड्या वेळ दोघंही शांत त्या अथांग समुद्राकडे बघत होते.

"कुठे सोडू तुला??तुझं घर?"..तो

"घरी नाही जायचं"..ती  

"काय?Oh I see,बॉयफ्रेंडने धोका दिला तर?तुम्ही मुली ना खूपच बावळट असता,कुणावरही विश्वास ठेऊन बसता. आता ना घरी जाऊ शकत,ना अजून कुठे"...तो   

त्याचं बोलणं ऐकून तिच्या डोळ्यात पाणी साचत होते.तिला लग्नाच्या आधी घडलेले सगळे आठवायला लागले होते. 

"अगं बाई रडू नको,या समुद्राला पुर यायचा नाही तर"त्याने त्याच्या खिशातला रुमाल काढत तिच्या हातात दिला.

"आत्महत्या करायला  रुमाल सगळं घेऊन गेला होता?

"तू नाही काय मनीष मल्होत्रा घालून गेली होती उडी मारायला,माझा एक रुमाल जड झाला होय ग तुला?

ते ऐकून  ती खळखळून हसायला लागली.तिला हसतांना बघून त्याला खूप समाधान वाटले.खूप वेळ विचार करून शेवटी त्याने काही ठरवले.

"माझ्याशी लग्न करशील?"

"काय???"

"अग खोटं लग्न,हे बघ तुला इथे एकटी सोडू शकत नाही, घरी न्यायचे म्हणजे काहीतरी ठोस कारण हवे.आम्ही मिडलक्लास लोकं,खूप सांभाळून वागायला लागते या समाजात"म्हणत त्याने तिला त्याचा सगळा प्लॅन तिला समजाऊन सांगितला.

शिवानीचे तिच्या घराशिवाय कोणीच ओळखीचे नव्हते, ही सगळी दुनियाच तिच्यासाठी अनोळखी होती,त्यात पहिल्यांदाच ती एकटी घराबाहेर पडली होती,त्यामुळे खूप भांबावली,गोंधळली,घाबरली होती .जायचे कुठे हा तिच्यासाठीसुद्धा मोठा प्रश्न होताच.जेव्हापासून एकटी होती,त्याचीच तिला साथ मिळाली होती,गेल्या चारपाच तासांपासून तो तिला वाचवण्याचा प्रयत्न करत होता.इतर कोणावर विश्वास ठेवण्यापेक्षा तिला त्याच्यावर विश्वास ठेवणे योग्य वाटले आणि तिने त्याचा प्लॅनसाठी होकार दिला.

आता अंधार पडत आला होता. दोघंही त्याच्या घरी पोहचले.

"आजी काका आलाsss"एक सहा वर्षाची मुलगी ओरडली.

"विरा तिथेच थांब, अजिबात घरात पाय ठेवायचा नाही."..आई

"आई,अग ऐकून घे"...तो

"मनात यायचे तसे वागायचे,किती शोधतोय रात्रीपासून,फोनपण  उचलत नव्हता"...आई

"सॉरी,फोन घरीच होता,खूप महत्वाचं काम आले होते"तो

"आता घराबाहेरच रहायचं,अजिबात आता तुला पाठीशी घालणार नाही,मनासारखं वागायच नेहमी,आमचा जीव टांगणीला लाऊन जातो,तुझ्यामुळे सगळी बोलणी मला खावी लागतात"....आई,तिच्या पाठोपाठ घरातील सगळे दाराजवळ आले.एकएक करत सगळे त्याला बोलतच होते की शिवानी त्याचा बाजूला येत उभी राहिली.बोलता बोलता सगळे अचानक थांबले आणि डोळे विस्फारून शिवानिकडे बघत होते.

"हे काय??तू लग्न....??"..आई

"हो,आम्ही लग्न केलेय,आमचं प्रेम आहे एकमेकांवर"....तो

त्याने असे सांगितल्यावर त्याला सगळ्यांची भरमसाठ बोलणी खावी लागली.सगळे त्याला रागावतात आहे बघून शिवानी च्या डोळ्यात पाणी साचायला लागले.त्याच्या आईचे तिच्याकडे लक्ष गेले तसे त्यांनी सगळ्यांना शांत केले.खूप विचारपूस केली,सगळ्यांना पटण्यासारखे नव्हते,पण घरचा मुलगा सोबत सून त्यांना घराबाहेर काढणे आईवडिलांना योग्य वाटले नाही,बाहेर जास्ती तमाशा नको म्हणून घरतल्यांनी त्या दोघांना घरात घेतले.शिवानी घाबरून त्याच्या मागेमागे लपत होती.

"नाव काय?"....आई

"च्यायला बायको बनविली,पण नावसुद्धा विचारले नाही,एखाद्या  राणी सारखीच दिसतेय"तो तिच्याकडे बघत विचार करत होता.

"राणी/शिवानी"..दोघंही एकसाथ बोलले.

"मी प्रेमाने राणी म्हणतो"सगळे अजब नजरेने  त्यांच्याकडे बघत आहे बघून त्याने विषय सांभाळला.

"आईवडील??"...बाबा

"शिवानीचे आईवडील नाहीये"....तो,ते ऐकून सगळ्यांना वाईट वाटले.

तर हा आहे विराज जोशी, सहा फूट,गव्हाळगोरा रंग, नाकिडोळी खूप ॲट्रॅक्टिव्ह,शरीरयष्टी व्यायामाने एकदम कसलेली,एखाद्या सोल्जरसारखा,खोडकर,मनमिळाऊ, हॅप्पीफेलो,एक माध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा,त्याच्या एका मोठ्या स्वप्नाच्या मागे लागला होता, सध्याचा बिनपगारी.

वडिलोपार्जित चार खोल्यांचे  चाळीस वर्ष जुने घर,समोर छोटे फुलाझाडांनी सजलेले अंगण,आई,वडील,दोन मोठे भाऊ,त्यांच्या बायका,एक लहान बहीण,भावांची मुले,असे नात्यांनी भरलेले,जेमतेम खाऊनपियुन सुखी घर.

"आवरून घ्या,जेवायला या, वाट बघतोय"...आई त्या दोघांना एका बेडरूममध्ये घेऊन जात बोलल्या.

"ये माझी अलका कुबल,आता तरी हस बाई,भेटलिये तेव्हापासून फक्त रडतियेस"....तो,त्यावर तिला हसायला आलं,तिने अलगद आपले डोळे पुसले.

"विरा,कपडे???"...ती

"विरा???इतक्या वेळ सोबत आहोत पण साधं एकमेकांचे नावसुद्धा विचारले नाही की आपली नीट ओळख सुद्धा नाही,अन् नवराबायको झालोय,ग्रेट ना...."तो स्वतःवरच हसला.

"येssss शिवानी.....मी विराज,फ्रेंड्स??"...त्याने फ्रेंडशिपसाठी हात पुढे केला.तिने हसतच त्याची फ्रेंडशिप कबूल केली.

" बरं थांब,मी विशू कडून तुझ्यासाठी ड्रेस घेऊन येतो"....तो,......बहिणी जवळून शिवानीसाठी ड्रेस आणून दिला.

सकाळपासून फक्त भागमभाग सुरू होती,थकले तर खूप होते,जेवण करून हॉलमध्ये आई,बाबा, विशू सोबतच विराज, शिवानी झोपी गेले.शिवानी कधीच खाली झोपली नव्हती,बऱ्याच वेळ तिला झोप येत नव्हती.सकाळपासून दिवसभर इतके काही घडून गेले होते,आणि अचानक हा नवीनच परिवार, सगळंच तिच्या कल्पनेच्या बाहेरच होते.देवाने काय लिहून ठेवले आहे नशिबात,ते बघायचे होते .

सगळ्यांच मन खट्टू झाले होते,पण नवीन सूनबाई सगळ्यांच्याच मनात भरली होती,ती दिसायला सुंदर तर होतीच,तिच्या स्वभावाने ती शांत,लोभस होती.चारपाच दिवस असेच कौतुक करण्यात गेले.

मोठ्या भावजयीला हे सगळं थोडे खटकत होते,घरात कमावते दोघं,वडिलांची फक्त पेन्शन होती,खाणारे दहा तोंड,त्यात आता अजून एकाची भर झाली होती.शिवाय घरात राहण्याचा प्रश्नसुद्धा निर्माण झाला होता.दोघांना रहायला वेगळी रूम घरात नव्हती.दोन बेडरूम दोन मोठ्या भावांची, हॉलमध्ये आई,बाबा,बहीण असे सगळे झोपणार होते,शेवटी रात्री झोपायला किचन त्यांच्या नशिबात आले.वेगळे झोपले तर घरात डाऊट येणार होता,त्यामुळे त्यांना सोबत असण्याचे नाटक तर करावेच लागणार होते.सुरुवातीला त्या दोघांना खूप अवघडल्यासारखं होत होते, जागा पण कमी होती,त्यात निभावून घेणेच सध्यातरी महत्वाचे आहे हे दोघांनीही समजून घेतले होते.आतापर्यंत तिने जेवढे विराजला ओळखले होते त्यातून तरी तो खूप संस्कारी आणि बायकांचा मानपान जपणारा होता.

"सॉरी,शिवानी...तुला या सगळ्यांची सवय नसेल ,पण आमचं असेच आयुष्य आहे"....तो

"घर माणसांनी बनते,मला तुझ्यामुळे घर मिळाले आहे,प्रेमळ परिवार मिळाला आहे,नको काळजी करू,होईल हळूहळू सवय"...ती

"विरा,मी घरीच लहान मुलांचे ट्यूशन क्लासेस घेऊ काय?"..ती

"कोणी काय बोललं काय?"..तो

"नाही रे,पण मलाच बरे नाही वाटत आहे हे असे आयते खाणे.आपली घरची मुलं आहेतच सोबत आजूबाजूची काही आहेत,माझा विरंगुळासुद्धा होईल"....ती

"तुला जे आवडते ते कर,तुला जॉब वैगरे करायचा असेल तर ते सुद्धा करू शकते तू"....तो

"नाही नको,मी घरीच काही करते"..तिला घराबाहेर जाण्याची खूप भीती वाटत होती.

"Okay".... तो

दोघंही किचनमध्ये छोट्याश्या जागेत एका गादीवर भिंतीआड झोपले होते,आणि गप्पा करत होते.तेवढयात विरजला कोणाची तरी येण्याची चाहूल लागली,त्याने लगेच शिवानीला ओढत स्वतःच्या मिठीत घेत लपवले आणि डोळे मिटले...हे सगळं एवढ्या लवकर झाले होते की शिवानीला काहीच कळले नव्हते,ती काही बोलणार तेवढयात तिला वहिनी किचनमध्ये येतांना दिसली,तिने चुपचाप डोळे मिटले.

दोन्ही वहिनींना विराजने बोलतांना ऐकले होते,हे दोघं नवराबायको सारखे अजिबात वागत नाही,म्हणून त्याने तिला जवळ घेतले होते.

विराजचा पहिल्यांदा असा स्पर्श तिला झाला होता.तो तिला आपल्या छातीशी पकडून झोपला होता.त्याचे हार्टबिट्स तिला स्पष्ट ऐकू येत होते,ते ऐकून तिचे हृदय जोराने धडाधायला लागले.त्याच्या स्पर्शाने एक वेगळीच भावना तिला जाणवत होती,एक आपुलकी होती त्याच्या स्पर्शात जी तिला शर्विलच्यासुद्धा स्पर्शात जाणवली नव्हती.त्याची ती मिठी तिला सगळ्यात सुरक्षित जागा वाटत होती.ती निर्धास्तपणे त्याच्या मिठीत विसावली होती.

वहिनी गेल्यावर त्याने सुटकेचा श्वास सोडला,हात काढणार तेवढयात त्याला जाणवले,शिवानी त्याच्या हातावर,टीशर्टची कॉलर पकडून झोपली होती.तिचे काही रेशमी केस तिच्या चेहऱ्यावर आले होते,त्याला तिला बघण्याचा मोह झाला होता,त्याने अलगदपणे केसं तिच्या कानामागे अडकवले, तसं तिच्या ओठांवर गोड हसू पसरले,ते बघून त्याचेपण ओठ रुंदावले.झोपेत ती खूप निरागस दिसत होती. त्याला माहिती होते तिला सहजासहजी झोप येत नाही,आज ती खूप शांत दिसत होती,खूप दिवसांनी ती गाढ झोपली होती.तिची झोपमोड होऊ नये म्हणून त्याने त्याचा हात तसाच ठेवला,खूप वेळ एकटक तिच्या चेहऱ्याकडे बघत कधीतरी त्याचा डोळा लागला.

शिवानी  ने लहान मुलांची ट्युशन क्लास सुरू केले होते.तिच्या गोड आणि लोभस स्वभावामुळे तिच्याकडे बरीच मुलं शिकायला येत होती.हातात बऱ्यापैकी पैसे येत होते.ती ते सगळे आईजवळ देत होती.विशूला सुद्धा ती अभ्यासात खूप मदत करत होती,दोघींची खूप चांगली मैत्री झाली होती.घरात सगळेच तिच्यावर खुश होते.घरकामात मात्र तिची खूप फजिती होत होती.त्यावरून दोन्ही वहिनी तिला टोचून बोलत होत्या.तिला असे ऐकायची सवय नव्हती,लगेच तिच्या डोळ्यात पाणी यायचे.आई,विशू,विराज तिला सांभाळून घ्यायचा.हळूहळू ती घरातील कामं शिकायला लागली होती.

"आई शिवानीची काळजी घेशील,मी चार दिवसात परत येतो"...विराज

"विराकाका तू काळजी नको करू आम्ही काळजी घेऊ छोटयाकाकुची"...मयु चिऊ ,सगळे हसायला लागले.

"हो रे लबाडा.....नीट दे परीक्षा"...आई

"येssss शिवानी,अलका कुबल माझी फेवरेट नाही ग बाई"...तिच्या नाकावर बोटाने मारत तो बोलला.तिने त्याला गोड स्माईल दिले.सगळ्यांना बाय करत तो बाहेर पडला.

"कुरिअर".... कुरिअरबॉयने आवाज दिला, त्याने एक लिफाफा शिवानीच्या हातात दिला.

घरातले सगळेच टेन्शनमध्ये आले होते. आई ची तर रडून खराब हालत झाली होती,बाबा शून्यात नजर लावून बसले होते.

क्रमशः

**

© मेघा अमोल

**

आवडल्यास लिंक  शेअर आणि  लाईक जरूर करा .. आणि हा भाग कसा वाटला हे कंमेंट्स मध्ये सांगा.

पहिल्या भागाची लिंक

https://www.irablogging.com/blog/destiny-ek-prem-katha_5156

🎭 Series Post

View all