मी सामसूम रस्ता बोलतोय

feelings of Deserted road's are expressed in story

मी शाळेसमोरचा रस्ता बोलतोय,शाळा सुटताना आणि  भरताना लहानग्यांची गर्दी मला तुडवत जायची,त्यांच्या उड्या मला असंख्य वेदना द्यायच्या,वाटायचं कधी माझा हा त्रास संपेल.वर्ग सुरू असताना जी काही थोडीफार विश्रांती मिळेल तेवढंच काय ते समाधान पण त्यातही मधल्या सुट्टीत खाऊसाठी मुलं गर्दी करायचे,अधूनमधून गाड्या,फेरिवाले,इतर लोकही असायचे.शाळा सुटायच्या अर्धा तास आधीच पालकांनी केलेली गर्दीही नकोशी वाटायची.कोरोना आला आणि शाळा बंद झाल्या.आता मी सुमसाम झालोय.आज मी एकटा आहे,मग मला आनंद का होत नाहीये?जी गर्दी मला नकोशी वाटायची ती आता हवीहवीशी वाटतेय,मुलांच्या आनंदाच्या उडयांच्या वेदना मला पुन्हा हव्या आहेत.मला तो मुलांचा गलबलाट,ती मस्ती,तो आनंद,ते क्षण पुन्हा हवे आहेत. मला सामसूम न राहता पुन्हा गजबजायचं.