माया आणि मीहीर नवीन लग्न झालेले, दोन महिन्याचा संसार... अचानक मीहीरचा अपघात होतो, त्याच्या डोक्याला मार लागतो आणि तो कोमात जातो, डॉक्टरांचे म्हणणे असते की,तो बरे व्हायचे चान्स खूप कमी...
बघता बघता सहा महिने निघून जातात पण त्याच्यात काहीच सुधारणा दिसत नाही, माया पूर्णपणे खचून जाते, कोणाशीच बोलत नाही, कोलमडून जाते... सतत विचारात असते...
तिचे सासू सासरे, आई बाबा एक दिवस तिला समजवायला येतात, त्याचं म्हणणं असते तिने दुसरे लग्न करावे पण ती अजून सावरली नसते या धक्क्यातून.. त्याचं ऐकून ती एकदम भानावर आली आणि म्हणाली, आग आई सात जन्म साथ देण्याच वचन दिलंय आम्ही आणि मी हि साथ अशीच सोडून देऊ, नाही.....माझा आतला आवाज सांगतोय एक छोटा प्रकाश दिसतोय मला सगळं नीट होईल....
तिने लगेच डॉक्टरांशी बोलुन पुढल्या हालचाल करायला सुरवात केली... काय आणि कसे प्रयत्न करू..?
एकटीच जाऊन ती बोलत असे... मीहीर सोबत गप्पा मारायला सुरुवात केली.. सुरवातीला तो काहीच रिस्पॉन्स देत नव्हता.. ती रडायची... पण तिने हिम्मत हारली नाही,अखेर तीच्या प्रयत्नांना यश आले आणि हळू हळू सुधारणा होऊ लागली... मीहीर हालचाल करू लागला, डोळ्यानेच हो- नाही असे बोलू लागला पण तो कोणालाच ओळखत नव्हता, तरीही तिने तिचे प्रयत्न सुरूच ठेवले... "देर है पर अंधेर नही..." म्हणतात ना तसेच झाले बघता बघता वर्ष झाले...हळूहळू तो ओळखू लागला... त्याच्यामध्ये झालेली सुधारणा पाहून डॉक्टर पण म्हणाले... शेवटी एक सावित्री आपल्या सत्यवानाला वाचवते हे काही खोटे नाही.. आम्ही अाशा सोडली होती... पण एका स्त्रीने मनात आणले तर ती काहीही करू शकते... आणि तुम्ही हे दाखवून दिलेत.... सगळ्यांना आनंद होतो... मीहीर नव्याने तीच्या प्रेमात पडतो.. अन त्यांच्या आयुष्याची नवीन सुरुवात झाली....
साहित्य चोरी हा गुन्हा आहे.
सदर कथेच्या प्रकाशनाचे,वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे ह्याची नोंद घ्यावी.
कथा जशी आहे तशी नावासकट शेअर करण्यास हरकत नाही.
© अनुजा धारिया शेठ
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा