देर आये दुरुस्त आये-5 अंतिम

देर आये
घरात लाखोंने पैसा खेळत होता. प्रतीक्षा तर बिझनेस टायकून बनली होती. नेहा तिच्यासमोर फिकी वाटत होती. प्रतीक्षाचे कपडे, साड्या, महागडी घड्याळं बघून तिला आश्चर्य वाटत होतं. तिला आपलं आयुष्य दिसलं, वन bhk मध्ये अडचणीत असलेलं घर, दिवसभर नोकरी.. कामाचा ताण, तोकडा पगार..तोकड्या पगारात संसार..याउलट प्रतीक्षा आणि तिचा नवरा... बिझनेस सेट करून दिल्याने दिवसभर मनाला वाटेल तसा वेळ घालवत. कधी फॉरेन टुर तर कधी पार्टी. आधी कष्ट करून बिझनेस सेट केल्याने आता काहीही न करता पैसा येत होता. प्रतीक्षाची मुलं महागड्या शाळेत होती. नेहाच्या मुलीत आणि प्रतीक्षाच्या मुलात मोठा फरक जाणवत होता. प्रतीक्षा च्या मुलांवर घरातील मोठ्यांचे संस्कार होते, नेहाची मुलगी दिवसभर मोबाईल, गेम यातच अडकलेली.

रात्री नेहा आणि तिचा नवरा खोलीत बोलत बसले होते.

"बघा काय प्रगती केली यांनी, आपण इथे राहिलो असतो तर आपणही ऎशोआरामात जगलो असतो.."

"तुलाच फार हौस होती ना, तुला प्रतीक्षा तुझी जाऊ म्हणून मनो होती, आईला सांभाळायचं नव्हतं...बघ आता"

तेवढ्यात तिच्या बहिणीचा फोन आला आणि तिच्याशी बोलायला ती टेरेसमध्ये गेली.

"अगं काही नाही गं, नुसता दिखावा आहे. आमचं बरं आहे, म्हातारीला सांभाळायची कटकट नाही.." नेहा स्वतःचीच समजूत घालत होती...

पण तिला हे माहित नव्हतं की सासूबाई रात्रीच्या वेळी टेरेसमध्ये बाजूच्या साईड ला फिरत. सासूबाई तिला दिसल्या नाहीत, पण सासूबाईंनी सगळं ऐकलं.

मोठ्या सुनेबद्दल असलेला कळवळा, प्रेम, आपुलकी एका क्षणात खल्लास झालं. त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. प्रतीक्षाला त्यांनी दिलेली थोडीफार वाईट वागणूक आणि तरीही प्रतीक्षा ने त्यांना सांभाळायची दाखवलेली तयारी बघून सासूबाईंना आपल्या चुकीची जाणीव झाली.

दुसऱ्या दिवशी सासूबाईंनी दोन्ही सुनांना जवळ बोलवलं,

"माणसाचं काही खरं नाही, कधी जायची वेळ येईल सांगता येणार नाही..म्हणूनच आज मी माझे दागिने आणि तिजोरीची चावी तुम्हाला सुपूर्द करणार आहे.."

नेहा खुश झाली, मोठी सून म्हणून मलाच सगळं मिळणार याची तिला खात्री होती.

सासूबाईंनी दागिने दोघींना समान वाटून दिले.

प्रतीक्षा म्हणाली, "आई तुम्ही आमच्यासोबत आहात हेच आमचं खरं सोनं आहे, तुमच्या आशीर्वादाने आज इतकी भरभराट झाली, मला काहीही नको"

तरीही सासूबाईंनी न ऐकता दोघांना समान वाटप केलं. आता वेळ होती ती तिजोरीची चावी एकीच्या हातात देण्याची.

तिजोरीत फक्त सोनं नव्हतं, तर त्यांच्या वाडवडिलांपासून चालत आलेल्या काही वस्तू, आणि जमिनीचे कागदपत्र होती. त्यांच्या घराण्याच्या नियमानुसार जो एक मुलगा घराण्याचं नाव काढेल त्याच्याच हातात ती किल्ली जाई.

नेहा आशेने सासूबाईंकडे बघू लागली, सासूबाईंनी पटकन प्रतीक्षाचा हात धरला आणि तिला चावी दिली..

"जी स्त्री घरात सर्वांना धरून ठेवते, मोठ्यांचा आदर करते, जिच्यात स्वार्थीपणाचा लवलेशही नाही..तिच्याकडे मी ही चावी देतेय.."

नेहा रागाने उठून उभी राहिली आणि जळफळत आपल्या खोलीकडे गेली.

प्रतीक्षाला मात्र आजवर केलेल्या कष्टाचं, त्यागाचं, अपमानाचं, प्रेमाचं फलित मिळालं....

भगवान के घर मे देर है, अंधेर नही म्हणतात ते हेच...!!!

समाप्त

🎭 Series Post

View all