नैराश्य आणि त्यावर मी केलेली मात!

This is a true story and I am posting it for the sake of the competition.

औरंगाबाद येथे वास्तव्यास असणार्या जोशी कुटुंबाची ही कथा आहे. आजी-आजोबा, आई-वडील, मोठी मुलगी सायली व तिच्यापेक्षा 2 वर्षीनी लहान असलेला तिचा भाऊ साहिल  अस हे सहा जणांच कुटूंब. वडील सरकारी अधिकारी व आई ग्रुहिणी असते. सायली, अगदी शांत स्वभावाची पण लहाणपणापासूनच खुप हुशार, वर्गात नेहमी पहिली येणारी तर दूसरीकडे साहिल- खोडकर, मनमिळाऊ व अभ्यासात तितकाच हुशार. आई वडिलांना दोघांचाही खुप अभिमान. बघता बघता सायलीचे 10 बोर्डची परीक्षा आली. आई वडिलांच लक्ष पूर्णत: सायलीकडे वेधलं गेलं. सायली ने नेहमीप्रमाणे चांगले मार्क्स (97टक्के) घेऊण बोर्ड पार पाडले. आता पुढे IIT मध्ये जायच, हे स्वप्न घेऊण सायली तिच्या आई बरोबर JEE preparation साठी पुण्यात आली. वडिलांने घराची सगऴी जबाबदारी उचलण्याचा निर्णय घेतला. आता औरंगाबादच्या घरात साहिल, वडील, आजी आजोबा व घरातील कामासांठी तीन नौकर मंडऴी होती. सायली ला कुठल्या ही गोष्टी ची कमतरता नको भासायला ह्याच विचारात सगळे असायचे. पण ह्या सगळ्या मुळे साहिल कडे दुर्लक्ष होतय हे कोणाच्या लक्षातच आलं नाही. 
सायली ची बारावी आली आणि साहिल ची दहावी. पण सायली ची बारावी दहावी पेक्षा जास्त महत्वाची अस समजून आई सायली जवळ पुण्यातच राहीली. इकडे साहिल स्वता सगळा अभ्यास करायचा, बाबा आँफिस ला गेल्यावर आजी आजोबांना सांभाळायचा. आई ची आठवण यायची पण तरी कोनाला नं दाखवता आपले काम करत रहायचा. साहिल आणि सायली दोघांचा निकाल लागला आणि ह्या वेळेस तर आई वडिलांच्या आनंदाचा काही नेम नवता. दोघांना ही ९३% मिळाले होते. शिवाय सायली ने JEE परिक्षा पास करून IIT मधे admission सुद्धा मिळवलं होतं. ह्या मुळे साहिल कडे परत दुर्लक्ष झालं. अख्या कुटुंबात पहिली व्यक्ती जिने इंजिनियरिंग करायचा निर्णय घेतला आणि IIT मधे admission मिळवलं. ह्याचा त्यांना खुप अभिमान. साहिल च कौतुक करायला कोणीच नवत कारण सायली ने त्यांच्या कुटुंबात कधी न घडलेलं काम जे करुण दाखवल होतं. तिथुन झाली साहिल च्या नैराश्याची सुरवात. ज्या वयात त्याला आई ची गरज होती त्या वयात आई सायली साठी पुण्याला आली होती. आणि अत्ता सुद्धा परिक्षेत येवढे चांगले marks मिळवून त्याचं सायली येवढं कौतुक नाही झालं ह्याची खंत त्याच्या मनात बसली. मनमिळाऊ पने सगळ्यांशी गप्पा मारनारा साहिल आता शांत शांत राहु लागला.मुलगी IIT मधे गेली ह्या आनंदात आई वडीलांच साहिल कडे दुर्लक्ष होऊ लागलं. तो स्वतःच्या मनाला खात राहीला. पण कोणाला बोलुण दाखवायची त्याची इच्छा नव्हती. मला कोणी समजून घेत नाही, मला कोणी दिदी येवढं महत्त्व देत नाही, माझं कोणी कौतुक करत नाही हे विचार त्यांच्या मनात येऊ लागले आणि तो अलिप्त राहू लागला. साहिल ची बारावी आली पण अजूनही आई वडील सायली च्याच कौतूकात रमले होते. तीला काय हवं नको ते बघू लागले.
साहिल चा निकाल लागला आणि ते एकूण आई वडीलांच्या पाया खालची जमिन सरकली. त्याला 65% मिळाले होते जे सगळ्यांसाठीच खूप धक्कादायक होतं. त्यात साहिल ची JEE सुद्धा clear झाली नव्हती. आता त्यांना साहिल ची काळजी वाटू लागली कारण साहिल ने सुद्धा IIT मधेच जावं अशी त्यांची अपेक्षा होती पण ह्या अश्या marks मुळे त्याला कुठलच चांगलं कॉलेज मिळणार नव्हत. साहिलचं आता पुढे काय हा निर्णय घेण्यासाठी त्याला career counselor कडे घेऊन गेले आणि तिथून त्यांना कळलं की साहिल नैराश्य चा शिकार झाला आहे. त्याला गोळ्या औषधे सुरू झाले. आणि साहिल ने एक वर्ष drop घेयचा निर्णय घेतला. आई वडीलांना वाटलं की ह्या एक वर्षात तरी तो चांगला अभ्यास करून admission मिळवेल. 
येवढं झालं तरी ही त्यांच्या अपेक्षा काही कमी झाल्या नाहीत कारण मुला ला समजून घेण्या आणि प्रेमाने समजून सांगण्या ऐवजी त्यांना IIT जास्त महत्वाची वाटली. इकडे साहिल एकटाच नैराश्य शी लढत होता. साहिल ने दुसऱ्या वर्षी पुन्हा JEE परिक्षा दिली. तेवढ्यात एक खुशखबर आली. सायली ला कॉलेज प्लेसमेंट मधुन Amazon कंपनी मधे नोकरी लागली होती. परत तेच. सायली च कौतुक. आणि त्यात साहिल चा JEE चा निकाल आला पण ह्या वेळेस सुद्धा त्याला अपयश मिळालं. आई वडील दोघेही नाराज झाले. त्यांनी त्याच्या कडुन अपेक्षा करणं सोडून दिलं. साहिल नैराश्य ग्रस्त आहे हे माहीत असूनही त्याचे आई वडील त्याच्या अपयशावर लक्ष देत होते. त्यांच्यासाठी ही अपमानास्पद बाब होती. इकडे मुली ने यश मिळवलं आणि मुलाने नाक कापले, हे त्यांचे शब्द आणि विचार होते. 
साहिल च नैराश्य अजून वाढत गेलं. काय करावे सुचेना, घरात कोणी साथ देणारं नाही, समजून घेणारं नाही. Career चा काही पत्ता नाही आणि वर घरच्यांचे टोमणे! 
फक्त गोळ्या औषध चालू होते म्हणून साहिल स्थिर होता. त्याला हळू हळू एक गोष्ट लक्षात येऊ लागली की प्रत्येक माणूस वेगळा असतो. आणि प्रत्येक माणसाची झेप घेण्याची एक वेळ असते. त्याच्या दीदी ला जसं सगळं लवकर भेटलं तसच त्याला सुद्धा भेटेल असे नाही हे त्याला कळू लागले. त्याने घरच्यांचे टोमणे, दीदी च कौतुक आणि त्याच्या सोबत मागच्या काही वर्षांत जे काही झाले ते सगळं विसरून एक नवीन सुरुवात करायचा निर्णय घेतला.
आता तो कोणाचचं ऐकणार नव्हता. तु पण IIT मधेच admission मिळवलं पाहिजे असं सांगणाऱ्या त्याच्या आई वडीलांना सुद्धा त्याने स्पष्ट सांगितलं की आता त्याची जी इच्छा आहे तो तेच करणार. घरच्यांच्या दबावा खाली येऊन तो ह्या ज्या परिक्षा देत बसला त्यामुळे त्याचं किती नुकसान झालं हे त्याच्या लक्षात आलं. ही लढाई त्याला एकट्यालाच लढायची आहे असं समजून त्याने पुढचे पाऊल उचलले. JEE चा नाद सोडला आणि एका साधारण पण चांगल्या कॉलेज मध्ये इंजिनियरिंग ला admission घेतलं. 4 वर्षा नंतर त्याला एका चांगल्या कंपनीत नोकरी लागली. त्याचा पगार नक्कीच दीदी येवढा नव्हता. पण त्याचं त्याला वाईट नव्हते वाटत कारण त्याने हा मार्ग स्वः इच्छेने निवडला होता, तो कोणत्याही दबावा खाली नव्हता. तो फक्त मनाचं ऐकत गेला. 2 वर्षा नंतर त्याला promotion मिळालं तो अत्यंत खूश होता. तो आयुष्य पुन्हा जगू लागला होता. त्याची गाडी आता रुळावर चालू लागली होती. फक्त एकदा त्याने माघे वळून पाहिले आणि त्यातून तो एक मोठी गोष्ट शिकला आणि ती म्हणजे कधी ही कुणाच्या दबावा खाली येऊन कुठलं काम करू नका. नेहमी स्वताच्या मनाचं ऐका कारण शेवटी मानूस त्याच्या शिक्षण किंवा कॉलेज मुळे नाही तर त्याच्या कर्तुत्वा मुळे ओळखला जातो.  
आपली इच्छाशक्ती आणि जिद्द असेल तर कुठल्याही संकटावर मात करू शकता हा संदेश साहिल ने त्याच्या अनुभवातून दिला आहे.