Oct 29, 2020
स्पर्धा

"नैराश्य व त्यावर मी केलेली मात"

Read Later

    "चांगले आणि वाईट असे दोन प्राणी नेहमीच डोक्यात    लढत  असतात,तुम्हाला माहिते कोण जिंकत?
                      "तो ज्याला तुम्ही भरावता."
'अलीकडेच ऍक्टर सुशांतसिंग राजपूतने नैराश्यातुन आत्महत्या केल्याची बातमी वाचली',अन मनाच्या ज्या एका कोपऱ्यात माझ्यातल्या एक मी ला मी दडपून ठेवलं होतं तीने हळूच डोकावलं.हो तीच मी जिने कधीकाळी माझ्या मना वर नैराश्याचा डोंगर उभा केला होता पण मला काय माहीत होतं की एक छोटासा स्वतःवरचा विश्वासरूपी उंदीर सुध्दा हा नैराश्यरूपी डोंगर पोखरु शकतो.
         आजकाल नैराश्याला वय उरलं नाही असं मला वाटतं कारण खूप लहान वयांत मुलांना नैराश्याने घेरलेले दिसून येतंय,त्यामुळेच आत्महत्ये सारखे पळखाऊ उपाय त्यांना सोपे वाटू लागले आहेत.मलाही अतिविचार करण्याची सवय..त्रास देणाऱ्या एखादया गोष्टीचा सारखा सारखा विचार केला की त्याच रूपांतर नैराश्यात होत व ते हळूहळू आपण जगण्याला लायक नाही असं आपल्याला वाटायला भाग पाडत.तसंच माझं झालं पहिल्यांदा जेव्हा मला 12 वीला कमी गुण मिळाले आणी माझं डॉक्टर होण्याचं स्वप्नं भंगल आणी मी खचले.आयुष्यातले सारे रंग उडून गेले असच मला वाटायचं त्यावेळीं.पण मला सांगायला खरच छान वाटतंय कीं त्यामुळेच मी माझ्यातल्या मला शोधलं कारण स्वतःपेक्षा मोठी कोणतीच ताकद नसतें,आणी माझ्या आयुष्यातले उडालेले रंग मला नव्याने सापडले.पैसा, लोकांचं बोलणं, परीक्षा,छोट्यामोठ्या कुरबुरी ह्यासारख्या गोष्टीं येतात आणि जातात.अहो वेळसुद्धा सेकंदाने पुढे सरकते मग टिकून राहणार तरी काय?काहीच नाही आपणसुद्धा.मग कोणत्याही गोष्टीचा इतका विचार का करावा,जर ती टिकणारच नाही,आणी हो आपण आहोत म्हणून जग आहे ,लोक आहेत आपण नसलो तर जग असूनही आपल्याला नसण्या सारखच ना,तेव्हा स्वतःच जग स्वतः बना.
        मला पहिल्यापासूनच वाटतं की कोणीच तुमची जागा घेऊ शकत नाही कोणीच नाही आणी हीच तुमची ताकद असतें.एक छोटी मुंगीसुद्धा खालीं पडलीतरी परत चढायला सुरुवात करते.मग आपण तर माणुस आहोंत. असें अनेक विचार मी त्या काळात केलें. हल्ली मला प्रॉब्लेम हे सर्दी-पडशा सारखे वाटते कारण त्यातून बाहेर पडायचं औषध मला मिळालय.रस्त्यावर चालणाऱ्या गाडीलाही ब्रेक आहे मग आयुष्याला नको?मजा करा,स्वप्न तुटली तरी पुन्हा पहा,कोणाला त्रास न देता जगत राहा.स्वतःच्या आयुष्याचे मालक स्वतः व्हा,कारण जर देवाला तुमच्या आयुष्याची किल्ली दुसऱ्याला द्यायची असती तर त्याने जेवून तुमचं पोट नसतं का भरलं काय पटतंय ना!आणि हो आत्महत्येने आपण संपतो.नैराश्य तसच हसतं उभं असत.मग काय ठरवलंय..मनाला नैराश्यावर राज्यं करायला लावणार ना!!