Jan 23, 2021
माहितीपूर्ण

दंत समस्या आणि उपचार

Read Later
दंत समस्या आणि उपचार

सर्वांना हसरा चेहरा प्रिय असतो.आपले दात जर चांगले असतील तर आपलं आरोग्य सुद्धा चांगले राहते. दात सुंदर, पांढरेशुभ्र असतील तर व्यक्तिचा चेहरा आकर्षक वाटतो यासाठी आपण आपल्या दातांची काळजी योग्य पदधतीने घेतली पाहिजे. वय वाढणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे, वयानुसार मनुष्याला शारीरिक समस्यांसोबत दातांच्या समस्येलाही सामोरे जावे लागते. वयस्कर लोकांमध्ये दात पडणे,दात् हलणे, कीड लागणे या समस्या प्रामुख्याने दिसतात.

1)किडलेले दात(carious tooth):

दातांना कीड लागणे म्हणजे दातांवर काळा डाग दिसणे, दातांमध्ये अन्न अडकायला सुरुवात होणे.दाताला तीन आवरण असतात. कीड जर दातात वरच्या वर असेल तर ती कीड काढून त्याजागी restorative cement भरतात. कीड जर दातात खोल वर गेलेली असेल तर root canal treatment केली जाते.

2)दात हलणे:

दात जर खूप हलत असेल तर तो दात काढून त्या ठिकाणी नवीन दात बसविता येतो. दात हलण्याच्या मागे हिरड्यांचे आजार किंवा हाडांची पकड सैल होणे अशी कारणे असू शकतात.

3)नवीन दात बसविणे:

दातांची कवळी ही सगळ्यांत जुनी आणि लोकप्रिय उपचार पद्धती आहे, त्यामध्ये सर्व दात (complete denture) किंवा जे दात नाहीत फक्त तेच नवीन बसविले जातात(removable partial denture) वरील दोन्ही प्रकरच्या कवळी या पूर्णपणे हिरडी किंवा हाडांवर आधांतरीत असतात, त्यामुळे त्या फार घट्ट बसत नाहीत तसेच रात्रीच्या वेळी कवळी काढून ठेवावी लागते, कवळी ची स्वच्छता ही ठेवावी लागते या काही कवळीच्या मर्यादा आहेत. नवीन प्रकरच्या कवळी मध्ये flexible denture हा प्रकार मोडतो, त्या मध्ये कवळी ही नरम असते आणि वजनाने हलकी असल्याने रुग्णास ती वापरणे सोपी आणि सहज असते.

Crown and bridge हा कायम स्वरूपी दात बसविण्याचा प्रकार आहे, या मध्ये शेजारील दातांचा आधार घेऊन दात बसविले जातात.

Dental implants ही नवीन आधुनिक उपचार पद्धती दात बसविन्यात विकसित झाली आहे. Dental implants हे टिटॅनियम धातूचे स्क्रू असतात जे जबड्याच्या हाडात रोवले जातात आणि त्यावर कायम स्वरूपी दात बसविले जातात.