"तुमची मराठी भाषा फारच डिफिकल्ट असते की ग स्मिता!"
"अरे राघव, तुला आमची मराठी भाषा एवढीच डिफिकल्ट वाटते तर मग माझ्याशी लग्न का केलं?"
" भाषा डिफिकल्ट असली तरी तू मला अडलेल्या शब्दांचे डेमो कम डावपेच जे खेळली , ते मला आवडले; म्हणून केलं की ग तुझ्याशी लग्न!"
"ए ,असे कोणते डेमो कम डावपेच खेळले रे मी?"
" सांगतो की ओ मॅडम मी!"
" सांग की रे माझ्या साऊथ इंडियन राघवा!"
"तू एकदा तुझ्या फ्रेंडशी फोनवर बोलत होती ,तेव्हा आक्राळविक्राळ हा शब्द वापरला, हा शब्द म्हणजे काय तुला विचारले, तेव्हा तू तोंडाला फेस पॅक लावला , केसांचा रबर बँड काढत केस अस्ताव्यस्त केले अन् म्हणाली याला आक्राळविक्राळ म्हणतात."
हसत हसत, स्मिता म्हणते,
" बर, अजून कुठले कुठले शब्द मी तुला असे डेमो कम डावपेच खेळून शिकवले?"
" सांगतो की ग स्मिता. एकदा मी पेपरात \"वडापाव सोबत झणझणीत चटणी मिळेल\" हे वाचलं अन् तुला झणझणीत म्हणजे काय विचारल ,तर तू मला थेट वडापाव सोबत झणझणीत चटणी खाऊ घातली."
" हा हा हा,राघवा, किती रे भोळा तू. अरे ही तर जस्ट गंमत केली होती मी.तुला हे शब्द कायम लक्षात राहावेत म्हणून."
"एकदा तुला दया म्हणजे काय विचारले, तेव्हा तू आई आजारी म्हणून भांडी घासायला आलेल्या आपल्या कामवाल्या बाईच्या मुलीला,\"आज मी घासून घेईन भांडी,तू शाळेत जा अन् अभ्यास कर\" असे सांगितले, अन् मग मी म्हणालो,\" ओह याला म्हणतात का दया?\",तेव्हा तू हळूवार मान डोलावली .हा डेमो मात्र मला जास्त भावला."
राघवच्या हळूच मिठीत जात,स्मिता म्हणाली,
" अच्छा अजून सांग पाहू?"
तिला अलगद मिठीत घेत,राघव म्हणतो,
" अजून एक सांगतो तुला मी. हिंदोळा म्हणजे काय विचारले तेव्हा तू मला आपल्या गार्डन मध्ये असलेल्या स्वींगिंग क्रेडल वर नेले."
" अरे हिंदोळा म्हणजे झोका."
" हो तेच म्हणतो मी,पण तू मला जोरजोरात हवेत झोके दिले,अन् मला हिंदोळा हा शब्द असा समजावला."
" हो का? बर! तू पण दे ना मग साऊथ इंडियन भाषेतील असे शब्दांचे डेमो, अह सॉरी डावपेच खेळ,ना माझ्याशी!"
" काय आहे ना ,मला माझ्या बायकोला अन् होणाऱ्या बाळाला बरेच शब्द शिकवायचे आहेत. पण मला असं तुझ्यासारख नाही ना शिकवता येत."
" मग मी आणि आपलं होणारं बाळ अशीच मस्त गंमत करून , ओहो म्हणजे तुझ्याकडून डेमो करवून शिकून घेवू. ओके?"
" होय का? "
" हो. ए, पण आपलं येणारं बाळ दोन्ही भाषा शिकेल ना?"
" स्मिता, आताच तर ठरलं की तुझा हा राघव डेमो देईल म्हणून!"
" ए पण डेमोच दे हा, डावपेच नको खेळू."
" असे का,शहाणे!"
" ए पण तरीही तू माझ्या या कौशल्यामुळे किती छान मराठी शिकलास माहितीये."
" होय माय डियर बायको.चल झोप की ग आता,नाहीतर तुझ्या पोटातलं आपलं बाळ भाषेचे सारे डेमो कम डावपेच आताच शिकेल!"
"हा,हा,हा.."
अशा प्रकारे छान हसत हसत साऊथ इंडियन राघव आणि महाराष्ट्रीयन स्मिता झोपी गेले.
# फोटो : साभार गुगल
©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा