देजा वू

माझ्या घराच्या परिसरामध्ये एक Restaurent आहे,देजा वू नावाचे.


माझ्या घराच्या परिसरामध्ये एक Restaurent आहे Deja vu नावाचे.तिथून जाता येताना त्या नावाकडे नेहमी लक्ष जाते.वेगळे पणा मुळे ते नाव माझ्या चांगलेच लक्षात राहिले. मला प्रश्न पडला की या नावाचा अर्थ काय असेल?घरी जाऊन शोधुया असे ठरवून घरी आले आणि विसरून गेले....नेहमीप्रमाणे ?

असेच दुपारी निवांत असताना मोबाईल हातात घेतला आणि "जागतिक स्तरावरचा लोकप्रिय Time Pass"असलेले FB उघडले.थोडेसे स्क्रोल केल्यावर खाली असलेल्या पोस्ट ने माझे लक्ष वेधले..."देजा वू" म्हणजे काय?मी दचकलेच,अरे गूगल "search history" वाचून तुम्हाला जाहिराती फेकून मारते तेव्हढे ठीक होते ,आता mind ही वाचायला लागले की काय?अरे देवा! एका news reportar च्या वरताण मन बडबडत असते दिवसभर,मग तर किती आणि काय काय दिसेल स्क्रीन वर? या विचारानेच घाम फुटला.

हे असे अनेकदा घडते,की आपण एखाद्या वस्तूचा अथवा व्यक्तीचा विचार करतो आणि अचानक तीच गोष्ट कुठेतरी दिसते,वाचनात येते अथवा त्याचा संदर्भ कोणाच्यातरी बोलण्यात येतो किंवा ती व्यक्तीच प्रत्यक्ष भेटते,आणि मग त्या व्यक्ती ला आपण उदारपणे शंभर वर्षांचे आयुष्य बहाल करून मोकळे होतो.कोणाला तरी फोन करायला फोन हातात घेतल्यावर आपण डायल करण्याआधी त्या व्यक्तीचाच फोन येतो आणि आपल्याही नकळत आपण बोलून जातो,"wave length"कित्ती जुळते ना आपली.

माझ्या बाबतीत तर असे बऱ्याच वेळा होते,संध्याकाळी "घरी कधी येणार"हे विचारायला नवऱ्याला फोन केला तर त्याने मलाच कॉल करायला फोन हातात घेतलेला असतो(आमची पण wave length कित्ती कित्ती जुळते ना?).माझ्या लेकाला कधी बरे नसले,किंवा तो पडला धडपडला तर नेमका त्याच वेळेला त्याच्या मावशीचा अवचित फोन येतो,सहज चौकशी करायला ? मग लेक विचारतो...आई!मावशी ला कसे ग कळते मला बरे नाही ते....हे असे बऱ्याचदा घडते ना आपल्या साऱ्यांच्याच आयुष्यात... कदाचित ह्यालाच "Telepathy" म्हणत असावेत.

आयुष्यात आपल्याला जे हवे असते,जे जाणून घ्यायचे असते ना,ते हवं असणं, जाणून घ्यावस वाटणं मनाच्या खोल स्तरावर खूप उत्कट असेल ना तर तिथे पोहचायचे मार्ग आपोआप तयार व्हायला लागतात आणि आपल्याही नकळत आपण तिथे पोहचतो.तसेही शाहरुख खान ने म्हणून ठेवलेच आहे की"अगर किसीं चीज को तुम दिल से चाहो तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशीश मे लग जाती है"

यातील गमतीचा भाग सोडला तर खूप गहन अर्थ दडलाय यात.कोणतीही गोष्ट प्रत्यक्षात येण्यापूर्वी आधी मनात साकार होते.आपल्या आत जे काही चालू असते ना तेच आपल्या सभोवताली असते.असे म्हणतात की युद्ध आधी मनात लढले जाते आणि मग रणांगणावर आणि तिथे जिंकायचे असेल तर आधी मनात जिंकावे लागते.म्हणूनच आपल्या आत आपण कोणत्या गोष्टीला खत पाणी घालायचे हे आपणच ठरवायचे.

"देजा वू" चा अर्थ शोधायचा आहे असे मी मनाशी ठरवून नंतर विसरूनही गेले तरी माझ्या मनाने ते पक्के लक्षात ठेवले होते,कारण त्या क्षणी तो अर्थ शोधायची माझी इच्छा उत्कट होती म्हणूनच नकळत का होईना तो शब्द अर्थासकट माझ्या समोर येऊन ठाकला.

जाता जाता "देजा वू" चा अर्थ ही सांगते,तर "Deja vu" हा एक फ्रेंच शब्द आहे,ज्याचा अर्थ होतो "Seen before", म्हणजेच मराठी मध्ये "पूर्वानुभव".एखादी जागा अथवा घटना पहिल्यांदाच बघत असताना सुद्धा आपल्याला असे वाटते की हे या आधीही कधीतरी बघितले आहे किंवा घडले आहे,हे असे होण्याच्या क्रियेला "देजा वू" म्हणतात आणि ही एक मानसशास्त्रीय अवस्था आहे.

तर तुम्हाला ही कधी झाले आहे का असे "देजा वू?


ऋतुजा नाईक