Mar 04, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

दैवगती (भाग-२)

Read Later
दैवगती (भाग-२)

कथा मालिका 

विषय- कौटुंबिक कथा


मालू चे लग्न झाले.आता तिच्या पुढील जीवनात काय घडले..

आता पुढे पाहूया.


मालू लग्न होऊन तिच्या घरी आली. खूप स्वप्न मनाशी घेऊन. कुठल्याही सर्वसामान्य मुलीप्रमाणे. नव्या नवलाईचे चार दिवस..

अत्यंत आनंदात गेले मालू सुद्धा मनोमन सुखावली. मात्र हे

दिवा स्वप्न ठरले. घरी सासू-सासरे, दीर ननंदा असं कुटुंब.

तरीसुद्धा ती त्या सर्वांचं मन लावून करायची. एक दिवस मात्र 

तिला कळलं की आपल्या नवऱ्याचं हे दुसरं लग्न आहे.आता

मात्र तिच्या पायाखालची वाळू सरकली. पहिल्या पत्नीपासून

घटस्फोट न घेता त्याने हे दुसरे लग्न केले होते. मालू हताश झाली.

दैवगती दुसरे काय?


हळूहळू तिच्या छळाला सुरुवात झाली. सासू म्हणायची,

\" ए माले चहा कर \"सासरा म्हणायचा \" मले भूक लागली खायाले दे.\"

दीर ननंदांची वेगळीच फर्माईश. अरेरे!!! काय त्या जीवाची

ओढाताण. पण हे सर्व ती न कुरकुरता करायची. मात्र एक दिवस

तर कहरच झाला. तिच्या नवऱ्याची पहिली बायको दोन मुलांसह

घरी आली. व तिला नको ते बोलू लागली. \" अवं एक मायमाजे..

का माह्या नवऱ्याच्या मांगं लागली वं ,चल निघ घरा भाईर. \"

नवरा व इतर घरची मंडळी काहीच बोलत नव्हती.

काय करावं. शेवटी ती घराच्या एका छोट्या खोलीत राहू लागली.


अशातच मालूला दिवस गेले. मालूने आनंदाने आपल्या नवऱ्याला

ही गोष्ट सांगितली. तिचा नवरा माधव रागाने लाल झाला.

\"आधीच ही दोन कार्टी हायं, आता हे तिसरं कायले?

ही गोष्ट तर मालूला अजिबात सहन झाली नाही. काय करावे,

कुठे जावे? तिला काहीच समजत नव्हते. शेवटी नशिबावर

दोष देत ती गप्प राहिली.

एव्हाना कर्णोपकर्णी मालूच्या आजीला मालूला होणाऱ्या छळाची..

वार्ता कळली. आजीला खूप दुःख झालं. मात्र ती मालूला घरीही..

आणू शकत नव्हती. मालूच्या काळजीने तिची तब्येत आणखीनच

खालावत चालली. मालूला जेव्हा आजीच्या तब्येती विषयी कळले,

तेव्हा ती तिच्या भेटीला आली.


मालूला पाहताच आजीला खूप आनंद झाला. आणि जेव्हा

आजीला तिने ती आई होणार असल्याचे सांगितले तेव्हा मात्र

तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. मालूने स्वतःहून आपल्या

सासरी होणाऱ्या छळाची गोष्ट आजीला सांगितली नाही.

पण आजीला सर्व माहीत होते. वरवर ती सुद्धा चेहऱ्यावर आनंदच

दाखवत होती.


आठ दिवस झाले, पंधरा दिवस झाले, महिना सुद्धा निघून गेला.

पण तिचा नवरा माधव तिला घ्यायला तर आलाच नाही पण

साधी विचारपूस सुद्धा केली नाही. मालू जे समजायचं ते समजली.

अशातच कोरोना आला आणि त्या महामारीने आजीचा बळी घेतला.

आता मालूचा एक भक्कम आधार हरवला.

मालू आजीच्या मृत शरीराला आलिंगन देत धाय मोकलून..

रडत होती.

खरचं नियतीपुढे कुणाचेचं चालत नाही. आता मालू पोटातल्या

बाळाशीचं बोलायची. त्याला मनातलं दुःख सांगायची.

 ' अरे बाळा तू बघतच आहेस सर्व. '

' आता यापुढे तुचं माझा आधार आहेस.'

'आता एकटीचं मी तुला सांभाळेन, लहानाचे मोठे करीन.'

'काळजी करू नको.'

आणि असं म्हणत रडत रडतचं झोपी जायची.


असेच आणखी काही दिवस गेले. एक दिवस अचानक मालूचे

पोट दुखू लागले. सर्वत्र लॉकडाऊन. कुठे जाणार? कशाने जाणार?

ती राहत असलेल्या भागात पेशंट जास्त असल्यामुळे संपूर्ण

एरिया सील झालेला. प्रत्येक जण आपापल्या जीवाच्या भीतीने

स्वतःला घरातच कोंडून घेत होता. मात्र एका स हृदय शेजाऱ्याने

तिची व्यथा ओळखली. आणि एका पोलीस च्या मदतीने

मालूला दवाखान्यात ऍडमिट केले. आणि तिथे मालूने..

एका सुंदर मुलाला जन्म दिला.


आता बाळाकडे पाहून मालू आपले सर्व दुःख विसरली.

तिने आपल्या मुलाचे नाव ठेवले, 'स्वप्निल'.

हळूहळू कोरोनाची लाट ओसरली. जनजीवन पूर्ववत सुरू झाले.

मालूने आता दोन-तीन घरची कामं मिळवली. आजीच्या शेळ्या 

विकून ते पैसे तिने बँकेत टाकले. आपल्या मुलाला खूप 

शिकवण्याचा तिचा मानस ती वेळोवेळी बोलून दाखवायची.

हळूहळू स्वप्नील मोठा झाला. मालूने त्याला शाळेत घातले.

स्वप्निल सुद्धा आईसारखाच खूप हुशार, चुनचूनीत.

आईला त्याने कधीच कोणत्याच बाबतीत त्रास दिला नाही.

वर्गातील मुलांचाही तो लाडका होता. चांगले कपडे ,बुट..

यासाठी त्याने आईजवळ कधीच हट्ट केला नाही.जणू

उपजतच आईची व्यथा त्याला माहीत होती. मिळेल ते गोड

मानून त्याने आईला एक प्रकारे साथ दिली.

दहाव्या वर्गात स्वप्निल ला छान गुण मिळाले. गरीब परिस्थितीत

जगणारा एक हुशार मुलगा म्हणून शिक्षकांची सुद्धा त्याला वेळोवेळी

मदत मिळायची. बारावी मध्ये सुद्धा स्वप्निल चांगल्या गुणांनी उत्तीर्ण

झाला.


आता त्याच्या पुढील शिक्षणाची काळजी होती. पण म्हणतात ना,

की परमेश्वराकडे न्याय आहे. अडल्या- नडलेल्यांचा तोच...

वाली आहे. स्वप्निल ज्या शाळेत शिकला त्या शाळेच्या

मुख्याध्यापकांनी त्याच्या पुढील शिक्षणासाठी मदत गोळा केली.

शिक्षणाबरोबरच स्वप्निल ने स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास

सुरू केला. स्वप्निल चे प्रयत्न सफल झाले आणि स्पर्धा परीक्षेत

सुद्धा तो उत्तीर्ण झाला. आणि एक मोठा अधिकारी बनला.

मालू चा आनंद गगनात मावेना. तिला तर अगदी काय करू नि..

काय नको असं झालं. वारंवार ती परमेश्वराचे, व तिला ज्यांनी 

ज्यांनी मदत केली त्यांचे मनातल्या मनात आभार मानू लागली.

तिच्या आनंदाला सीमाच नव्हती.


आतापर्यंत तिने केलेल्या कष्टाचे, त्यागाचे जणू फळचं..

तिला मिळाले होते. स्वप्निल ने आता आपल्या नावासमोर

वडिलांच्या नावाऐवजी मालोचे नाव लावण्याचे ठरवले.

' स्वप्निल मालती ठसे'अशी नेमप्लेट सुद्धा त्याने बनवून घेतली.

आता स्वप्निल ने एक छानसे घर खरेदी केले. त्या घरावर

अगदी समोर त्याने ती नेमप्लेट लावली.

मालूला अगदी कृतकृत्य झाले.


'स्वप्निल आता मला सून हवी आहे रे '

मालवणी स्वप्निल समोर प्रस्ताव ठेवला.

' अग आई कशाची घाई आहे'

स्वप्निल वेळ मारून न्यायचा. अरे आताशी माझी तब्येतही 

ठिक राहत नाही. खूप थकले रे मी आता.मालू म्हणायची.

शेवटी स्वप्निल ने लग्न करण्याचा निर्णय घेतला. आणि एक

सुंदरशी मुलगी पाहून शुभमंगल उरकले.

मालू खूप सुखावली. आतापर्यंत तिने केलेले कष्ट, तिने

सोसलेल्या यातना सर्व विसरून ती आपल्या मुलाच्या

संसाराकडे बघू लागली.

आणि एक दिवस सकाळी स्वप्निल ने आईला आवाज दिला.

' आई, ए आई उठ नां, बघ तुझ्या सूनबाईने तुझ्यासाठी चहा 

बनवलायं '

पण मालूने आवाज दिला नाही. लागली असेल सकाळी सकाळी 

झोप. झोपू दे तिला. स्वप्निल स्वराला म्हणाला.

बराच वेळ झाला पण सासूबाई उठल्या नाहीत म्हणून स्वरा (

स्वप्निल ची बायको) सासुबाईंना उठवायला गेली उठवायला गेली.

' अरे स्वप्निल लवकर ये. आई काहीच प्रतिसाद देत नाहीत.

बघ ना लवकर '

स्वप्निल धावतच आला. त्याने पाहिले मात्र आई त्याला सोडून

देवा घरी निघून गेली होती. स्वप्निल ने हंबरडा फोडला.

' कां गं आई !

' का आम्हाला सोडून निघून गेलीस.

सर्व शेजारी गोळा झाले. स्वप्निल ची आईला दिलेली आर्त

सर्वांचेच हृदय पिळवटून टाकणारी होती. मात्र मालतीच्या

चेहऱ्यावर तृप्ततेचे भाव होते. मालेच्या आयुष्याचा अशा प्रकारे

तृप्त मनाने शेवट झाला होता.


समाप्त.

कथामालिका.

दैवगती (भाग-२)

विषय- कौटुंबिक कथा

लेखिका -  सौ. रेखा देशमुख

टिम- अमरावती
,
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//