Feb 23, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

दियल सांता..

Read Later
दियल सांता..


दियल सांता,

कसा हाये ले तू? मस्तच अश्शिल नां? नेहमी हॅप्पी हॅपी अशणारा, मला हशवणारा माजा सांता, उदाश अशतो का कधी? नाईच मुली..

मला नं सांता, तुज्याशी कित्ती कित्ती बोलायचंय मनुन शांगु! खलं मंजे नं मी तुला फोनच कलनाल होते.. पण तुजा नंबलच नाय नं माज्याकले.. मग कशं फोन कलनाल? मनून नां मग मी तुला दायलेक पतलंच लिहायला बशलेय.

सांता, मला तुला खूप खूप शांगायचंय.. शांगू का ले? ए सांता मला माहित्ये, “हो शांग, मी ऐकतोय..” तू अशच मंशील, कालन तू खूप श्वीत हाये नां! माजं शगलं शगलं ऐकतोश..

सांता, मला शांग, मोटी मानशं छोत्या मुलांना शांगतात, नेहमी खलं बोलावं, कधी खोतं बोलू नये, देव बाप्पा कान कापतो.. मंग मोटी मानशं स्वतः खोतं बोलतात तल देवबाप्पा त्यांचे पन कान कापनाल?

सांता, काल न मी बोलाच बी खाल्लं.. ममी मनते, आता पोटात बोलाचं झाल येनाल.. खलं झाल येनाल का ले? आणि नं त्या दिवशी पाऊश आला होता नं तेंवा आभालात गलगल आवाज झाला, ममी मनाली की तुजी माई वर जात्यावल दलन दलते. खलं का ले? तुजी माई दलन दलत होती?

सांता, तुला शांगू? आमी नां, ख्रिशमशला शुत्तीत मामाच्या गावी गेलो होतो. तेव्वा कित्ती कित्ती मज्जा केली होती माईत्ये आमी? माई, आप्पा, मामा मामी आणि ओंकालदादा शगल्यांनी मिलुन खुप धमाल केली. तुला शांगू? मामाने नं मला त्याच्या खांद्यावल बशवून लानात फिलायला नेलं, आमी तिथे पेलू, बोलं, चिंच्या, चिकू खाल्ले. नंतल शेतातला ऊश पण खाल्ला. मग शंद्याकाली मामीने केल्याचं शिकलन बनवलं होतं. मी पोलीशोबत शिकलन खाल्लं.. ओंकाल दादा आणि मी खूप खेललो. तुला माईत्ये? ती मामाच्या गोत्यातली ‘हांशा’ गाय आहे नां तिला बाल जालंय.. गोलं गोलं पान.. आमी बालाचं नाव ‘चंदली’ ठेवलंय.. नंतल मामीने नं मला खलवश खायला दिला.. खूप मत्त होता.. गोल गोल.. मग नं माईनं मला तिच्या कुशीत झोपवलं.. तिने नं चांदोमामाची गोत्त पन शांगितली.. माई खूप चांगली आहे. ती माझ्यावल खूप माया कलते. खाऊ देते.. गोत्ती शांगते.. माजे लाल करते.. ती हाशते नं तेंव्हा तिचा एक दात चमकतो.. तिचे शगले केश व्हाईत जालेत.. तिने माज्याशाती तिच्या शालीची, मंजे तिच्या लुगल्याची गोद्ली शिवलीय.. फाल मऊ मऊ आहे ती.. मला माजी गोद्ली खूप आवलते.. माई मला गट्ट मिठी मालून जोपलीय अशं वात्तं..

सांता, किशमसची शुट्टी लगेच शंपली आणि आमी पलत घली आलो.. पन ममी बोलते की आमी पंदला दिवश लायलो.. पन मला वातलं शुट्टी खुप लवकल शंपली.. अशं काय कलतो ले सांता? किती छोती शुत्ती देतो.. आता इथे घली कुनी कुनी नाईये माज्याशी बोलायला.. पप्पा ऑफिशला गेलेत.. शांता मावशीकले मला ठेवून ममी पन ऑफिशला गेलीय.. मी घलात एकती बशलेय.. सांता, तुला माहितीये? पप्पा घली आले की, नुत्ता मोबाईल घेऊन बशतात.. माज्याकले त्यांचं लक्षच नशतं.. ममी पन बीजी अशते.. ती घली आली की आमच्याशाती गलम गलम जेवण कलते.. ममी खूप काम कलते.. ऑफिश, घल दोनी शंभालते.. दम लागत अशेल नां ले तिला? तिलापन कंटाला येतो माज्या बलोबल खेलायला.. मग ती मला तिचा मोबाईल देते आणि मोबाईल मधला गेम खेलायला शांगते.. मला नाई आवलत गेम.. बोल हाये तो गेम.. सांता, तुजी ममी पन ऑफिशला जाते का ले? मग तुजे ममी पप्पा ऑफिशला गेले की तू काय कलतो? मोबाईलमधला गेम खेलतो? सांता, आता मला मामाची, मामीची, ओंकाल दादाची, माईची आणि हं हांशाच्या बालाची पन खूप खूप आठवण येतेय ले आणि नं मग मला खूप ललू येतंय..

सांता, तुला माहित्ये? आपली मिनू आहे नां, ती ले.. माझी बेश्ट फ्लेन्ड.. माज्या क्लाशमध्ये माज्या शेजाली बशते ती मिनू.. तिची आज्जी पन खूप चांगलीये.. मिनूची आज्जी मला आणि मिनूला चॉक्केत देते, बोनविता वाला दुदू पन देते.. तिच्या मऊ मऊ हातांनी मऊ भात खाऊ घालते. खूप खूप चांगली आहे ती. तुला माहितीये? काल नं मिनू खूप ललत होती. मी विचालं तिला, काय जालं? का ललते? मिनू ललत म्हणाली की, तिच्या आज्जीला तिचे ममी पपां मोट्या घली शोलून आले. त्याला नं आज्जी आजोबांचं घल मनतात. तुला माहितीये? तिथे शगले माई, आप्पा शालखे खूप खूप आज्जी, आजोबा एकत्ल लातात. पन तूच शांग सांता, मिनूचं घल कित्ती कित्ती मोत्तं हाये, तली त्यांच्या माईला तिकले लांब का पातवलं? आता तूच शांग, मिनूला कुशीत घेऊन कोन जोपनाल? तिला चिऊ काऊची गोष्ट कोन शांगनाल? गलम गलम दूध भात कोन भलवनाल? मिनूला अंधलाची भीती वात्ते, मग तिला जवल कोन घेनाल? तिलापन तिच्या माईची आत्वन येत अशनाल ना ले? मिनू बोलते की, आता ती आणि मी मोते जालो मनून तिचे ममी पप्पा आज्जीला मोत्या घली शोलून आले. मंग आता माज्या माईला पन माजे मामा मामी मोत्या घली शोलून येनाल? अशी का कलतात मोती मानशं? तू त्यांना शांग अशं कलू नका.. आमच्या शालक्या लान मुलांच्या आज्जी आजोबांना मोत्या घली शोलू नका..
त्ये पन एक्ते घाबलत अशतील नं..

सांता, मला शांग, तुला तुजी माई हाये का ले? ती पन तुजे लाल कलत अशेल ना? तुजी माई कुत्ते लाते? ती तुज्याशोबत तुज्या ममी पपा जवलच लाते नां? की तुजी माई पन मोत्या घली शगल्या आजी आजोबा बलोबल लाते?

सांता, तू नं मला खूप खूप मोटं घल घेऊन देशील? मग न शगल्यांचे आज्जी आजोबा तिथे लातील आणि न घलाच्या शमोल अंगणात खाऊचं मोत्तं झाल लाव.. मी तो खाऊ शगल्या आजी आजोबांना देनाल. ते पन हॅप्पी आणि मी पन.. माजं इतुशं काम कलशील नां ले?

तुजी लालकी बेश्त फ्लेंद,
पियू
© निशा थोरे (अनुप्रिया)
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

निशा थोरे (शिवप्रिया - शब्दस्पर्श)

Service

मला शब्दांच्या विश्वात रमायला खूप आवडते.

//