गोष्ट छोटी डोंगराएवढी. विषय:- प्रिय सांतास.... शिर्षक:- प्रिय सांतास..... सांता तू कधी येतो नी कधी जातो ते कळत पण नाही...पण सगळे म्हणतात की तू आला की आनंद देऊन जातो. २५ डिसेंबर आला की तुझ्या येण्याचे वेध लागतात.सांता येणार आणि खूप गिफ्ट देऊन जाणार.... तुझी झोळी नेहमी गिफ्टनी भरलेली असते.. तू विशेषत: लहान मुलांत खूप प्रिय आहे कारण त्यांना आवडणारे चॉकलेट,खेळणी, केक तू देतो.. मला तुझा एक गुण खूप आवडतो तो म्हणजे दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचे हास्य...तू गिफ्ट देऊन त्यांना हसवतो. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव खूप काही सांगून जातात.त्याच्या जिवनात येणारा हा आनंदाचा क्षण अविस्मरणीय असतो. तुझ्याकडे बघितले की एक वाक्य आठवते ते म्हणजे कोणाकडे जायचे असेल तर आनंद घेऊन जा. दुःख तर त्याच्याकडे ऑलरेडी असते.. ख्रिसमस या सणामुळेच सरत्या वर्षाचा शेवट हा गोड होत असतो. त्यामुळे हा सणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. मला तर सांता नेहमी भेटतो. हरघडी भेटतो. सुखासाठी रित्या असणाऱ्या मनाला जेव्हा एखादे काम पूर्ण केले की जी कौतुकाची थाप मिळते ना तोच तर माझा सांता असतो.माझाच काय इतर कोणाचाही सांता वेगळा नसतो. संपला संपला सणांचा गोतावळा सुरू झाला ख्रिसमस च्या सोहळा. सर्वांची सुरू झाली धावपळ. खरेदीसाठी निघाले मित्रमंडळ चोखंदळ ! सजू लागली घरे-दारे सुंदर सुंदर नवरंगानी. उत्साहाला उधाण आले पताका अ्न् चांदण्यांच्या आकाश कंदिलांनी! ख्रिसमस ट्री उभी राहिली घरोघरी डौलाने. आप्तेष्ट आणि मित्रांनी भेटी घेतल्या एकमेकांच्या आनंदाने ! ताटे सजली ठीक- ठीकाणी सुंदर ,सुंदर पदार्थांनी मध्यभागी स्थानापन्न होण्याचा मान मिळवला केक आणि डोनट नी ! मस्त मस्त बक्षीस मिळणार म्हणून बाळे होती बटवा घेऊन खुश. सांताला देखील मुलांसाठी भेटवस्तू देण्याचा जास्तच होता हुरुप.! बघता बघता 25 डिसेंबर च्या सनई आणि रोषणाईने सर्वांवर टाकली नजर. हर्ष आणि उत्साहाने सर्वजण झाले प्रार्थनेसाठी चर्चमध्ये हजर.! प्रत्येकाच्या कल्पनेतला सांता हा वेगळा असतो. सांताचा उद्देश गिफ्ट वाटणे हा नसून आनंद वाटणे हा आहे.जास्तीत जास्त आनंद वाटायचा . त्यासाठी गिफ्ट द्यायला पाहिजे असं काही नाही.एखाद हसू, शाबासकी, कौतुक अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत.आपण सगळेच जण खरतर एक सांताच असतो. तुझीच एक सांता प्रेमी...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा