Login

डिअर एडिसन

डिअर एडिसन
शब्द मंद झालेत माझे
सध्या उजेड पडत नाही
पहाटे लवकर उठून ही
लिहिण्या सवड मिळत नाही

एडिसन च्या दिव्याने
जगभर प्रकाश पडला
शिक्षकांचा मार खाऊन
बालपणी तोच जास्त रडला

आईचा होता तो लाडका
घरीच शाळा शिकू लागला
रोशन करून आईच नाव
त्यानेच शेवटी दिवा लावला

प्रयोग निराळे करत होता
ट्रेन मध्ये काम करताना
शोध लागला दिव्याचा
हजार मार्ग शोधताना

©श्री??‍♀️✍?

🎭 Series Post

View all