Deadline

-----

Deadline © आरती पाटील 

" सकाळचे 9 वाजत आले तरी अजून नाश्ता काही बाहेर आला नाही. " रमाबाई हॉलमध्ये बसून आपल्या पती रघुनाथ  व मुलगा रोहन समोर सून माधवी बद्दल बोलत होत्या. रात्री आपल ऑफिसच काम उशिरापर्यंत करणाऱ्या माधवीला हे सवयीच झालं होत.  वर्ष, दीड वर्षांपूर्वी लग्न होऊन घरी आलेल्या माधवीला कोरोना मुळे 4 महिन्यांपासून  Work From Home होत, शिवाय Lockdown होण्याआधी एक प्रोजेक्ट हाती होता त्याचंही काम होतंच. सकाळी लवकर उठून सर्व काम, स्वयंपाक आणि नाश्ता सर्व बनवून माधवी काम करायला बसे. बऱ्याचदा तिला नाश्ता ही करायला वेळ मिळत नसे. तरीही रमाबाईना ते पटत नसे आणि माधवीला टोमणे सुरु असत. रघुनाथ ( सासरे ) चार महिन्यांपासून हे सर्व बघत होते. ते यावर कायमचा तोडगा काढायचा असे ठरवतात.

 दुपारी जेवताना रघुनाथराव माधवीला ओरडतात, " काय भाजी बनवली आहे?  चवच  नाही त्याला. " हे पाहून रमाबाईंना अजून चेव चढतो आणि त्या सुद्धा माधवीला बोलू लागतात. मग रघुनाथ राव माधवीला बोलतात, " या पुढे जेवण तू बनवायचं नाही, तूला घरातली कामे ही नीट जमत नाही ते ही करू नकोस. सर्व माझी रमा करेल. याआधी ही तीच करायची आणि lockdown संपल्यावर तुझं काय करायचं ते ठरवू. "  

हे ऐकून रमाबाईंना टेन्शन आलं. त्या एवढं बोलल्या होत्या आणि नाव ठेवली होती त्यामुळे आता घरातली काम त्यांना करावीच लागणार होती. माधवीला रडू येत होत. या घरासाठी शक्य तेवढं सर्व करून ही अशी वागणूक मिळत होती. रोहन माधवी जवळ येतो आणि तिला समजावतो. जाऊ दे,  तू तूझ्या कामावर लक्ष दे. नंतर जे होईल ते बघू, शिवाय तू किती करते ते मला माहित आहे. त्यामुळे मी तुझी साथ सोडणार नाही. हे ऐकून माधवीला धीर येतो. 

               रमाबाईंना त्यांच्या नणंदेच्या घरून call येतो. त्या  ( नणंद ) म्हणतात की वहिनी माझ्या नात्यात एकीला मुलगी झाली आहे. तेव्हा गिफ्ट द्यायचं आहे पण सर्व दुकानें बंद असल्यामुळे काही देता येत नाहीये. तुम्हाला विनकाम येतं.  मला परवापर्यंत एक स्वेटर बनवून द्या. परवा बारस आहे त्यामुळे मला परवाच हवं आहे. रमाबाईंना नाही म्हणायचं होत पण नणंदला नाही म्हणायची त्यांना हिंमत होत नव्हती. आता सर्व घरकाम, जेवण आणि नाश्ता बनवून स्वेटर परवा पर्यंत बनवून देणं कठीण होतं. रमाबाई सकाळी लवकर उठून सर्व काम करून स्वेटर बनवायला बसल्या. त्यांना सुरुवातीपासूनच त्रास होऊ लागला. परवा पर्यंत पूर्ण कस होणार याच त्यांना टेन्शन आलं, आणि त्या रात्री सुद्धा स्वेटर बनवत होत्या. त्यामुळे सकाळी साहजिकच उठायला उशीर झाला.  सकाळचे १० वाजले तरी नाश्ता अजून आला नव्हता. रघुनाथ राव चिडले आणि रमाबाईंना ओरडू लागले. "सकाळचे १० वाजले तरी अजून नाश्ता नाही आला नक्की करताय काय? " रमाबाई आल्या आणि म्हणाल्या की, "मी एवढं करतेय ते तुम्हाला दिसत नाही का?  रात्री उशिरा पर्यंत काम करत होते. तुमच्या बहिणीला नाही म्हणू शकत नाही ना म्हणून. घरातलं काम, जेवण, नाश्ता परत रात्रीच जेवण एवढं करून वरून स्वेटर तेही परवा पर्यंत पाहिजे त्यांना. सगळं करता उशीर झाला उठायला. थोडं तुम्हीही Adjust करा ना. मी ही माणूस आहे. मशीन नाही. "  त्यावर रघुनाथ राव म्हणाले, "म्हणजे माधवी मशीन आहे का?  " हे ऐकून रमाबाई रघुनाथ राव यांच्याकडे पाहू लागल्या. रघुनाथ राव पुढे म्हणाले, " माधवी आल्यापासून सर्व करते तू काहीही करत नाही ती आल्यापासून. Lockdown पासून तर तिची कामे अजूनच वाढली आहेत. कारण सर्व घरातच आहेत. सर्व करून ती ऑफिस च काम करतेय, त्यांना पण deadline असते. 8 -9 तास मान मोडेपर्यंत काम करूनही किती बोलते तू तिला. तेव्हा नाही लक्षात येतं की ती ही माणूस आहे मशीन नाही. तेव्हा नाही लक्षात येतं आपणही थोडं Adjust करायला हवं? " हे ऐकून रमाबाईंना आपली चूक लक्षात येते.   माधवी आपल्या बेडरूम मध्ये बसून ऑफिस work करत असते. रमाबाई नाश्ताची बशी घेवून माधवीकडे येतात आणि  माधवीला देतात. ते माधवी म्हणते, "आई तुम्ही का घेवून आलात मी आले असते बाहेर. " रमाबाई म्हणतात, " माफ कर गं माधवी तुझी दगदग दिसत नव्हती गं मला. किंवा पाहायची नव्हती असं म्हणालीस तरी चालेल. पण माझ्यावर हे सर्व ओढावाल्यावर मला आता कळतंय की तू किती त्रास सहन केला. यापुढे असा कधीही नाही होणार. मी तूला नक्की मदत करेन. " 

हे सर्व रघुनाथ राव आणि रोहन दारातून पहात होते. Deadline ची जबाबदारी कळल्यामुळे रमाबाईच्या मनात माधवी बाबत असलेली कडी निघाली होती. 
   

समाप्त....