डायरीतल फूल

सिद्दीने भराभर पाने पलटली‌.सिद्धी लाआठवल, ताईला इंजेक्शन घेताना पाहून तिला खूप भीती वाटायची मग आई म्हणायची "बघ ताई किती शूर वीर आहे नि मग सतत ताईचे कौतुक करायची" पुढच्या काही पानात नुसतीच तारीख घातलेली होती. एका पानावर वाढदिवसाचा उल्लेख होता.बी कॉम झाल्यावर सीए करायचा विचारही ताईने आधीच ठरवला होता ."सीए करायचे आहे पण माझी तब्येत किती साथ देते पाहू आईला खूप विश्वास आहे"..
डायरीतल फूल?

\"महेश -- मी आज आईकडे जात आहे .संध्याकाळी नाहीतर, उद्या येईन.\" ....घरातून निघतांना सिद्धी म्हणाली
महेश: \"ओ.के\"
\"मी येऊ का संध्याकाळी?\" - महेश
\"नको ,मी आई-बाबांनाच घेऊन येईन घरी.\"
सिद्धी आईकडे आली तेव्हा आई-बाबा दोघे घरी नव्हते, ते सौम्या च्या वर्ष श्राद्धाची म्हणून आश्रमात देणगी द्यायला गेले होते.

सिद्धी कुलूप उघडून घरात आली.
जवळ जवळ एक वर्षाने ती या घरी आली होती. ताई गेली तेव्हा महेश सोबत सिद्धी युगांडा ला होती, महेश ला कंपनीने पाठवले होते अचानक परत येणे शक्य नव्हते.

परत आली तेव्हा आई व बाबा बाबांच्या बदलीच्या गावी उदयपुर ला शिफ्ट झाले होते, त्यामुळे घर बंद होते.

बाबांची बदली तर 4--6 वर्ष आधीच उदयपूरला झाली होती पण सिद्धी आणि सौम्या च्या शिक्षणाकरता आई इथे मुंबईतच राहत होती.
खोलीचे दार उघडून सिद्धी आत आली . भिंतीजवळ पूर्वी जिथे ताईचा पलंग असायचा तिथे एक टेबल ठेवले होते. त्यावर ताईचा हार घातलेला फोटो होता. सिद्दीने दोन फुले तिथे ठेवली, मन आतून दाटून आले डोळे बरसू लागले . बरेच वेळ ती तिथेच बसून राहिली.

सर्व खोलीत एक भयाण शांतता जाणवत होती.
अल्बम पहावा असा विचार करत सिद्दी अलमारी उघडायला गेली. अलमारी ला कुलूप होते, दार उघडताना वरून काहीतरी पायाशी पडले .उचलून पाहिले \"हेअर बँड\" त्याला पाहताच तिला एकदम लहानपणात गेल्यासारखे झाले.

याच हेअर बँड वरून सौम्या व सिद्धी खूप भांडल्या होत्या आणि तो तुटला, तरी सिद्दीला हवाच होता ताईने लबाडीने पटकन अलमारी वर ठेवून दिला. सिद्धी चा हात पोहोचत नव्हता मग ती ताई शी खुप भांडली, शेवटी आईने दोघींसाठी वाटीत खाऊ आणून शांत केले...

सिद्धी आणि सौम्या, दोघींमध्ये दोन वर्षाने ताई मोठी होती. पण नावाप्रमाणेच सौम्य व नाजूक तर सिद्धी अवखळ बंडखोर व तब्येतीने सुदृढ त्यामुळे त्या दोघी आवळ्याजावळ्याच दिसत..

एक दिवस आई बाजारात काही सामान घ्यायला म्हणून गेली होती सिद्धी आणि सौम्या दोघी घरी खेळत होत्या, खेळता खेळता ताई पडली डोळे उघडेना सिद्दीने घाबरून शेजारच्या काकूंना बोलावले. त्यांनी सौम्या वर पाणी शिंपडले पण तरी ताई उठेचना .
तेवढ्यात आई पण आली. आईला पाहून सिद्धीला रडू येऊ लागले आई घाबरली व ताईला डॉक्टरांकडे घेऊन गेली, ताई शुद्धीवर आली, डॉक्टरांनी सगळ्या टेस्ट करायला सांगितल्या..
ताईला बरे नाहीये तिला त्रास देऊ नको असे सांगून आईने ताईला झोपवले.
त्या दिवसानंतर घरातले वातावरणच बदलले. आई, ताई कडे जास्त लक्ष देऊ लागली. ताईला मधूनमधून औषधं देत असत सिद्धीला मस्ती करायला कोणीच नसायचे मग ती बाहेरच्या मित्र-मैत्रिणींमध्ये जाऊन खेळायची...

जशी जशी सिद्धी मोठी होत गेली तसे तिला समजायला लागले. ताईला काहीतरी आजार आहे त्यामुळे तिला औषध व जेवायच्या आधी इंजेक्शन घ्यावे लागते.

आता आई पूर्णपणे ताईच्या खाण्याच्या, अभ्यासाच्या वेळा पाळत असे .
सिद्धीला कधीकधी मग ताईचा राग येई, एक असूया मनात जन्म घेऊ लागली.
वाटत असे आई फक्त ताईची होऊन बसली.
बाबा सिद्धि शी खेळत , तिच्याकडे लक्ष देत. मग सिद्धी बाबां बरोबरच बाहेर फिरायलाही जाऊ लागली
. कधी कधी बाबा तिला बाहेर छान छान खाऊही घालत .ताईला सांगायचे नाही हे न सांगताच सिद्धीला समजायला लागले...

ताईचा तेरावा वाढदिवस होता ताईला खीर खूप आवडते म्हणून आईने बनवली पण तीही दोन त-हेची ताई ची वेगळी‌ का? समजले नाही. पण मग ताई जास्त लाडकी असे वाटून सिद्धी रुसून बसली.

सिद्धी अशी रुसून बसली की मग बाबा तिला ,"चल सिद्धू आपण पण जरा पाय मोकळे करून येऊ,असे म्हणाले की मग सिद्धी मूडमध्ये येत असे."
त्यादिवशी बाबांनी तिला ताईच्या डायबिटीस बद्दल सांगितले हा आजार औषधांनी कंट्रोल करावा लागतो पण पथ्य ही भरपूर आहेत..

आता सिद्धीला परिस्थितीचे भान आले ताई कोणत्या त्रासातून जातीये हे समजले. मग तिच्या मनातली ईर्षा जाऊन सहानुभूतीने जागा घेतली.

सौम्या च्या आजारपणातही आईचे तिच्या अभ्यासाकडे पूर्ण लक्ष होते बारावीनंतर सौम्या ने कॉमर्सला ॲडमिशन घेतली. तिला सीए व्हायचे होते
. सिद्दीने बारावीनंतर जर्नलिझम करायचे ठरवले त्यासाठी तिने पुण्यात ऍडमिशन घेतली..
.
काळ आपल्या गतीने चालला होता.दोघी बहिणी मोठ्या झाल्या.
. महेश सिद्धीच्या आयुष्यात अनेक रंग घेऊन आला तर, सौम्याचे आजारपण तिचे रंग पुसू पहात होते .
आता औषध इंजेक्शनही असर करत नसत .बीकॉम ची परीक्षा सौम्या छान पास झाली. पण जीवनाची परीक्षा अधिक अधिक कठीण होऊ लागली. आता तिला घरातल्या घरातच राहावे लागत असे
सिद्धी महेश ला घेऊन घरी आली. टेक्स्टाईल इंजिनीयर महेश ने आई-बाबांना चांगलेच इम्प्रेस केले. व त्या दोघांच्या नात्याला संमती मिळाली. सौम्याच्या तब्येतीकडे पाहता पुढे काही अघटित व्हायच्या आधीच सिद्धी व महेश चे लग्न झाले ,व ते दोघे सहा महिन्याकरता युगांडा ला गेले...

दार वाजल्याचा आवाज ऐकून सिद्धी भानावर आली. आई-बाबा आश्रमातून परत आले होते, सगळ्यांचीच मनदुखावलेली होती.
आईला समोर पाहताच सिद्धीला भरून आले ,आईच्या गळ्यात पडून तिने अश्रूंना वाट करून दिली दुःखाचा भर थोडा ओसरल्यावर बाबांनी सिद्धीला व आईला पाणी देत, तिची व महेश ची विचारपूस करत विषय बदलला.
दोन दिवसांनी घर विकून आई-बाबा परत उदयपूरला जाणार.सिद्धी" तू जरा ताईची खोली आवर आम्ही बाकी सर्व आवरतो म्हणत बाबांनी कामाला सुरुवात केली". खोलीमधील एकेक वस्तू आवरता आवरता सिद्धीला जुन्या आठवणी येत होत्या .
हा पलंग यावर दोघी झोपायच्या. अल मारीत एक एक खण वाटून घेतलेला, अलमारी तील सामान काढताना सिद्धीला एक डायरी सापडली. अक्षर पाहून ती विचार करू लागली कधी बरे लिहू लागली ताई डायरी..

पहिले पान ---आज-काल मला खूप थकवा येतो आईने गोळी देऊन जेवायला दिले की जरा बरे वाटते माझी गोळी पाहून सिद्धी पण हट्ट करते आणि नाही दिली किती आईवर रुसते..

मध्ये बरीच पाने रिकामी होती.---

मग एका पानावर इंजेक्शनचा उल्लेख होता-- "इंजेक्शनची मला खूप भीती वाटते पण आता ते रोजच घ्यावे लागते" .

सिद्दीने भराभर पाने पलटली‌.
सिद्धी लाआठवल, ताईला इंजेक्शन घेताना पाहून तिला खूप भीती वाटायची मग आई म्हणायची "बघ ताई किती शूर वीर आहे नि मग सतत ताईचे कौतुक करायची"

पुढच्या काही पानात नुसतीच तारीख घातलेली होती.

एका पानावर वाढदिवसाचा उल्लेख होता.
बी कॉम झाल्यावर सीए करायचा विचारही ताईने आधीच ठरवला होता ."सीए करायचे आहे पण माझी तब्येत किती साथ देते पाहू आईला खूप विश्वास आहे"..

पुढच्या एका पानावर----
सिद्धी पुण्याला गेल्यापासून मला खूप एकटं वाटतं .
आताशा रात्री झोपताना भीती वाटते, आई सतत जवळ असते तिने राम रक्षा म्हणायला सांगितले की थोडे बरे वाटते. पण बाहेरच्या जगात मित्र-मैत्रिणींना पाहून आपल्या आयुष्यात असे क्षण येतील कां? मनात तर त्याच्या खूप कल्पना येतात..

मधल्या पानावर नुसतीच तारीख घातलेली होती.

पुढे पानावर----
आज सिद्धी महेश ला घेऊन आली मी पाहिले खूप हँडसम आहे. माझेही मन त्याच्याकडे ओढ घेत होते, पण मला झोपलेली समजून माझी ओळख नाही दिली.

महेश दोन-चारदा येऊन गेला. आताशा तो आला की मी बाहेरच्या खोलीत एकदा तरी जाते.
तो हाय हॅलो करतो कशी आहे ही विचारतो.

सिद्धी ने पान पलटून वाचायला सुरुवात केली,
आई म्हणत होती सिद्धी महेश च्या प्रेमात आहे. मला तर सिद्धीची ईर्ष्या वाटते, मलाच कां असा आजार व्हावा?
मग मी कल्पनेत तिच्या जागी स्वतःला ठेवू लागते.

दोन दिवस झाले,मला खूपच गळल्या सारख वाटत आहे.

मध्ये मला दवाखान्यात ऍडमिट केले होते आई बाबा खूप चिंतेत आहेत किडनी काम करत नाहीये बाबा जवळच बसले होते नक्की डोनर मिळेल म्हणाले. डायलिसिसचा खूपच थकवा आला होता ‌.

आज थोडे बरे वाटते आहे,
दोन दिवसांनी सिद्धी व महेश च लग्न आहे.

आज सिद्धीचे लग्न झाले मी खूप नर्व्हस होते सिद्धी आता माझ्यापासून दूर जाणार. मी झोपले आहे असे सर्वांना वाटते.
पण खरे तर मला या आयुष्याचा कंटाळा आला आहे तरी सिद्धीला वधू वेशात एकदा डोळे भरुन पाहून घेतले, व मनात पुढच्या जन्मी मलाही असाच कोणी भेटू अशी देवाला प्रार्थना करते‌.
दोन पानांच्या मधे एक सुकलेले गुलाबाचे फुल सिदधी ला दिसले मागे महेश घरी आला तेव्हा सिद्धी साठी आणले होते.


पुढची सर्व पाने कोरी होती....

सिद्धीने डायरी मिटली डोळ्यापुढे ताई उभी राहिली कितीतरी इच्छा मनात घेऊन देवाकडे गेली. देव नक्की च पुढच्या जन्मी पूर्ण करेल.
सिद्धी---आईचा आवाज येताच सिद्धीने डोळे पुसत डायरी पर्समध्ये लपवली, आईला दिसायला नको ,आता आई-बाबांना या दुःखातून बाहेर काढायला हवे.
उद्या आई-बाबांना घेऊन ती आपल्या घरी जाणार ,तेथून ते उदयपूरला जातील. या घरापासून दूर नव्या वातावरणात आई बाबा स्वतःला सावरतील.
ताई चे कपडे, इतर सामान गरजू लोकात वाटून टाकू.
राहतील फक्त आठवणी त्या तर नेहमीच सोबत करतील पण डायरीतल्या सुकलेल्या गुलाबा प्रमाणे त्या असतील....

------------------------------------------