दवबिंदू

दवबिंदू


घनदाट धूकं दाटून येती
धुक्यात रस्ता हरवत जातो
भानू निशेचा निरोप घेऊन
दवबिंदू आकाराला येतो

अशी ही रम्य पहाट येती
पारिजात सुगंध पसरतो
घन हे ओथंबून येती
दवबिंदुच्या सडा पडतो

पहाटेस चिंब भिजवती
किलबिलाट कानी येतो
पाखरे नभी स्वच्छंद उडती
गोल टपोरे मोती चमकतो

हिरव्या गालिच्यावर पसरती
अस्तित्व स्वतःचे पानांनी सावरतो
रवी किरणांची नक्षी पांघरती
त्या मोत्यांत एक रूप होतो.

✍?✍?✍?
©श्री.

🎭 Series Post

View all