अतुल आणि सारिकाच्या लग्नाची बोलणी चालू होती. अतुल हा देखणा, हुशार आणि समजूतदार मुलगा होता. कॉलेजच शिक्षण पूर्ण झाल्या नंतर त्याला अमेरिकेची ऑफर आली असतांना ती नाकारुन त्याने आपल्या शहरातच उच्च शिक्षण घेण्याचा न निर्णय घेतला . ते झाल्यावर त्याने लगेचच स्वःचा बिसनेस सुरु केला आणि तो सुद्धा अगदी उत्तम चालला होता. त्याला आई वडीलांना सोडून परदेशात सेटल व्हायचा नव्हतं.
अतुल आणि सारिका चे आई -वडील आधीपासून एक- मेकांना ओळखत होते पण अतुल आणि सारिका ह्यांनी एकमेकांना शेवटचं अगदी लहानपणीच बघितलं होतं.
सारिका सुद्धा कर्तृत्ववान असल्याने दोघांचा जोडा अगदी शोभून दिसणार होता, सारिकाने इटली मधून आर्चिटेक्टचर चा कोर्स केला होता.. आणि आता शिकून ती पुन्हा भारतात येउन स्वतःची कंपनी टाकणार होती. अतुल आणि सारिकाच्या वयात जवळपास ५ वर्षांचं अंतर होतं.
लग्नाची बोलणी झाली. दोघे जण एक-मेकांना भेटले आणि अगदी आयुष्यभर आपण एक-मेकांचीच वाट बघत होतो असा त्यांना वाटलं. दोघांची एकदम घट्ट मैत्री सुद्धा झाली. दोघांचं अगदी रात्री २ वाजेपर्यंत बोलणं व्हायचं. कारण अरेंज मॅरेज मध्ये लग्न ठरल्या पासून तर लग्नाआधीचे क्षण अगदी सोनेरी क्षण असतात. अतुल आणि सारिका पूर्ण शहरात फिरत असत.. कधी सिनेमा तर कधी कधी पाणीपुरी. बिसनेस बद्द्दल बोलणं व्हायचं. दोघांनी ठरवलं की काही वर्षांनंतर दोघांचा बिसनेस जॉईन करायचा आणि मग पुढे एक मोठी कंपनी.. खूप स्वप्न रंगवले होते दोघांनी.
एका रविवारी अतुल आणि सारिका च सिनेमाला जाण्याच्या प्लॅन झाला..
" हॅलो अतुल, मी तुला घ्यायला येतेयं तुझ्या घरी, वी आर गोइंग फॉर मूवी "
" हे सारिका, हो लगेच रेडी होतो.. "
सारिका तिची कार अतुल च्या घराबाहेर पार्क करते. आणि अतुल ला कॉल लावते.
अतुल काही कॉल उचलत नाही... सारिका मग घरात जाऊन त्याला सरप्राईस द्यायचं ठरवते.
घरात गेल्या नंतर ती हॉल मधून काहीतरी गुजबूज चाललेली असते ते ऐकते. समोर तीच्या सासूबाई आणि तिची नणंद बसून काहीतरी बोलत असतात..
"नणंद सासूबाईंना म्हणते -
" अगं आई .. सारिका वाहिनी तर म्हणत होती की तिला बिसनेस करायचा आहे"
" नाही ग. सासरी आल्यावर तिला इतकी कामं असतील की, काही करायला वेळ सुद्धा मिळणार नाही"
"मला नाही वाटत वाहिनी फक्त काम करेल,, तिचे खूप स्वप्न आहेत "
" काही नाही ग,, आज कालच्या पिढी ला रोग च झालाय... तरुण वयात असता हे स्वप्न वैगेरे.... लग्न झाल्या झाल्या मी सांगेन अतुलला , बाळा, मूळ होऊ दे !" आम्हाला खेळायला नातू हवाय "
" मग तुझं काय म्हणणं आहे आई , की वहिनीने फक्त घरातली कामं आणि तिचा मूल सांभाळायचा का?
" नाही ग,, फक्त तेच काम करून घ्यायचा असतं तर एखादी कमी शिकलेली मुलगी केली असती ना"
" मग एवढी शिकलेली सून का आणते घरात "?
अंग शेजारच्या काकूंची सून पण mba आहे. दिसायला मात्र सावळीच आहे म्हणा, पण त्या कौतुक करत असतात. स्वयंपाक छान करते.. पाहुणे आले की, काय हवं काय नको ते बघते..
शिकलेल्या सूना घरात आणल्या म्हणजे समाजात पण आपली प्रतिष्ठा राहते,, आणि तिने घरातली कामं , पाहुणचार केला की आपण सुद्धा खुश राहतो आणि चार लोकं सुद्धा म्हणतात " पाटलांची " सून सुंदर आहे हं ..!.
" मग तिचं स्वतः काय आई?
" काही नाहीं एकदा माहेरून आली की लावेल मी तिला चांगले वळण"
"आई, माझ्या सासूने असा केलेलें चालेल तुला"?
" हं नाही, मी तुला अश्याच ठिकाणी देणार आहे जिथे मुलगा आई-वडिलांपासून दूर राहतो..
नणंद तिथून त्रासून निघून जाते..
तेवढ्यात सारिकाला अतुल मेसेज येतो,
" हे सारिका , मला आई आज नाही पाठवणार सिनेमा ला .. रात्रीचे ८ वाजले ना!
रात्री घरी यायचा उशीर होईल..
हे सगळं बघून आणि अतुल चा मेसेज बघून सारिका ला खरं काय ते समजला होतं.
अतुल च तिच्यावर खूप प्रेम होतं हे तिला ठाऊक होतं पण २८ वर्षाच्या मुलाला सिनेमा ला जाण्यासाठी आई ची परवानगी घ्यावी लागते अश्या मुलाशी अजिबात जमणार नाही..
आईचं प्रेम असणं आणि आईच्या धाकाखाली असणं ह्या दोघी वेगळ्या गोष्टी आहेत.
एक विशिष्ट वय झाल की आई-वडिलांनी मुलांना स्वतंत्र सोडून द्यायचं असतं नाहीतर तीच मुलं पुढे जाऊन आईच्या पदराखाली लपून बसतात आणि जेव्हा जगाला सामोरं जायची वेळ येते तेंव्हा मात्र अपयशी होतात.
आपल्या सगळ्यांचे आवडते पु. ल. ह्यांच्या एका पुस्तकातील हे वाक्य ह्या कथेचं सर
" मुलं आपल्या प्रेमामुळे आपल्याला बिलगून आहेत यापेक्षा आपल्या धाकाखाली आहेत हे सांगण्यात कित्येक पालकांना मोठेपणा वाटतो ,
आजची मुले ही उद्याची स्वतंत्रपणाने आपल्या पायावर उभी राहणारी व्यक्ती आहे हे पुष्कळांच्या ध्यान्यातच येत नाही.
स्वतः विचार करून योगयोग्य ठरवण्याची क्षमता असणारा आपला मुलगा व्हावा किंवा मुलगी व्हावी यापेक्षा मुले फक्त आपल्या आज्ञेत वागणारी व्हावीत अशीच बहुतेक पालकांची इच्छा असते. त्यातून कौटुंबिक स्वास्थ्य बिघडतं आणि पर्यायाने अशा बिघडलेल्या वातावरणात वाढणारी मुले सामाजिक स्वास्थ्य बिघडवतात."