शंकर जरा टेन्शनमध्येच होता.
"डॉक्टर, काय झालं मुलगा की मुलगी?"
"डॉक्टर, काय झालं मुलगा की मुलगी?"
डॉक्टर म्हणाले,
"मुलगी झाली आहे. तिचा तेजःपुंज चेहरा, बाळसेदार बांधा, सुंदर टपोरे डोळे, चंचलता म्हणजे निसर्गाचा जणू काही एक अद् भूत चमत्कार आहे. असे सुंदर बाळ माझ्या करियरमध्ये मी पहिल्यांदाच पाहतोय."
"मुलगी झाली आहे. तिचा तेजःपुंज चेहरा, बाळसेदार बांधा, सुंदर टपोरे डोळे, चंचलता म्हणजे निसर्गाचा जणू काही एक अद् भूत चमत्कार आहे. असे सुंदर बाळ माझ्या करियरमध्ये मी पहिल्यांदाच पाहतोय."
"अहो डॉक्टर, मला आधीच एक मुलगा आणि मुलगी आहे. त्यात ही पण मुलगीच झाली. आम्हाला मुलाची अपेक्षा होती. काय करणार आहे ही मोठेपणी? शिकवलं तरीही लग्नं करून नवऱ्याच्या घरीच जाणार. माझे नाव मोठे करेल ही?"
"व्हॉट रबिश! काय माणूस आहे हां? आपली बायको आणि बाळ व्यवस्थित आहेत याचे याला काही घेणे देणे नाही. असले मूर्ख लोकं ना असाच बुरसटलेला विचार करणार!"
तेवढ्यात एक सिस्टर धावतच आल्या आणि डॉक्टरांना म्हणाल्या,
" डॉक्टर.."
" डॉक्टर.."
"हं बोला सिस्टर?"
"एक इमर्जेन्सी पेशंट आले आहे."
"चला तुम्ही पुढे मी आलोच."
डॉक्टर आणि सिस्टर तिथून निघून गेले.
शंकर आपल्या आईला म्हणाला,
"हे डॉक्टर लोकं ना स्वतःला खूप शहाणे समजतात."
"हे डॉक्टर लोकं ना स्वतःला खूप शहाणे समजतात."
"हे बघ, डॉक्टर बरोबर बोलत होते. सुलभा आणि बाळ व्यवस्थित आहेत नां ते महत्त्वाचं. मुलगा किंवा मुलगी होणं आपल्या हातात नसतं रे.हे बाळ तुझे नाव नक्की मोठे करेल. दांडेकरांची शान होईल हे बाळ."
"बास आई आता. अजून बाळ बाळात्यातच आहे. आणि लगेच दिवसा स्वप्नं दाखवायला लागलीस तू.त्यापेक्षा चल जाऊ आतमध्ये."
आत आल्यावर, शंकरची आई आपल्या सुनेला म्हणजे सुलभाला म्हणाली,
"वाह! सुलभा काय छान मुलगी झाली आहे गं तुला. अगं डॉक्टर सुद्धा कौतुक करत होते."
"वाह! सुलभा काय छान मुलगी झाली आहे गं तुला. अगं डॉक्टर सुद्धा कौतुक करत होते."
"खरंच आत्या?"
"हो खरंच!"
तेवढ्यात शंकर म्हणाला,
"वाह! चालू द्या तुमचं सासू-सुनेचं गुणगान या पोरीबद्दल. बघतो मी पण. खरच ही पोरगी आपलं नाव मोठं करेल की नाही ते!"
"वाह! चालू द्या तुमचं सासू-सुनेचं गुणगान या पोरीबद्दल. बघतो मी पण. खरच ही पोरगी आपलं नाव मोठं करेल की नाही ते!"
शंकरची आई म्हणाली,
"अरे जरा जवळून बघ तरी. किती नक्षत्रासारखी लेक झालीये तुला!"
"अरे जरा जवळून बघ तरी. किती नक्षत्रासारखी लेक झालीये तुला!"
"नको, मला नाही पाहायचं. मुलगा असता तर पाहिलं असतं."
त्यावर सुलभा म्हणाली,
"आत्या बघा ना ओ.हे कसे बोलत आहेत ते."
"आत्या बघा ना ओ.हे कसे बोलत आहेत ते."
"जाऊ दे गं.बघ रडायला लागली ती. चल आधी छातीशी लाव अन् शांत कर या नाजूक जीवाला. ह्याच्याकडे लक्ष देऊ नको."
सुलभा हसू लागली. शंकर म्हणाला,
"हं, तू का हसत आहेस आता?"
"हं, तू का हसत आहेस आता?"
शंकरची आई म्हणाली,
"शंकर तू जा बरं इथून. मेडिकलमधून ही औषधे आणून दे."
"शंकर तू जा बरं इथून. मेडिकलमधून ही औषधे आणून दे."
"हो हो जातो मी. देतो औषध आणून. खात बसा तुम्ही दोघी मायलेकी औषधं."
"शंकर, जातो का तू? का मी जाऊ? "
"नको नको तू इथेच थांब. सुलभाला काय हवं नको ते बघ."
"बायकोमध्ये जीव तर आहे. मग हा दिखाऊपणा कशाला? जा आता, मेडिकलमधून औषधं आण. "
तेवढ्यात एक सिस्टर आत आल्या आणि म्हणाल्या,
"औषधे आणलीत का तुम्ही?"
शंकर म्हणाला,
"आँ, हे काय सिस्टर चाललोच आहे आणायला."
"आँ, हे काय सिस्टर चाललोच आहे आणायला."
"बरं लवकर आणा."
शंकरची आई म्हणाली,
"गेला शंकर औषधं आणायला एकदाचा. सुलभा पोटभर दूध पाज लेकराला."
"गेला शंकर औषधं आणायला एकदाचा. सुलभा पोटभर दूध पाज लेकराला."
"हो आत्या. बघा कशी आळेपिळे देतीये. अगदी दिमाखात! हो नां?"
"बघू गं तिला. दे बरं माझ्याकडे. ओ ओ ओ. काय गं राणी पोट भरलं तुझं? खरंच काहीतरी आहे या पोरीमध्ये. म्हणजे डॉक्टर म्हटले ते खरेच आहे. माझ्या पाहणीत देखील असे सुंदर, नखऱ्याचे बाळ नाही. उगाच माझे एवढे केस पांढरे नाही झाले! बाळा आमच्या घराण्याचं नाव काढ बरं. दाखवून दे तुझ्या बापाला, की मी साधी मुलगी नाही, मी तर डॅशिंग दांडेकर आहे."
"हो आत्या. होईल ही डॅशिंग दांडेकर."
"चल सुलभा मी निघते आता. बरं झालं विहीणबाई आल्या माझ्या मदतीला. नाहीतर आपल्या यश अन् सानूची जरा आबाळच झाली असती."
"हो खरं आहे आत्या तुमचं. माझ्या मोठ्या लेकरांची खूप काळजी होती मलाही,पण तुम्ही आणि आईने सारं काही छान सांभाळून घेतलं."
"बरं बरं पुरे आता आमचे कोड कौतुक. आपल्या डॅशिंग दांडेकरकडे लक्ष दे नीट. काही लागलं तर फोन कर. मी जाते घरी आणि विहीणबाईला पाठवून देते. काळजी घे तुझी आणि बाळाची."
"हो आत्या."
सुलभाने आपल्या या मुलीचे नाव ओवी ठेवले.
काही दिवसांनी,
"आई मला लाडू दे नां. मी तुझे सगळे काम करेल."
"आई मला लाडू दे नां. मी तुझे सगळे काम करेल."
"हो का माझी ओवी, आमची डॅशिंग दांडेकर? काय काम करशील बरं तू?"
"मी तुला कपडे धुवायला, भांडी घासायला मदत करेल."
"अगं माझी गोडंबी. मस्का लावतेस का मला? जमेल का तुला हे सारं काम?"
"मग! तू शिकवशील नां मला."
"बरं बाई.हा घे लाडू. तू भातुकली खेळ. अजून तू लहान आहेस. ही कामं तुला जमणार नाही."
"आई मग मी भातुकली खेळू?"
"हो."
"मला माहित होतं तू मला असेच म्हणशील. म्हणून मी जरा गोड बोलले तुझ्याशी!"
"असं का? शहाणी कुठली. चल पळ."
ओवी पळून गेली.
क्रमशः
खरच ओवी होईल डॅशिंग दांडेकर? तिच्या वडिलांना ती तिचे कर्तुत्व दाखवून देईल?पुढे काय असेल तिच्या नशीबात?पाहूया पुढील भागात.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा