Login

डार्लिंग डॉट कॉम : भाग ३

Its A Mysterious Story Of Brahmin Man


डार्लिंग डॉट कॉम : भाग ३

सुदर्शन गुरुजींनी आज गावातील दत्त मंदिरात प्रवचन सुरू केले. महिलांनी फुलांची आरास केली होती, पुरुषांनी मंडप सजवला होता आणि मुलांनी फुलांची तोरणे बांधली होती. सर्वांचे मनोबल उंचावले होते आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भक्तिभाव दिसत होता. प्रवचनाच्या सुरुवातीलाच सुदर्शन गुरुजींनी एक सुंदर अभंग घेतला:


"सुखाची साजिरी वदनी,
पंढरीच्या राया भेटे,
तू माझा पांडुरंगा, सुखकर्ता।
भज माझे चित्त हर्षित, तूच वंदन।"

गुरुजींच्या गोड आवाजात भक्तिभाव होता. अभंग संपल्यावर त्यांनी श्रोत्यांना नम्रतेने विनंती केली की सर्वजण शांततेने बसावे आणि मनोभावे श्लोकांचा अर्थ समजून घ्यावा.

सुरुवातीला त्यांनी पतिव्रता अनुसयाची कथा सांगायला सुरुवात केली. त्यांनी अनुसया मातेच्या पतिव्रतेच्या पवित्रतेचे महत्त्व स्पष्ट केले. अनुसया मातेला संपूर्ण जगाने पतिव्रता म्हणून ओळखले आहे. तिच्या जीवनाची कथा सांगताना सुदर्शन गुरुजी भावनांनी ओतप्रोत झाले.

"अनुसया मातेने तिच्या पतिव्रताने साक्षात ईश्वराला देखील नम्र केले आहे. एकदा त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू, महेश तिची पतिव्रता तपासण्यासाठी भिक्षेच्या रूपात आले. अनुसया मातेला तिच्या पतिव्रतेवर विश्वास होता आणि तिच्या व्रतामुळे तिने त्रिमूर्तींना बालक रूपात परिवर्तित केले. अनुसयाच्या पतिव्रतेची ताकद इतकी प्रखर होती की तिने त्रिमूर्तींना आपले बालक बनवले."

गुरुजींनी हे सांगितल्यावर श्रोत्यांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी भावुक भक्तांना पाहून एक ओवी गायली

"अनुसया मातेचे पतिव्रत महान,
त्रिमूर्तींचे बालकांना तिच्या चरणी मान।
पतिव्रतेचे तेज, अखंडित स्वभाव,
अनुसया मातेचे जीवन, पतिव्रतेचे जणू गाव।"


अनुसया मातेच्या कथेनंतर, सुदर्शन गुरुजींनी मर्यादापुरुषोत्तम रामाच्या चरित्रावर प्रकाश टाकला. "रामायण" या महान ग्रंथाचा संदर्भ घेत त्यांनी रामाच्या जीवनातील आदर्श पतिव्रता आणि पती-पत्नीच्या नात्याचे महत्त्व सांगितले.

"राम हा सर्वांचा आदर्श होता. त्याने सदैव धर्माचे पालन केले आणि सीतेसाठी वनवास स्वीकारला. त्याचे जीवन सर्वांसाठी एक आदर्श आहे. सीता मातेने देखील आपल्या पतिव्रतेचे पालन करून रामासोबत वनवासात गेली. तिच्या पवित्रतेने अग्निपरीक्षा देखील पास केली."

गुरुजींनी रामायणातील एका श्लोकाचा उल्लेख केला:

"रामो राजमणिः सदा विजयते,
रामं रमेशं भजे।
रामेणाभिहता निशाचरचमू,
रामाय तस्मै नमः।"


प्रवचनाच्या शेवटी, सुदर्शन गुरुजींनी पतिपत्नीच्या नात्याचे महत्त्व सांगितले. "पतिपत्नीचे नाते हे विश्वास, आदर आणि प्रेम यांवर आधारित असते. पती आणि पत्नीने एकमेकांवर विश्वास ठेवावा आणि एकमेकांना आदर द्यावा. या नात्यातील प्रेम हेच खरे आध्यात्मिक आधार असते."

गुरुजींनी शेवटच्या ओवीने प्रवचनाचा समारोप केला

"पतिपत्नीचे नाते, स्नेहाचे बंधन,
विश्वासाचे स्तंभ, प्रेमाचे मंदिर।
जीवनाच्या प्रत्येक क्षणी, एकत्र चालावे,
पतिपत्नीचे नाते, खरे सुखदायक असावे।"


सुदर्शन गुरुजींच्या विचारांनी आणि कथा सांगण्याच्या पद्धतीने श्रोते भावविभोर झाले. त्यांच्या ओव्यांनी आणि श्लोकांनी वातावरण पवित्र केले होते.

प्रवचन संपल्यावर सुदर्शन गुरुजींनी भाविकांना आशीर्वाद दिला आणि मंदिराबाहेर आले. ते आपल्या घरी परत जाण्याच्या तयारीत होते, तेव्हाच त्यांना मोबाइलवर एक संदेश आला. तो संदेश 'अनुसया मॅडम' नावाने 'डार्लिंग डॉट कॉम' या वेश्या व्यवसाय सुरू असणाऱ्या वेबसाइटवरून होता. संदेशात लिहिले होते:

"गुरुजी, कृपया आज घरी या. आमचे हे म्हणाले की माझी शांती घालावी लागेल. त्यामुळे कृपया पूजेला आज घरी या..पूजेचे निमित्त करेन मजला तुमच्या मिठीत घायाळ"

संदेश पाहून सुदर्शन गुरुजींना थोडे आश्चर्य वाटले, पण त्यांनी लगेचच जाण्याचा निर्णय घेतला.


गुरुजी अनुसया मॅडमच्या घरी पोहोचले. तेथे त्यांचा नवरा त्यांची वाट पाहत होता. गुरुजींना पाहून तो नम्रतेने म्हणाला, "गुरुजी, माझे कामात लक्ष लागत नाही हिच्या चिडचिडेपणा मुळे. अनुसया चंचल बायको आहे,आमच्या एका नातेवाईकांनी सांगितले की बायकोची शांती घाला,हिने तुमच्या बद्दल ऐकलं होतं प्लिज हिची शांती घाला."

गुरुजींनी नम्रतेने मान डोलावली. "ठीक आहे, मी प्रयत्न करतो," त्यांनी उत्तर दिले.

नवऱ्याने अनुसयाला थोडावेळ गुरुजींसोबत एकांतात सोडून देऊन तो कामावर निघून गेला. नवरा बाहेर जाताच गुरुजी आणि अनुसया यांनी शरीरसुखाचा आस्वाद घेतला.

गुरुजींच्या मनात द्वंद्व सुरू झाले. एकीकडे ते पतिव्रता अनुसया मातेची कथा सांगून आले होते आणि दुसरीकडे ते आधुनिक अनुसया, जी सहज पतीला फसवते, तिच्यासोबत होते. त्यांची मनोवृत्ती एका विचित्र अवस्थेत होती.

"पतिव्रतेच्या नावे घेतलेली सृष्टी,
आधुनिक काळात फसवे नाती।
गुरुजींच्या पापाचा भरला घडा,
देवच येईल याला आता शिकवायला धडा।"

*************************************************

इन्स्पेक्टर राघव कंदलगावकरांच्या फोनची रिंगटोन वाजायला लागली..

"श्याममुरारी, कुंजविहारी तो शिरीहारी भेटलं का?
वाट मला त्या गाभाऱ्याची आज कुणी तरी दावलं का?
बघ उघडूनी दार अंतरंगातला देव गावलं का?
बघ उघडूनी दार अंतरंगातला देव गावलं का? "

"अहो सर फोन वाजतोय तुमचा, किती मारता त्या आरोपीला ,बाहेर या आणि या टेबलावरचा फोन उचला " एका हवालदाराने राघवला ओरडून त्याचा फोन वाजतोय या बद्दल सांगितलं

" वाजू दे फोन, आया बहिणींची छेड काढतात हे मुलं आणि ह्याचा आशा परिणामामुळे कोण्या एकाच धर्मावर लोकं हिंसक होतात म्हणून हरामीला फाडतोच आज " राघव रागात बोलत होता.

" अहो सर गंगाचा फोन आहे " हवालदार जोरात ओरडून सांगू लागला.

"काय गंगा ? ,थांबा लगेच आलो " राघव गंगाचे नाव ऐकून लगेच फोन घेण्यासाठी पळाला.

" हा बोलना गंगा ,कशी आहेस तू ? " राघवने विचारले

" अहो सर मी सीमा बोलतेय ,इकडे या बायका भांडत आहेत जेलमध्ये म्हणून गंगा मॅडम त्यांचा बेत बघताय ,घ्या ऐका तुम्हीच" हवालदार सीमाने राघवला सांगितलं आणि फोन स्पीकरवर ठेवला.


" तुमचा मुडदा बसविला तुमच्या तर ,भावान्यांनो दिवसभर पाकीट मारता आणि इथं जेलात घेतलं की एकमेकींची मारता व्हय !...थांबा आशा नाही ऐकणार तुम्ही...केसच कापते आज मी तुमचे म्हणजे एकमेकींचे झिंज्या उपटायला केसच हातात येणार नाही तुमच्या " गंगा तावातावाने रागात जेलमध्ये भांडणाऱ्या आरोपी महिलांशी बोलत होती.

" मॅडम " सीमा हवालदार गंगाकडे फोन घेऊन गेल्या

" काय आहे ?" गंगा व्हसकून सीमावर ओरडली

" राघव साहेबांनी उचललाय फोन ,घ्या बोला त्यांच्याशी " सीमा गंगाकडे फोन देत म्हणाली

" होका ? त्यांना सांग मेली गंगा, वाहून गेली ती गंगेच्या पाण्यात ,दोन दिवस झाले फोन नाही,आम्हालाही कामं आहेत पण आम्ही लावतो बरं का फोन " गंगा रागात बोलत होती

गंगाने रागात फोन कट करून दिला..

" अय्यो, बाईसाहेब लय भडकल्यात आता त्याच्या चौकीवर जाऊन मनवल्या शिवाय मला चैन नाही पडणार " राघव त्याच्या हवालदाराला म्हणाला.

*********************************

अनुसया मॅडम सोबत रासलीला रंगवून झाल्यावर सुदर्शन घरी आला, दारातच त्याची बायको पार्वती उभी होती.

" या या,आलात ...अनुसयातून बाजूला होऊन जरा पार्वतीला पण वेळ द्या की " पार्वती म्हणाली

अनुसया नाव ऐकून सुदर्शन थोडा घाबरला, त्याला घाम फुटला ..

" काय म्हणालीस ? ,अनुसया ? ...ती कोण ? " सुदर्शनने पार्वतीला विचारलं

" अहो असं काय करता, पतिव्रता अनुसया बद्दल बोलतेय मी, शेजारची सुमन सांगत होती आज तुम्ही मंदिरात मस्त प्रवचन दिलं देवी अनुसया बद्दल " पार्वती म्हणाली

" अच्छा ती होय , मला वाटलं " गुरुजी हळूच तोंडातल्या तोंडात बोलले

"काय , तुम्हाला कोण वाटलं ? पार्वतीने विचारलं

"नाही काही नाही, आपले बछडे झोपलेत का गं ? आणि राणी ताई ?..ती कुठं गेली आहे ? " सुदर्शनने विषय बदलत पार्वतीला विचारलं.

" अहो, आज परत त्रास झाला ताईना खूप ,मी म्हणाले मी येते सोबत पण त्या एकट्याच जाते बोलल्या हॉस्पिटलमध्ये, येतीलच इतक्यात " पार्वती म्हणाली

" काय !...अगं पण पैसे होते ना सोबत ? " सुदर्शनने विचारलं

"हो होते काही तीन चार हजार माझ्याकडे ते दिले मी त्यांना ,येतीलच लवकर तुम्ही नका टेन्शन घेऊ,मी आपल्या राजुला पाठवलं आहे ताईंसोबत " पार्वती म्हणाली.


क्रमशः

टीप : ही कथा केवळ मनोरंजन या हेतूने लिहीत आहे,त्यात धर्म कोणता वापरला, हाच धर्म का ..याबाबत जास्त विचार करू नये,तरीही कोणाच्या भावना दुखावल्या जात असतील तर क्षमस्व..