डार्लिंग डॉट कॉम - भाग २
सुदर्शनच्या घरातली शांतता आता ढगातली वीज चमकल्यागत फुटली होती. पार्वती सुदर्शनकडे पाहत होती, तिच्या डोळ्यात असंतोष आणि उद्वेग दोन्ही मिसळले होते.
"सुदर्शन, घरातल्या गोष्टींना तुझं कधी लक्ष लागणार?" पार्वतीच्या आवाजात तिरस्कार स्पष्ट होता.
"पार्वती, मी काय करू? गावातले लोक माझ्यावर विश्वास ठेवतात. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीच माझा वेळ जातो," सुदर्शनने आपली बाजू सावरत सांगितलं.
"आणि घर? मुलं? त्यांचं काय?" पार्वतीचा स्वर तिखट झाला.
सुदर्शनने तिच्या जवळ जाऊन तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. "पार्वती, तूच तर माझी आधारवड आहेस. तूच सगळं बघतेस ना? तुझ्या समजुतीमुळेच आपलं घर सांभाळलं जातं."
"बस्स सुदर्शन! मला तुझ्या गोड गोड बोलण्याची सवय झाली आहे. मी एकटीच किती सांभाळणार? तुला काही कर्तव्य नाही का?" पार्वतीने डोळ्यांतून आसवांचे मोती काढत विचारले.
सुदर्शनने तिच्या भोवती हातांचा विळखा घातला आणि तिला स्वतःकडे ओढलं. "अगं पार्वती, मला माफ कर. मी जाणतो की मी खूप चुकतोय, पण तुझ्या प्रेमात मला काहीच कळत नाही. तूच माझी संसाराची अर्धांगिनी आहेस."
पार्वती काही क्षण शांत राहिली, पण तिच्या मनात अजूनही असंतोषाचा भडका होता. ती सुदर्शनला बरोबर घेऊन बोलू लागली. "सुदर्शन, तू मला कायम आश्वासन देतोस, पण काही बदलत नाही. मी एकटी किती आणि कसे सांभाळू?"
सुदर्शनने तिच्या ओठांवर एक गोड किस केला. "मी तुला कायमचा वचन देतो की आता पासून मी तुझ्या प्रत्येक बोलण्याला महत्त्व देईन. आपण दोघांनी मिळून आपल्या संसाराची गाडी चालवू."
या गोड गप्पांमध्ये दोघांचे मन काही काळ शांत झाले. पोरं झोपली होती आणि त्या गप्पांची दिशा हळूहळू रोमँटिक झाली. सुदर्शन आणि पार्वती एकमेकांच्या मिठीत हरवले. सुदर्शनने तिच्या कंबरेतून हात फिरवत तिला जवळ ओढलं. त्यांनी आपल्या खोलीच्या अंधारात आनंदाच्या क्षणांचा आस्वाद घेतला.
रात्री पार्वती झोपल्यावर सुदर्शनने हळूच उठून फोन बाहेर काढला. "डार्लिंग डॉट कॉम" साईटवर लॉगिन करून तो चेक करू लागला. Sexy सुदर्शन प्रोफाइलवर त्याला एक नवा मेसेज आला होता. "हॅलो सेक्सी सुदर्शन, उद्या भेटूया का माझ्या फ्लॅटवर? २०००० देईल मी पूर्ण दिवस सोबत रहा माझ्या.."
सुदर्शनने झपाट्याने उत्तर दिलं, "ठिके, येईन. बायकोला सांगतो वास्तुशांती पूजा आहे दिवसभर बाहेरच असेल."
सकाळी सुदर्शन निघण्याच्या तयारीत होता. पार्वतीने त्याला विचारलं, "आज कुठे जाणार आहेस?"
"वास्तुशांती पूजा आहे. दिवसभर बाहेरच असेल. रात्री उशिरा येईन," सुदर्शनने उत्तर दिलं.
पार्वतीने नुसतं "हं" केलं, पण तिच्या मनात काहीतरी वेगळं होतं. तिने काही विचारलंच नाही.
सकाळी सुदर्शन आपल्या नेहमीच्या कपड्यांऐवजी, एकदम मॉडर्न कपडे घालून, गॉगल लावून निघाला. त्याने जीन्स, टी-शर्ट, आणि स्पोर्ट्स शूज घातले होते. पार्वतीला हे थोडं विचित्र वाटलं, पण तिने काही विचारलं नाही.
"आज खूप काम आहे. मी परतायला उशीर होईल," सुदर्शनने सांगितलं.
"ठीक आहे, काळजी घे," पार्वतीने उत्तर दिलं.
सुदर्शन एका आलीशान अपार्टमेंटमध्ये पोहोचला. त्याने दरवाजा वाजवला आणि समोर मीरा उभी होती. मीरा एक सुंदर, साधारण पस्तीस वर्षांची महिला होती. तिचे मोठे काळे केस, गोरा रंग, आणि नाजूक चेहरा होता. ती नेसून एक सुंदर साडी परिधान केली होती, पण तिच्या डोळ्यांत एक वेदना स्पष्ट दिसत होती.
"हॅलो सुदर्शन, ये ना आत," मीरा हसून म्हणाली.
सुदर्शनने आत येऊन तिचं घर पाहिलं. घरातला सजावट खूपच आधुनिक होती, पण तिथे काहीतरी उदास वाटत होतं. मीरा आणि सुदर्शन सोफ्यावर बसले.
"तू खूप सुंदर दिसतेस मीराजी," सुदर्शनने कौतुक केलं.
"धन्यवाद, सुदर्शन. तुला पाहून माझं मन हलकं झालं," मीरा म्हणाली.
"तू खूप ताणात आहेस का?" सुदर्शनने विचारलं.
मीरा थोडी गप्प राहिली आणि मग हळूच बोलली, "माझा नवरा मला समजून घेत नाही. तो माझ्यावर हात उचलतो. मला तुझ्या प्रेमाच्या स्पर्शाची खूप गरज आहे."
सुदर्शनने तिचा हात हातात घेतला. "मीरा, तू एक खास स्त्री आहेस. तुझी वेदना मी समजू शकतो. चल, आजचा दिवस आपण आनंदात घालवू."
सुदर्शन आणि मीरा जवळ आले. त्यांनी एकमेकांच्या मिठीत हरवून, एका वेगळ्या जगात प्रवेश केला. सुदर्शनने तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि त्याला तिथे खूप वळ उमटलेले दिसले. त्याच्या मनात एक करुणा जागी झाली.
"हे वळ कसे झाले?" सुदर्शनने विचारलं.
मीरा थोडी थांबून म्हणाली, "माझा नवरा मला मारतो. त्याला माझी काहीच किंमत नाही."
सुदर्शनने तिला जवळ घेतलं आणि तिच्या पाठीवर क्रीम लावायला सुरुवात केली. "तुझी वेदना मी समजतो. मी तुला आनंद आणि प्रेम देईन," त्याने हळूच तिच्या कानात कुजबुजलं.
मीरा आपल्या वेदनांना विसरून त्या प्रेमाच्या स्पर्शांमध्ये हरवली. सुदर्शनने तिच्या वळांवर क्रीम लावताना तिला गोंजारलं. तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू आले.
"सुदर्शन, खूप दिवसांनी कोणी आपलं माझ्यासोबत बसलंय असं वाटतंय मला, तुझं प्रेम मला मिळालं," मीरा अश्रू ढाळत म्हणाली.
सुदर्शनने तिला मिठीत घेतलं. "तुझं दुःख मी दूर करू शकतो. तू माझ्यासोबत आनंदी राहायला हवीस. हवं तेव्हा बोलावं तू मला ,तुझ्यासाठी नेहमी येईल मी, मलाही पैशांची गरज आहे"
ते दोघं त्या क्षणांमध्ये एकमेकांच्या प्रेमात हरवले होते. सुदर्शनने तिच्या प्रत्येक वेदनेला आपल्या प्रेमाने फुलवलं. त्या रात्रीचा रंग भरून गेला होता.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा