डार्क हॉर्स भाग 43

अरिनचे हे स्वप्न पूर्ण होईल का?


राध्याच्या आग्रहाखातर अरीनने मनात नसताना ही थोडे जेवण केले. पण तो रात्री बराच वेळ मुसमुसत होता.राध्याने ही त्याला अडवले नाही कारण नमिताचे बोललेले शब्द अरीनच्या जिव्हारी लागले होते आणि त्या दुःखाचा निचरा होणे गरजेचे होते. सकाळी अरीन उठला ही नाही आणि नेहमी प्रमाणे जीमला ही गेला नाही. राध्याने त्याला फोर्स ही केले नाही. ती स्वतःच आवरून खाली गेली आणि नाष्टा-चहा घेऊन आली. तर अरीन अजून ही झोपलाच होता.

राध्या,“ उठ अरीन आज ऑफिसला जायचं नाही का तुला?”ती त्याला उठवत म्हणाली.अरीन उठून बसत म्हणाला.

अरीन,“नको मला नाष्टा; मी चहा घेतो!” असं म्हणून तो उठून वॉशरूमकडे जाऊ लागला तर राध्याने त्याचा हात धरला आणि त्याला स्वतः जवळ बसवून घेत बोलू लागली.

राध्या,“ अरीन मला कळत आहे तुला काय वाटते आहे ते पण कोणाच्या बोलण्याला किती महत्त्व द्यायचे हे देखील आपल्याला कळायला हवे! अरे नमिता तुला असंच बोलणार तुझा पाय खेचायचा प्रयत्न करणार कारण तिच्या मनात तुझ्या विषयी रादर आपल्या विषयी राग आहे! तीच पितळ उघडे अण्णांनी अप्रत्यक्षपणे जरी पडले असले तरी तिला कुठून ना कुठून हे कळलेच आहे ना! आणि अण्णांनी हे कोणासाठी केले तुझ्या आणि माझ्यासाठीच ना म्हणून ती तुला अशी टोचून बोलली आहे! आता तू ठरव की यातून बाहेर येऊन तिला हरवायच की स्वतः हरून मला ही हरवायच!” ती त्याला समजावत बोलत होती आणि अरीन तिला मिठी मारून बोलू लागला.

अरीन,“ नाही राध्या मी तिला जिंकू देणार नाही! मीच जिंकणार आणि तुला ही जिंकवणार! ती कोण समजते स्वतःला? नाही तिच्या नाकावर टिच्चून हा अरीन इनामदार स्वतः एक ब्रॅड झाला तर बघा!” तो ठामपणे म्हणाला.

राध्या,“ that\"s like a good boy!बरं उठ आणि आवर आता ऑफिसला जायचे आहे ना! मला ही ऑफिस आहे आज साहेब आणि पुढे अजून तुला संधी मिळतील अरीन! तुझं टॅलेंट पाहून तुला नक्कीच मोठी ऑफर येईल!आणि मी आहे ना!” ती त्याचा गाल ओढत म्हणाली.

अरीन,“ तू माझी ताकत आहेस राध्या! Love you!बरं मी आलो तयार होऊन दोघे बरोबर निघू मी तुला ऑफिसमध्ये सोडून जातो मला आज फॅक्टरी मध्ये ही जायचे आहे आणि हो आज अजून येताना काही ऍड्स एजन्सीमध्ये पोर्टफोलिओ देऊन येतो!” तो म्हणाला.

राध्या,“आता कसं माझा अरीन इनामदार शोभतोस बघ! जा आता!” ती खुश होत म्हणाली.

अरीन,“तुझाच!” तो डोळे मिचकावून म्हणाला आणि आवरायला निघून गेला.

माणसाला जर घरातून योग्य सपोर्ट मिळाला त्याला योग्य वेळी योग्य व्यक्तीचा मानसिक आधार मिळाला तर माणूस पुन्हा पुन्हा नव्या जोमाने जगाशी लढायला तयार होतो. अरीनसाठी राध्या त्याची सपोर्ट सिस्टीम होती. तिने त्याला आज ही योग्य पध्द्तीने सांभाळून घेतले होते त्यामुळे अरीन पुन्हा उभा राहू शकला होता.
★★★
थोड्याच दिवसात अरीनच्या प्रयत्नांना यश आले आणि त्याला एका बड्या ब्रँडच्या ऍडमध्ये काम करण्याची संधी मिळाली. तिथून त्याच्या करिअरला चांगली ग्रीप मिळाली होती.पण तो अजून ही नमिताने त्याचा केलेला अपमान आणि त्या डायरेक्टरने त्याच्याकडे केलेली विचित्र मागणी विसरू शकला नव्हता. त्याच्या मनात आता अनेक विचार फेर धरून नाचत होते.त्याला प्रश्न पडला होता की तो आर्थिक दृष्ट्या स्टेबल असताना,घरातून सपोर्ट असताना देखील ही त्याला स्वतःचे अस्तित्व निर्माण करायला किती तरी अडचणींना सामोरे जावे लागले. त्याला अपमानास्पद वागणूक दिली गेली. तो विचार करत होता मग ज्या पुरुषांना या दलदलीतून बाहेर पडायचे आहे पण आर्थिक आणि कौटुंबिक पाठबळ नाही त्यांना तर या इच्छा असून देखील या दलदलीतून बाहेर निघणे केवळ अशक्य आहे. त्यांच्यासाठी काही तरी केले पाहिजे हा विचार अरीनला आता स्वस्थ बसू देत नव्हता. म्हणून मग त्याने या विषयी राध्या बरोबर चर्चा करायचे ठरवले.

आज रविवार होता आणि म्हणून त्याने डिनरचा प्लॅन केला तिथून येताना राध्याशी या विषयी चर्चा कारायची असे मनोमन ठरवले.त्याने संध्याकाळी डिनरसाठी जायचे आहे याची आधीच राध्याला कल्पना दिली होती. आज सुट्टी असली तरी अरीनची मात्र एका ऍड संदर्भात दुपारी मिटिंग होती. तो दुपारी जेवण करून मिटिंगसाठी निघून गेला.

राध्याने मात्र अरीनच्या मनात काही तरी उलथापालथ सुरू आहे हे हेरले होते पण अरीन स्वतःहुन बोलण्याची वाट ती पाहत होती. आज कदाचित त्याच्या मनात काय चालू आहे हे तो बोलेल असे तिला ही कुठे तरी वाटत होते. अरीनला घरी यायला उशीर झाला होता तरी त्याने राध्याला तयार होऊन बस म्हणून सांगितले होते. राध्या तयार होऊन त्यातीच वाट पाहत होती. अरीन सात वाजता घरी आली. तो फ्रेश होऊ पर्यंत राध्याने त्याच्यासाठी कॉफी करून आणली.ते पाहून तो म्हणाला.

अरीन,“ thanks dear! याचीच खूप गरज होती मला & you are looking beautiful!”तो तिला पाहून एका हाताने जवळ ओढत म्हणाला.

राध्या,“ आता तू thanks म्हणणार का मला! आणि चल लवकर आता उशीर होईल आपल्याला!” ती त्याच्या ब्लेझरची कॉलर नीट करत हसून म्हणाली.

अरीन,“ हो मॅडम चला!” तो हसून म्हणाला. दोघे ही निघाले.

शहरापासून लांब पण निवांत रेस्टॉरंट मधील प्रायव्हेट एरियात त्याने टेबल बुक केलं होतं. रेस्टॉरंट निसर्गाच्या सानिध्यात असलेले पाहून राध्या खुश झाली. दोघांनी ही डिनर केला आणि दोघे तिथंच असलेल्या गार्डनमध्ये बसले. अरीन मनात शब्दांची जुळवाजुळव करत होता. त्याचा चेहरा पाहून राध्याच्या ते लक्षात आले आणि तिनेच बोलायला सुरुवात केली.

राध्या,“ अरीन काय चालले आहे तुझ्या मनात नेमकं?बरेच दिवस झाले तुला पाहतेय मी तुझ्या मनात नक्कीच काही तरी सुरू आहे!” ती त्याच्या हातावर हात ठेवत म्हणाली.

अरीन,“ राध्या you know me better! हो माझ्या मनात बरेच दिवस विचार घोळत आहे!राध्या मी आर्थिक दृष्ट्या इतका स्टेबल असताना तुम्ही सगळे माझ्या मागे इतके खंबीरपणे उभे असताना देखील मला मॉडलिंग क्षेत्रात करिअर करायला किती त्रास झाला मला किती स्ट्रगल करावे लागले.इतका बॅकअप सपोर्ट असताना ही मी हार मानली होती. तू माझ्या पाठी खंबीरपणे उभी राहिलीस म्हणून मला मॉडलिंग करणे शक्य झाले. त्या दलदलीतून मी अगदी सहज विणा मॅडम मुळे बाहेर पडू शकलो! पण ज्या पुरुषांना या दलदलीतून बाहेर पडायचे आहे पण त्यांना खंबीर पाठिंबा नाही ते आर्थिकदृष्ट्या तितके सक्षम नाहीत ते इच्छा असून देखील यातून बाहेर पडू शकत नसतील. अशा पुरुषांना मदत करण्यासाठी मला काही तरी करायचे आहे!”तो बोलायचा थांबला.


राध्या,“ खूप चांगला विचार आहे अरीन पण यासाठी काय करायचे याची काही कल्पना तुझ्या डोक्यात आहे का?” तिने कौतुकाने त्याला पाहत विचारले.

अरीन,“ हो आहे माझ्या डोक्यात एक कल्पना वीणा मॅडमच्या नावाने आपण एक स्ट्रस्ट उघडायची त्या माध्यमातून ज्या पुरुषांना या देह विक्रीच्या दलदलीतून बाहेर पडायचे आहे त्या पुरुषांना मदत करायची म्हणजे त्यांना कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे किंवा काही व्यावसायिक शिक्षण घ्यायचे आहे. ते त्यांना द्यायचे तसेच त्यांना काम करण्यासाठी संधी आपणच उपलब्ध करून द्यायच्या! समजा मला जसा वाईट अनुभव आला तसा कोणाला आला तर त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहून असं वाईट वागणाऱ्या लोकांना धडा शिकवायचा!यासाठी अण्णांच्या समाज कार्यातील अनुभवाचा आपल्याला खूप फायदा होईल. अण्णा आणि बाबा या ट्रस्टचे ट्रस्टी असतील अर्थात मी ही काम करणारच पण त्यांच्या अंडर हे सगळे काम चालेल त्या साठी प्रोफेशनल स्टाफ आपण अपॉइंट करायचा म्हणजे कायदे तज्ञ, करिअर ऍडव्हायजर,त्यांचे गृमिंग करण्यासाठी स्टाफ तसेच समुदेशक!(तो बोलत होता आणि राध्या त्याच बोलणं ऐकत होती. ती बराच वेळ काही बोलत नाही हे पाहून अरिनने तिच्या समोर चुटकी वाजवली आणि तो म्हणाला) कुठे लक्ष आहे राध्या तुझं मी एकटाच बडबडत आहे किती वेळ झाले?” तो म्हणाला.


राध्या,“ अरे तुझी कल्पना ऐकत आहे! खरंच अरीन तुझी कल्पना खूप चांगली आहे आणि तुला इतके सामाजिक भान आहे याचा मला अभिमान वाटतो!” ती म्हणाली.

अरीन,“अभिमान कसला ग त्यात? मी जे भोगले ते दुसरे कोणी भोगू नये हीच इच्छा! आणि या कामासाठी तू माझ्या सोबत आहेस ना? तू माझी प्रेरणा माझी ताकत आहेस! तुझी साथ मला हवी आहे राध्या!” तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला.

राध्या,“अरीन हे काय विचारणे झाले का? I am always with you! बरं उशीर होतो आहे आपल्याला चल निघू!” ती म्हणाली आणि अरीनने होकारार्थी मान हलवली.

अरीनने जे भोगले होते त्यातून त्याला ही कल्पना सुचली होती आणि समाजासाठी त्याला काही तरी करण्याची गाढ इच्छा होती. त्यातूनच त्याने हे स्वप्न पाहिले होते. जे साकार होण्यासाठी त्याला खूप लोकांची खंबीर साथ हवी होती.

अरीनचे हे स्वप्न सत्यात उतरेल का?


©स्वामिनी चौगुले


सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा!






🎭 Series Post

View all