डार्क हॉर्स भाग ४१

अरिन अचानक कुठे गायब झाला असेल?


अरीन दुसऱ्या दिवशी त्या लोकल ब्रँडच्या ऑडिशनसाठी गेला आणि त्याच्या उमद्या व्यक्तिमत्त्वामुळे तो सिलेक्ट देखील झाला. त्या नंतर त्याला अशीच छोटी-मोठी कामे मिळत होती. ऑफिस,फॅक्टरी आणि मॉडेलिंग करिअरचा ताळमेळ बसवताना त्याच्या नाकीनऊ येत होते पण या सगळ्यात राध्याची त्याला समर्थ साथ होती.

आज दोन महिने झाले होते आणि आराध्याला(अरीन+राध्या) त्यांच्या ड्युप्लेक्स फ्लॅटचे पजेशन मिळाले होते त्यामुळे दोघे ही खूप खुश होते.राध्याने तिच्या ऑफिसच्या कामातून वेळ काढून छान इंटेरिअर करून घेतले होते.ड्युप्लेक्स फ्लॅट एका हाय सोसायटीमध्ये मस्त फाईव्ह बी.एच.के प्रशस्त होता. त्यामुळे सगळ्यांना ज्याची त्याची प्रायव्हसी मिळणार होती. मोठा हॉल एका बाजूला प्रशस्त आणि सुसज्ज किचन,दुसऱ्या बाजूला दोन बेडरूम आणि मोठ्या गॅलऱ्या,हॉल मधून जाणारा नागमोडी जीना आणि वर तीन प्रशस्थ बेडरूम! पुण्यात देखील अर्पिता, आई-बाबा आणि अण्णांची शिफ्टिंगची बरीच तयारी झाली होती. अर्पिताचा ही रिजल्ट ही लागला होता आणि तिने पुन्हा कॉलेजमध्ये टॉप केले होते. तिला पुढच्या आठवडा भरात कंपनीने जॉबवर हजर रहायला सांगितले होते. त्यामुळे अरीन आणि अर्पिताने पुढच्या दोन दिवसातच शिफ्टिंग करायचे ठरवले होते.शिफ्टिंग झाल्यावर गृह प्रवेशाची पूजा आणि छोटेखानी कार्यक्रम करायचे सर्वानुमते ठरले होते.आज अरीन आणि राध्या पुण्याला गेले आणि दुसऱ्याच दिवशी ते दोघे सगळ्यांना घेऊन शिफ्ट झाले.

ठरल्या प्रमाणे तीन दिवसांनी पूजा होती. अरीन आणि राध्याने पूजेची सगळी तयारी केली. आज पूजा होती पूजेला राध्या आणि अरीन बसणार होते. अरीन तयारी पाहण्यासाठी लवकरच खाली आला होता. राध्याने ही खालचे सगळे आवरले. तिचा स्टाफ होताच हाताखाली. पूजेचा मुहूर्त बाराचा होता आणि पाहुणे ही यायला सुरुवात झाली होती म्हणून आईंनी तिला तयार व्हायला पाठवून दिले.थोड्या वेळाने अरिन ही रूममध्ये गेला आणि आरशात पाहून तयार होणाऱ्या राध्याला पाहतच राहिला.
राध्याने गर्द हिरव्या रंगांची पेशवाई साडी नेसली होती.जी तिचा गोरा रंग आणखीनच खुलवत होती.हातात हिरव्या जर्द बांगड्या,कानात मोठे झुबे, कपावर चंद्रकोर, लाईट मेकअप, गळ्यात चिंचपेटी,मंगळसूत्र आणि गंठण,केसांचा अंबाडा त्यात खोवलेली स्वर्ण फुले! ती नाकात मोत्यांची नाथ घालत होती!पूर्ण पारंपारिक वेशात ती एखाद्या राजघराण्यातील स्त्री सारखी दिसत होती.अरिन तिला न्याहळत आहे याच्याकडे तिचे लक्ष नव्हते.अरिन तसाच तिच्या न कळत माघारी गेला त्याने कसलाही आवाज न करता दार लावले. तो तिच्या जवळ आला आणि तिला मागून मिठी मारली!तो राध्याचे आरशातील प्रतिबिंब पाहत तिच्या कानात हळूच खट्याळ हसून बोलू लागला.

अरिन,“राणी सरकार मुजरा स्वीकारा!”

राध्या,“ आता हे काय नवीन!” तिने हसून विचारले.

अरिन,“नवीन काय त्यात तू माझ्या हृदयाची राणीच तर आहेच आणि आज तर काय राणीच दिसत आहेस! आज तर माझा मर्डर निश्चित केला आहे वाटत!” तो तिला स्वतःकडे वाळवत म्हणाला.

राध्या,“ उगीच काही तरी बोलत जाऊ नकोस अरिन मूर्खा सारखं!आणि हो साहेब मी तुमची राणी आहे तर तुम्ही माझे राजे आहात!बरं सोड मला; खाली जाऊ दे सगळी कामं खोळंबली असतील!तुझे कपडे इथे बेडवर ठेवले आहेत काढून; लवकर आवरून ये बरं!” ती त्याला सूचना देत होती.

अरिन,“ झालं लावली माझ्या रोमान्सची वाट!जाच तू मी येतो!” तो नाराजीने म्हणाला.

राध्या,“ बापरे आमचे राजे नाराज झाले की!बरं राजे माफ करा आम्हाला!पण असं वाटत नाही का तुमच्या तिल शृंगार रस केव्हाही उभाळून येतो मग आम्ही काय करावे बरे!” तिने निरागसपणे विचारले.

अरिन,“ ये बाई मी तुला राणी म्हणालो तर लगेच त्या कॅरेक्टरमध्ये घुसलीस की काय?इतकं मराठी मला येत नाही!हा पण माझी नाराजी दूर करण्याचा उपाय मात्र मला माहित आहे!” तो खट्याळ हसून म्हणाला.

राध्या,“ हुंम म्हणजे आमच्या राजाना आता लाच द्यावी लागणार तर घ्या मग तुम्हाला कोण आडवले आहे!” ती गालात हसून म्हणाली.

आणि अरिन तिच्या अगदी जवळ आला.त्याचे श्वास तिला तिच्या श्वासात जाणवत होते.त्याचे ओठ तिच्या ओठांच्या अगदी जवळ तिला जाणवले आणि तिने डोळे मिटून घेतले.पुढच्याच क्षणी त्याचा श्वास वर जाणताना तिला जाणवला आणि तिने डोळे उघडले. तर अरिनचे ओठ तिच्या कपाळावर टेकले.तिने लाजून तिचा चेहरा वळवला.तर अरिनने तिचा चेहरा दोन्ही आताच्या ओंजळीत घेतला आणि तो बोलू लागला.

अरिन,“राध्या माझी मनधरणी करण्यासाठी किंवा माझी नाराजी दूर करण्यासाठी तुला कधीच मला असली कोणतीच लाच द्यायची गरज नाही!love you!” तो म्हणाला आणि राध्याने त्याला मिठी मारली.

राध्या,“love you too!”

अरिन,“बरं जा लवकर खाली मी आलोच पंधरा मिनिटात!” तो म्हणाला आणि राध्याने होकारार्थी मान हलवली.

ती खाली सगळी तयारी पाहत होती आणि अरिन तिला पायऱ्या उतरताना दिसला!ती आणि बाकी सगळेच त्याला पाहतच राहिले.मोरपंखी रंगाचा तंग जोधपूर त्यातून त्याची पिळदार शरीरयष्टी उठून दिसत होती! एका हातात घड्याळ एका हातात ब्रेसलेट,जेल लावून सेट केलेले केस आणि ओठांवर किलर स्माईल! तो एखाद्या राजा सारखा रुबाबात पायऱ्या उतरत होता! राध्या तर त्याला पाहून घायाळ झाली होती.तिथे अर्पिता आली आणि ती म्हणाली.

अर्पिता,“वहिनी किती पाहताय त्याला अहो बास आणि तुम्ही सगळे माझ्या भैय्याला नजर लावणार आहात का?जा तुमची कामं करा!” तिच्या बोलण्याने राध्या सहित सगळे भानावर आले आणि आपापल्या कामाला लागले.अर्पिता अरिन जवळ गेली आणि त्याच्या काना मागे डोळ्यातल्या काजळाची टीत लावत म्हणाली.

“तुला नजर लागयला नको बाबा सगळे तुलाच पाहत होते म्हणून हा उपाय!”

अरिन,“ काय अप्पे तू पण ना आजी बाई होतेस बघ कधी कधी!” तो हसून म्हणाला.त्याने राध्याला डोळ्यांनी विचारले कसा दिसतोय म्हणून आणि तिने हाताचा मोर करून छान असा इशारा केला.

दोघे ही पूजेला बसले.गृह प्रवेशाचा कार्यक्रम साग्रसंगीत पार पडला आणि सगळ्यांचे रुटीन पूर्ववत सुरू झाले.अण्णांनी मुंबईत त्यांची समाजसेवा सुरू केली. आता अरिनचे बाबा ही त्यांच्या बरोबर काम करत होते.आई घरीच असायच्या,अर्पिताने ऑफिस जॉईन केले.राध्याने मुंबईत तिचे नवीन हेड ऑफिस सुरू केले होते आणि अरिनचे ऑफिस,फॅक्टरी आणि मॉडेलिंग असे तिहेरी काम सुरू होते.

अरिनला सध्या तरी लोकल ऍड मिळत होत्या.पण तो त्यातच खुश होता आणि त्याला माहित होते की आज ना उद्या त्याला एखाद्या मोठ्या इंटरनॅशनल ब्रँडची ऍड नक्की मिळेल.त्यासाठी त्याचे प्रयत्न देखील सुरू होते आणि ती संधी त्याला लवकरच मिळाली.एका मोठ्या ब्रँडच्या ऍडसाठी ऑडिशन होणार होते आणि त्या ऍडचे दिग्दर्शण एक नामांकित डायरेक्टर करणार होता! त्याने नेहमी प्रमाणे त्याचे ऑफिसचे काम दुपार पर्यंत उरकले आणि तो ऑडिशनसाठी गेला.

राध्या दिवस भर मनोमन त्याला ही ऍड मिळावी म्हणून प्रार्थना करत होती.ती संध्याकाळी ऑफिसमधून घरी आली आणि उत्सुकतेने अरिनची वाट पाहू लागली पण रोज दहा वाजे पर्यंत येणारा अरिन अकरा वाजले तरी आला नव्हता.तिने त्याला फोन देखील लावला पण फोन बंद लागत होता.ऑफिसमध्ये फोन करून विचारले तर तो दुपारी ऑडिशनसाठी गेला तो परत ऑफिसला आलाच नाही असे कळले.घरात ही सगळ्यांनी तिला विचारून झाले की अरिन का नाही आला अजून तर उगीच सगळ्यांना टेन्शन नको म्हणून तिने तो मिटिंगसाठी गेला असून रात्री उशिरा येणार आहे अशी थाप मारली.तिला अरिनची काळजी ही वाटत होती आणि त्याच्या अशा बेजबाबदार वागण्याचा राग देखील येत होता.ती आता मनातून घाबरली होती.अजून थोडावेळ वाट पाहून सगळ्यांना सांगून पोलीस स्टेशन गाठायचे असे तिने ठरवले होते.

अरिन अचानक असा कुठे गायब झाला असेल?

©स्वामिनी चौगुले


सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा!





🎭 Series Post

View all