डार्क हॉर्स भाग ४०

स्वतःचे अस्तित्व निमार्ण करण्याचा अरीनचा संघर्ष कसा असेल?


अरीन आणि राध्या मुंबईला निघून गेले. त्यांचे वैवाहिक जीवन सुरळीत सुरू झाले होते. दोघी ही एकमेकांच्या सहवासात प्रेमाने चिंब भिजत होते. दोघांच्या ही रात्री जागून जात होत्या.राध्याने मुद्दाम पंधरा दिवसा नंतर ऑफिस जॉईन करण्याचा निर्णय घेतला होता कारण तिला अरीनच्या सहवासाची ओढ लागली होती आणि लग्न होऊन तीन महिने होऊन गेले असले तरी ती आत्ता लग्नानंतरचे गुलाबी दिवस अनुभवत होती. राध्या तिच्या बिझनेसच्या हेड ऑफिससाठी मुंबईत जागा शोधत होती. अरीन ऑफिसमध्ये जात होता पण तो आजकाल पाच वाजता ऑफिस सुटले की लगेच घरी येण्यासाठी निघत असे तो साधारण सहा वाजता घरी पोहोचत असे दोघांचे प्रेम सुंदर आकार घेत होते.

अचानक घेतलेला लग्नाचा निर्णय त्या नंतर झालेले लग्न! राध्या-अरीनचे वैवाहिक आयुष्यात निर्माण झालेल्या समस्या! त्या नंतर तीन महिने त्याला घ्यावे लागणार समुपदेशन या सगळ्यामुळे त्याने घेतलेला मॉडेलिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय कुठे तरी मागे पडला होता. आता त्याने वैवाहिक जीवन सुरळीत झाले होते पण अरीनला सध्या तरी राध्या शिवाय काहीच दिसत नव्हते.राध्याला मात्र आता अरीनला स्वतःची ओळख निर्माण करताना पहायचे होते.म्हणून आज तिने त्या बद्दल अरीनशी बोलायचे ठरवले होते. अरीन नेहमी प्रमाणे आज ही सहा वाजता घरी आला. तर राध्याने तो येण्याआधीच त्याला आवडतो म्हणून मुगाच्या डाळीचा हलवा करून ठेवला होता. तो फ्रेश व्हायला गेला आणि तिने चहा ठेवला तो येई पर्यंत तिने चहा नाष्टा हॉलमध्ये टीपॉयवर आणून ठेवला होता. अरीन सोफ्यावर येऊन बसला आणि हलवा पाहून म्हणाला.

अरीन,“ आज काय विशेष मॅडम? म्हणजे खास माझ्या आवडीचा पदार्थ केला आहे?” त्याने हसून विचारले.

राध्या,“ हो आहे काही तरी विशेष! तू खा आधी मग बोलू!” ती त्याच्या हातात प्लेट देत म्हणाली.

दोघांनी नाष्टा केला आणि चहा घेतला आणि राध्याने विषयाला हात घातला.

राध्या,“ अरीन मला वाटतं की तू आता ऑफिस बरोबरच मॉडलींगच्या करिअरचा देखील विचार करावास! त्यासाठी तू आता पाऊले उचल!”

अरीन,“ हो पण राध्या सध्या मला माझा जास्तीत जास्त वेळ तुला द्यायचा आहे! आधीच साखरपुडा होऊन एक वर्ष लग्नासाठी आणि आता लग्न होऊन देखील तीन महिने तुला वैवाहिक सुखाची वाट पाहावी लागली त्यामुळे आता मला अजिबात तुझ्याकडे दुर्लक्ष करायचे नाही! मी मॉडलींगचा विचार काही दिवस तरी करायचा नाही असं ठरवलं आहे!” तो गंभीर होत बोलत होता.राध्या त्याच्या जवळ जाऊन बसली आणि त्याचा हात धरून बोलू लागली

राध्या,“ अरीन हा कसला भलता विचार करत बसला आहेस!मी किती वेळा सांगू तुला की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून मी तुझ्यासाठी हे सगळं केलं रादर मी हे स्वतःसाठी केले आहे. कारण मला तू हवा आहेस अरीन! अरीन मला तुझी ताकद बनायचे आहे तुझा विकनेस नाही! मी खुश आहे तुझ्याबरोबर! तू मला खूप भरभरून दिले आहेस प्रेम,आदर,सुख अगदी सगळं सगळं!आणि हो मी तुला खूप त्रास दिला होता अरीन स्वतःचे भलते-सलते समज करून घेऊन की तू आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलास! इतकं सगळं होऊन देखील तू मला मोठ्या मनाने माफ केलंस तुझ्या आयुष्यात जागा दिलीस! तुझ्या सारखा समजूतदार लाईफ पार्टनर मला मिळाला नसता! आणि तू जर तुझ्या करिअरवर फोकस केलंस तर माझ्याकडे तुझं दुर्लक्ष होईल असं काही नाही प्लिज अरीन मला काय म्हणायचे आहे कळत नाही का तुला? हीच योग्य वेळ आहे तू स्वतःच्या करिअरचा विचार करून त्यासाठी प्रयत्न करण्याची!” ती त्याला समजावत बोलत होती.

अरीन,“ काय राध्या तू पण मागच काढत बसलीस आणि त्या वेळी तुझ्या एकटीची चूक नव्हती तर चूक माझी देखील होती! तू असलं काही तरी बोलून मला लाजवत आहेस! मॉडेलिंगमध्ये मला उतरायचं आहे राध्या पण मी आत्ता तरी तो विचार नाही करू शकत कारण ऑफिस बरोबर मोडलींग जर सुरू केलं तर मी तुला म्हणावा तितका वेळ नाही देऊ शकणार! आणि हा तुझ्यावर अन्याय असेल! आधीच माझ्यामुळे तुझ्या आयुष्यात सुख खूप उशीरा आले आहे. माझ्या जबाबदाऱ्या! माझा मानसिक त्रास या सगळ्यात तुझ्या हळुवार भावना,इच्छा भरडल्या गेल्या!तुझ्या सारख्या मोठ्या घराण्यातील मुलीने माझ्या सारख्या मुलाला स्वीकारणे हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे!” तो भावुक होऊन बोलत होता. हे ऐकून राध्या मात्र चिडली आणि त्या पेक्षा जास्त दुखावली गेली.ती रडत पण रागाने बोलू लागली.

राध्या,“ठीक आहे अरीन! तुला काय करायचे तू करू शकतोस इथून पुढे मी तुला काहीच बोलणार नाही कारण मी तुझी बायको असून देखील तू मला अजून ही मनापासून आपले मानले नाहीस!तू तर असं बोलत आहेस की मी हे सगळं करून तुझ्यावर उपकार केले आहेत आणि त्या उपकाराची परत फेड तुला असं वागून करायची आहे!मी तुझी सहचारिणी! तुझी लाईफ पार्टनर नाही तर तुझी जबाबदारी आहे फक्त!”

ती असं म्हणून रडत बेडरूममध्ये गेली.अरीन तिच्या मागोमाग बेडरूममध्ये गेला. त्याला कळून चुकले होते की त्याने चुकीचे बोलून राध्याला दुखावले आहे.आता त्याला तिची मनधरणी करावी लागणार होती.ती जाऊन बेडवर बसली होती तिच्या डोळ्यातून कढ वाहत होते.अरीन तिच्या जवळ जाऊन बसला आणि तिचा चेहरा दोन्ही हाताच्या ओंजळीत घेऊन बोलू लागला.

अरीन,“ I am sorry राध्या मी भावनेच्या भरात चुकीचं बोलून गेलो.माझ्या बोलण्याचा अर्थ तसा नव्हता राध्या! तू माझी जबाबदारी नाहीस तर you are my life!आणि तू माझी आहेस कळलं तुला! माझी बायको आणि तुझ्यावर माझा हक्क आहे तसाच तुझा ही माझ्यावर हक्क आहे इथं आपलं आणि परक्याचा प्रश्नच नाही! I love you sweetheart!आणि ठीक आहे मी माझ्या करिअरचा विचार करेन आणि त्या दिशेने प्रयत्न देखील सुरू करेन!” तो तिला समजावत बोलत होता.

राध्या,“ काही गरज नाही मला सॉरी म्हणण्याची आणि माझी मनधरणी करण्याची आणि तुझ्या करिअर बाबतीत तू निर्णय घेण्यासाठी समर्थ आहेस मी इथून पुढे तुला काही बोलणार नाही!मी जाते स्वयंपाक करायचा आहे मला!”

ती डोळे पुसून तोंड फुगवून म्हणाली आणि जाऊ लागली तर अरीनने तिचा हात धरून तिला स्वतःकडे जोरात ओढले.त्या झटक्या सरशी ती त्याच्या अंगावर जाऊन आदळली.अरीनने तिला स्वतःच्या मांडीवर बसवून घेतले आणि त्याच्या मजबूत पाहू पाशात तिला घट्ट जखडले. ती स्वतःला सोडवून घेण्याची व्यर्थ चुळबूळ करत होती.

अरीन,“ मी तुला सॉरी म्हणत आहे ना! माझं चुकलं मी नाही बोलणार पुन्हा असं काही!ऐक ना प्लिज!” तो तिच्या कानात बोलत होता!”


आता त्याचे ही डोळे भरून आले होते.ते पाहून राध्या मात्र आता कसं तरी वाटलं आणि ती त्याच्या गळ्यात दोन्ही हात गुंफून त्याच्या डोळ्यात पाहत बोलू लागली.

राध्या,“ खरं का? तू मला असं बोलून परकं करतोस अरीन मी तुझ्यावर कोणता ही उपकार केला नाही कळलं! मी तुझ्यावर प्रेम केलं आहे!I Love you alot!” ती म्हणाली.

अरीन,“हो ते माहीत आहे मला! Love you daring!” असं म्हणून तो तिला घेऊन बेडवर पडला.

अरीन तिच्यावर मुक्त हस्ताने प्रेमाचा वर्षाव करत होता आणि राध्या त्यात मनसोक्त न्हाऊन निघत होती. दोघांना ही वेळ काळाचे भान राहिले नव्हते. राध्या अरीनच्या छातीवर विसावली.अरीनने तिच्या भोवती हाताचे घट्ट कडे केले होते.

राध्या,“ अरीन सोड बरं मला स्वयंपाक करायचा आहे.खूप वेळ झाला!” ती लाडिकपणे म्हणाली.

अरीन,“नाही सोडणार माझी हक्काची बायको आहेस तू!”तो त्याच्या हाताचे कडे आणखीन घट्ट करत म्हणाला.

राध्या,“अच्छा! मघाशी बोलताना विसरला होतास का मग हे? नालायक कुठला?अशा वेळी बरा हक्क गाजवायचा कळतो रे तुला!” लटक्या रागाने म्हणाली.

अरीन,“ मी त्यासाठी तुला all ready sorry म्हणालो आहे! अशा वेळी का बरं मी तर कायमच तुझ्यावर हक्क गाजवतो!” तो तिला त्याच स्थितीत पाहत म्हणाला.

राध्या,“बरं बाबा! सोड आता मला तुला काही तरी दाखवायचं आहे आणि स्वयंपाक करायचा आहे!” ती स्वतःला सोडवून घेण्याचा प्रयत्न करत म्हणाली.

अरीन,“ दाखव नंतर! आणि स्वयंपाक राहू दे करायचा आपण बाहेर जेवायला जाऊ थोड्या वेळाने!आणि तुझी चुळबूळ बंद कर बरं आधी नाही तर तुला खूप महागात पडेल राध्या!” तो तिला धमकावत म्हणाला.

राध्या,“ अच्छा तू मला धमकी देणार का?सस्ती चिजों का शौक हम भी नही रखते आणि आज पासून बाहेरचे खाणे बंद! घरातले पौष्टिक अन्न खायचे! उद्या पासून जीमला जायला आळस करायचा नाही! आजकाल तू सकाळी उठायच्या कंटाळ्याने जीमला जायला टाळाटाळ करतोस!मॉडलिंगमध्ये उतरायचे तर हे सगळं करावेच लागेल. फिट असायला हवं ना!आणि सोड बरं मला तुला काही तरी दाखवायचे आहे अरीन अरे मी आज नेटवर मॉडेल हवा अशी जाहिरात पाहिली आहे म्हणजे ब्रँड लोकल आहे तुला कसं वाटतं बघ!सोड की आता मोबाईल घेऊन येते मी हॉलमध्ये आहे माझा मोबाईल!” ती आता वैतागून म्हणाली आणि अरीन हसायला लागला.

अरीन,“नवीन डायलॉग शोध जरा आणि लागली का माझ्या आत्ता पासूनच मागे! मी फिट आहे कळलं का? माझ्याकडे ही मोबाईल आहे आणि त्यात नेट सुद्धा!त्यासाठी हॉलमध्ये जाण्याची गरज काय?(तो राध्याला सोडून उठला आणि बेडवर पडलेल्या त्याच्या नाईट पॅन्टच्या खिशातून मोबाईल काढला आणि तो राध्याच्या हातात दिला) हा घे मोबाईल आणि दाखव ती ऍड!” तो तिला पुन्हा जवळ ओढत म्हणाला.राध्याने त्याचा मोबाईल घेतला आणि तिने ती ऍड शोधून काढली आणि त्याला ती दाखवत म्हणाली.

राध्या,“ हे बघ! मुंबईत ऑडिशन आहे ब्रँड तसा लोकल आहे पण मला वाटतंय तू ट्राय करावं या ऍडसाठी!” ती म्हणाली.अरीनने ऍड पाहिली आणि तो म्हणाला.

अरीन,“ याचे उद्याच ऑडिशन आहे की! मी जाईल ऑडिशनसाठी आणि सुरवात तर छोट्याच कामापासून करावी लागेल ना!”

राध्या,“ हुंम बरं मग उद्या जा नक्की मी आले असते तुझ्या बरोबर मॉरल सपोर्टसाठी पण मला उद्या नेमकं ऑफिससाठी जगा पाहायला जायचं आहे फोन आला होता आज एजंटचा!” ती म्हणाली.

अरीन,“ अग जाईन मी ऑफिस मधून दुपारी आणि राहील मॉरल सपोर्टचे तर एक गुडलक किस दे बास!”तो तिच्या ओठांवरून हात फिरवत खट्याळ हसत म्हणाला.त्याच्या आशा वागण्याने आणि बोलण्याने राध्या थोडी लाजली पण लटक्या रागाने उठून जात म्हणाली.

राध्या,“ चल निर्लज्ज कुठला!दिवसेंदिवस तू निलाजरा होत चालला आहेस अरीन तुला ना काळ वेळ काही राहिलीच नाही! जाते मी आवरून आता आठ वाजून गेले. तुझ्यामुळे उशीर झाला स्वयंपाक करायला मला!”

अरीन,“असुदे मी निर्लज्ज!पण तुझ्याचमुळे झालो आहे मी तू इतकी hot & beautiful का आहेस मग! आणि प्रेम करायला काही काळ वेळ नसतो मॅडम! मी येतो तुला मदत करायला थांब!” तो उठून तिचा हात धरून डोळे मिचकावत बोलत होता.

राध्या,“ बरं त्यात पण माझाच दोष का?आणि आमचे साहेब इतके हँडसम आहेत की रस्त्याने जाताना मुली मागे वळून पाहिल्या शिवाय जात नाहीत त्याचे काय?आणि काही गरज नाही माझी मदत करायची माहीत आहे मला तुझी मदत करण्याची पध्दत मला मदत करायच्या निमित्ताने किचनमध्ये येऊन काय करतोस ते आज काल जास्तच शेफारला आहेस तू!त्या पेक्षा आवर आणि टी. व्ही पहा!” ती लटक्या रागाने म्हणाली आणि वॉशरूममध्ये निघून गेली. अरीन मात्र तिच्याकडे पाहून हसत होता.

आराध्याच्या(अरीन+राध्या) प्रेमाला आणि वैवाहिक आयुष्याला आता नवीन धुमारे फुटत होते. दोघांच्या ही आयुष्यात सुगंधित प्रेमाची उधळण होत होती. पण या सगळ्यात अरीन मात्र स्वतःची मॉडलिंगमध्ये करिअर करण्याची इच्छा मात्र मारू पाहत होता पण राध्याने त्याला तसे करू दिले नाही तर ती त्याची ताकत त्याची प्रेरणा बनली होती.

आता स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचा अरीनचा संघर्ष कसा असेल?


©स्वामिनी चौगुले


सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा!










🎭 Series Post

View all