डार्क हॉर्स भाग ३८

अरिनचा संघर्ष अजून संपला नव्हता.पुढे अजून त्याच्या आयुष्यात काय काय घडणार होते?


दोघे घरी आले.राध्याने स्वयंपाक केला व जेवायला घेतले. जेवताना आईने डोळ्यांनी इशारा केला आणि बाबांनी बोलायला सुरुवात केली.

बाबा,“ अरीन तू आणि राध्या हनिमूनला कुठे जाणार आहात म्हणजे सात आठ दिवस जाऊन या! हेच दिवस असतात. एकमेकांना समजून घेण्याचे एकमेकांच्या सहवासात सुखवण्याचे!” ते म्हणाले


आणि अरीनचा चेहरा मात्र खर्रकन उतरला. राध्याच्या ते लक्षात आले आणि तिने त्याच्या हातावर हात ठेवला आणि डोळ्यानेच त्याला आश्वस्त केले. अरीन बोलण्या ऐवजी राध्याच बोलू लागली.

राध्या,“ बाबा कशाला उगीच हनिमून वगैरे?”

अरीन,“ हो बाबा असं ही मला खूप कामे आहेत मी परवाच मुंबईला जाणार आहे त्यामुळे मला इतके दिवस नाही मिळणार!” तो म्हणाला.

आई,“ठीक आहे नाही जायचे हनिमूनला तर नका जाऊ पण तुझ्या बायकोला मात्र तुझ्या बरोबर घेऊन जा बाबा! उगीच म्हणायची लग्नला आठ दिवस झाले नाहीत आणि नवरा गेला मला सोडून मुंबईला आणि सासूने इथे जाच करायला मला थांबवून घेतले!” त्या मिश्कीलपणे म्हणाल्या.

राध्या,“काय तरीच काय बोलताय आई!” ती गोरिमोरी होत म्हणाली. त्यावर आई-बाबा मात्र मोठ्याने हसले.

आई,“ राध्या अग अरीनच्या कामामुळे तुम्हाला जर हनिमूनला जाणे शक्य नाही तर मग तू जा त्याच्या बरोबर मुंबईला! हे मंतरलेले फुलपाखरी दिवस पुन्हा नाही येणार! तू तुझी ही बॅग भर आणि जा अरीन बरोबर!” त्या तिला समजावत म्हणाल्या.राध्याला ही तेच हवे होते. त्यामुळे तिचा चेहरा खुलला आणि ते मात्र कोणाच्याच नजरेतून सुटले नव्हते.
★★★

दुसऱ्या दिवशी अरीन आणि राध्या डॉ. साळीकडे समुदेशनासाठी जाऊन आले.डॉ. साळी कडून त्यांनी आठवड्यातील शनिवार दुपार आणि सोमवार सकाळची अपॉइंटमेंट घेतली.कारण अरीन मुंबई वरून शनिवार आणि रविवारी आला की सोमवारी समुपदेशन घेऊन पुन्हा मुंबईला जाऊ शकत होता. ठरल्या प्रमाणे राध्या त्याच्या बरोबर मुंबईला गेला. राध्याचे ऑफिस काही दिवस अण्णा सांभाळणार होते.

मुंबईत राहायला गेल्यामुळे दोघांना ही हवा तसा एकांत मिळाला होता. राध्या डॉ.साळीनी सांगितल्या प्रमाणे अरीनला समजून घेऊन त्याच्याशी प्रेमाने वागत होती. ती स्वतः पुढाकार घेऊन त्याला सुखवण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे अरीनमध्ये ही हळूहळू आत्मविश्वास वाढत होता आणि तो राध्याच्या प्रेमामुळे सुखावत होता. दोघे ही तो ऑफीसमधून आला की मुद्दाम टू व्हीलरवर भटकायला बाहेर जात.त्यांचे लग्ना नंतरचे फुलपाखरी दिवस भरभरून जगण्याचा प्रयत्न करत होते.शनिवार,रविवार पुण्याला जात अरीनचे समुपदेशन सुरू होते.

आज त्यांच्या लग्नाला तीन महिने होत आले होते आणि अरीनमध्ये राध्याच्या प्रेमळ समजूतदारपणामुळे आणि डॉ. साळीच्या समुपदेशनामुळे बरीच प्रगती झाली होती.आज शनिवार होता. नेहमी प्रमाणे अरीन-राध्या पुण्याला आले ते घरी न जाता आधी डॉक्टरकडे गेले आणि त्या नंतर घरी आले. उद्या त्यांच्या लग्नाची थ्री मंथ एनिव्हर्सरी होती. प्रत्येक महिन्याच्या लग्न झालेल्या तारखेला अरीन राध्यासाठी काही तरी स्पेशल करत असे!त्याने शनिवारी रात्रीच तिच्यासाठी काय करायचे हे मनात ठरवले होते. दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने अरीन अण्णा सहित सगळ्यांना घेऊन लंचला गेला. दुपारी जेवणावर सगळ्यांनीच चांगलाच आडवा हात मारल्याने रात्री राध्याने नुसती भाताची खिचडी केली. तिचे काम आज लवकरच आवरले.

ती आज लवकरच झोपायला रूममध्ये गेली. ती आत केली आणि आधीच तिची चाहूल लागलेल्या अरीनने तिच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण केली. राध्या अरीनच्या अशा वागण्याने खुश झाली. बेडवर त्याने गुलाबाच्या पाखळ्यांचा बदाम तयार केला होता आणि त्याच्या मध्ये तीन असा आकडा टाकला होता तसेच खाली पाखळ्यांनीच I love you लिहले होते. राध्याने ते सगळं पाहून अरिनला मिठी मारली. अरीनने लाईट ऑफ केली. राध्याला बेडवर नेले. नेहमी प्रमाणे राध्यानेच पुढाकार घेत त्याच्या ओठांचा थांबा मिळवला. दोघे ही हळू हळू एकमेकांना सुखावत होते.दोघांचे ही कपडे केंव्हाच गळून पडले होते आणि ते एकमेकांमध्ये अधिकाधिक विरघळण्याचा प्रयत्न करत होते.दोघे ही सुखाच्या त्या परमोच्च शिखरा पर्यंत तर पोहोचले होते पण राध्याच्या मनात मात्र ते शिकर दोघांना गाठता येईल का? ही धाकधूक होती.तरी ही ती अरीनला उत्तेजित करत होती आणि अरीन उत्तेजित होत होता. तो आज निःसंकोचपणे राध्याशी संग करत होता. ज्या परमोच्च सुखाची दोघे ही तीन महिन्यां पासून वाट पाहत होते ते शिखर अरीनने आज गाठले होते. राध्या आज खऱ्या अर्थाने सुखावली होती. दोघे आज खऱ्या अर्थाने नवरा-बायको झाले होते. दोघे ही पहाटे पर्यंत एकमेकांना सुखावत राहिले. शेवटी अरीन राध्याच्या शेजारी झोपला आणि राध्या त्याच्या मिठीत आली. तिच्या चेहऱ्यावर पूर्णत्वाचे समाधान आणि तृप्त झाल्याचे तेज होते पण डोळ्यात मात्र अश्रू होते.ते पाहून अरीन थोडा गडबडला.

अरीन,“राध्या तुला त्रास झाला का? मी तुला विचारायला हवं होतं तुला त्रास वगैरे होतो आहे का? मी वाहवत गेलो I am sorry!” तो अपराधीपणे बोलत होता.तर राध्याने त्याला आणखीन घट्ट मिठी मारली आणि ती त्याच्या कानात बोलू लागली.

राध्या,“ सॉरी म्हणू नकोस मला कसला ही त्रास नाही झाला. हे तृप्तीचे अश्रू आहे! मी आज पूर्ण स्त्री झाले त्या आनंदाचे अश्रू आहेत हे! Thanks & love you so much!” ती त्याच्या नाकावर नाक घासत हसून म्हणाली.

अरीन,“thanks तर मी तुला म्हणायला हवं राध्या! तू मला स्वीकारलेस! गेल्या तीन महिन्यात मला प्रेमाने समजून घेतले! मी खरंच भाग्यवान आहे की तुझ्या सारखी बायको मला मिळाली तुझ्या प्रेमामुळेच मी माझ्या भूतकाळाच्या सावल्यांमधून बाहेर पडू शकलो!love you!” तो भावून होत म्हणाला.

राध्या,“हो का! वेडा कुठला? तुझ्या सारखा जीव ओवाळून टाकणारा नवरा मला भेटला असता का? आणि तुला आठवतंय का डॉ.साळी त्या दिवशी काय म्हणाले हेच पप्पा ही म्हणाले होते मला की खूप हँडसम नवरा गटवला आहे मी!तू शरीराने जितका सुंदर आहेस ना मनाने त्या हुन सुंदर आहेस कळलं तुला परत मला असलं काही म्हणायचे नाही! आणि नुसतं कोरडंच thanks का?मी आत्ता कुठे या समुद्राच्या किनाऱ्या वरून आत समुद्रात उतरले आहे मला तर अजून समुद्राचा तळ गाठायचा आहे!” ती म्हणाली.

अरीन,“ इतकी स्तुती माझी बाप रे! आणि समुद्राच म्हणशील तर चल तुला आणखीन खोल घेऊन जातो!” असं म्हणून त्याने पुन्हा तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करायला सुरुवात केली. ती ही मनसोक्त त्याच्या प्रेमाच्या पावसात चिंब भिजत होती. तिला आज नव्यानेच स्वतःची ओळख होत होती.

दोघे ही पहाटे नंतर केंव्हा तरी झोपले होते. राध्याने जेंव्हा डोळे उघडले तेंव्हा अरीनचा हात तिच्या उघड्या कमरे भोवती घट्ट लपेटलेला होता. तो तिच्या श्वासाच्या अंतरावर गाढ झोपला होता. त्याच्या ही चेहऱ्यावर तृप्तीचे तेज विलसत होते.ती त्याला भान हरपून पाहत होती. तिने त्याच्या ओठांचे पूसटसे चुंबन घेतले त्यामुळे त्याची झोप चाळवली आणि तो तिला आणखीन जवळ ओढत झोपेतच म्हणाला.

अरीन,“ राध्या झोपू दे ना ग! तू ही झोप बरं!”ती त्याच्या बोलण्यावर हसली आणि तिने घड्याळात पाहिले तर आठ वाजून गेले होते.

राध्या,“ झोप काय झोप! अरीन सोड मला आठ वाजून गेले आहेत खूप उशीर झाला आहे!” ती त्याच्या मिठीतुन स्वतःला सोडवून घेण्याचा प्रयत्न करत म्हणाली.

अरीन,“ मग काय झालं इथे आपण दोघेच तर असतो की तू अजून थोडावेळ माझ्या मिठीत राहिली तर काय फरक पडत नाही!” तो त्याची मिठी आणखीन घट्ट करत म्हणाला.

राध्या,“ अरीन भानावर ये! आपण मुंबईत नाही पुण्यात आहोत कळतय का तुला!” ती वैतागून म्हणाली.तिच्या या वाक्यावर अरीनने डोळे उघडले आणि तो उठून बसत म्हणाला.

अरीन,“ हो की आपण तर घरी आहोत!”

राध्या,“ हो तेच सांगतेय मी!बरं मी आवरते आणि जाते मग तू आवर आणि बाहेर ये! आपल्याला दुपारी डॉ.साळीकडे ही जायचं आहे.तसेच पप्पाकडे देखील” ती स्वतःला सावरून उठत बडबडत होती. तर तिला अचानक एक झटका बसला आणि ती पुन्हा बेडवर आडवी झाली तिला काही काळायच्या आधीच अरीनने तिचा ताबा घेतला होता. तो तिच्या कानात बोलू लागला.

अरीन,“ लगेच कुठे निघालीस?आधी मला सांग तू खुश आहेस ना! कसं वाटलं तुला काल? काही त्रास तर नाही झाला ना?आणि तुला काय वाटलं ग आठ वाजले म्हणून मी तुला असच सोडून देईन का?आधीच मी तीन महिने वाट पाहिली आहे या सगळ्याची ! मला खूप गिल्ट यायचं राध्या!कारण मी पैसे घेऊन अनेक स्त्रियांना तृप्त केले होते पण माझ्या हक्काच्या बायकोला तिच्या हक्काचे सुख देऊ शकत नव्हतो.आज मला खूप मोकळं आणि तृप्त तसेच पूर्ण झाल्यासारखे वाटत आहे कारण आज मी माझ्या प्रेमाच्या व्यक्ती बरोबर हे सुख उपभोगले आहे!” तो कातर आवाजात बोलत होता.

राध्या,“मी ना खूप म्हणजे खूप खुश आहे अरीन! मला नाही झाला कसला ही त्रास कारण तुझ्या स्पर्शात आणि अवेगात ही इतका हळुवारपणा आणि ठेहराव आहे की जणू हजारो मोरपीस अंगावरून फिरतात!तुझ्या बरोबर मी त्या सुखाच्या अज्ञात प्रदेशात मनसोक्त विहार केला! You are such a amazing!”ती लाजून चेहरा लपवत म्हणाली.

अरीन,“ and you are hot daring!” तो तिचा चेहरा स्वतःकडे वळवत म्हणाला.

राध्या,“ बरं सोड बरं आता मला! नऊ वाजत आल्या आई-बाबा काय म्हणतील?आवरायचं आहे मला!” ती पुन्हा स्वतःला सोडवण्याचा निष्फळ प्रयत्न करत म्हणाली.

अरीन,“ काही म्हणायला घरात कोणी असलं तर पाहिजे ना!आई-बाबा,अर्पिता सगळे सोसायटी मधील सुमितच्या लग्नाला गेले आहेत हडपसरला!ते संध्याकाळ शिवाय येणार नाहीत!” तो तिला हसून म्हणाला.

राध्या,“ काय? मग आईंनी मला का सांगितले नाही!” तिने आश्चर्याने विचारले.

अरीन,“ तू लगेच म्हणाली असतीस मी येते. पण त्यांना ही कळतं ना आपल्याला एकांत हवा आहे नवीन लग्न आहे आपले म्हणून आईने मला सांगितले!”तो हसून म्हणाला.

राध्या,“ हुंम आई पण ना!” ती थोडी कौतुकाने म्हणाली.

अरीन,“ आणि डॉक्टरकडे आपल्याला एक वाजता जायचे आहे आणि तिथून पुढे पप्पांकडे! आत्ता नऊ वाजले आहेत तर आपल्याकडे खूप वेळ आहे! झाले तुझ्या सगळ्या शंकांचे निरसन! आता हा वेळ सदकारणी लावू!”असं म्हणून त्याने पुन्हा तिच्यावर प्रेमाची उधळण करायला सुरुवात केली.

राध्या आणि अरीन पुन्हा एकदा सुखाच्या हिंदोळ्यावर झुलण्यासाठी एकमेकांच्या बरोबर त्या अज्ञात प्रदेशात गेले होते. आज तीन महिन्यांच्या अरिनच्या एका मानसिक संघर्षा नंतर दोघे ही सर्वार्थाने नवरा-बायको झाले होते.दोघींनी ही एकमेकांना खऱ्या अर्थाने सुखवायला सुरुवात केली होती.या सगळ्यात संघर्षात मात्र राध्याने अरिनला समजून घेऊन प्रेमळ साथ दिली होती आणि आज दोघांनी ही सुखाचा परमोच्च बिंदू गाठला होता.

अरिन स्वतःच्याच मानसिक संघर्षात आज यशस्वी झाला होता पण त्याचा संघर्ष अजून संपला नव्हता.

©स्वामिनी चौगुले


सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा!











🎭 Series Post

View all