डार्क हॉर्स भाग ३७

अरिनच्या आयुष्यातील सुख-दुखाचा पाठ शिवनीचा खेळ कधी संपणार होता?


राध्या उठली तर अरिन तिच्या शेजारी नव्हता. रात्री जे काही झाले त्यामुळे अरिन अपसेट आहे हे राध्याला माहीत होते.त्यामुळे तो दिसला नाही म्हणून ती काळजीत पडली. ती अरिनला फोन करण्यासाठी मोबाईल हातात घेणार तर रूममध्ये अरिन आलेला तिला दिसला.अरिन थोडा पुढे आला आणि राध्याने त्याला मिठी मारली आणि ती बोलू लागली.

राध्या,“कुठे गेला होतास तू सकाळी सकाळी?मी घाबरले ना!” ती भरल्या आवाजात बोलत होती.

अरिन,“राध्या घाबरायचे काय त्यात मी मॉर्निंग वॉकला गेलो होतो!” तो तिला समजावत म्हणाला.

राध्या,“ लग्नाच्या पहिल्या रात्रीनंतरच्या सकाळी मॉर्निंग वॉकला जात का कुणी?” ती त्याला लटक्या रागाने बेडवरून उठून केस बांधत म्हणाली

अरिन,“ अच्छा! मग काय करतं?”त्याने तिला मागून मिठी मारून विचारले.

राध्या,“ काही नाही सोड मला!” ती पुन्हा लटक्या रागाने त्याच्या मिठीतुन सुटण्याचा प्रयत्न करत म्हणाली.

अरीन,“ असा कसा सोडिन तुला?” असं म्हणून त्याने तिला स्वतःकडे वळवून घेतले आणि तिच्या ओठांचा ताबा मिळवला. दोघांचे उष्ण श्वास एकमेकांमध्ये बराच वेळ मिसळत राहिले. बऱ्याच वेळा नंतर राध्याने स्वतःला सोडवून घेतले आणि अरीनच्या खांद्यावर विसावली.त्याच्या टी शर्टच्या बटनाशी खेळत लाडीकपणे म्हणाली.

राध्या,“ I love you!”

अरीन,“ love you too! But I am sorry राध्या काल रात्री जे काही झालं त्या बद्दल! मी तुझ्या इच्छा अपेक्षा नाही पूर्ण करू शकलो! तुझ्या मनात लग्नाच्या पहिल्या रात्री बद्दल किती स्वप्न असतील पण मी….” तो कातर आवाजात बोलत होता आणि राध्याने त्याच्या ओठांवर बोट ठेवले आणि ती त्याचा चेहरा दोन्ही हाताच्या ओंजळीत घेऊन त्याच्या डोळ्यात पाहत बोलू लागली.

राध्या,“ उगीच भलता सलता विचार करू नकोस आणि sorry म्हणायला तू चुकला नाहीस कळलं तुला! लग्नाच्या पहिल्या रात्रीच म्हणशील तर तुझ्या बरोबर आयुष्यात अशा अनेक रात्री रंगावायच्या आहेत मला कळलं तुला आणि तू पहिली रात्र काय घेऊन बसलास रे! उगीच आपलं तेच तेच मूर्ख कुठला! माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि माझा माझ्या प्रेमावर विश्वास आहे! हे सगळं उपभोगण्यासाठी अख्ख आयुष्य पडलं आहे आपल्या समोर अजून आणि आत्ता तर मला या गुलाबातील दोन पाकळ्यांचा गुलकंदच बास आहे!” ती हसून त्याच्या ओठांवर बोट फिरवत म्हणाली आणि त्याने तिला कमरेत हात घालून आणखीन जवळ ओढले आणि तो तिच्या डोळ्यात पाहत बोलू लागला.

अरीन,“तुला बास होत असेल पाकळ्यांचा गुलकंद पण मला तर लवकरात लवकर या गुलाबाच्या झाडाची फांदी न फांदी हवी आहे!” तो तिला रोखून पाहत तिच्या उघड्या कमरेवर दोन्ही हात फिरवून बोलत होता. त्याच्या अशा वागण्याने आणि रोखून पाहत बोलण्याने ती शहारली! लाजून तिने त्याला मिठी मारली.

राध्या,“चला बास झाला रोमान्स! मी आवरते आता!” ती स्वतःला सावरत म्हणाली.

अरीन,“छान इतक्यातच बास! राध्या तू आजच्या आज तुझ्या ओळखीच्या समुपदेशकाची अपॉइंटमेंट घे आपण आज पासूनच माझ्यावर उपचार सुरू करू कारण मला ना या गुलाबाच्या झाडाला लवकरात लवकर आपलंस करून याच्या प्रत्येक फांदीचा आस्वाद घ्यायचा आहे!” तो तिला पुन्हा जवळ ओढत म्हणाला.

राध्या,“हो मी घेते अपॉइंटमेंट! तो माझं नाव ऐकून लगेच दुपारची अपॉइंटमेंट देईल आपण आजच जाऊ त्याच्याकडे मग तर झालं! आणि बराच अधीर झाला आहेस की! सोड बरं मला आई काय म्हणतील किती वेळ लावते ही रूम बाहेर यायला!” ती हसून थोडी लाजतच म्हणाली.

अरीन,“बरं आवर तुझं मग मी माझं अवरतो!”तो हसून म्हणाला
★★★
राध्या म्हणाल्या प्रमाणे तिच्या ओळखीने अरीनला लगेच दुपारची अपॉइंटमेंट मिळाली.दोघे ही जेवण वगैरे करून बाहेर जाऊन येतो असे सांगून क्लिनिकमध्ये पोहोचले. दुपारी तीनची वेळ त्यांना मिळाली होती. डॉक्टर साळी हे पुण्यातील प्रख्यात असे लैगिंग समस्येवर समुपदेशन आणि उपचार करणारे डॉक्टर होते.अरीनचा नंबर आला आणि दोघे ही त्यांच्या केबीनमध्ये गेले चाळीस-पंचेचाळीस वर्षाच्या डॉक्टर साळीनी राध्याला पाहिले आणि ते म्हणाले.

डॉ.साळी,“ ये ये राध्या! अण्णा कसे आहेत? तुझ्या लग्नाचे इंनव्हीटेशन दिले होते अण्णांनी पण मी नेमका आऊट ऑफ टाऊन होतो! असो कसं काय येणं केलंस! हे तुझे मिस्टर का?(त्यांनी अरीनला पाहत विचारले राध्याने होकारार्थी मान हलवली) चांगला हँडसम मुलगा गटवलास की!”ते हसून म्हणाले.अरीनने मात्र थोड लाजूनच मान खाली घातली.

राध्या,“हो पप्पा अगदी मजेत आहेत! मला वाटलंच तुम्ही लग्नाला आला नाही त्या अर्थी कुठे तरी बाहेर गेले असणार आणि हो हे अरीन इनामदार माझे मिस्टर! डॉक्टर Thanks लगेच मला अपॉइंटमेंट दिल्या बद्दल!” ती कृतज्ञतेने म्हणाली.

डॉ.साळी,“अग इतकं काय त्यात अण्णा माझे जुने स्नेही आहेत तुला ही मी चांगलं ओळखतो तर मग याचा काही तरी फायदा हवा की नको!बरं कसं काय येणं केलंत काही प्रॉब्लेम आहे का?”त्यांनी विचारले.

राध्या,“ डॉक्टर आमच्या लग्नाला चार-पाच दिवसच झाले आणि काल आमची पहिली रात्र होती पण अरीनला थोडी समस्या आहे म्हणून मी त्याला घेऊन तुमच्याकडे आले आहे!” ती गंभीर होत म्हणाली.

डॉ. साळी,“कालच पहिली रात्र होती तर पण तुमच्यात काय झालं आणि अरीनला नेमकी कुठे आणि काय समस्या आली ते न लाजता तुम्ही दोघे ही मला सांगा म्हणजे मी योग्य निदान आणि उपचार करू शकेन!” ते म्हणाले.

राध्या,“ काल रात्री आम्ही खूप जवळ आलो होतो! सगळं नॉर्मल सुरु होत. आमच्या दोघांमध्ये आधीच खूप चांगलं बॉंडिंग आहे. साखरपुडा होऊन देखील एक वर्षा नंतर आमचं लग्न झालं. त्यामुळे किस करणे! एकमेकांच्या जवळ येणं! स्पर्शाने सुखावने या गोष्टी आमच्यात होत आल्या आहेत पण त्या अर्थाने इंटिमेंट झालो नाही कधी! तरी ही एक कन्फर्ट आमच्यात आहे. दोघे ही एकमेकांना सुखावत असताना आम्ही परमोच्च क्षणा पर्यंत पोहोचलो पण त्या नंतर अरीन अस्वस्थ झाला आणि अचानक माझ्या पासून लांब झाला. या सगळ्याला त्याची थोडी पार्श्वभूमी ही जबाबदार आहे!” ती गंभीरपणे बोलत होती.

डॉ.साळी,“ कसली पार्श्वभूमी आणि तू अस्वस्थ झालास म्हणजे नेमकं काय झालं?” त्यांनी अरीनला विचारले.

अरीन,“ डॉक्टर मी दोन वर्ष आधी 10-11 महिने माझ्या पर्सनल प्रोब्लेम्समुळे मेल एस्कॉर्ट म्हणून काम केले आहे!त्यामुळे मी अनेक स्त्रियांशी संग केला आहे. माझी इच्छा नसताना देखील कधी स्वतः फोर्सफुली तर कधी यांत्रिकपणे मी सेक्स केला आहे.त्यामुळे काल रात्री राध्या आणि मी इंटिमेट झालो तेंव्हा मला तेच सगळं आठवत होतं. त्यातून मी राध्या बरोबर जे काही क्षण उपभोगत होतो ते माझे प्रेम आहे! यांत्रिकता की वासना? या सगळ्या शंकांचा माझ्या मनात हलकल्लोळ माजला आणि मी नाही करू शकलो राध्याच्या अपेक्षा पूर्ण!” तो अपराधीपणे बोलत होता आणि डॉ.साळी तो बोलत असताना त्याचे बारीक निरीक्षण करत होते.

डॉ. साळी,“पहिले तर तू तुझ्या मनातली अपराधीपणाची भावना काढून टाक! कारण अगदी सामान्य असणाऱ्या पुरुषांच्या बाबतीत ही पहिल्या रात्री अशा समस्या उद्भवतात आणि तू तर सेक्स वर्कर म्हणून काम केले आहे. या फीडमध्ये बऱ्याचदा इच्छा नसताना संग करावा लागतो. त्यातून स्त्रियांच्या पेक्षा पुरुषांची अवस्था खूप बिकट असते कारण त्यांना स्त्रीच्या तुलनेत सेक्समध्ये ऍक्टिव्ह पार्ट प्ले करावा लागतो! त्यात यांत्रिकता येणे साहजिक असू शकते कारण समोरच्या व्यक्ती बरोबर कोणते ही इमोशनल बॉण्ड नसताना तिच्या बरोबर सेक्स करायचा आणि त्या व्यक्तीला सेक्सुली सॅटिसफाईड करायचे सोपी गोष्ट नाही! एका अर्थाने स्वतःला ओरबाडून घेणे झाले हे! या गोष्टीचा मानसिक परिणाम त्या व्यक्तीवर होणे साहजिक आहे. तोच मानसिक परिणाम तुझ्यावर झाला आहे अरीन! तुला ही शंका येत आहे की तू जो राध्या बरोबर इंटिमेट होत आहेस ते नेमके काय आहे?यांत्रिता, वासना की प्रेम? तुझ्या मनाचा या सगळ्यात गोंधळ उडाला आहे! त्यातून तुझ्यात आणि राध्याच्या सेक्सुल रिलेशनमध्ये प्रॉब्लेम्स येत आहेत. पण तुझ्या मनातील गोंधळ शांत झाला आणि तुझ्या अंतर मनाला तू राध्या बरोबर सेक्स करशील ते प्रेम आहे. त्यात तुझा आणि तिचा ही आनंद आहे. हे जेंव्हा पटेल तेंव्हा ही समस्या आपोआप दूर होईल!

राध्या,“ पण हे सगळं होणार कसं?” तिने विचारले.

डॉ.साळी,“त्यासाठी आपण अरीनचे समुपदेशन करू! आठवड्यातून दोन सेशन घेऊ!त्यातून त्याच्या मनाला उभारी मिळेल आणि त्याच्या अंतर मनाला एकदा खात्री पटली की तुझ्यात आणि त्याच्यात घडणारे सेक्स म्हणजे प्रेम आहे की तुमचे वैवाहिक जीवन सुरळीत होईल!” ते म्हणाले.

अरीन,“ पण हे सगळं व्हायला किती दिवस लागतील?” त्याने विचारले.

डॉ. साळी,“ तुझी समस्या खूप सामान्य आहे अरीन त्यामुळे जास्तीत जास्त सहा महिने! किंवा मग त्या आधी देखील तुझी ही समस्या दूर होईल! फक्त प्रयत्न करत राहा दोघे ही आणि हो आठवड्यातून दोन वेळा सेशनला यायचे म्हणजे यायचेच! त्यातून तुझे माईंड रिफ्रेश तर होईलच तसेच तुझ्या मनात असणाऱ्या भावनिक गाळाचा उपसा होईल!” ते म्हणाले.

राध्या,“ डॉक्टर एक ही सेशन चुकणार नाही याची काळजी मी घेईन!” ती म्हणाली.

डॉ. साळी,“अरीन रिसेप्शनमध्ये जा! तुला रिसेप्शनिष्ट एक फॉर्म देईल तो भर! मी इंटर कॉम वरून सांगतो( ते म्हणाले अरीनने होकारार्थी मान हलवली आणि तो गेला. त्यांनी फोन वरून रिसेप्शनिष्टला काही सूचना दिल्या. डॉक्टर आता राध्याकडे पाहून बोलू लागले.)
राध्या मला तुझ्याशी एकटीशी बोलायचे होते म्हणून मी अरिनला पाठवले.अरीनला तसा खूप मोठा प्रॉब्लेम नाही. त्याला फक्त मानसिक आधाराची आणि प्रोत्साहनाची गरज आहे! तू त्याला प्रोत्साहन देत राहा. त्याच्याशी प्रेमाने वाग! त्याच्यात आणि तुझ्यात जे काही आहे हे प्रेम आहे.असा विश्वास त्याच्यात निर्माण कर! त्याला जास्तीत जास्त वेळ दे! त्याला जास्तीत जास्त एक्सप्लोर कर! तू पुढाकार घे आणि त्याला खुलव! त्याच्याशी रोमँटिक वाग! तो तुझ्या मदतीने खूप लवकर यातून बाहेर येईल आणि तुमचे वैवाहिक आयुष्य जास्तीत जास्त खुलेल! He is a such nice guy! आणि मदतीला तर मी आहेस पण तू बायको म्हणून त्याला सेक्सुली छान एक्सप्लोर करू शकतेस!कळतय ना तुला मी काय म्हणतोय ते?” त्यांनी तिला विचारले.

राध्या,“ हो डॉक्टर मला कळतय आणि तुम्ही म्हणता तसेच मी त्याच्याशी वागेन! त्याला जास्तीत जस्त वेळ देईन आणि त्याला या सगळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करेन! आम्ही जर थोडे दिवस हनिमूनला बाहेर गेलो तर?” तिने विचारले.

डॉ.साळी,“ नको नको!हनिमूनला वगैरे नको! कारण तसे केले तर त्याच्यावर दडपण येऊ शकते. हा तू त्याला कामा निमित्त म्हणून कोठे तरी घेऊन जा! ज्या ठिकाणी कुटुंबातील कोणी नसेल फक्त तुम्ही दोघेच असाल!”ते म्हणाले.

राध्या,“ ठीक आहे डॉक्टर असं ही तो मुंबईत असतो कामा निमित्त! मी काही दिवस माझे काम थांबवणारच आहे! तर मी त्याच्या बरोबर तिथे जाऊन राहीन अधून मधून!” ती म्हणाली.

डॉ.साळी,“ that\"s better!आपण त्याचे समुपदेशन उद्या पासूनच सुरू करू!” ते म्हणाले.

तो पर्यंत अरीन आला. डॉक्टरांनी दोघांशी जुजबी गप्पा मारल्या आणि दोघे ही घरी आले. उद्या पासून अरीनचे सेशन सुरू होणार होते. अरीन-राध्याचे लग्न तर झाले होते पण जे वैवाहिक सुख दोघांना मिळायला हवे होते. ते अजून त्यांना मिळाले नव्हते. डॉक्टर म्हणाले तसे अरीनला रिकव्हर व्हायला सहा महिने लागतील का?

अरीनच्या आयुष्यातील सुख-दुःखाच्या पाठशिवणीचा खेळ केंव्हा संपणार होता?


©स्वामिनी चौगुले


सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा!






🎭 Series Post

View all