डार्क हॉर्स भाग ३३

अरिनसाठी मॉडेलिंगच्या क्षेत्रात स्वतःचे अस्तित्व निर्माण करणे खरंच इतकं सोप असेल का?


या सगळ्या घटना घडून एक वर्ष होऊन गेले होते. आदित्यने अरीनला सहा महिन्यात बरेच काही शिकवले होते. अरीन मुळातच हुशार असल्याने त्याने लवकरच या क्षेत्रातील ज्ञान आत्मसात केले होते.तो आता फॅक्टरी आणि ऑफिसमध्ये चांगलाच रुळला होता. आदित्यला तो फोन करून बिझनेस मधील घडामोडी सांगत असे. तसेच काही महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर त्याचा सल्ला घेत असे. लोक आता त्याला चंद्रचूड गारमेंट्सचा बिझनेस पार्टनर म्हणून ओळखू लागले होते तरी अजून ही अधेमधे त्याच्या भूतकाळाच्या सावल्या त्याला छळत असत. समाजात वावरताना बरेच हाय प्रोफाईल लोक विशेष करून महिला त्याला हिनवत किंवा मग ऑफर देत. अरीन त्या सगळ्यांना फाटा द्यायला आता शिकला होता.

इकडे पुण्यात अर्पिताची फायनल एक्साम सुरू होणार होती आणि त्या आधीच तिला कॅम्पस इंटरव्ह्यूवमध्ये एका मल्टिनॅशनल कंपनीत चांगल्या पॅकेजची नोकरी मिळाली होती. राध्या आणि अरीनचा साखरपुडा झाला होता त्यामुळे ते ऑफिशली आता समाजात वावरू शकत होते.पण अरीन मात्र मनातून अजून ही अस्वस्थ होता. त्याची आर्थिक घडी आता नीट बसली असली तरी त्याची स्वतःची अशी ओळख नव्हती.त्याला स्वतःचे असे काही तरी करून दाखवायचे होते. त्याचा विचार तो करत होता.आज राध्या त्याला नेहमी प्रमाणे मुंबईमध्ये भेटायला आली होती. दोघे ही बाहेर कुठे भेटण्या पेक्षा अरीनच्या फ्लॅटवरच भेटून कॉलिटी टाईम घालवत असत. राध्या दुपारीच तीन वाजता फ्लॅटवर आली होती. तिच्या जवळ अरीनने फ्लॅटची एक चावी देऊन ठेवली होती.त्यामुळे ती कधी ही फ्लॅटवर येत असे. अरीन अजून ऑफिसमध्येच होता. राध्याने फ्रेश होऊन अरीनला फोन लावला.तिचे स्क्रीनवर फ्लॅश होणारे नाव पाहून तिने बोलायच्या आधीच अरीनने फोन घेऊन बोलायला सुरुवात केली.

अरीन,“ बोला मॅडम! पोहोचलात वाटतं फ्लॅटवर!” तो हसून म्हणाला.

राध्या,“ हो पोहोचले ना पण साहेब कधी येणार आहेत नाही म्हणजे वेळ आहे का साहेबांना!” ती ही मिस्कीलपणे म्हणाली.

अरीन,“ राध्या तुला चांगलंच माहीत आहे मला साहेब वगैरे म्हणलेले आवडत नाही!खरं सांगायचं तर माझी एक मिटिंग आहे ग! मला दोन तास लागतील घरी यायला!” तो म्हणाला.

राध्या,“ बरं मी रात्री जाणार आहे! तू आरामात तुझी मिटिंग वगैरे करून ये work first! तो पर्यंत मी स्वयंपाक करून ठेवते डिनर करू घरीच मस्त! आणि साहेब म्हणालेले नाही आवडायला काय झाले. साहेब तुम्हाला सगळेच आता इनामदार साहेब म्हणतात विसरलात का?” ती हसून म्हणाली.

अरीन,“ बरं चालेल आणि thanks नाही तर मला वाटलं की आता मॅडम फुगन बसणार की काय? हो म्हणतात मला सगळे साहेब पण त्यात माझा काहीच पराक्रम नाही राध्या ही सगळी माझ्या gf ची आणि आदित्य दादाची कृपा!” तो त्याच्या केबीनमध्ये लावलेल्या वीणाच्या फोटोकडे पाहत कातर आवाजात म्हणाला.

राध्या,“अरीन are you ok! तुझ्या मनात नेमकं काही तरी सुरू आहे!” तिने काळजीने विचारले.

अरीन,“yes I am fine! हो माझ्या मनात काही तरी चालू आहे मी घरी आल्यावर आपण बोलू बरं ठेवतो मी मला निघावं लागेल मिटिंगसाठी!” तो मनगटावरचे घड्याळ पाहत म्हणाला आणि फोन ठेवून कोटचे बटन लावून त्याची लॅपटॉपची बॅग घेऊन ऑफिस बाहेर पडला.तो मिटिंग संपवून पुन्हा ऑफिसला जाऊन घरी सात वाजता पोहोचला. तो पर्यंत राध्याने त्याला आवडणारा स्वयंपाक करून ठेवला होता. राध्याने हसत मुखाने दार उघडले. अरीन फ्रेश व्हायला गेला तो पर्यंत तिने त्याच्यासाठी आणि तिच्यासाठी कॉफी करून आणली. दोघांच्या कॉफी घेत गप्पा सुरु झाल्या.

राध्या,“ आज ऑफिसमध्ये खूप काम होत का?” तिने विचारले.

अरीन,“ म्हणलं तर हो म्हणलं तर नाही! रोज असतच की काम त्यात काय इतकं ग हा आज एक एक्स्ट्रा मिटिंग अचानक ठरली इतकच! तू बोअर नाही झालीस ना!” त्याने वाफाळलेल्या कॉफीचा घोट घेत विचारले.

राध्या,“नाही रे! मी स्वयंपाक केला तो पर्यंत!” ती म्हणाली.

अरीन,“ म्हणजे माझ्या आवडीचा बेत का?” त्याने कॉफी मग टीपॉय वर ठेवत खुश होऊन विचारले.

राध्या,“हो! आणि मी फोन केला तेंव्हा म्हणत होतास बोलायचे आहे! काय बोलायचे आहे तुला अरीन मला तुझी काळजी वाटते!”ती त्याचा हात धरून डोळ्यात पाणी आणून म्हणाली.अरीनने तिचे डोळे पुसले आणि तो तिला एका हाताने मिठीत घेत म्हणाला.

अरीन,“राध्या काळजी करण्या सारखे काहीच नाही! मी ठीक आहे. बरेच दिवस झाले माझ्या मनात एक विचार घोळत होता.” तो तिच्या केसातून हात फिरवत बोलत होता.

राध्या,“ कोणता विचार?” तिने विचारले.

अरीन,“ राध्या ही इतकी मोठी कंपनी ऑफिस सगळं सगळं अनपेक्षितपणे माझ्या पदरात येऊन पडले! मी माझी जबाबदारी म्हणून हे सगळं स्वीकारले आणि मनापासून निभावत पण आहे. थोड्याच दिवसात पुण्यात पण आपल्या चंद्रचूड गारमेंटची एक ब्रँच सुरू होईल पण या सगळ्यात माझं कर्तृत्व काहीच नाही! मी आयत्या पिठावर रेघोट्या ओढत आहे! त्यामुळे मला मानसिक समाधान मिळत नाही! सतत असं वाटतं की या सगळ्यात माझं असं काय आहे? माझं अस्तित्व काय आहे?मला स्वतःच्या जीवावर स्वतःच असं काही तरी करून दाखवायचे आहे.पण काय हे सुचत नाही!” तो गंभीर होत म्हणाला.

राध्या,“बाप रे किती विचार करतो अरीन अरे मी पण पप्पांचा बिझनेसच पुढे नेत आहे की त्यात इतकं अस्वस्थ होण्यासारखं काय आहे? आणि तुला तुझ्या जीवावर कर्तृत्व करायचे आहे तर मग नाय सुचायला काय झालं तू मॉडलींग क्षेत्रात उतर की! तुझं स्वप्न होत ना ते जे जगण्याच्या लढाईत कुठे तरी मागे पडले!” ती म्हणाली.

अरीन,“ तेंव्हाची गोष्ट वेगळी होती राध्या आता मला मॉडलींग जमेल का?” त्याने साशंकपणे विचारले.

राध्या,“ का नाही जमणार! आणि तू हँडसम आहेस! स्वतःला छान मेंटेन केले आहेस! सुंदर आहेस! जे मॉडलींगसाठी लागतं ते सगळं तुझ्याकडे आहे! आणि वरून तू माया नागरी मुंबईत राहतोस की!” ती म्हणाली.

अरीन,“ अग पण बिझनेस सांभाळून मला जमेल का मॉडलींग करायला?” त्याने पुन्हा विचारले.

राध्या,“का नाही जमणार? इच्छा असेल तर मार्ग सापडतोच की!बघ बोलता बोलता एक तास होऊन गेला. आठ वाजले जेवायला घेते मी!” ती असं म्हणून उठू लागते तर अरीनने तिला जवळ ओढले.

अरीन,“ मघाशी काय काय म्हणत होतीस कसा दिसतो?” तो तिला अगदी जवळ जाऊन तिच्या डोळ्यात पाहत विचारले.

राध्या,“हुंम मिस्टर अरीन इनामदारला आज स्तुती ऐकायची आहे का स्वतःची? तर ऐक you are so handsome! Good looking & talented also!त्या बरोबर तू एक चांगला माणूस आहेस एक चांगला मुलगा आहेस आणि एक चांगला life partner!I love you so much!”ती त्याच्या गळ्यात दोन्ही हात गुंफून त्याच्या डोळ्यात पाहत बोलत होती.

अरीन,“ I love you too sweetheart!” तो तिच्या कपाळाचे चुंबन घेत म्हणाला.

अरीनने तिच्या कमरेत डावा हात घालून उजव्या हाताने तिला आणखीन जवळ ओढले. राध्या ही त्याच्या या कृतीमुळे मोहरली आणि त्याने तिच्या ओठांवर अलगद ओठ ठेवले.राध्या ही त्याच्या सुगंधित श्वासात विरघळत राहिली. थोड्या वेळाने भानावर येत त्याला म्हणाली.

राध्या,“ बास ना आता अरीन! चल जेवायला!”ती लाडीकपणे त्याला म्हणाली.

अरीन,“बरं!पाहू तरी आमच्या मॅडमनी आज काय काय बनवले आहे! तसं ही आता डेजर्टची काहीच गरज नाही! ते तर जेवणा आधीच मिळाले!” तो तिच्या ओठांवरुन अलगद बोट फिरवत खट्याळ हसून म्हणाला आणि राध्या लाजून त्याला म्हणाली.

राध्या,“चल आता निर्लज्ज कुठला!”

अरीनचे आयुष्य या एका वर्षात पूर्ण बदलून गेले होते.त्याला परमेश्वराने न मागताच बरंच काही दिले होते. तो आता समाजात मनाने जगत होता. राध्याने आणि त्याच्या कुटुंबाने ही या एका वर्षात त्याला बरीच साथ दिली होती. मेन म्हणजे वीणा कारखानीस आणि आदित्यमुळे तो या सगळ्यातून सहज बाहेर पडू शकला होता.अधून मधून त्याला त्याच्या भूतकाळाच्या सावल्या सतावत होत्या पण त्याला सावरायला त्याच्या अवती भोवती त्याची हक्काची माणसे होती. तरी देखील त्याच्यातील स्वाभिमानी माणूस त्याला गप्प बसू देत नव्हता. स्वतःची अशी वेगळी ओळख त्याला स्वकर्तुत्वावर निर्माण करायची होती. म्हणून मग त्याने राध्याच्या प्रेरणेने मॉडलींगच्या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला होता.


पण अरीनसाठी स्वतःचे अस्तित्व आणि स्वतःची ओळख निर्माण करणे इतके सोपे होते का? कसा असेल त्याचा पुढचा प्रवास?
©स्वामिनी चौगुले


सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा!












🎭 Series Post

View all