डार्क हॉर्स भाग २७

राध्या आणि अरिनचे नाते तो म्हणाला तसे इथेच संपले होते का?


राध्या वीणाच्या घरून निघाली. तिच्या मनात अनेक भावनांनी गर्दी केले होती. तिच्या डोळ्यांचे तळे पूर आल्यासारखे ओसंडून वाहत होते. नाण्याला दोन बाजू असतात तशाच प्रत्येक घटनेला देखील दोन बाजू असतात. त्या दोन्ही बाजुंचा सरासार विचार करणे गरजेचे असते पण माणूस त्याला हवी ती एकच बाजू पाहतो आणि त्याच बाजूने विचार करतो. राध्याने देखील तीच चूक केली होती. तिने फक्त तिच्या बाजूने विचार केला आणि अरीनला त्याची बाजू मांडायची एक ही संधी दिली नाही. त्याला तिने नाही नाही ते बोलून दुखावले होते. त्याच गोष्टीचा आता राध्याला पश्चात्ताप होत होता. आज देखील ती त्याला नाही ते बोलून गेली होती त्याचे ही तिला वाईट वाटत होते.

राध्याने रोडवर जाऊन टॅक्सी थांबवली आणि ती सरळ अरीनच्या फ्लॅटवर पोहोचली. अरीनचे मनसोक्त रडून झाले होते आणि त्याला त्यामुळे हलके वाटत होते. तरी त्याचे डोळे मात्र रडल्यामुळे सुजले होते. तो नुकताच फ्रेश होऊन आला होता. हे सगळं होऊ पर्यंत रात्रीचे आठ वाजले होते.राध्याने दाराची बेल वाजवली आणि घड्याळ पाहत आत्ता कोण आले असेल हा विचार करत अरीनने दार उघडले तर समोर राध्या! त्याने राध्याला पाहिले आणि दार उघडेच सोडून तो आत हॉलमध्ये तिच्याकडे पाठ करून उभा राहिला. राध्याने दार लावले आणि तिने त्याला मागून मिठी मारण्याचा प्रयत्न केला तर अरीन तिच्या पासून लांब होत तिला म्हणाला.

अरीन,“ मॅडम हात लावू नका मला! तुम्ही मला स्पर्श केला आणि तुम्ही अपवित्र झाला तर तुम्हाला शुद्धीकरण करून घ्यावे लागेल स्वतःचे! काही बोलायचे राहिले होते का म्हणून तुम्ही इथे आला आहात?” तो काहीसा कडवटपणे म्हणाला.

राध्या,“ I am sorry मी तुला नाही नाही ते बोलले अरीन! माझं चुकलं मी तुला बोलायची संधी द्यायला हवी होती!” ती डोळ्यातले पाणी पुसत म्हणाली.

अरीन,“ sorry कशा साठी मॅडम! मीच तुमची माफी मागतो मीच तुम्हाला फसवले आहे. माझी खरी ओळख तुम्हाला मी सांगायला हवी होती I am really very sorry! आणि मला या गोष्टीची पुरेपूर जाणीव आहे! खरंच माझं चुकलं!” तो तिच्या समोर उभा राहून हात जोडत म्हणाला.

राध्या,“अरीन तू जरी चुकला असलास तरी मी देखील कुठे बरोबर होते! मी तुला बोलायची संधी सुद्धा दिली नाही. तुझ्याशी बोलताना खूप जहाल शब्द वापरले तुझ्या मनाचा विचारच केला नाही…” ती पुढे बोलणार तर अरीन तिचे बोलणे तोडत मध्येच खिन्नपणे हसत बोलू लागला.

अरीन,“ मन…. मॅडम आमच्या सारख्या पुरुषांना कुठे असते मन! मी तर रोज एका बाई बरोबर जातो आणि तिच्या बरोबर मजा मारतो आणि वरून पैसे ही घेतो! म्हणजे डबल फायदा!”

आज तिनेच काही दिवसा पूर्वी बोललेल्या शब्दांची तीव्रता तिच्या लक्षात येत होती आणि त्याच्या तोंडून तिचेच शब्द तिला ऐकायला नकोसे वाटत होते.

राध्या,“ मला मॅडम आणि अहो का म्हणत आहेस तू अरीन? माझं चुकलं आहे म्हणते आहे ना मी!” ती त्याच्या जवळ जाऊन त्याचा हात धरण्याचा प्रयत्न करत म्हणाली आणि तो तिच्या पासून पुन्हा दूर सरकला.

अरीन,“नाही मॅडम मी माझी लायकी विसरलो होतो थोडे दिवस एका सुखद स्वप्नात जगत होतो स्वप्नच ते तुमच्या शब्दांनी माझे डोळे उघडले आणि तुटलं ते! Thanks मला माझी लायकी दाखवल्या बद्दल! असो तुमची माफी तर मला मागायचीच होती. बरं झालं तुम्ही आलात खरंच मॅडम मला माफ करा! मी चुकलो तुमच्या पासून मी जिगेलो असल्याचे सत्य लपवले. तुम्हाला माझ्यामुळे त्रास झाला! त्यासाठी मी तुमची हात जोडून माफी मागतो!” तो डोळ्यात पाणी आणून हात जोडून म्हणाला पण त्याचे असे वागणे राध्याला असह्य झाले आणि ती रडत त्याला बोलू लागली.

राध्या,“ बास ना अरीन! अजून किती वेळा माफी मागून मला लाजवणार आहेस तू! उलट आता मला तुझी माफी मागायची आहे!मी तुला जे बोलले ते बोलायला नको होते!” ती म्हणाली.

अरीन,“नका मागू माझी माफी तुम्ही; माझी लायकी नाही तितकी!मी एक जिगेलो आहे पुरुष वैश्या! जो पैशासाठी स्वतःचे शरीर विकतो. लोकांना फक्त आमचे शरीर दिसते आम्हाला मन कुठं असते! खरं सांगायचं तर स्त्री वैश्यांना कमीत कमी सहानुभूती तरी मिळते पण आम्हाला ते ही मिळत नाही. आम्ही काय स्वखुशीने हे काम करत नसतो कारण स्त्रियांना जसा वासनेने बरबटलेला स्पर्श नको असतो तसा तो पुरुषाला देखील नको असतो.स्त्री वैश्या तिच्या मनात नसेल तर गप्प पडून राहते. तिच्याकडे येणारा पुरुष तिला ओरबाडून त्याला हवं असणार सुख ओरबाडून निघून जातो पण आमचं तसं नसत आम्हाला स्वतःला ओरबाडून घ्यावं लागतं मनात असो अथवा नसो! आमच्या क्लायंटला तृप्त करावं लागतं आणि हे सोप्प काम नसतं! प्रत्येक पुरुषाची मागणी स्त्री कडून जवळपास सारखीच असते पण इथे प्रत्येक स्त्री आणि तिची मागणी वेगळी असते. बरं प्रत्येक स्त्री आमच्याशी चांगलं वागेलच असे नाही.काही स्त्रिया आम्हाला त्यांच्या हातातील खेळणं समजतात! काही घाण शिव्या देखील देतात तरी सगळं ऐकून हसत त्यांना सामोरे जावे लागते! तिथे तुमचा पुरुषी अहंकारच काय पण तुमचा स्वाभाविक देखील चिरडला जातो! बरं जवळ जवळ सगळ्या स्रिया चाळीशी पार केलेल्या त्यामुळे त्यांचे मूड कधी चेंज होतील आणि त्या तुम्हाला कधी हकलवून देतील सांगू शकत नाही! त्यातून सगळ्या गोष्टीची सिक्रसी पाळणे! त्यांच्या नवऱ्याने किंवा मुलाने पाहिले तर ते काय करतील याची भीती! खूप काही सहन कराव लागतं. त्यातून कुटुंबा समोर सतत हसत मुखाने राहायचे! समाजात वावरताना आपण काय काम करतो हे कळू नये म्हणून मुखवटा घालायचा! खरं तर मला ही प्रश्न पडतो कधी कधी की मी अरीन आहे की डार्क हॉर्स!” तो भरल्या आवाजाने बोलत होता आणि त्याच्या डोळ्यातून गरम कढ वाहत होते.

इथे प्रत्येकाची एक कथा असते आणि त्या मागे लपलेली एक व्यथा!आपण फक्त समोर दिसणारी चकचकीत बाजू पाहून कोणाला जज नाही करू शकत.राध्याने मात्र अरिन बाबत तीच चूक केली होती आणि त्याचा पश्चात्ताप तिला होत होता.

अरिन आज पहिल्यांदाच त्याच्या मनातील व्यथा कोणा पुढे तरी मांडत होता.राध्याला ही त्याचे बोलणे ऐकून खूप वाईट वाटत होते.तिच्या ही डोळ्यातून अश्रू वाहत होते.तिने न राहवून अरिनला मिठी मारली आणि ती रडतच बोलू लागली.

राध्या,“ मी तुला खूप चुकीचं समजले अरिन I am sorry for that!”

अरिन,“ माझं ही चुकलं आहे!” त्याने स्वतःला तिच्या मिठीतुन सोडवून घेतलं आणि स्वतःला सावरलं!

राध्या ही थोड्या वेळात शांत झाली.ती काही तरी विचार करून म्हणाली.

राध्या,“ अरिन मी तुझी आयुष्य भर साथ द्यायला तयार आहे! तू हे सगळं सोडून दे!”

अरीन,“ हे सगळं तर मी काही महिन्यांनी सोडून देणार आहेच पण राध्या मी तुझ्या लायक नाही! तू आणि मी या जन्मात तरी एकत्र येणे शक्य नाही! तू माझा नाद सोडून दे! त्यातच तुझं भल आहे!” तो म्हणाला.

राध्या,“ मी नाही जगू शकणार तुझ्या शिवाय आणि तू माझ्या लायकीचा आहेस की नाही ते तू नको ठरवू मी ठरवेन!” ती ठामपणे म्हणाली.

अरीन,“ राध्या तुला कल्पना नाही की मी कोणत्या दलदलीत फसलो आहे! माझ्या आयुष्यात पुढे अजून काय वाढून ठेवले आहे हे मला देखील माहीत नाही! हा समाज आणि लोक मला स्वीकारतीलच असे नाही! मी माझ्यासाठी तुझे आयुष्यपणाला लावू शकत नाही! इतका स्वार्थी मी नाही होऊ शकत! मला तुझी माफी मागायची होती माझी बाजू मांडायची होती ती मी मांडली आणि तू ऐकून घेतलंस मला समजून घेतलंस त्यासाठी मी तुझा आभारी आहे.पण आपण दोन ध्रुव आहोत जे कधीच एकत्र येऊ शकत नाहीत. तुझा आणि माझा मार्ग वेगळा आहे!तू जाऊ शकतेस आणि ही आपली शेवटची भेट! इथून पुढे तू मला भेटायचे नाही आणि मी ही तुला भेटणार नाही!” तो म्हणाला.

अरीनने त्याचा निर्णय राध्याला सांगितला होता. राध्या आणि अरीन तो म्हणाला तसं कधीच एकत्र येऊ शकणार नाहीत का? अरीन म्हणाला म्हणून राध्या त्याला सोडून निघून जाईल का?नियतीने काय वाढून ठेवलं असेल दोघांच्या आयुष्य?

©स्वामिनी चौगुले


सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा!







🎭 Series Post

View all