डार्क हॉर्स भाग १७

नमिता पुढे अरिन विरुद्ध कोणते पाऊल उचलणार होती?


भाग 17
अरीनने विचार केला होता ते इतकं त्याच्यासाठी सोपं असणार नव्हतं. कारण अरीनला आता खूप मोठ्या पेचात टाकणाऱ्या घटनांची शृंखलाच त्याच्या आयुष्यात येणार होती आणि त्या घटनांची सुरुवात आता होणार होती. आधीच दलदलीत अडकलेला अरीन अजूनच त्या दलदलीत रुतण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. अरीन मात्र या सगळ्याला कसा तोंड देणार होता?

राध्या गेली. तिचे अरीन बरोबर फोनवर बोलणे मात्र सुरू होते. तिच्या प्रत्येक फोन मधून तिच्या प्रत्येक कृतीतून अरीनसाठी असलेले तिचे निस्वार्थ प्रेम दिसून येत होते आणि अरीनच्या मनात मात्र अपराधीपणाची भावना अजूनच गडद होत होती. त्यातच एक नवं वादळ त्याच्या दारा बाहेर घोंघावत होतं.


अरीन दुपारच्या वेळी त्याच्या क्लायंटची यादी पाहत होत्या. आज त्याला कोणाकडे जायचे आहे याचा विचार करत होता आणि त्याचा फोन वाजला मोबाईलवर नाव फ्लॅश होत होते नमिता मॅडम! त्याने नाव पाहिले आणि तो चपापला. कारण नमिता राध्याच्या भावाच्या लग्नात भेटून एक आठवडा होऊन गेला होता. पहिल्यांदा तो घाबरला कारण त्याला माहित होतं की नमिता गप्प बसणाऱ्यातील बाई नाही. तिने आठवडा होऊन गेला तरी कोणतीच हालचाल केली नाही त्यामुळे तो रिलॅक्स झाला होता पण आज अचानक तिचा आलेला फोन पाहून तो काळजीत पडला. तरी स्वतःला कसेबसे सावरत त्याने तिचा फोन घेतला.

अरीन,“ बोला मॅडम!”

नमिता,“ मला संध्याकाळी सात वाजता ब्लु रेन हॉटेलमध्ये येऊन भेट रूम नंबर मी whs up करते आहे!” ती म्हणाली.

अरीन,“ पण मॅडम मला वेळ…” तो पुढे बोलणार तर त्याचे बोलणे तोडत ती म्हणाली.

नमिता,“ no excuse dear! तुला माहीत आहे की मी आता काय करू शकते?समझनेवाले को इशारा काफी है जानेमन!” ती हसून म्हणाली आणि तिने फोन ठेवला.

अरीनकडे आता नमिताला भेटायला जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता कारण ती त्याला सरळसरळ ब्लॅक मेल करत होती. त्याने फोन ठेवला आणि तो सोफ्यावर बसला. त्याला आठवू लागल्या काही महिन्यां पूर्वीच्या गोष्टी!

नमिता ही अशाच हाय प्रोफाईल क्लायंट मधील त्याची एक क्लायंट होती.त्याला एजन्सी मधून फोन आला आणि त्याला नमिताचा रेफरन्स मिळाला. तो ठरल्या वेळी तिच्याकडे गेला.त्याला वाटले होते की नमिता ही एक सामान्य क्लायंट असेल जी एकटेपणाने ग्रासली आहे पण तिथे गेल्यावर त्याला तिचे बोलणे ऐकून धक्काच बसला होता.तो एका हॉटेल रूममध्ये तिला भेटायला गेला तर ती रूममध्ये दारू पित बसली होती. तो रूममध्ये जाऊन एका खुर्चीवर बसला आणि ती त्याच्या जवळ येऊन बसली.

नमिता,“ hi handsome!तुला माहीत आहे का मी तुला इतक्या मेल एस्कॉर्टमधून निवडून का बोलवले आहे?” तिने विचारले.

अरीन,“तुम्हाला सॅटिसफाईड करायला! पण तुम्ही हा प्रश्न मला का विचारत आहात मॅडम?” त्याने आश्चर्याने विचारले.

नमिता,“ हो सॅटिसफाईड तर करायचेच आहे मला! पण मला तुला एक ऑफर द्यायची आहे कारण तू त्या ऑफरसाठी परफेक्ट आहेस! तू दिसायला चिकना आहेस आणि एखाद्या मॉडेल सारखी तुझी शरीरयष्टी आहे!” ती त्याला रोखून पाहत बोलत होती.

अरीन,“ कसली ऑफर?” त्याने असमंजसपणे विचारले.

नमिता,“ ऑफर तुझ्या फायद्याची आहे आज तू जितके पैसे या धंद्यातून कमावतो त्याच्या डबल पैसे कमावशील! माझ्यासाठी पोर्न फिल्ममध्ये काम करशील?” तिने विचारले.

अरीन,“ काय?हे बघा मॅडम मी एका चांगल्या घरातील मुलगा आहे. माझ्यावर परिस्थिती ओढवली म्हणून मी या लाईनमध्ये आलो पण मी कायमच हे काम नाही करणार! मला तुम्ही म्हणता तसलं काही करायचं नाही; मला माफ करा!” असं म्हणून तो निघाला.

नमिता,“ ठीक आहे माझी ऑफर मान्य नाही तुला! पण मी तुला ज्यासाठी बोलवले आहे ते तरी करशील की नाही?” ती उठून त्याच्या चेहऱ्यावर बोट फिरवत म्हणाली आणि तिच्या स्पर्शाची त्याला शिसारी आली. तो तिच्या पासून लांब होत म्हणाला.

अरीन,“नाही जमणार मला तुमचं काय सांगावे इथे कुठे छुपा कॅमेरा असेल तर!” तो म्हणाला.

नमिता,“ मी तुझी तक्रार तुझ्या एजन्सीत करेन!” ती चिडून म्हणाला.

अरीन,“ खुशाल करा! मी कोणाशी ही बांधील नाही! नकाराचा अधिकार मला आहे!” असं म्हणून तो तिथून निघून गेला.
अरीनचा फोन वाजला आणि तो भूतकाळातून वर्तमानात आला. फोन राध्याचा होता.

राध्या,“ काय करतो आहेस?” तिने विचारले.

अरीन,“ काही नाही बसलो होतो तू बोल!” तो भरलेल्या आवाजात बोलत होता त्याच्या डोळ्यातून एक चुकार अश्रू गालावर नकळत ओघळला. त्याच्या आवाजातील बदल राध्याच्या लक्षात आला.

राध्या,“काय झालं अरीन तुझी तब्बेत तर ठीक आहे ना? तुझा आवाज असा का येत आहे?” तिने काळजीने विचारले.

अरीन,“ मी ठीक आहे काही नाही झालं मला! राध्या तुला काही विचारू का?खरं उत्तर देशील?” त्याने स्वतःला सावरत विचारले.

राध्या,“ हो विचार ना!”ती म्हणाली.

अरीन,“तुला जर उद्या माझ्या बद्दल कुणी काही सांगितले आणि समजा मी जो आहे तो नसून दुसराच कोणी आहे असे तुला कळले तरी ही तू माझ्यावर प्रेम करशील का?” त्याने आवंढा गिळत विचारले.

राध्या,“नेमकं काय झालंय अरीन? आणि तू काय बोलतो आहे मला खरंच कळत नाही!कोणती गोष्ट तुला त्रास देत आहे?मला तुझी काळजी वाटते आहे बोल ना!” तिचे डोळे ही आता त्याच्या काळजीने झरू लागले होते.

अरीन,“काही नाही आपण तू आल्यावर बोलू मला खूप महत्त्वाचे काही तरी तुला सांगायचे आहे!त्या नंतर सर्वस्वी निर्णय तुझा असेल!” तो डोळे पुसून म्हणाला.

राध्या,“ अरीन काय झालं आहे काय बोलतो आहेस तू? मला भीती वाटते आहे! तुझा आवाज खूप लो येत आहे! तुझ्या मनात काय चालले आहे नेमकं कशा बद्दल बोलतो आहेस तू? भलता सलता विचार नको करुस अरीन प्लिज!” ती घाबरून रडत बोलत होती.

अरीन,“अग असं काही नाही मी काही भलता सलता विचार करत नाही! थोडं लो फिल होत होतं म्हणून! तुझ्याशी बोललो आता बरं वाटतं आहे!” तो पुन्हा स्वतःला सावरत म्हणाला.

राध्या,“अरीन मी तुझ्या बरोबर कायम आहे! तुला लो फिल होत असेल तर तू पुण्याला जातोस का थोडे दिवस? की मी आत्ता औरंगाबादमध्ये आहे इकडे माझ्याकडे येतोस! मी अर्पिताला फोन करू का?” ती पुढे बोलणार तर अरीन तिला मध्येच म्हणाला.

अरीन,“ अग हो हो मी ठीक आहे! आणि ये बाई त्या अप्पीला काही बोलू नकोस ती येईल इथे माझ्या डोक्यावर नाचायला!”तो म्हणाला.

राध्या,“ बरं नाही सांगत तिला पण मग तू पुण्याला जातोस का?की माझ्याकडे येतोस अरीन मला तुझी मानसिकता ठीक दिसत नाही. खूप दिवस आपल्या माणसांपासून दूर राहील की माणूस इमोशनली एकटा पडतो! मला काळजी वाटते तुझी!” ती म्हणाली.

अरीन,“तू म्हणतेस ते खरं आहे मला ही एकटं एकटं वाटत होत पण तुला बोलल्यावर मला बरं वाटत आहे आणि मी नाही जाऊ शकत पुण्याला ना तुझ्याकडे येऊ शकतो खूप कामं आहेत ग!हा पण शनिवारी मी जाईन घरी!” तो म्हणाला.

राध्या,“ नक्की ना? तू खरंच घरी जा तुला बरं वाटेल!” ती म्हणाली.

अरीन,“ बरं मी फोन ठेवतो! मला कामा निमित्त बाहेर जायचे आहे जरा!” तो म्हणाला.

राध्या,“बरं बाय! Love you & take care!” ती म्हणाली आणि फोन ठेवला.
★★★

अरीन तयार होत विचार करत होता.

“ ही नमिता आता नक्कीच मला राध्याचे नाव घेऊन ब्लॅकमेल करणार! तीच काम माझ्याकडून साधवून घेण्याचा नक्की प्रयत्न करणार पण आज ना उद्या मला राध्याला सत्य सांगायचेच आहे मग घाबरायचे कशाला!जे होईल ते पाहता येईल!”

तो नमिताला भेटायला हॉटेल रूममध्ये पोहोचला. नमिता त्याचीच वाट पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा असुरी आनंद झळकत होता. ती अरीनला तिच्या जाळ्यात ओढायला पूर्णपणे तयार होती.

नमिता,“ या या मिस्टर डार्क हॉर्स उप्स सॉरी मिस्टर अरीन इनामदार!मी तर तुला डार्क हॉर्स म्हणूनच ओळखत होते पण thanks to राध्या तुझी खरी ओळख मला पटली!”ती कुत्सितपणे हसत म्हणाली.

अरीन,“ मॅडम तुम्ही मला इथे का बोलावले आहे?” त्याने विचारले.

नमिता,“अरे हा काय प्रश्न झाला.तुझ्या सारख्या धंदेवाल्या पुरुषाला कोणती स्त्री का बोलवेल!” ती हसून म्हणाली.

अरीन,“ मॅडम पण मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की मला तुमच्याशी कोणताच संबंध ठेवायचा नाही!” तो म्हणाला.

नमिता,“ o my god!तुझ्या हिमतीची तर दाद द्यायला हवी!एका मोठ्या घरच्या पोरीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलेस! काय रे तू डार्क हॉर्स आहेस हे तिला माहीत आहे का? तिला जर कळले की तू कोण आहेस आणि काय करतोस तर?तर काय होईल?” तिने विचारले.

अरीन,“ म्हणजे तुम्ही सांगणार तर तिला आणि हे न सांगण्यासाठी मला काय करावे लागेल?” त्याने विचारले.

नमिता,“ that\"s like a good boy!आता कसा आलास मूळ मुद्द्यावर! काही नाही जुनीच ऑफर जे काम तू चार भितींमध्ये करतोस ते ऑन कॅमेरा करायचे! पोर्न फिल्मची माझी ऑफर स्वीकारायची आणि हे काम मी फुकट नाही करून घेणार तुझ्याकडून तर त्याचा योग्य तो मोबदला तुला मिळेल!” ती म्हणाली.

अरीन,“ आणि मी नाही म्हणालो तर?” त्याने तिला रोखून पाहत विचारले.

नमिता,“ तर राध्याला तुझे सत्य सांगेन मग पहा ती तुझे काय हाल करेल!” ती म्हणाली.

अरीन,“ ते सगळं माझं मी पाहून घेईन पण तुम्ही जे जे आत्ता बोललात ते मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ऐकवले तर? तुमची ही जी बेगडी प्रतिष्ठा आहे ना ती धुळीला मिळेल त्याच काय? तुमच्या सारख्या बायका दिवसा प्रतिष्ठित शीलवान म्हणून मिरवता आणि रात्री आमच्या सारख्या पुरुषां समोर….मला जास्त बोलायला लावू नका मॅडम! हे ऐका आणि हो हे रेकॉर्डिंग मी लगेच माझ्या दुसऱ्या फोनच्या whs up वर देखील हे बघा पाठवून ठेवले. म्हणजे तुम्ही इथे हॉटेलमध्ये आरडा ओरडा केलात माझ्यावर काही आरोप लावले आणि माझा फोन काढून घेतला मला पोलिसांनी नेले तर दुसऱ्या फोन मधील रेकॉर्डिंग मी तिथे देईन! इथून पुढे माझ्या वाटेला जाऊ नका नाही तर तुमचा मुखवटा फाडेन मी!” तो रागाने म्हणाला आणि मोबाईलवरचे रेकॉर्डिंग तिला एकदा ऐकवून निघून गेला.

नमिता मात्र रागाने धुमसत होती.ती शांत बसणाऱ्यातील नव्हती याची कल्पना मात्र अरीनला देखील होतीच म्हणूनच त्याने त्याचे सत्य दुसऱ्या कडून राध्याला समजण्या पेक्षा स्वतःच ते सांगायचे ठरवले.
©स्वामिनी चौगुले







सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा!



🎭 Series Post

View all