डार्क हॉर्स भाग १४

राध्याला अरिनचे सत्य कळल्यावर ती काय करेल?


भाग 14
सकाळी राध्याला जाग आली. कुस बदलली तर अरीन अजून ही झोपलेला तिला दिसला. ती थोडा वेळ अरीनला निहाळत राहिली आणि काल रात्रीची तिला आठवण आली. ती त्याला पाहत विचार करत होती.

“अरीन काल रात्रीच्या तुझ्या वागण्यामुळे मी अजूनच तुझ्या प्रेमात पडले. तुझा आदर वाटतो मला. आणि माझी निवड योग्य आहे याची खात्री ही मला पटली. मी सहज तुझ्या मिठीत काल विरघळले आणि तुझ्या स्वाधीन झाले पण तू मात्र स्वतः बरोबर मला देखील सावरलेस! असं ही जरी तू स्वतःला आणि मला सावरले नसतेस तरी इतका काही फरक पडला नसता. पण तुझ्या मते हे योग्य नाही आणि तुझ्या मताचा मला आदर आहे!” याच विचारत ती उठून बसली आणि जवळ झोपलेल्या अरीनच्या केसात हात फिरवत म्हणाली.

राध्या,“ अरीन उठ सात वाजले आहेत.मला जायचं आहे लवकर!”

तिच्या आवाजाने अरीन डोळे चोळत उठला आणि उठून बसत म्हणाला.

अरीन,“तू तुझं आवर मी फ्रेश होऊन चहा आणि नाष्टा बनवतो.” तो असं म्हणाला आणि राध्याने त्याला विचारले.

राध्या,“पाय कसा आहे तुझा? अजून दुखतोय का? आणि काही गरज नाही चहा-नाष्टा बनवायची तू बस मी बनवते सगळं!” ती काळजीने म्हणाली.

अरीन,“अजून थोडा दुखतोय पण बरा आहे मी आता!” तो पायाची क्राफ्ट बँडेज सोडत म्हणाला.

राध्या,“ काय बरा आहे म्हणतोस! अजून पायावर सूज आहे की मी गिझर लावून येते गरम पाण्यात मीठ टाकून देते पाय शेकून घे! बरं वाटेल तुला!” ती त्याच्या पायाकडे पाहत म्हणाली.

अरीन, अग एवढं सगळं करू पर्यंत उशीर होईल की तुला जायला!” तो म्हणाला.

राध्या,“ नाही होत मला उशीर!तू बस मी आलेच!” असं म्हणून ती निघून गेली.


तिने अरीनसाठी तिथेच बादलीत गरम पाणी आणून दिले आणि त्यात किचन मधून मूठ भर मीठ आणून टाकले. अरीनला मिठाच्या गरम पाण्याने पाय शेकल्यामुळे जरा बरे वाटले. राध्या तो पर्यंत तीच आवरून आली आणि किचनकडे वळली. अरीनने ही तो पर्यंत त्याचे आवरले. त्याचा पाय चांगलाच मुरगळल्यामुळे तो अजून ही लंगडत चालत होता. राध्याने नाष्ट्याला शिरा आणि चहा बनवला आणि दोघांनी नाष्टा केला.

अरीन,“शिरा छान झाला आहे राध्या! तुला जेवण बनवता येत तर! मला वाटलं की तू फक्त बिझनेस आणि वेटिंग प्लॅनिंग मध्येच हुशार आहे!” तो तिला पाहून हसत म्हणाला.

राध्या,“ हो का? मला सगळं येत आवर आता मला जायचं आहे!” ती तोंड वाकड करत म्हणाली आणि अरीन अजून हसायला लागला.

अरीन,“ बरं चल तुला बस मध्ये बसवून येतो. माझी बाईक ही आणायची आहे लोणावळ्यावरून मित्राला पाठवतो आता!” तो म्हणाला आणि दाराकडे वळला.

राध्या तिची पर्स घेऊन त्याच्या मागे होती तिने त्याचा हात धरला. अरीनने खुणेनेच काय म्हणून विचारले.तर राध्याने पर्स ठेवून त्याच्या गळ्यात दोन्ही हात गुंफले आणि ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली.

राध्या,“ नाही म्हणजे तू नेहमीच अस कोरडं बाय करणार का? की भाव खातोस जास्त?”

अरीन,“आss तुझ्या समोर भाव खाऊन मी कुठे जाणार ना आणि कोरड बाय तर मी करणारच नव्हतो!” असं म्हणून त्याने तिच्या कमरेत एक हात घालून तिला आणखीन जवळ ओढून घेतले आणि दुसरा हात तिच्या केसात घालून तिच्या ओठांचा ताबा मिळवला.दोघे एकमेकांमध्ये थोडावेळ गुंतत राहिले.राध्या हाताने त्याचे ओठ पुसून त्याच्या पासून दूर होत म्हणाली.

राध्या,“ बरं चल आता आणि काळजी घे आज शक्य झाल्यास ऑफिस मधून सुट्टी घे आणि आराम कर! बघ अजून लंगडतो आहेस!” ती काळजीने बोलत होती.

अरीन,“ हो मॅडम तुमच्या सूचनांचे तंतोतंत पालन केले जाईल! मग पुन्हा अशी भेट कधी!धावत्या भेटीने समाधान होत नाही! ” तो तिला पुन्हा जवळ ओढत म्हणाला.

राध्या,“ अच्छा! मग भेटू ना लवकरच!बरं चल ना आता!” ती हसून म्हणाली.

अरीन,“ बरं!” म्हणून दोघे ही टॅक्सीने बस स्टॉपवर पोहोचले. अरीनने पोहोचल्यावर फोन कर म्हणून तिला बसमध्ये बसवले.

तो तिला बाय करून तिथून निघाला. तर समोरच इतका वेळ त्या दोघांना लांबून पाहणारे त्याच्याच प्रोफेशन मधील दोघे मित्र होते. त्यातील विनोद जरा मोठा चाळीशीकडे झुकलेला. तर दुसरा विरेन अरीन पेक्षा लहान असलेला. ते त्याच्या जवळ आले.

विरेन,“अरीन काय कवळी काकडी होती रे ती! तुझं आपलं चांगलं आहे मजा आली असेल ना रात्री नाही तर आमच्या नशिबात आहेत चाळीशीच्या पुढच्या आंट्या!” तो तोंड वेडावून बोलत होता.

अरीन,“विरेन ती माझी क्लायंट नाही!माझं एक काम कर ना लोणावळ्यात ब्यु पर्ल रेस्टॉरंटमध्ये माझी बाईक आहे ती घेऊन ये ना! माझा पाय ट्विस्ट झाला आहे म्हणून काल तिथेच बाईक सोडून यावी लागली!” तो त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून त्याला बाईकची चावी देत म्हणाला.

विरेन,“आणतो बाईक मी पण ती आहे तरी कोण रे?”त्याने पुन्हा विचारले. आता इतका वेळ शांत असलेला विनोद म्हणाला.

विनोद,“विरेन तुला काय करायचे रे! जा बाईक घेऊन ये अरीनची!” तो दटावत म्हणाला आणि विरेन गपचूप निघून गेला.

अरीन,“ thanks वाचवलेस बाबा मला या विरेन पासून नाही तर याने प्रश्न विचारून मला भंडावून सोडले असते.” तो विनोदकडे पाहत म्हणाला.

विनोद,“चल कॉफी घेऊ!” तो म्हणाला आणि दोघे जवळच्या कॅफे मध्ये गेले विनोदने दोन कॉफी ऑर्डर केल्या आणि तो गंभीरपणे बोलू लागला.

विनोद,“ काही विचारू का तुला अरीन म्हणजे पर्सन विचारतो तुला राग येणार नसेल तर!”

अरीन,“ हो विचार ना! नाही येणार राग मला!”

विनोद,“ ती मुलगी तुझी गर्ल फ्रेंड आहे ना? प्लिज आता खोटं नको बोलुस तुम्हा दोघांना मी बराच वेळ झालं लांबून पाहत आहे तिच्या हावभावा वरून ती तुझी गर्ल फ्रेंड आहे हे कोणी ही सांगेल!” तो म्हणाला.

अरीन,“ हो ती gf आहे माझी!”

विनोद,“ तिला माहीत आहे का तू काय काम करतोस ते?(त्याने गंभीर होत विचारले आणि अरीनने त्याची मान खाली घातली) म्हणजे तिला माहीत नाही तर ती चांगल्या घरातील मुलगी दिसते अरीन याचा अर्थ असा नाही की तू वाईट घरातील आहेस म्हणून पण आपण जे काम करतो ना ते समाज मान्य नाही आणि कोणतीच मुलगी मेल एस्कॉर्टचा स्वीकार तिचा नवरा म्हणून करणार नाही हे कटू असलं तरी सत्य आहे. तुला सांगू स्त्री वैश्या आणि आपल्यात तसा काहीच फरक नाही त्यांच्या नशिबात ही लग्न न करता सतरा नवरे असतात आणि आपल्या नशिबात ही लग्न न करता सतरा बायका! लग्न संसार त्यांच्या नशिबात नसतं तसं ते आपल्या देखील नशिबात नाही. उलट त्या स्त्रिया आपल्या पेक्षा धाडसी आहेत त्या उघड उघड धंदा करतात पण आपण लपून छपून करतो. माझा अनुभव तुझ्या पेक्षा जास्त आहे अरीन आपण ज्या दलदलीत रुतले आहोत ना त्या दलदलीत आपल्याला कोणाला ही असं खेचण्याचा अधिकार नाही. अजून ही वेळ नाही गेली सावर स्वतःला कारण उद्या त्या मुलीला सत्य कळल्यावर ती तुला झिडकरणार आणि त्याचा सगळ्यात जास्त त्रास देखील तुलाच होणार!” विनोद त्याला समजावत म्हणाला.

अरीन,“ तुझं म्हणणं पटतंय मला आणि या सत्याची ही जाणीव आहे मला की तिला माझं सत्य कळल्यावर ती मला सोडून जाणार पण माझं प्रेम आहे तिच्यावर तू काळजी नको करू मी तिचा कोणता ही गैर फायदा नाही घेणार आणि मी तिला सत्य सांगितल्यावर किंवा तिला मी मेल एस्कॉर्ट आहे हे कळल्यावर ती निघून जाईल हे सत्य स्वीकारण्याची मी माझ्या मनाची तयारी केली आहे. मला फक्त तिच्या बरोबर काही क्षण घालवायचे आहेत जे माझ्या जगण्याचे कारण बनतील!” तो डोळ्यातले पाणी पुसत म्हणाला

विनोद,“ ठीक आहे!”

खरं तर विनोद जे अरीनशी बोलला होता त्यातला एक आणि एक शब्द खरा होता. अरीनला देखील हे सत्य माहीत होते पण तो त्याच्या प्रेमा पुढे हतबल होता. त्याला निदान काही दिवस तरी राध्या बरोबर जगायचे होते. या सगळ्या पासून अनभिज्ञ राध्या मात्र अरीनच्या प्रेमात आकंठ बुडाली होती.

जेंव्हा अरीनचे भयंकर सत्य तिच्या समोर येईल तेंव्हा ती कशी वागेल काय? करेल? याचा मात्र कोणीच अंदाज बांधू शकत नव्हते
©स्वामिनी चौगुले

सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा!








🎭 Series Post

View all