दापोली व्हाया सिलिकॉन व्हॅली भाग 8

विजयाताई मुलींना मदत करायचा निर्णय घेतात.

दापोली व्हाया सिलिकॉन व्हॅली भाग 8


मागील भागात आपण पाहिले समुद्रावर फिरायला जाताना आशुला काही गोष्टी जाणवतात. पूर्वा तिला समजवायचा प्रयत्न करते. रॉनी तिला परत एकदा फोटो मागतो. विजयाताई एलिबद्दल चौकशी करतात. आता पाहूया पुढे.


आशू आता द्विधा मनस्थितीत सापडली होती. एकीकडे तिला रॉनी हवा होता आणि दुसरीकडे काहीतरी चुकत आहे याची आतून जाणीव होत होती.

"हाय, ॲश कॅन वुई टॉक? आय फिल व्हेरी लोनली हिअर." एलिचा मॅसेज पाहताच आशुला चिंता वाटली.

"येस,वुई कॅन."तिने रिप्लाय पाठवला.

एलिने फोन केला. त्यानंतर तिने सांगायला सुरुवात केली.

"माझ्या मॉमला अजिबात वेळ नाही. त्यामुळे ती मला रीहॅब सेंटरला पाठवणार आहे. आय एम नॉट अ ड्रग ॲडिक्ट ऑर अल्कोहोलिक. मी पळून जाईल इथून."

एली सांगताना रडत होती. तोपर्यंत विजयाताई हळूच मागे येऊन उभ्या राहिल्या होत्या.

"एली,रनिंग अवे फ्रॉम होम इज अल्सो पुट यु इन ट्रबल. वुई फाईंड अनादर ऑप्शन." आशू रडत मैत्रिणीला समजावत होती.

"कॅन आय सजेस्ट द ऑप्शन?" मागून आलेल्या आवाजाने आशू दचकली.

पण तिलाही आता आधाराची गरज होती. तिने हळूच फोन आजीकडे दिला. त्यानंतर विजयाताई अत्यंत सौम्य आवाजात एलिला समजावत होत्या.

थोड्या वेळानंतर बोलणे संपवून त्यांनी फोन ठेवला आणि आशुकडे वळून त्या म्हणाल्या,"आय एम सॉरी. मला माफ कर आशू पण काहीवेळा कुटुंब,मोठी माणसे लागतात मदतीला."

"येस आजी. पण एली रीहॅब सेंटरमध्ये ती नाही राहू शकणार. प्लीज सेव्ह हर."

असे म्हणून आसावरी आजीच्या कुशीत शिरली. विजयाताई तिला थोपटत शांतपणे काही ठरवत होत्या.


दुसऱ्या दिवशी सकाळी म्याव म्याव अशा मांजरीच्या ओरडण्याने उन्मेष टुणकन उठून बसला. खोलीचा दरवाजा उघडून तो बाहेर आला. त्याने पाहिले दारात एक आजीच्या वयाची बाई टोपली ठेवून घेऊन बसली होती.

दोन्ही आज्या मासे हातात घेऊन बघत होत्या आणि मासे खायला मिळावेत म्हणून कडेने मांजरी ओरडत होत्या.

"ईईई आजी किती स्मेल येतोय ह्या फिशचा." उन्मेष घरात पळून गेला.

तेवढ्या गडबडीत आशुची झोपमोड झाली.

"उन्मेष, कमऑन! किती गडबड करतोय. कॅट्स कुठून आणल्यास तू? त्यांना हात लावू नकोस." आशू बडबडत सुटली.

"टाई,थांब. मी कॅट्स आणल्या नाहीत. आजी फिश खरेदी करतेय. ते खायला आल्यात त्या."

आशुच्या तोंडावर हात ठेवून उन्मेष ओरडला.

"काय? फिश! वॉव चल लवकर बाहेर." आशू ओरडतच बाहेर आली.

अनघा आणि दोन्ही आज्या मासे साफ करत होत्या आणि उरलेले तुकडे मटकावत मांजरी निवांत आजूबाजूला बसल्या होत्या. दुसरीकडे पूर्वा मासे धुवून काढत होती. सुलभाआजी मसाला तयार करत होती आणि चक्क आण्णा आजोबा मासे फ्राय करत होते.

"वा मॉम कसले भारी ना. किती भारी वास सुटला आहे. कोणता फिश आहे हा."

आशू खाली बसून बोलू लागली.

"पापलेट आहे हा. धर खाऊन घे." आण्णा तिला एक तुकडा देत म्हणाले.

डीप फ्राय पापलेट खाऊन आशू प्रचंड खुष झाली.

"मॉम आय जस्ट लव इट."
तिने स्वतः भोवती गिरकी घेतली.

"अजून एक आनंदाची बातमी तुला द्यायची आहे." विजयाताई तिला हसून बोलल्या.


आशुने आजीकडे पाहिले. त्यांनी शांतपणे तिला एक मॅसेज दाखवला.
"आजी, आय कान्ट से माय फिलिंग्ज इन वर्डस."

आशुने आजीला घट्ट मिठी मारली.

विजयाताई आणि अनघाने एलिला भारतात बोलावले होते. तिच्या पालकांची परवानगी घेऊन एली पुढील आठवड्यात भारतात येणार होती.

आशू आनंदाने अंघोळ करायला पळाली.

"विजयाताई,अशी वयात आलेली परकी पोर इथे बोलावून आपण बरोबर करतोय ना?"
सुलभाताई अजून साशंक होत्या.

"आपल्या नातीची मैत्रीण आहे ती. तिला जरा आधार हवा आहे. विजया वहिनी सांभाळतील सगळे."
आण्णा धीर देत म्हणाले.

अनघा सुद्धा ह्या निर्णयाबद्दल फार आशावादी नव्हती.

"आई,तू शिक्षिका होतीस तो काळ वेगळा होता. शिवाय ती पोरगी जन्माने अमेरिकन आहे."

अनघाने तिचे विचार मांडले.

"अनघा,शिक्षक कायम शिक्षक असतो. कुटुंब,प्रेम, माया आणि आधार कोणत्याही मुलाला हवे असतात. तो अमेरिकेत जन्मला म्हणून स्वतः सगळे नाही ना शिकू शकत."

विजयाताई विश्वासाने बोलत होत्या.


विजयाताई एलिला सावरू शकतील? रॉनी बद्दल आशू काय निर्णय घेईल? पुर्वा आणि आशुची मैत्री फुलेल का?

वाचत रहा.
दापोली व्हाया सिलिकॉन व्हॅली.
©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all