दापोली व्हाया सिलिकॉन व्हॅली भाग 2
मागील भागात आपण पाहिले अनघा तिच्या दोन्ही मुलांना घेऊन एक वर्षासाठी भारतात येणार आहे. तिला ह्या दोन पिढ्यांचे विचारतील अंतर पाहून भीती वाटत होती. त्यातच मोबाईलवर एक मॅसेज आला. आता पाहूया पुढे.
मोबाईलवर आलेला संदेश पाहून अनघा आणि सुबोध स्तब्ध झाले.
"सुबोध,तू आता लगेच आईला फोन लाव. तिला थांबव." अनघा चिंतेत बोलत होती.
"वा! हे बर आहे तुझ. जसे काय मला काहीच बोलणार नाहीत त्या. हे बघ इकडे अण्णांचा मॅसेज." सुबोध मोबाईल दाखवत म्हणाला.
" सुबोध,तू आईशी बोल आणि मी आण्णा डील." अनघाने तडजोड केली.
"हॅलो आण्णा,कसे आहात?" अनघाने सुरुवात केली.
"मला काय धाड भरली. आता तू आणि मुले येत आहात. विजयाताई आपल्या बरोबर असणार. मला तर खूप छान वाटत आहे."आण्णांना प्रचंड आनंद झालेला दिसत होता.
"आण्णा,मी काय म्हणते. आईला कशाला बोलावता उगीच." अनघा थांबली.
"अनघा,उगीच काय? त्या तुझी आई असल्या तरी आधी माझ्या मित्राची बायको आहे.
" अण्णा चिडले होते."तसे नाही आण्णा. पण आशुसुद्धा दापोलीत राहील का?"
तसे आण्णा चिडले,"हे बघा सूनबाई,चिरंजीव तुमच्याआड लपतात. ते काही नाही ह्यावेळी आम्ही ठरवले तसेच होईल."
पलीकडून फोन कट झाला.अनघाचा चेहरा पाहून सुबोधला अंदाज आला. अखेरचा प्रयत्न म्हणून त्याने विजयाताईंना फोन केला.
"बोल सुबोध,आमचं कन्यारत्न कुठेय? कधी निघताय? माझी पॅकिंग झाली." विजयाताई बोलतच सुटल्या.
"बाई,मला काय वाटतं पुण्यातच नाही का राहता येणार?" सुबोध हळूच म्हणाला.
"अनघा म्हणाली का असे? ह्यावेळी तरी भावोजी आणि सुलभा दोघांना नातवंडं सहवास लाभू द्या." विजयाताई चिडल्या.
"तसे नाही. त्यांनाच पुण्याला बोलावू. मुलांना दापोली आवडणार नाही." सुबोधने बाजू मांडली.
"ते काही नाही आता जे ठरलं तेच होईल." पलीकडून फोन कट झाला.
अनघा आणि सुबोध बिचारे ब्लँक झाले होते. आसावरीला आता काय सांगायचे हा यक्ष प्रश्न उभा राहिला होता. दोन दिवसांनी आसावरी आणि अनघा खरेदीसाठी मॉलमध्ये गेल्या.
"मॉम,प्लीज टेक ऑल हायजिन थिंग्ज हा. तिकडे काय माहित कसे असेल?" आशू नाक उडवत म्हणाली.
"आशू,मी वयाची पंचवीस वर्षे तिथेच राहिले. आजही ठणठणीत आहे." अनघा शक्य तितक्या सौम्य आवाजात म्हणाली.
" पण यु बॉर्न देअर. मला कसे सगळे छान लागते. तरी पुणे त्यातल्या त्यात ओके दिसत आहे गुगलवर." आशुची बडबड चालूच होती.
"आशू,समज आपल्याला पुण्यात राहता आले नाही तर?" अनघाने चेंडू टाकला.
"मग मी येणार नाही हा. तुला आधीच सांगून ठेवते." आसावरी तरातरा पुढे निघून गेली.
अनघा स्तब्ध होऊन पहात राहिली.
"मग मी येणार नाही हा. तुला आधीच सांगून ठेवते." आसावरी तरातरा पुढे निघून गेली.
अनघा स्तब्ध होऊन पहात राहिली.
घरी आल्यावर तिने दुपारचा प्रसंग सुबोधला सांगितला.
ते दोघे बोलत असताना अचानक आशू ओरडली,"मॉम,मॉम लवकर ये!"
सुबोध आणि अनघा धावत आसावरीच्या खोलीत गेले. आसावरी संपूर्ण घामाने भिजलेली. तिने थरथरत्या हाताने मोबाईल पुढे केला. आसावरीच्या जिवलग मैत्रीण असलेल्या एलिने आत्महत्या करायचा प्रयत्न केला होता. तर दुसरी एक मैत्रीण विल्मा मरण पावली होती.
हा सगळा सुन्न करणारा प्रसंग होता. अनघाने आशुला आधी खाली बसवले. तिला पाणी प्यायला दिले. आशू बरीच शांत झाली होती. एलीचे आई वडील विभक्त झाले होते. ती सध्या विद्यार्थी हॉस्टेलमध्ये राहत असे. अनघाने सुबोधला गाडी काढायला सांगितली. पुढच्या पंधरा मिनिटात सगळे हॉस्पिटलला पोहोचले.
डॉक्टर धावत आले."शी इज इन अ क्रिटिकल सिच्युएशन. वुई हॅव टु अबॉर्ट द चाईल्ड." डॉक्टर शांतपणे बोलल्या
. अनघा पहातच राहिली.
डॉक्टर तिचे पालक आल्याशिवाय कार्यवाही करायला तयार नव्हत्या. एलीची आई बिझनेस ट्रीपवर बाहेर होती. तिचे वडील फोन घेत नव्हते.
तेवढ्यात अनघा पुढे झाली,"डॉक्टर प्लीज डू द प्रोसिजर. मी करते सह्या."
अमेरिकेत असे करणे धोकादायक होते. तरीही अनघाने धोका स्वीकारला. जवळपास पाच तासांनी डॉक्टर एलीला वाचवण्यात यशस्वी ठरले. तिने घेतलेले विषारी द्रव्य बाहेर काढले. अबॉर्ट केल्याने तिला निरीक्षणात ठेवून डॉक्टर बाहेर आल्या.
"यु टेक द रिस्क अँड वुई सेव हर. कॉल एनी रीलेटिव्ह इफ शी हॅव." डॉक्टर निघून गेल्या.
अनघा आणि आसावरी बाहेर आल्या. घरी येताना आसावरी काहीच बोलत नव्हती. घरी पोहोचल्यावर ती एकच वाक्य म्हणाली,"मॉम,मी तयार आहे तू भारतात जिथे नेशील तिकडे यायला."
एलीचे पुढे काय होईल? दापोली मानवेल का आसावरीला? अनघाचे ह्या दोन पिढ्यांत सँडविच होईल का?
वाचत रहा.
दापोली व्हाया सिलिकॉन व्हॅली.
©®प्रशांत कुंजीर.
दापोली व्हाया सिलिकॉन व्हॅली.
©®प्रशांत कुंजीर.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा