Mar 01, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

दापोली व्हाया सिलिकॉन व्हॅली भाग 14

Read Later
दापोली व्हाया सिलिकॉन व्हॅली भाग 14


दापोली व्हाया सिलिकॉन व्हॅली भाग 14

मागील भागात आपण पाहिले रॉनीने सुबोधला काहीतरी ऑफर केले. इकडे सूवर्णाबद्दल सगळे मुलींना समजले. आशू रॉनीच्या गोड बोलण्यात येत होती. एली मनापासून सावरण्याचा प्रयत्न करत होती. आता पाहूया पुढे.


संध्याकाळी एली आणि आशू शाळेचा अभ्यास पूर्ण करत असताना आशुला सतत रॉनी मॅसेज पाठवत होती. वेगवेगळे जोक्स आणि काही अश्लील सूचक बोलत होता. आशुला कुठेतरी हे हवेसे वाटत होते तर दुसरीकडे एली आणि आता सुवर्णाचे उदाहरण पाहून भितीही वाटत होती.

तरीही तिने त्याला काही उत्तरे दिली. त्यानंतर अभ्यास संपल्यावर त्याने व्हिडिओ कॉल कर अशी मागणी केल्यावर मात्र तिने माझ्याबरोबर एली आहे असे सांगितले. त्याबरोबर पलीकडून येणारे मॅसेज थांबले.इकडे सुबोधने रॉनीचा दिलेल्या नंबरवर मॅसेज केला.

"हाय ड्यूड. फिलिंग बोअर."
लगेच रिप्लाय आला,"वाना हॅव सम फन?"

सुबोध थोडे थांबला.
"येस, वाना एन्जॉय विकेंड." त्याने रिप्लाय दिला.

"ॲट माय प्लेस. मिडनाईट वुई हॅव पार्टी. इफ वॉन्ट टू जॉईन प्लीज कम.आय विल सेंड यू द डिटेल्स."

रॉनीचा रिप्लाय आला होता.

"येस,आय वॉन्ट टू जॉईन." सुबोधने रिप्लाय पाठवला.

त्यानंतर आलेला रिप्लाय वाचून त्याला खात्री झाली की हा रॉनी नक्कीच काही वाईट कामे करत आहे. तरीही पहिल्यांदा त्याचा विश्वास मिळवणे आवश्यक होते.

सुबोध तिथे गेला. त्यानंतर रॉनीने सांगितलेला आऊटफिट घातला. त्याने फक्त पाहिन असे सांगितले. आता आल्यावर त्याला शॉक बसला.तिथे एक अडल्ट पार्टी चालू होती.

रॉनी नग्न पार्टीत भटकत होता. त्याने हळूच सुबोधला कानात विचारले,"इफ वॉन्ट समथिंग जस्ट टेल."

सुबोध कसाबसा तासभर थांबला आणि घरी आला. तो अनेकदा त्याच्या मित्रांकडून हे सगळे ऐकत आला होता. काही त्याचे मित्र अशा नात्यात होते. पण ती गोष्ट वेगळी. इथे रॉनी पैसे घेऊन हे सगळे आयोजित करत होता.

आता लवकरच पुरावे सापडणार होते. सुबोधने तसा मॅसेज विजयाताईंना केला.एली आता स्वतः स्वयंपाक करू लागली. तिचे आणि सुलभाताईंचे अनेक व्हिडिओ तिने बनवले होते. एक दिवस यू ट्युब सर्च करताना तिला काही भारतीय कुकिंग व्हिडिओ दिसले.

एलीच्या डोक्यात एक कल्पना येऊ लागली. तिने त्यावर काम करायचे ठरवले. ती विचारात असताना अचानक आवाज आला.

"एली,लवकर बाहेर ये.आज आपण सांडगे बनवायचे पीठ करायची तयारी करणार आहोत." सुलभाताई आवाज देत होत्या.

एली पटकन उठली.

"एली,कम ऑन तू आता हे सगळे करणार आहेस?" आशुने तिला विचारले.

"व्हाय नॉट? मला आवडते आहे हे सगळे करायला." एली उत्तर देत असताना अनघा आत आली.

"नको तिथे वेळ घालवण्यापेक्षा हे छानच आहे एली." अनघाने उत्तर दिले.

आशू काही बोलणार एवढ्यात एलिने तिला गप्प बसायची खूण केली.

"आईने खाली बोलावले आहे." अनघा निरोप देऊन निघुन गेली.

आशू प्रचंड चिडली होती. तेवढ्यात तिने मोबाईल पाहिला.

"हे बेबी, टुडे आय हॅव स्ट्राँग वर्कआऊट ॲट जिम."

असे लिहून खाली स्वतः चे अर्धनग्न व्हिडिओ त्याने पाठवले होते.आशुला त्यांचे कूल असणे आवडू लागले होते.


पूर्वा आणि तिच्या मैत्रिणी विजयाताईंच्या शिकवण्यामुळे छान अभ्यास करू लागल्या होत्या. त्या दिवशी संध्याकाळी शिकवणी संपवून सगळ्या घरी चालल्या होत्या. एकेक जण वेगळ्या वाटेने पुढे गेली. पूर्वा आपल्याच नादात चालली होती.

"पूर्वा थांब." समोर कृष्णा उभा होता.

ती चिडून निघून जाणार होती. तेवढ्यात तो आडवा झाला.

"पूर्वा,माझे बोलणे नीट ऐक.मला तू आवडतेस अगदी मनापासून. तुझ्यावर माझे खरे प्रेम आहे. तुला कदाचित हे सगळे खोटे वाटत आहे. किंवा भीती वाटत आहे.

पण आज इथे तुला मी वचन देतो की तुला इथून पुढे पुन्हा भेटेल ते कोणीतरी मोठा बनुनच. जर तेव्हा तुझे मन बदलले तर आपण एक होऊ अन्यथा तुला एक स्वप्न समजून माझ्या ह्रुदयात कायम जपून ठेवील."

एवढे बोलून कृष्णा वेगाने निघून गेला. पूर्वा फक्त त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहात राहिली. नंतर कितीतरी वेळाने भानावर येऊन ती यांत्रिकपणे घराची वाट तुडवू लागली.


रात्री उशिरा आशू आणि रॉनी चॅट करत होते.

"बेबी, गेट फिजिकल इज अ इम्पॉरटंट पार्ट ऑफ रिलेशनशिप.
इट्स नॉर्मल इन यु.एस.
यु आर नॉट अ टिपिकल इंडियन गर्ल."

रॉनी अगदी मधाळ शब्दांचे गारूड विणत होता आणि आशुच्या मनाचे फुलपाखरू त्यात अलगद अडकत चालले होते.


इकडे सुबोधने ह्या प्रकरणात अमेरिकन पोलीस दलात असणाऱ्या मित्राची मदत घेतली. तो म्हणाला की "अडल्ट पार्टीज आर कॉमन. पण तुला पुरावे शोधायला आणि तुझ्या मुलीला वाचवायला मी नक्की मदत करेल."एली आता बरीच सावरली होती. तिने तिच्या आजीबरोबर संवाद वाढवला होता. तिची आई करत असलेला आर्थिक आणि मानसिक संघर्ष आता तिला समजत होता.

अडनिड्या वयात आकर्षण आणि त्यात असणारे धोके यांची जाणीव तिला इथे सुलभाताई आणि विजयाताई अनेक उदाहरणे देऊन समजावत होत्या.ह्या तीनही मुली आणि त्यांच्याशी कुटुंब म्हणून जोडलेले सगळे ही अवघड वळणे कशी पार करतील. पाहूया अंतिम भागात.


वाचत रहा.
दापोली व्हाया सिलिकॉन व्हॅली.
©®प्रशांत कुंजीर.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Kunjir Prashant Vishwanath

Primary Teacher

Primary Teacher In Z P Pune A Writer,A Poet An Anchor

//