दापोली व्हाया सिलिकॉन व्हॅली भाग 12

एका कुटुंबाच्या समोर आलेले नाजूक वळण आता हळूवार पार होणार.

दापोली व्हाया सिलिकॉन व्हॅली भाग 12


मागील भागात आपण पाहिले एली भेटल्याने आशुला प्रचंड आनंद झाला. रॉनिने प्रेमाने केलेला मॅसेज तिला आणखी सुखावून गेला. एली भारतात येऊन आनंदी होती. तरीही तिचे मन मात्र आनंदी नव्हते. आता पाहूया पुढे.


जेवण करून एली आराम करायला गेली. मुंबई ते दापोली प्रवास आणि त्यात आलेला मानसिक थकवा ह्यामुळे तिला खूप थकल्यासारखे जाणवत होते. इकडे रॉनीच्या मॅसेजमुळे आशू आनंदी होती.

सुलभाताई दुपारी जेवणात आळूवडी करणार होत्या आणि घरच्या काजूची बर्फी. त्यांनी अनघाला मदतीला बोलावले.

"आशुला काही विचारलेस का? कोण आहे तो मुलगा?" सुलभाताई तिला काळजीने म्हणाल्या.

"आई,अहो ती माझ्याशी बोलायलाच तयार नाही.आता एली आलीय तर तिची काही मदत मिळेल का पाहू."

तेवढ्यात एलिच्या आईचा फोन आला. अनघाने तिला नीट आश्वस्त केले.

"बिचारी अशीच प्रेमात पडून फसली आणि ह्या दोन पोरांना वाढवते आहे. आपली मुलगी त्याच वाटेवर चाललेली पाहून तिला खूप त्रास होत आहे." अनघा उदास होऊन सांगत होती.

"आशू,चल आपल्याला जरा बाहेर जायचे आहे." विजयाताई हाक मारत होत्या.

"कुठे जायचे आहे? काय काम आहे आजी?"आशुने बाहेर येत विचारले.

"काही नाही ग! त्या अनिताच्या वडिलांना भेटून येऊ. तिला अभ्यासाला बोलावले तरी आली नाही. बरोबर स्केच बुक घे. काही माहिती मिळाली तर घेता येईल."

दोघीही निघाल्या. सोबत आण्णा होते. आण्णा आजोबा सरकारी नोकरीत असल्याने गावी फार कमी राहायचे. पण नंतर मात्र इथे बदली मागून घेतली होती त्यांनी. अनिताच्या घराजवळ येताच आण्णा थोडे थांबले.

"बाळू,ये बाळू बाहेर ये." आण्णांनी हाक मारली.

" आण्णानू तुमी. काय काम व्हता काय?" बाळू बाहेर येत बोलला.

"काम त्यांचे नाही माझे आहे." विजयाताई म्हणाल्या.

"काय चुकी झाली काय आमच्याकडुन?"बाळूला समजेना.

विजयाताई मग त्याच्याशी खूप वेळ बोलल्या. त्यांनी शिक्षणाचे महत्व समजावले. तरीही त्याच्या मनात एक भीती होती.

विजयाताई जाताना आण्णा आजोबांना म्हणाल्या,"काहीतरी घटना आहे. ज्यामुळे ही सगळी लोक मुलींच्या जास्त शिक्षणाला विरोध करत आहेत."

"हो,आहे खरी. तुम्हाला रात्री सांगतो." आण्णा पुढे चालताना बोलले.


"अनघा आळू काढून आणतेस का?" सुलभाताई अनघाला म्हणाल्या.

"आंटी, अळू काय असते?" मागून आलेल्या एलिने विचारले.

"चल दाखवते." अनघा तिला परसात घेऊन गेली.

ती पाने पाहून एली हसायला लागली."आंटी,माझी ग्रेट ग्रॅनी पण अशा पानाचे रोल्स करायची."

"मस्तच की. चल लवकर पाने काढून आजीला नेऊन देऊ." बोलत बोलत दोघी काम करू लागल्या.

पाने घेऊन आल्यावर एली म्हणाली,"आजी,मी कॅमेरा घेऊन येते. आपण हे सगळे शूट करून ब्राझील मध्ये राहणाऱ्या माझ्या आजीला पाठवू."

एली पटकन जाऊन कॅमेरा घेऊनही आली. अळू वडीतील प्रत्येक मसाला,त्याचे उपयोग सगळे ती समजावून घेत होती. त्याचबरोबर एलिने तिच्या आजीच्या पद्धतीने एक रोल बनवला. त्यानंतर भाकरी आणि संपूर्ण स्वयंपाक तिने आवडीने पाहिला.

"एली,तुला कुकिंग एवढे आवडत असेल असे वाटले नव्हते." अनघा म्हणाली.

"आंटी,त्यासाठी घर कुठे होते मला? माझी ग्रॅनी आणि माझ्यात हीच एक सेम थिंग आहे."

सुलभाताई तर इतक्या खुलल्या की त्यांनी एलिला इथले पदार्थ शिकवायचे कबूल केले.


"एली,तुझे आई वडील तुझ्याबरोबर रहात नाहीत का?" सुलभाताई पटकन बोलून गेल्या.

"मॉम आणि डॅड सेपरेट झालेत. शी वॉज जस्ट सेवेंटीन व्हेन आय वॉज बॉर्न. शी सफर फ्रॉम लॉट." एली डोळ्यांच्या कडा पुसत बोलली.

"पोरी,बाईच्या शरीराला रुजण्याचे वरदान दिले असल्याने त्याबाबत जास्त काळजी घ्यावी लागते." सुलभाताई तिला जवळ घेऊन बोलल्या.


विजयाताई आणि आशू परत घरी येत असताना त्यांनी पाहिले की पूर्वा आणि एक मुलगा बोलत होते आणि अचानक पूर्वा वेगाने पुढे निघून गेली. तेवढ्यात तो मुलगा यांच्या दिशेने वळून चालू लागला. त्याच्या गालावर ओघळलेले अश्रू लपवायचा आटोकाट प्रयत्न तो करत होता.


" आजी,व्हाय ही इज क्राईंग.प्रपोजल ॲक्सेप्ट करणे किंवा नाकारणे इट्स जस्ट नॉर्मल थिंग." आशू म्हणाली.

"लूक आशू वुई आर डिफरेंट फ्रॉम ऑल. आपण इतर प्राण्यांपेक्षा वेगळे आहोत.वुई हॅव सोसायटी,रुल्स अँड थिंकिंग पावर. इथे एका मेल पार्टनरला नाही आवडलो तर दुसरा असे नाही चालत.कारण इट्स अबाऊट लाईफ." विजयाताई हळूवार समजावत होत्या.


इकडे सुबोधने अमेरिकेत ज्या जिमला रॉनी जायचा तिकडे जायला सुरुवात केली. रॉनी सुरुवातीला छान वागत होता.पण हळूहळू काही गोष्टी सुबोधच्या लक्षात येऊ लागल्या.फक्त आता त्याचे पुरावे शोधावे लागणार होते.


सुबोधला काय समजले असेल? एली आणि तिची आई एकत्र येतील? आशू आणि अनघाचे नाते काय वळण घेईल? आण्णा आजोबा काय सांगणार असतील?

वाचत रहा.
दापोली व्हाया सिलिकॉन व्हॅली.
©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all