दापोली व्हाया सिलिकॉन व्हॅली अंतिम भाग

कुटुंब आपल्यासोबत असेल तर अनेक संकटे सहज थोपवता येतात.दापोली व्हाया सिलिकॉन व्हॅली अंतिम भाग


मागील भागात आपण पाहिले सुबोधने रॉनीला रंगेहात पकडण्यासाठी योजना बनवली. इकडे कृष्णाने त्याच्या भावना सांगितल्या. एलिने काहीतरी मनाशी ठरवले होते. आशू मात्र जाळ्यात अडकत चालली होती. आता पाहूया पुढे.


आशू प्रचंड रागात होती. तिने ठरवले की रॉनीच फक्त आपला आहे. त्याला दुखवायचे नाही. त्याला जे आवडेल ते करायचे.

त्यासाठी संधी कशी मिळवायची याची ती वाट पाहू लागली. इकडे सुबोध आणि त्याच्या मित्राने रॉनीचे खरे रूप समोर आणायची योजना आखली.

"हे ड्यूड, लास्ट पार्टी वॉज ऑसम. आय वॉन्ट मोअर थ्रील." त्याने मॅसेज पाठवला.

"येस हॉटी. यू सेंड मी युअर लाइक्स. आय मॅनेज ऑल यू नीड." पलीकडून लगेच रिप्लाय आला.

" आय वॉन्ट द सेम ॲज लास्ट पार्टी. माय फ्रेंड अल्सो वॉन्ट टू जॉईन." सुबोधने विचार करून उत्तर दिले.

"शुअर, इफ ही विल रेडी फॉर पे देन नो प्रॉब्लेम." रॉनीचे उत्तर आले.

" ओके देन सेंड मी टाईम अँड प्लेस." सुबोधने हसत रिप्लाय पाठवला. त्यानुसार येत्या शुक्रवारी पार्टी ठरली.


सुबोधने आशुला व्हिडिओ कॉल केला. दोघांनी भरपूर गप्पा मारल्या.

"प्रिन्सेस,ह्या फ्रायडेला तुला एक सरप्राइज आहे." सुबोध म्हणाला.

"वॉव, डॅड काय आहे सरप्राइज? सांग ना." आशू उत्साहाने म्हणाली.

"ते तुला त्याच दिवशी कळेल." सुबोधने नंतर अनघाला सगळे सांगितले आणि एलिला तिच्या सोबत त्यावेळी असू देत अशा सूचना दिल्या.


इकडे एली आपल्या कल्पनेवर प्रचंड आनंदी झाली होती. तिने दुसऱ्या दिवशी सकाळी चहा घेताना सुलभाताईंना काही रेसिपी व्हिडिओ यु ट्युब वर दाखवले.

"आजी,वुई कॅन अल्सो डू इट.आपल्या दोघींच्या देशातील काही जुने पदार्थ.काही आपण दोघींनी शोधलेले असे व्हिडिओ करून टाकू." एलिने कल्पना मांडली.


"वा! सुरेख कल्पना." आण्णा आजोबा दुजोरा देत म्हणाले.

त्यासाठी इतर काही मदत लागली तर ती तयारी त्यांनी दर्शवली.

"ते सगळे ठीक आहे पण ह्याला नाव काय देणार?" विजयाताई विचारू लागल्या.

"सोप आहे. चव दोन पिढ्यांची." पूर्वा पटकन बोलून गेली.

ठरले तर मग. आजी आता आपण आधी छान आपला इंट्रो देणारा व्हिडिओ शूट करू उद्या.

"ये पण मला जमेल ना?" सुलभाताई अजून साशंक होत्या.

" जमेल का? का नाही जमणार आई. मी करेल ना मदत तुम्हाला." अनघाने तयारी दाखवली.

ह्या सगळ्यात आशू मात्र सतत आपल्याला हवा तो एकांत कधी आणि कसा मिळेल याचा विचार करत होती. त्यातून तिच्या डोक्यात एक कल्पना आली. तिने खोटेच सांगितले की तिला बरे वाटत नाहीय. तर ती जरा आराम करणार आहे.


हा प्रमोशन व्हिडिओ कुठे घ्यायचा? कपडे कोणते? ठिकाण कोणते? नुसते उत्साहाला उधाण आले होते. उन्मेष तर आनंदाने नाचत होता.

इकडे आशुने रॉनीला रिप्लाय दिला की शुक्रवारी ती व्हिडिओ कॉल करेल आणि एकटी असेल.

परंतु आता रॉनी विचारात पडला कारण त्या दिवशी पार्टी असल्याने घराची सजावट तशी असणार होती. त्याने ठरवले की आता ही जाळ्यात आली आहे.


पण तिला संशय यायला नको म्हणून त्याने शनिवारी कॉल कर असे सांगितले. वर तो आजारी आहे असेही जोडले.


विजयाताई आणि एली तयारी करू लागल्या. आपापल्या देशांचे पारंपरिक पोशाख घालून शूट करायचे ठरवले.

"हे बट हाऊ कॅन वुई हॅव ब्राझिलियन ड्रेस." एलिने अडचण मांडली.

"एवढेच ना! आपण व्हिडिओ पाहून तसा पोशाख शिवू." अनिताने प्रस्ताव मांडला.

"ये पण शिवणार कोण?" कारण गावात लेडीज टेलर नाही." सगळ्या मुली विचारात पडल्या.


"एक जण आहे. जो तुमची मदत करू शकेल." अनघा आपल्या आईकडे बघत बोलली.


"मशीन आणून द्या. मग देते शिवून." विजयाताई म्हणाल्या.


"मशीनची सोय मी करते." सुलभाताई म्हणाल्या.


मग सर्वांनी व्हिडिओ पहायला सुरुवात केली. त्याप्रमाणे कोणत्या रंगाचे कपडे लागतील, मण्यांच्या माळा अशी यादी तयार झाली. तर दुसरीकडे आशू शनिवारची तयारी करण्यात गुंग झाली.सुबोध आणि त्याच्या पोलीस मित्राने रॉनीला चांगली मोठी रक्कम दिली. सुबोधचा मित्र रॉनी बरोबर लगट करून सतत संपर्कात होता.


शुक्रवारी एली आणि सुलभाताई प्रचंड उत्साहात होत्या. आण्णा आजोबा कॅमेरामन होते. अनघा दिग्दर्शन करत होती तर उन्मेष इतर सूचना देत होता.


आशू मात्र जरा लांबच होती. संपूर्ण दिवसभर दमून सगळ्यांनी व्हिडिओ बनवला.


रात्री मस्त भात आणि कढी खाताना आण्णा म्हणाले,"एली,चल करून टाक व्हिडिओ अपलोड."


तेवढ्यात आशुला आठवले की पप्पा तिला फोन करणार होते. ती जेवण आटोपून धावत वर गेली. तसे अनघा एलिजवळ गेली आणि तिला वर जायला सांगितले.


आशुने लॅपटॉप उघडला आणि त्यासरशी व्हिडीओ कॉल आला. तिने कॉल घेतला आणि समोरचे दृश्य ती पहातच राहिली. रॉनी एका पुरुषाबरोबर नग्न अवस्थेत बसला होता. त्यांचे संभाषण तिला ऐकू येत होते.


पैशांसाठी रॉनी काय काय करतोय हे सगळे तिला दिसत होते. आशूच्या डोळ्यातून पाणी थांबत नव्हते. तिला प्रचंड धक्का बसला होता.


एलिने पुढे येऊन पटकन कॉल बंद केला. आशू स्तब्ध उभी होती. तेवढ्यात अनघा आत आली. तिला पाहताच आशु पटकन धावत गेली.


"मॉम, मॉम ही चीट मी. दॅट ब्लडी बास्टर्ड वॉन्ट टू यूज मी." आशू रडत होती.


अनघाने तिला शांत होऊ दिले."असा बरा तुझा फायदा घेईल तो. ते ही आम्ही असताना." अनघा तिला धीर देत म्हणाली.


आशुला आश्चर्य वाटले. "आशू,तू सुद्धा माझ्या वाटेवर चालली होतीस. पण तुझ्याकडे ते आहे जे माझ्याजवळ नव्हते. एक भक्कम आधार देणारे कुटुंब." एली पुढे येत म्हणाली.


" आशू,वेळीच तू सावरली. शेवटी ज्याचा शेवट गोड ते सर्व गोड." आजी आजोबा म्हणाले.


*******एक वर्षानंतर*******

एली आणि सुलभाताई दोघींचा चॅनल प्रचंड हिट झाला होता. त्यांना लाखो फॉलोवर मिळाले होते. एली आता अमेरिकेत होती. सुलभाताई आणि एली मिळून पैसे तर कमावत होत्याच शिवाय एली एका संस्थेमार्फत वाट चुकलेल्या मुलींना मदत करत होती.


आशू सागरी जीव संशोधनात पुढे शिकायचे प्रयत्न करत होती. विजयाताईंच्या तिनही विद्यार्थिनी दहावी पास होऊन पुढे शिकत होत्या.


पूर्वा कॉलेजला चालली असताना तिला कृष्णा दिसला. ती हळूच त्याच्या जवळ गेली.


"माझे स्वप्न पुरे होईपर्यंत थांबशील? मलाही तू कायम सोबत असलेले आवडेल." असे म्हणून गोड हसून पूर्वा निघून गेली.


आशुने तिला सांगितले तसे प्रत्येकवेळी प्रेम खोटे असेल असे नव्हते.हे परत सिद्ध झाले होते.


सिलिकॉन व्हॅलीमधून सुरू झालेला हा प्रवास दापोली मार्गे सुफळ संपुर्ण झाला होता.


वाचकांनी कथेला दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल वाचकांचे आभार.🎭 Series Post

View all