Feb 26, 2024
नारीवादी

सासूला असा ही दणका द्यावा

Read Later
सासूला असा ही दणका द्यावा
सासूला असा ही दणका द्यावा

शिवानी खूप काम करून ही सासूबाई नेहमीच इतरांसमोर तिला खोटे पाडत

शिवानी कशी आळशी आहे ,चपळ नाही, आणि कुठलेच काम परफेक्ट असे नाही म्हणून सगळीकडे तिला बदनाम करत

शिवाणीला याचे खूप वाईट वाटत ,इतके काम करून ही स्तुती मात्र नाही..

तिने स्वतःची बाजू मांडली तर लगेच म्हणत इतके काम तर माझी मुलगी सहज करून मोकळी होते, तिचे तर मोठे घर ,माणसे ही जास्त तुला तर तसे काहीच काम नाही..नेहमी स्वतःची स्तुती करू नये..इतरांनी केली तर समजावे की आपण खरंच खूप कामाच्या आहोत..पण इतर कोणीच तुझी स्तुती करत नाही कारण त्यांना माहीत आहे सगळी कामे मीच करते...तू फक्त माझ्या हाताखाली काम करतेस..कुठे कांदा चिरून दे, कुठे मसाला वाटून दे,कुठे कणिक मळून दे तर कुठे वरणाला फोडणी दे ही काय काम झाली का... हे तर छोटी मुलं ही करतील सहज..

शिवणीला नेहमीच्या त्यांच्या ह्या वागण्याचा खूप त्रास होत,काही बोलता ही येत नसत, आणि गप्प ही रहाणे सहन होत नसत..कधी तरी त्यांना दणका द्यायचा हे ठरवून ही ते तिला जमत नसत ,हे जर केले तर नवऱ्याला वाईट वाटणार, सासरे ज्यांच्या मनात माझे चांगले स्थान निर्माण केले आहे त्यांच्या नजरेतून पडणार, ताईंचा मनात मी वाईट आहेच अजून वाईट ठरणार...बाईक आजू बाजूच्या शेजारणी ह्या ही आपली चर्चा करणार, सगळीकडे मीच वाईट ठरवली जाणार ह्या विचारातून तिने नेहमी बोलणे टाळले...

इकडे सगळ्या शेजारी सुना ज्या शिवाणीच्या वयाच्या होत्या त्यांना शिवणीची बाजू पटत होती ,त्यांच्या ही सासवा त्यांची अशीच बदनामी करत आणि आम्ही सुना कश्या वाईट हे बोलत म्हणून काकू जेव्हा घरी येत आणि शिवाणीची बदनामी करत तेव्हा त्या ही सुनांनी ठरवले आज काहीतरी गम्मत करायची.. येणाऱ्या सार्वजनिक देव भोज करण्याचा कार्यक्रम शिवणीच्या सासू बाईंना धडा शिकवायचा...

प्रीती शिवणीच्या खूप जवळची मैत्रीण होती ,ती ही सासूबाई ला वैतागली होतीच पण ती आपली बाजू ठाम पणे मांडत होती ,आणि आपण किती आणि कसे काम करतो हे नवऱ्याला आणि इतरांना दिसेल असे आणि नजरेत येईल असे काम करायची...छोटे काम सासूबाईने करायचे आणि मोठे काम सगळे तिने करायचे असे ठरवले , सासूबाई यांनी तिच्या कामात लुडबुड न करता त्यांनी त्यांना सोपवलेली कामे करायची. म्हणून बऱ्याचदा सासुला मी किती काम करते ,आणि सून काहीच करत नाही हे म्हणण्याची आता संधीच मिळत नसे..पण शिवानी सगळा स्वयंपाक करून त्याची स्तुती मात्र सासू घेऊन मोकळी होत ..ह्याचा त्रास तिला होत..

शिवानी खूपदा म्हणायची आई भाजी मी केली होती मग सगळ्या तुमची स्तुती करत असताना तुम्ही का नाही सांगितले की ती माझ्या।सुनेने केली आहे...

सासूबाई म्हणायचा, अग तू तर माझ्या सांगण्यावरून करतेस ,मग माझी स्तुती करून घेतली तर बिघडले कुठे ,शिरा जरी तू केलास तरी साखर किती टाकायची हे मी संगीतले ना मग ह्यात माझे काहीच श्रेय नाही का...मीठ किती टाकायचे आमटीत हे मी सांगते म्हणून तर आमटी छान होते ना ,बाकी मसाला म्हणजे काय खास चव देत नसतो बरं... सगळा खेळ मिठाच्या प्रमाणावर असतो...तशी भाजी तर मी ही करू शकते...मग स्तुती तर माझीच होणार ना..


आता शिवाणीला प्रितीने सांगितले ,ह्या वेळेस तू काहीच बोलायचे नाही सगळे मी बोलणार ,त्यात तुझी स्तुती नाही करणार पण दणका सासुबाईला बसणार ह्या स्तुतीचा अशी अद्दल घडवणार..


ह्या वेळी मोठा उसत्व होणार होता, त्यासाठी सगळ्या बायकांनी अप आपल्या परीने स्वतःची कौशल्य दाखवून देवाच्या पूजेसाठी प्रसाद म्हणून काही काही करायचे ठरवले होते, त्यात ज्या बाईला जे चांगले येते ते तिने करायचे होते ,आणि त्यात तिची भरभरून स्तुती होणार होती हे जगजाहीर होते...


प्रितीने तिच्या सासूचे नाव पुढे केले...संगीताने मान देऊन स्वतःच्या सासूचे नाव पुढे केले, रिमाने तिला जे खास येते त्यासाठी तिचे नाव पुढे केले, इथे सासूबाई यांना मान देण्याचे ठरवले होते आता शिवाणीच्या सासूबाईची बारी होती...


त्यांची बारी येताच त्यांची तत पप झाली, त्यांना आता टेन्शन आले...त्या लगेच सुनेला पुढे करणार इतक्यात प्रीती लगेच म्हणाली ,राणेंच्या घरातून काकू त्याची खास मिलाई बर्फी करतील , त्यांची बर्फी सगळ्यात भारी होते, नुसती साखर टाकली तरी चव जिभेवर रेंगाळत रहाते, त्यांची ही खासियत आहे...काकूंचे नाव आता सगळीकडे होणार आहे, त्यामुळे त्यांना बर्फीसाठी ऑर्डर ही येणार आहेत, काकूंची त्यांची कला आणि चव दाखवण्याची सुवर्ण संधी आहे...

इकडे शिवाणीच्या सासूबाईंचा चेहरा पिवळा पडला होता, त्यांना प्रीतीचे बोलणे ऐकून घाम फुटला होता, आता आपण माघार घ्याची तर कशी घ्याची ह्याचा पेच पडला होता ,आपण तर आपली सतत खोटी स्तुती करत होतो..आता त्या खोट्या स्तुतीचा चांगलाच दणका पडणार होता ,आपले पितळ उघडे पडणार होते सगळयांसमोर...


तिक्यात त्या म्हणाल्या आता इथून पुढे माझी सून ह्या उत्सवात भाग घेत जाणार आहे ,तिला तशी परवानगी द्यावी..सासू

प्रीती....आहो काकू तिला काहीच येत नाही ,मग तिला कश्याला उगाच पुढे करत आहात तुम्ही..तुम्ही बऱ्या पैकी छान बर्फी करू शकतात ,तिला ना स्वयंपाक येत ना तिला साधे वरण फोडणीला टाकता येत

सासूबाई... नाही अग प्रीती माझी सून खूप तरबेज आहे स्वयंपाक करण्यात ,तिला सगळे येते ती खरंच खूप prefect आहे...मीच तिला कधी सगळ्यांच्या स्तुतीची पात्र ठरवू दिले नव्हते, तिने करायचे आणि मी आयत्या स्तुती चा मान घेत असायचे...मला कधी वाटले नव्हते त्याचा असा दणका मला मिळेल...

प्रिती...असे काही नाही काकू तुम्ही जे तिला शिकवले तेच तर ती करते, मला विचाराल तर तुम्हीच तिच्यापेक्षा ही छान निपुण आहात स्वयंपाक करण्यात...मग तुम्ही आज माघार घेऊन तुला इतका मोठा मान देऊ नका..

सासूबाई...अग मी आज कबूल करते मी कधीच स्वयंपाक करत नसायचे, मी फक्त मीठ इतके टाक, हळद इतकी टाक ,मसाला इतका टाक हेच सांगायचे ग.. हे देवाचे कार्य आहे म्हणून मी कबूल करते ,मी खोटं बोलत होते नेहमी आणि तिला खोटं पाडत होते..पण बर्फी मला नाही शिवाणीला खूप छान जमते...उगाच मी हा मान घेऊन तोंडावर नाही पडणार...

शिवानी...आई तुम्ही इतके जरी करत होतात तरी स्वयंपाकाला छान चव येत.. तेच माझ्यासाठी खूप आहे...आणि माझी स्तुती काय आणि तुमची स्तुती काय नाव तर आपल्याच घराचे होत असते ..

प्रीती...पण काही हरकत नाही तुम्ही दिलेला मान शिवानी स्वीकारते.. पण स्तुती कोणाची करायची ह्या वेळेस काकू हे तुमची ठरवा..

सगळ्या जणी काकूच्या ह्या वागण्याला हसत होत्या...शेवटी त्यांना कबूल करणे भाग होते नाहीतर त्यापेक्षा ही मोठा दणका बसणार होता, पण वाचल्या सासूबाई..
©®अनुराधा आंधळे पालवे
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Anuradha Andhale Palve

Government Job

... I Search My Identity In Being A Writer Of My Soul

//