दमानिया मेंशन भाग 2

एका रहस्यमय केस मध्ये आपलीच वर्ग मैत्रीण गायब असल्याचे राजेशला समजते



दमानिया मेंशन भाग 2

मागील भागात आपण पाहिले की राजेश वर जीवघेणा हल्ला झाला. तरीही तो दुसऱ्या दिवशी दमानिया बंगल्यावर गेला. वृद्ध हंसाने एका आत्म्याच्या त्रासाबद्दल सांगितले. आता पाहूया पुढे.


राजेशने सगळे मुद्दे नोंदवले आणि तो निघाला.

इतक्यात बाहेर पडताना त्याला ऐकू आले,"दिसते त्याच्या पलीकडे पहा."

राजेश हसला. बाहेर पडल्यावर राजेशने गुगलवर मिसेस दमानिया बाबत सर्च केले आणि त्याची असिस्टंट मिस रोझीला फोन केला,"रोझी,लगेच ऑफिसवर ये. येताना मी सांगतो त्या वस्तू घेऊन ये."


फोन ठेवला आणि राजेशने दुसरा फोन इन्स्पेक्टरला लावला,"त्या दिवशी नेमके काय झालेले? गाडी दरीत पाडण्याचे कारण काय?"


ही सगळी माहिती घेत राजेश ऑफिसला पोहोचला. तोवर रोझीने सांगितलेल्या वस्तू आणल्या होत्या. त्यात दमानिया बंगल्याचा सगळा इतिहास,त्या परिसरातून गायब झालेल्या व्यक्ती याबाबत असलेले रिपोर्ट ह्याबाबत इत्यंभूत माहिती होती.


राजेशने मिसेस दमनियाच्या मुलाला फोन लावला तर तो फोन तिच्या नातवाने उचलला,"हॅलो,राजेश प्रधान बोलतोय."


तसा पलीकडून आवाज आला,"येस,राजेश प्रधान द फेमस घोस्ट हंटर. बोला,तुम्हाला काय माहिती हवी आहे."


राजेशने त्याला भेटायची वेळ निश्चित केली आणि मग त्याने दमानिया बंगला असलेल्या भागातील गायब झालेल्या व्यक्ती शोधायला सुरुवात केली.


गेल्या जवळपास सत्तर वर्षात त्या भागातून अनेक लोक गायब झालेले होते.

राजेशने रोझीला सांगितले,"रोझी,ह्या सगळ्या लोकांची यादी बनव आणि त्यांचे गायब होण्याचे वर्ष, वय हे सगळे लिहून काढ."

रोझीला सूचना देऊन राजेश घरी जायला निघाला.



राजेश घरी पोहोचला आणि जपाला बसला. गेले हजारो वर्ष त्याचे घराणे शक्ती पंथात साधना करत होते. दुष्ट शक्तींशी लढत होते.


आजही मिसेस हंसा दमानियाला भेटल्यावर त्याला अस्वस्थ वाटलेले. आजूबाजूला प्रचंड नकारात्मक ऊर्जा त्याला जाणवली होती.


इकडे रोझीने सगळी यादी व्हॉट्स ॲपवर पाठवली आणि घरी गेली.

साधना संपल्यावर राजेश जेवायला बसला तेव्हा राजेशची आई म्हणाली,"राजेश,हे सगळे नको रे आता. थांबव सगळे."

राजेश मंद हसत म्हणाला,"आई,आजोबांचा वारसा असा सोडून नाही देणार. इतरांना मदत करायचा हा वसा जपला पाहिजे."


जेवण झाल्यावर राकेश रोझीने पाठवलेले मॅसेज पहात होता. सगळी यादी पाहिल्यावर त्याच्या लक्षात आले की गेल्या तीस चाळीस वर्षात जवळपास दहा ते बारा तरुण,तरुणी तिथून गायब आहेत.

शिवाय तारखा पाहिल्यावर दर चार वर्षांनी एक तरी व्यक्ती त्या बंगल्याजवळून गायब आहे.


तेवढ्यात राजेशचे लक्ष एका नावावर गेले. ते नाव वाचून राकेश उडालाच,राखी देसाई? राखी गायब आहे?


त्याने पटकन कॉलेजचा ग्रुप काढला आणि मॅसेज टाकला,"राखी कोणाच्या संपर्कात आहे का? कोणाकडे पत्ता किंवा नंबर आहे का?"

त्यानंतर बरोबर रात्री अकरा वाजता एक मॅसेज आला,"हाय राजेश,मी प्रिती पाटील ओळखले का?"


प्रितीचे नाव झळकताच राजेशच्या चेहऱ्यावर नकळत गोड हसू आले. तेवढ्यात पुढून प्रश्न आला,"भेटलास तर राखी बद्दल सविस्तर सांगेल."


राजेशने हो असा रिप्लाय दिला आणि मग तिला ऑफिसचा पत्ता पाठवला.

काय माहित असेल प्रितीला? राखीसोबत काय घडले असेल पाहूया अंतिम भागात

©® प्रशांत कुंजीर

🎭 Series Post

View all