तेरा साथ हो तो - भाग - 3

tera saath


    – भाग – ३


आशा पुन्हा सांगू लागली. गावी आमचे घर खूप मोठे आणि ऐसपैस होते. मला ती घाणेरडी जागा बघून उलटी सारखं होवू लागलं... मी तिथे गेल्यावर खूप रडली, बाहेर पळून जायचा खूप प्रयत्न केला पण मला कोंडून ठेवण्यात आलं... मी हतबल झाली होती. मी नशिबाला दोष देत होती, घरच्यांच्या विरोधात गेली म्हणून देवाने मला हि शिक्षा दिली असं स्वतःला सांगत राहिली...


आठ दिवस त्या लोकांनी मला खूप मारलं.. .मी एकच सांगत राहिली त्या कोठेवालीला कि मला इथून सोडा...पण सगळं व्यर्थ होत तिथे माझा आवाज ऐकणार कोणी नव्हतं... शेवटी तीन दिवसांनी त्या लोकांनी माझं खाणं - पिणं बंद केलं.. मग शेवटी भुकेने आणि तहानेने माझा जीव कळवळू लागला..आणि मी हार मानली... मी शेवटी त्या सगळ्याला सामोरं .. जायला तयार झाली... आशा बोलता बोलता जोरात रडू लागली.....

कुंटनखाण्यात सगळे दिवस सारखेच असत. सकाळी अंघोळीसाठी हा मुलींचा गोंधळ असे त्यांची ती भाषा ऐकूनच त्यांचा तो आरडा-ओरडा ऐकूनच सकाळ होत असे. अंघोळ झाल्यावर नाश्ता झाल्यावर त्या तो भडक मेक – अप करून बसत असत. मला त्यांचे ते रंगलेले चेहरे बघून कसंस होत असे.


मग मी हार मानल्यानंतर च्या दोन दिवसांनी माझ्या आयुष्याची दुर्दशा चालू झाली... मला सुरवातीला तो भडक मेक-अप करून , नवीन ड्रेस घालून बसवलं गेल. पहिल्यादिवशी जो पुरुष आला त्याच्या तर मी पाया पडून बोलली ओ दादा मी तसली मुलगी नाही आहे मला जबरदस्तीने इथे आणलं आहे अस. तो माणूस चिडला आणि त्याने बाहेर जावून त्या कोठेवालीला माझं नावं सांगितलं...मी नाटकी करतेय नको असं बोलतेय ते सांगितलं...


मग काय विचारूच नका तिने मला काठीने एवढं मारल कि माझ्या जखमा बर्या व्हायला आठ दिवस गेले. मी मनातल्या मनात म्हंटल चला आठ दिवस तरी सुटका झाली ह्या असल्या घाणेरड्या कामापासून, पण दहा दिवसांनी त्या बाईने मला निरोप पाठवला कि तयार राहा एक माणूस आलाय... ह्यावेळी ती ओरडून सांगून गेली, मागच्या वेळी सारखं काही केलसं तर डबल मार मिळेल... मी मुकाट्याने तयार झाले.


आता रोज नवीन नवीन पुरुष येवून माझ्यावर अत्याचार करू लागले. मला स्वतःचीच किळस वाटू लागली. मला त्रास होवू लागला.. माझ्या पोटात दुखत असे, पण पेन किलर देवून मला गप्प केल जात असे. मी रडून आणि विचार करून दिवस रात्र घालवत होती....

मी नाही म्हंटले तर मला ते लोक खूप मारत असत. मला जेवायला देत नसत. घसा कोरडा पडला तरी पाणी देत नसत. पाण्यासाठी तडफडवत असत. मला जीव द्यावासा वाटे पण तो दयायला तरी बाहेर जावेच लागणार होते ना, माझे बाहेर पडायचे सर्व रस्ते बंद होते, त्या बाईची माझ्यावर कडी नजर असे.

मी नशिबाला दोष देवून रडून आला दिवस घालवत होते. असेच दिवस जात होते हळू हळू मी पण त्यांच्यातलीच एक झाली होते. मला तिथे सहा महिने होत आले होते. आता मी स्वतच मेक- अप करून बसू लागले होते. पण मी बाहेर पडण्याची आशा सोडली नव्हती.....


( पुढच्या भागात आपण बघणार आहोत....सुधीरराव आशाला कसे सोडवतात ते......)

🎭 Series Post

View all