दैव

कहाणी एका रणरागिणीची
#अलक

सुख ...

माहेरी अठराविश्व दारिद्रय ..
आज जेवले की उद्या मिळेलच याचा काहीही भरवसा नाही ..
अश्यातच ही ऐन तारुण्यात आली ..
तीच ते गाभारलेलं तारुण्य डोळ्यात भरत होतं ..
यातच याच स्थळ सांगून आलं ..
नाव ठेवायला जागा असली तरी ,
परिस्थिती तशी नव्हती ..
पटापट लग्न उरकविले ..
ही प्रचंड आत्मविश्वाशी
सासरी परिस्थिती बदलायचीचं हाच ध्यास घेऊन तिने गृहप्रवेश केला खरा
पण ...
पण हा अट्टल दारुडा होता हे तिला नंतर कळले ...
परिस्थितीला दोष देण्यापेक्षा ,
दोन हात करावं हे लक्षात आलं आणि पदर खोचला हिने ...
दोन कळ्या उमलल्या वेलीवर
त्यांचे शिक्षण , लग्न सारं सारं एकटीने पार पाडले ...
हा मस्त कलंदर आपल्यातच गुंग ..
पण आताशा त्याला जाणीव होत होती
तिच्या मेहनतीची ,
तिच्या कष्टाची ..
त्याचं व्यसन आता नियंत्रणात आले होते ..
आताशा तिला संसाराचे ,
नवऱ्याचे सुख मिळायला लागले होते की ,
नियती पुन्हा फितूर झाली
ही पहाटे साखरझोपेतच पंचतत्वात विलीन झाली ..
आयुष्यभर स्वतः उपाशी राहून
तिने दुसऱ्यांचे पोट भरले होते ...
?

*©®मीनल सचिन*