दैव जाणिले कोणी भाग 2

Daiv Janile Koni


या एका प्रसंगातून तिने.. म्हणजेच आशाने मनावर तर संयम ठेवला होताच. पण..
नुसता संयम ठेवून चालणार नव्हतेच मुळी. \"काहीही झाले तरी, पोराला व्यवस्थित शिक्षण द्यायचेच\" असे तिने मनात पक्के केले होते. चाहे कुछ भी हो जाये.

आर्यनच्या बाबांची जेमतेम कमाई घरात येत होती. शिवाय आर्यनला लहान बहिणही होती. असं हे कुटुंब होतं. आता मलाही काहीतरी करून, थोडाफार घराच्या खर्चात हातभार लावायलाच पाहिजे. असे तिने ठरवले.

आणि कामही घरात राहूनच तिला हवे होते. काही दिवसानंतर दोन व्यक्तींच्या जेवणाच्या डंब्यांचे काम तिने स्वीकारले. हे व्यवस्थित ती करू लागली. त्यामुळे दोन पैसे हातात येऊ लागले.

असे करत करत आर्यन आता चौथी तुन पाचवीत गेला होता. मग तो ट्युशन साठी हट्ट करू लागला. म्हणून त्याला पाचवीपासून ट्युशन चालू केले त्यामुळे खर्चात ही भर पडली. मग आशाने मैत्रिणीचा बचत गट होता. त्यातही पैसे भरायला सुरुवात केली. यामुळे एक फायदा झाला.

\"पाहिजे तेव्हा एक छोटेशे कर्ज तिच्या हाताशी उपलब्ध होऊ लागले.\" याद्वारे कर्ज घेऊन तिने पिको करायची मशीन घेतली आणि दररोज तिच्याकडे पिको करण्यासाठी साड्या येऊ लागल्या. डबेही पूर्ववतच होती. त्यानंतरच्या वेळात हे साडी पिको चे काम वाढले होते. छोटी सलोनी पण आता शाळेत जात होती. तीही अभ्यासात हुशारच होती.

एक दिवस आर्यन म्हणाला,
"आई बाबा तुम्हा दोघांनाही आमच्या शाळेत बोलावले आहे. तुम्हा दोघांचाही सत्कार करणार आहेत."
नुकताच दहावीचा रिझल्ट लागलेला होता.आर्यन ने, पहिला नंबर सोडलेला नव्हता. तो 90% पेक्षा जास्त मार्क घेऊन पहिला आला होता. अजूनही बरेच मुले होती 90% च्या वर. त्या सर्वांचे आई-बाबा पण या कार्यक्रमासाठी येणार होते.

"असंऽऽ सगळ्यांचेच आई-बाबा येणार आहेत? किती जण आहेत?" बाबांनी आर्यनला विचारले.

"15 जण 90% च्या वर आहोत बाबा, बाकी माहित नाही, मॅडमनी आवर्जून सांगितले आहे. दोघांनी पण चलायचे आहे बाबा. तुमचा कोणताही बहाना चालणार नाही. या वेळेला. आणि हो. सलोनीऽ तुला पण यायचे आहे. तुझी नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. त्याबद्दल तुलाही त्यांनी बोलावले आहे." आर्यन ने सांगितले.
" होका. कधी आहे हा कार्यक्रम?" सलोनीने विचारले.
"उद्या सकाळी ठीक साडेदहाला कार्यक्रम सुरू होणार आहे." आर्यनने सांगितले.

मुलाने असं सांगितल्यावर दोघांनाही. म्हणजे आशा आणि तिचे पती यांना अंगावर मुठभर मास चढल्यासारखे झाले होते.

शाळेत कार्यक्रम चालू होता. आशा आणि तिचे पति स्टेजवर खुर्चीत बसले होते. टॉप आलेल्या इतर मुला मुलींचे आई बाबा पण होते.

पण असं हे सर्व मंडळी समोर, स्टेजवर, मान्यंवरा सोबत बसणं. हे आर्यनच्या आई-बाबांना प्रौढ फील करून देत होतं. त्या क्षणी आशाच मनात " जीवनात ही घडी अशीच राहू दे"हे गीत रुंजी घालत होतं.

🎭 Series Post

View all