दैव जाणिले कोणी भाग 1

Daiv Janile Koni


संध्याकाळची वेळ होती.

लहान, मोठी अशी सर्वच मुले एकत्र खेळत होती. त्यात मोठी मुले, जरा क्रिकेटच्या मागे होती. म्हणजेच ती क्रिकेट खेळत होती.
आणि थोडी लहान म्हणजे, पहिली दुसरीची. ही आपापल्या मित्रांसोबत. आवडीचे खेळ खेळत होती.

जवळच्याच ओट्यावर या मुलांच्या आया ही गप्पा मारत बसल्या होत्या.त्याच्यही गप्पा चांगल्याच रंगात होत्या.

पण मध्येच..
छोटा करन रडत, रडत आईकडे म्हणजेच मनीषा कडे आला, आणि म्हणाला,
"आईऽऽ बघ ना मला त्या आर्यनने चापट मारली."

" का बरं रे." मनीषा ने विचारले.

"माहित नाही. आम्ही खेळत होतो. तर त्याने मला मारले." करन म्हणाला.

हे ऐकून मनीषा तावातवाने उठली. आणि \"कुठे तो आर्यन\" असं म्हणत त्याच्याकडे गेली.


आणि त्याला म्हणजे आर्यनला, जोराने विचारू लागली," का रे, का मारलस माझ्या करनला?"
"कुठे? मी नाही मारलं काकु करनला. माझं मी इथेच खेळतो आहे. त्याचाच इथे पाय घसरला, आणि तो पडला." असे आर्यनने स्पष्टीकरण दिले.
हा सगळा गोंधळ ऐकून आर्यन ची आई म्हणजे आशा.तीही आली आणि,
"का? काय झालं?" असं विचारू लागली.

"बघनाऽऽ लेकराला मारून, तुझं पोरगं नाही म्हणतय." असं जरा तोऱ्यातच मनीषा आशाला म्हणाली.
"नाही मारूनही, तुझं पोरगं \"मारलं\" म्हणते गं" असं आशानेही सांगितलं.
पण ऐकुन कोण घेतो..?

झालं या एकमेकींच भांडण सुरु झालं. पैशावरून, परिस्थितीवरून, साड्या, खाणं अगदी अंगण झाडणे, कचरा लावणे, अबब!! सगळे विषय या भांडणात होते. सगळी मुलं खेळायचे थांबवून यांची भांडणच ऐकत बसली.

"हो ना तुझं पोरगं हुशार नाही मुळीच. काहीच येत नाही त्याला.आणि तुझी कुठे ऐपत आहे गं पोराला चांगल्या शाळेत घालायची." मनीषा म्हणाली.
" तुला काय करायचे गं? मी माझ्या पोराला साध्या शाळेत घालीन, नाहीतर आणखी कुठे. तू घातलस ना, तुझ्या पोराला चांगल्या इंग्रजी शाळेत. बघूया ना काय दिवे लावतो ते." आशाने उत्तर दिले.

" होऽ होऽ बघशीलच. तुझं पोरगंही काय दिवे लावीन, ते मीही बघेनच."जरा गुरमीतच मनीषा म्हणाली.


"आम्ही फक्त शिकून त्यांना शहाणे करणार आहोत.माझा पोरगा हुशार आहे की नाही हे ठरेलच वेळ आल्यावर."
आशाने समजून घेत सांगितले.

असं म्हणून ती पोराला घेऊन घरात निघून गेली. या भांडणांचा ताण चांगलाच तिच्या मनावर झाला. \" पण संयम ठेव,आशा संयम ठेव.\" असे तीचे मन तिला बजावून सांगत होतं.


तर अशा या मनीषा आणि आशा.

सख्या चुलत जावा. एकाच जागेत राहायच्या. यांची ही तिसरी पिढी म्हणू हवं तर..
पहिल्या पिढीत भाऊ भाऊ वेगळे..
नंतर दुसऱ्या पिढीत भावांची मुलं वेगळी वेगळी.. आणि या तिसऱ्या पिढीत मुलांची मुलं वेगळी वेगळी.. असे असो.

कोणी परिस्थितीने वेल होते. तर कोणी साधारण. जीच्या नवऱ्याची कमाई चांगली. ती वेल स्थितीत. आणि जिच्या नवऱ्याची साधारण, ती साधारणच. तर अशाच या दोघी एक वेल आणि दुसरी साधारण. अशी यांच्या कुटुंबाची स्थिती होती. यांची मुलं पहिली इयत्तेत शिकत होती.

🎭 Series Post

View all