दहा वर्षे ! पार्ट 4

.


वरुण, सिध्दार्थ , आलिया तिघांचीही बॉलिवूडमध्ये आज वेगळी ओळख आहे. तिघेही छान अभिनय करतात. तिघांचाही मोठा फॅनबेस आहे. आज जसे अनन्या पांडे , जान्हवी कपूर यांना ट्रोल केले जाते तसे या तिघांसोबत कधीच झाले नाही. प्रेक्षकांनी तिघांना भरभरून प्रेम केले. आलिया भट्ट हा सिनेमा करताना 18-19 वर्षांची होती. ज्या टिनएजर प्रेक्षकांनी हा सिनेमा बघितला आलिया त्यांच्यासोबतच मोठी झाली आहे. हा सिनेमा अतिशय दर्जेदार होता असे मी म्हणणार नाही. पण टिनएजर म्हणून ज्यांनी हा सिनेमा बघितला त्यांना हा सिनेमा मैत्री , कॉलेज लाईफ या कारणांमुळे जवळचा वाटला. या सिनेमाचे बोट पकडून तारुण्यात पदार्पण केले कित्येक जणांनी. लोकमतला लास्ट पेजला यांच्या फोटो आल्या तर मी कापून ठेवत. असे असंख्य किस्से आठवणी खूप जणांच्या जोडल्या गेल्या आहेत. मला शाळेत जाण्यासाठी रिक्षा असायची. दोन मुली गप्पा मारत होत्या.
" तुला कोण आवडतो ? उंच की बुटका ?" हा संवाद कानावर पडला.
त्या वरुण-सिद्धार्थबद्दल बोलत होत्या. शाळेत खूप चर्चा चालायची सिनेमाची. त्याकाळी तीन खान , हृतिक , अक्षय हे तेच तेच चेहरे असत. हे फ्रेश चेहरे सर्वाना आवडले. माझा एक मित्र म्हणून गेला , " दिसायला इतका भारी हिरो आजवर बॉलिवूडमध्ये बघितला नाही. " तो वरुण धवनबद्दल बोलत होता. मिडल क्लास असल्यामुळे मला सिनेमात अभिमन्यूशी जास्त कनेक्ट होता आले पण रोहनची मैत्रीही भावली. मान्य करा किंवा नको करू , त्याकाळी प्रेक्षक " outer appearance " ला जास्त महत्व देत. कॅटरिना हिला हिंदी येत नाही. तरीही मी तिचा फॅन आहे ते याच कारणामुळे. या दिसायला सुंदर असले तरी तिघांनी आपले अभिनय कौशल्यही सिद्ध केले आहे. " स्टुडंट ऑफ द यिअर 2 " देखील बनवला गेला. ज्यात टायगर श्रॉफ , अनन्या पांडे , तारा सुतारिया यांच्या भूमिका होत्या. पण तो सिनेमा आपटला. कारण हल्लीचा प्रेक्षक बदलला आहे. त्याला फक्त गुणवत्ता हवी. चांगली कथा हवी. बॉलिवूड इंडस्ट्रीत येऊन दहा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आणि भविष्यासाठी या तिघांना मनापासून शुभेच्छा.

©® पार्थ धवन

🎭 Series Post

View all