हा दागिना माझी ओळख

Dagina
आई मेघाला आज आवर्जून सांगत होती जरा लवकर घरी ये, नाहीतर जाऊच नकोस तू आज अभ्यासिकेत ,राहू दे जरा तो अभ्यास आजच्या दिवस. हो मला तर असे वाटते की तू आज जाऊच नकोस अभ्यासाला.आज मुलगा बघायला येणार आहे .तू अस कर तू थांब नको जाऊ, त्यांना 5 वाजताची वेळ दिली आहे, मी त्यांना आवडेल ते  खाण्याचे सोय करते, तू फक्त parlour मध्ये जाऊन ये.
जरा तयारी कर,आवर,सावर,make up कर, माझे दागिने आणि तुला आवडेल ती साडी घाल , जरा आहे त्यापेक्षा छान दिसली पाहिजेस त्यांना. कुठे कमी पडायला नको ,आपली मुलीची बाजू आहे ,आणि त्याने तुझे रूप बघताच होच म्हणायला हवे बर ताई.

आई सकाळी सकाळीच मेघाच्या मागे लागली होती, मेघाचा काही दिवसांवर mpsc चा पेपर आला होता, mpsc ची आधीच तिने खूप तयारी केली होती, या आधी ही तयारी केली पण दोनदा परीक्षा रद्द झाल्यामुळे ती खूपच निराश होती. त्यात डोक्यात भविष्यातील चिंता तिला खात होती, कसे असेल पुढचे आयुष्य किती स्पर्धा वाढली आहे,त्यात वारंवार रद्द होणाऱ्या परीक्षा, वाढते वय,
त्यात lockdown हे सगळे विचार मनात चलबिचल करत होते, आपला problem कोणा पाशी बोलावा तर तसे कोणीच नव्हते. त्यात आई ही समजून घेत नव्हती ती तर आता अभ्यास खूप झाला आता आपल्या सासरी गेल्यावर काय करायचं ते कर पण आधी लग्न कर असेच म्हणायची.

मेघा हुशार मुलगी होती,तिला कोणावर ओझं व्हायच नव्हतं, ती स्वाभिमानी होती आणि तो स्वाभिमान तिला जपायचा होता, त्यासाठी तिला तिच्या पायावर उभे राहायचे होते. तिच्या पाठी माघे हिमतीने उभे राहणारे फक्त तिचे बाबाच होते. तिला स्वतःची ओळख असणे आणि अधिकारी पदाची वर्दी असणे तिच्यासाठी मोठा दागिना होता.जो दागिना परिधान केल्यावर कोणाला तिची ओळख सांगायची गरज भासणार नाही ,तिला तिच्या कर्तृत्ववान ओळखले जाईल असे काही तरी करायचे होते.

मुलगा बघायला आला तेव्हा आईने तिच्या समोर किती तरी दागिने काढून ठेवले होते,म्हणत होती घाल त्यातला तुला आवडेल तो दागिना, ती ठुशी घाल जी तुला मी पहिल्यांदा तू लहान असताना केली होती,जी तू कधीच घालून पहिली नाहीस. तो diamond चा नेकलेस घाल छान impression पडेल तुझं त्या मुलावर, ही पैठणी नेस तुला खुलून दिसेल. तरी तिचे लक्ष समोर ठेवलेल्या पुस्तकात होते, ती तेव्हा ही पुस्तक वाचत होती.आईचे शब्द कानावर पडत होते पण मनावर पडत नव्हते.

कशीबशी ती तयार झाली,तिचे काका आणि आत्या ही आले होते. काका तर सतत टोमणे मारत होता,आधीच लग्न केले असते तर किती तरी मुलं मिळाले असते, तेव्हा दिसायला ही बरी होती आता बघ कशी थोर दिसते, काय तर म्हणे स्वाभिमान माझा दागिना आहे. किती वर्षांपासून mpsc देते अजून कशात काही नाही.

मुलगा बघून गेला, आणि मेघा आपला पसारा गुंढाळून परत अभ्यासिकेत गेली.

1 महिना उलटून गेला पण मुलाकडून काही बातमी नाही की होकर नकार ही नाही. हे पाहून मेघा परत जोमाने अभ्यासाला लागली,तिला आता एखादी मोठी पोस्ट मिळवण्याची जिद्द लागली. बाबांचा कितीदा अपमान सहन करायचा,का म्हणायचं आपली मुलीकडची बाजू आहे,मग का आपणच पुन्हा पुन्हा लाचारासारखी पडती बाजू घायची.

मेघा जिद्दीला पेटली, परीक्षा दिली आणि ती परीक्षा चांगल्या गुणांनी पास झाली, तिने पुढे ही mains आणि interview पास केली, तिला हवी तीच पोस्ट मिळाली, सगळीकडे तिचे कौतूक होऊ लागले,वडील अभिमानाने सगळीकडे मुलीचे गुण गाऊ लागले, नात्यातून आता तिला स्थळ सांगून येऊ लागले.

तिच्या यशाची बातमी पहायला आलेल्या स्थळापर्यंत पोहचली ,आणि त्यांना जाग आली,वर्ष भरा नंतर ते परत बोलणी करू म्हणून बोलू लागले .पण आता मेघा ने त्याला नकार कळवला होता,आता तिचा दागिना तिला मिळाला होता,तिचा स्वाभिमानाला कचरा समजणाऱ्याला स्वाभिमान काय असतो याचा धडा दिला होता.?