दगाफटका(माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग)

नात्यात प्रामाणिकपणा असावा. पैशांमध्ये नात्यांना कधीच तोलू नये.
गोष्ट छोटी डोंगराएवढी
दगाफटका
माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग

"कल्पना..ए कल्पना.." सिद्धांत आनंदाने दारातूनच आवाज देत आत आला.


"काय हो, काय झालं कोकलायला? कल्पना चिडक्या स्वरात बोलली तसा सिद्धांत वरमला.



"अगं, माझं प्रमोशन झालयं.. आणि कंपनीने मला मॅनेजर ची पोस्ट दिली आहे. आता माझा पगार बारा हजार नसून साठ हजार असणार आहे." सिद्धांत आनंदाने सांगत होता.


"काय? खरचं.. अहो ही तर खूप आनंदाची बातमी आहे. थांबा हं मी देवापुढे साखर ठेवते." कल्पना वळली तोच सिद्धांतने तिला आवाज देऊन थांबवले.


"अगं थांब! हे घे..तू नेहमी तक्रार करतेस ना मी तुला स्वस्तातली मिठाई आणून देतो..ही घे आज तुझी आवडती काजूकतली आणली आहे आणि तुला आवडणाऱ्या काका हलवाई कडून आणली आहे." सिद्धांत मिठाई चा चकचकीत बॉक्स कल्पना समोर धरतो.


"अय्या.. खरचं? बघू बघू.." म्हणत कल्पना बॉक्स उघडते आणि त्यातील काजूकतली काढून पहिले स्वतः खाते.


"अगं, देवापुढे ठेवणार होतीस ना?"


"अगोबाई विसरलेच..सॉरी हं.. लगेच ठेवते." कल्पना जीभ चावत बोलते आणि वाटीत दोन मिठाईचे पीस काढून देवाजवळ ठेवते.


"आज जेवायला की नाही सगळं तुमच्या आवडीचं करते बघा.. काय आवडत तुम्हाला? "


साठ हजार ऐकून आज ही बाई माझ्या आवडीचं करते आहे जिला माझी आवड सुद्धा माहीत नाही..सिद्धांत स्वतःशीच बोलतो.


"अहो.. सांगताय ना!" कल्पना त्याच्यासमोर टिचकी वाजवत बोलते.


"अं.. हो सांगतो ना. पनिरची भाजी बनव,जीरा राईस बनव, दाल फ्राय आणि रोटी मी बाहेरून मागवतो."


"हो चालेल.. आणि ऐका ही गोष्ट लगेच तुमच्या आई आणि बहिणीला सांगू नका!"


"हम्म"


कल्पना जिरा राईस आणि पनीरमसाला बनवते. सिद्धांत दाल फ्राय आणि बटर रोटी ऑर्डर करतो. हॉटेलचा एक माणूस ऑर्डर घेऊन घरी येतो. सिद्धांत पिशवी घेऊन कल्पनाच्या हाती देतो आणि आलेल्या माणसाला पेमेंट करून त्याचे आभार मानतो.


"अहो..काय काय मागवलं आहे बापरे... मला तर खुपचं छान वाटत आहे. अहो पण एवढी रोटी का मागवली? बरं असुदे, उद्या चहा सोबत खाईन मी. असं म्हणत कल्पना दोन ताटं घेते.


एवढयात दारावर टकटक पडते.


"आता नेमकं जेवायच्यावेळी कोण मेलं?" वैतागतंच कल्पना दार उघडते.

"तुम्ही? यावेळी इथे?" दारात सासूसासऱ्यांना बघून कल्पना आश्चर्याने विचारते.


"आम्हाला सिद्धांतने बोलावलं आहे." सुमतीताई सिद्धांतची आई बोलते.


"काय हो तुम्ही बोलावलतं या म्हातारीला!" कल्पना चिडून विचारते.

सिद्धांत उठतो आणि खन..कन कल्पनाच्या कानाखाली जाळ काढतो. कधीही काहीही न बोललेल्या सिद्धांतचं असं वागणं त्याचे आईवडील आणि कल्पना सगळ्यांनाच नवीन होतं.


"हे मी आधीच करायला हवं होतं. आई.. तू प्रत्येकवेळी मला शांत रहायला सांगितलंस. माझ्या कमी पगाराच्या नोकरीवरून ही बाई सतत मला बोल लावायची तरी मी कधी काही बोललो नाही. डे-नाईट..जमेल तेवढ्या आणि मिळतील त्या शिफ्ट केल्या पण रात्री घरी आल्यावर माझी विचारपूस सोड गं.. कधी ताजं अन्न सुदधा मला खाऊ घातलं नाही या बाईने. माझ्या इतक्या वर्षच्या मेहनतीचे आणि प्रामाणिकपणाचे फळ म्हणून मला आज मॅनेजरपद देण्यात आलं. माझा पगार वाढवण्यात आला तर ही बाई आज मला काय आवडत ते बघते. अगं आई.. तुला आणि बाबांना या नीच बाईमुळे वृद्धाश्रमात रहावा लागतंय हीच मोठी खंत आहे. त्याहीवेळी तुम्ही दोघांनी मला शांत रहायला सांगितलं. ही नालायक बाई पैशांपायी आपल्या घराची अब्रू आज वेशीवर टांगायला निघाली आहे. निघाली काय टांगली गं... मला लाज वाटते हिला बायको म्हणवून घेतांना.

ज्या सरांनी माझं प्रमोशन केलं त्यांच्यासोबत ही नालायक बाई रासलीला करते.


चार महिन्यांपूर्वी मी टेंडरची फाईल घेऊन बेंद्रे सरांच्या घरी गेलो होतो तिथे ही त्यांच्या रूममध्ये त्यांच्या सोबत.....शी...मला सांगतांना सुद्धा लाज वाटते.

एका सहीसाठी तिथे गेलो होतो. सही झाली आणि लगेच निघालो बाहेरच्या खिडकीतून पाहिलं तर बेंद्रे सरांनी हिच्या तोंडावर पैसे फेकले. हिला कितीदा विचारलं होत इतके पैसे कुठून येतात तर म्हणे कमिटी मेम्बर आहे मी सोसायटीची..


त्यादिवशी हिला त्या अवस्थेत पाहिलं आणि तेंव्हाच ठरवलं इतकं मोठं व्हायचं की पैशाची कमी नाही झाली पाहिजे आणि ह्या घाणीला पहिले घरातून बाहेर काढायची.

तो प्रसंग, तो दिवस आजही माझ्या लक्षात आहे आणि कल्पना तुझा मी खूप आभारी आहे. तुझ्याचमुळे आज मी इथवर आलो. हे डिवोर्स पेपर्स मी सह्या केल्या आहेत. तुझी बॅग घे आणि तोंड काळं कर तुझं.


(प्रत्येकवेळी पुरुष चुकीचा नसतो बाई सुद्धा असते. चांगलाचं अविस्मरणीय दिवस असावा अस नाही. कधी कधी खूप वाईटामधूनपण शिकता येत. काही गोष्टी नजरेआड कधीच करता येत नाहीत.) ही कथा काल्पनिक आहे. जर काही संदर्भ आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)


धन्यवाद
श्रावणी लोखंडे..