दगडीखाना ! पार्ट 14

स्त्रीविशेष समलैंगिक सामाजिक
दगडीखाना ! पार्ट 14

पार्थच्या नजरेतून कथा :

केस जिंकल्यावर कार्तिक आणि योमिताच्या लग्नाची बोलणी सुरू झाली. कार्तिक आता खूप मॅच्युर्ड झाला होता. त्याने नव्याने बिजनेस सुरू केला होता आणि तो व्यवस्थित चालत पण होता. दिवाळी जवळ येत होती. कॉलनीत लायटिंग लावल्या जात होत्या. ओनरच्या मुलांना पण सुट्ट्या लागल्या. ते पण धिंगाणा घालू लागले. मला माझे बालपण आठवू लागले. म्हणजे गावाकडे घालवलेले बालपणाचे सुंदर क्षण. मामाच्या गावाची ओढ लागली. किती सुंदर होते बालपण. हॉस्टेलमधल्या शाळेला दिवाळीची सुट्टी लागली की मी मामाकडे जायचो. फराळ , चिवडा , चकल्या करंज्या गुलाबजामुन. किती सुंदर ते गाणे "पळती झाडे पाहुया मामाच्या गावाला जाऊया!". मी स्वतःला लकी समजतो माझे बालपण तेव्हा गेले जेव्हा स्मार्टफोन नव्हता. फेसबुक इंस्टा नव्हते. आम्ही आजीच्या तोंडून कथा ऐकल्या आहेत. युट्यूबवरून नाही. आनंद मैदानी खेळांतून मिळे फेसबुक इंस्टावरच्या लाईक्स वरून नाही. आम्हाला दिवाळीत दहा दिवसांच्या सुट्ट्या मिळत तेव्हा मी खूप उत्साहित असे मामाच्या गावी जायला. आम्ही दहा कझिनस एकत्र जमत. मी सर्वात मोठा आणि शांत मला सर्व जण \"\"दादु" म्हणत. काही आगाऊ कझीन्स "नाम है दद्दु खाता है कद्दु..काम मै पिद्दु!" असे विचित्र गाणे म्हणत ती गोष्ट वेगळी. पत्ते कॅरम लुडो चेस कवड्या लगोरी वाघोबा वाघोबा शिवाजी म्हणतो चिमणी उडाली हे सर्व खेळ खेळलो. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.

माझे मामाचे गाव तसे लातूरमधील निलंगा. आजी लहानपणी निळकंठेश्वर मंदिरात ( जे मंदिर निलंग्यात आहे ) घेऊन जात. ते मंदीर राक्षसाने बांधले असे म्हणत. महादेवबद्दल तेव्हापासून माझ्या मनात आदर. असा देव जो सर्वांना एकसमान वागवतो. किती वर्षे झाली ना निलंग्यात जाऊन. दिल्लीची प्रदुषित हवा खाऊन कंटाळा आला होता. कार्तिककडे मुलाचे लग्न मामाच्या गावी होत असे आणि सुदैवाने कार्तिकचा मामा पण लातूरमध्ये राहत. मी नवस मागितला होता निलकंठेश्वरला कार्तिक बरा व्हावा म्हणून. कार्तिकचे लग्न दिवाळीत  ठरले. आम्ही सर्वानी प्लॅन बनवला. साहिल जानकी बाई पण जॉईन झाले. माझ्या भावाचे लग्न ठरले होते. मला खूप काम करायचे होते. दिल्लीहुन मी साहिल आणि जानकी बाई आधीच निघालो. आम्ही रेल्वेस्टेशनवर पोहोचलो. बाबा मुंबईहुन डायरेक्ट लातूरला म्हणजे कार्तिकच्या लग्नाला येणार होते. मी खूप खुश होतो की साहिल माझ्या सोबत आहे. त्याला कस मनवल होते माझे मला माहीत आहे. कार्तिक योमिता किरण यश दोन दिवसाने निघणार होते. यशला आणि कार्तिकला काम होते. मीना आसाममध्ये गेली होती म्हणून तिला जमणार नव्हते. रेल्वे सुरू झाली. आयुष्य पण एक प्रवास आहे. वेगवेगळे लोक भेटतात आणि गप्पा होतात. कुणासोबत पटत कुणासोबत नाही पटत. शेवटी स्टेशन येते आणि प्रत्येकजण आपापल्या डेस्टिनेशनवर पोहोचतो. असो. साहिल झोपी गेला आणि येणारी हवा त्याची केस उडवत असे. तो भयानकरित्या क्युट दिसत होता. साहिलला पाहून मला एक कविता सुचली.

प्यार के डोरी से सजा आशियाना
हसने को न लगे हमे कोई बहाना
खुशिया ढूंढें हमारा ठिकाना
जिंदगी जिंदगी मेरे घर आना

मुस्कान से भरे हमारे चेहरे
खुदा देता खुशीयो को पेहरे
सबने सारा सुखदुख है बाटा
जिंदगी जिंदगी मेरे घर आना

कभी गिरने ना दे आँसूओ के मोती
साथ अपनोंका डराए कैसी चुनौती
बस हाथों में हाथ थामे रखना
जिंदगी जिंदगी मेरे घर आना

आँगन मे पड़े प्यार की रोशनी
हौसलों उड़ान दिलसे है भरनी
मुश्किल राहे हसके पार करना
जिंदगी जिंदगी मेरे घर आना

कड़वाहट रिश्तों नहीं आने देना
हो चाहे छगड़े फिर मनाभी लेना
विश्वास की ईटों से घर है सजाना
जिंदगी जिंदगी मेरे घर आना

सिर पर जब हो बड़ों का हाथ
पूरा परिवार जब है हमारे साथ
फिकिर फिर कैसी कैसा घबराना
जिंदगी जिंदगी मेरे घर आना

मेहबूब के बाहों में मिले जन्नत
वो साथ फिर क्याही मांगे मन्नत
प्यार बढ़ाने देंगे समय की रिश्वत
लगाएंगे इश्क में हम पूरी शिद्धत

बड़ी धूप है दोस्त..
तेरे आँगन से कुछ छाव चुराके
जीना है जीना जीना है जीना

जिंदगी जिंदगी मेरे घर आना
जिंदगी जिंदगी मेरे घर आना

जानकीबाई वॉशरूमला गेल्या. डब्यात कुणीच नव्हते. मी दरवाजा लावला आणि लगेच साहिलला किस केलं.

" माझा शोनू " त्या येडुला जाग आली नाही. गार हवा सुटली होती. मी ट्रेनच्या मेन दरवाज्यापाशी गेलो. किती सुंदर निसर्ग दिसत होता. मी हात हलका सोडला आणि तो हवेच्या दिशेने वेव्हसारखा उडू लागला. साहिल मागून आला आणि त्याने माझा हात पकडला.

" खूप एक्ससाईटेड दिसतोय निलंगाला जायला?"

" मग ? विषय आहे का ?" मी त्याला म्हणालो.

आमची रेल्वे महाराष्ट्रमध्ये घुसली. जानकीबाई उतरल्या आणि माती उचलून कपाळाला लावली.

" किती वर्षांनी आपल्या मातीत पाय ठेवले आहे!!" त्या म्हणाल्या.

" तुमचे माहेर पण महाराष्ट्रमध्ये आहे ना काकू ?" मी विचारले.

" उदगीरला आहे. आईवडील गेल्यानंतर भावाने संबंध तोडले. त्याला माझे बंगाली मुलासोबत लग्न केलेलं आवडले नव्हते. " त्या लहान तोंड करून निघून गेल्या. मला आणि साहिलला वाईट वाटले.

ह्या बाईला समजून घेणे अवघड आहे.
आम्ही निलंग्याला पोहोचलो. जाताना शिवाजी महाराजांची मूर्ती दिसली. भर चौकात घोड्यावर स्वार हातात तलवार घेऊन उभे असलेले शिवाजी महाराज.

" आम्ही लहानपणी जेव्हा पण मामाच्या गाडीवर त्या चौकात मूर्तीभोवती राउंड मारू तेव्हा जोरात शिवाजी महाराज की जय म्हणत . माझ्या बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. " मी साहिलला म्हणालो.

मामाच्या घरी गेलो तेव्हा बाहेर एक मुलगी चिप्पा खेळत होती. " तू निखिलची मुलगी का ? मी फेसबुकवर फोटो पाहिला तुझा. मी तुझा पार्थ काका. " मी म्हणालो. ती पण खुश झाली.

मी चिप्पा हातात घेतला आणि टाकला.

" ओय दिल्लीकर. कधी हा गेम खेळलाय ? खूप खेळायचो मी. कधीच नेम हुकायचा नाही. लगोरी वाघोबा वाघोबा असे कितीतरी गेम आम्ही खेळायचो. " मी साहिलला म्हणालो.

पण समोर "वट्टा" होता म्हणजे तुमच्या भाषेत कट्टा. तो माझ्याशी गप्पा मारू लागला. तेव्हा लोड शेडिंग असायची आणि सर्व फॅमिली तिथे बसून गप्पा मारायची. आजीने लावलेल्या तुळशीचे वृंदावन तसेच होते अजून. मामा कधी कधी बाज टाके. आम्ही सर्वजण त्यावर झोपून अंताक्षरी खेळत असो. हे नुसते घर ,अंगण नव्हते तर आठवणीचा खजिना होता माझ्यासाठी.

" पार्थ..कुठे हरवला ?" साहिल मला म्हणला.

" भूतकाळात. " मी त्याला म्हणालो. पण लगेच निखिल ( माझा मामाचा मुलगा ) आला. त्याने माझे आणि साहिल जानकी बाईचे स्वागत केले. आम्ही व्हरांड्यात आलो. इथे पण मला मीच दिसू लागलो. पळताना हसताना खेळताना. मी माझ्या भूतकाळातील पार्थशी नव्याने भेटत होतो. तिथे माझे भाची आणि बाकीचे ( तिचे ) क्झिन्स "कवड्या" खेळत होते.

" निखिल. आज पण हे लोक कवड्या खेळतात?\"\"

\"\"दादू. मी शिकवलं त्यांना. मोबाईलचे लाड नाही आमच्यात. " निखिल मला म्हणाला.

मी त्यांच्या बाजूला बसलो.

" साहिल. इकडे ये ना. तुला कवड्या शिकवतो. जानकीकाकू तुम्ही पण या. " मी म्हणालो.

" आम्ही आलो तर तुम्ही टिकणार नाही. कवड्या आणि फासे जानकीच्या इशाऱ्यावर चालतात. आम्हास लहानपणी शकुनी म्हणायचे. " जानकीबाई

" तर मग या मैदानात. " मी म्हणालो.

पण मामा मामी आणि आजी आले. त्यांनी विचारपूस केली. मी तिघांच्या पाया पडलो.

" थकला असशील. आधी आंघोळ करून घे. कवड्या बिना आंघोळ करता खेळत नाहीत. " माझ्या मामी म्हणाल्या.

मग आम्ही आंघोळ वगैरे केली. फ्रेश झालो. मामीने पोहे केले. किती दिवसाने पोहे खाऊन माझे मन तृप्त झाले. दिल्लीत शेंगदाणे टोमॅटो वरून घालतात. महाराष्ट्रात ते आधीच मिक्स करतात. आम्ही मग कवड्या खेळायला बसलो. ( या खेळाला "काचकुऱ्या" पण म्हणतात ) तर या खेळात ( ५ X ५ ) पंचवीस कप्पे असतात. ज्या कप्प्यात क्रॉस असेल तिथे तोडी होत नसे. तोडी म्हणजे जर एखाद्या गोटीवर दुसऱ्याची गोटी आली की ती गोटी आऊट होत असे. सहा कवड्या असतात. पंचवीस पडले की गोटी मध्ये जात असे. डाव सुरू झाला. जानकी बाई खरोखरच शकुणीचा फिमेल अवतार होत्या. पहिलाच बारीत त्यांचा डाव फुटला. माझा आणि साहिलचा डाव फुटत नव्हता. डाव फुटणे म्हणजे सहा बारा पंचवीस दहा पडल्याशिवाय गोट्या बाहेर पडत नसे. माझे भाचे भाची मला हसू लागले. कसेबसे आमच्या गोट्या बाहेर पडल्या. जानकीबाई कवड्या फेकत. पूर्ण मैदानात नजर फिरवत आणि लगेच तोडी करत. असे करत करत त्या डाव जिंकल्या. पण खूप मजा आली. विशेषकरून साहिलला हा गेम खूप आवडला. तो खूप खुश दिसत होता. त्या दिवशी संध्याकाळी मला शेतात जायचे होते. मी माझ्या भावाची बुलेट घेतली. मी आणि साहिल शेताकडे निघालो. शिरूर अनंतपाळ बाजूला मामाचे शेत होते. मला अजूनही रस्ता माहीत होता. शेतात पोहोचलो. साहिल मुद्दामहून ब्रेक मारीत आणि मला पण त्याला घट्ट पकडायला आवडे. मी माझ्या आनंदाचे सर्वोच्च क्षण जगत होतो. शेतात पोहोचताच गार हवेने आमचे स्वागत केले आणि ती हिरवळ मन जिंकत होती. दिल्लीच्या प्रदूषित हवेने त्रस्त झालेले आम्ही आम्हाला शेताची शुद्ध हवा भेटल्यावर आनंदाला पारावर उरला नाही. मग आमच्या आनंदाची लेव्हल वाचकांनी स्वतः समजून घ्यावी. आम्ही शेत फिरलो. पहिले पाऊल पडले ते विहिरीकडे. शांत खोल विहीर. त्यात मी लहानपणी दगडे फेकायचो आणि तरंगे बघायचो. मला कधी त्या विहिरीची भीती वाटली नाही. वाटत असायचे आयुष्य पण असच खोल आणि स्तब्ध असावं. मी कितीही दगडे टाकली. तरंगे उमटवली तरी थोड्या वेळाने विहीर शांत होते. मला विहिरीसारखे आयुष्य जगायचे आहे. प्राणी पक्षी माणसे माझ्या शरण मध्ये यावी आणि माझ्यामुळे त्यांची तहान तृप्त व्हावी आणि कुणी आयुष्यात दगडे मारली. डिस्टर्ब केलं तरी आपण शांत व्हावं. शांतता हा विहिरीचा गुण आहे. तसाच गुण मला पण माझ्या आयुष्यात हवाय.

" काय बघतोय नकटु ? चल त्या झाडाच्या बाजूला बसून बोलू ?" मला साहिल म्हणाला. माझे हात पकडून मला तिकडे घेऊन गेला.

" माहीत नाही यार. साहिल आज पहिल्यांदा फ़ेसबुकवर नोटिफिकेशन बघत नाहीये. हे वडाचे झाड माझ्या पणजोबाने लावले आहे. " मी म्हणालो.

" ग्रेट यार. दिल्लीत कधी असे झाड बघितले नाही. " साहिल म्हणाला.

" कारण आपण कधी निसर्गाच्या जवळ आलोच नाही. स्क्रीनवरच चॅटिंग एका अंधाऱ्या खोलीत सेक्स आणि फेसबुकवरची मैत्री. आज खूप ताजेतवाने वाटत आहे शोनू. तुला महित्ये पूर्ण जग राजकारणाने व्यापले आहे. आईवडील आणि मुलाच्या नात्यात पण राजकारण आहे. एक शोषण करणारा आणि दुसरा शोषित. प्रेमापोटी आपण ते दुर्लक्षित करतो इतकेच. फेसबुक व्हाट्सप्प वरचे ग्रुप तिथे राजकारण. मला मॅनेजरची पोस्ट भेटू नये म्हणून मला बदनाम करणारे. सर्वजण राजकारण करतात. मी लेखक आहे. मला राजकारण जमत नाही. चाली समजत नाही. त्यात एकटेपणा आणि विरह. अश्याने जखमी झालेले माझे हृदय घेऊन ह्या निसर्गाच्या शरणाला आलोय. इथे राजकारण नाही. कधी ऐकलय एका हरणाने दुसऱ्या हरणाला फसवून वाघाच्या तोंडात दिल. निसर्गात वाघ हरणाला खाणार फिक्स असते. कुणी मुखवटे घालत नाही. जितकं माणूस निसर्गाच्या जवळ तितका तो निर्मळ होतो. म्हणून आदिवासी लोकात शकुनी निपजणे शक्य नाही. आज ह्या वडाच्या झाडाखाली त्याच्या दाट सावलीत येऊन असे वाटत आहे की आईच्या मांडीवर झोपलो आहे. निसर्ग पण माऊलीच आहे ना. ते बघ. चिमणीचे घरटे. दिल्लीत एक पण चिमणी दिसत नाही. आज तिला बघून बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. त्या चिऊ काऊच्या निरागस कविता आणि कथा. साहिल , शूज काढ..
आणि ह्या ओल्या मातीवर पाय ठेव. पुन्हा हा चान्स नाही भेटणार. " मी त्याला म्हणालो.

त्याने तसेच केले.

"भारी वाटतय रे पार्थ. थँक्स मला आणलं इथे. "

" मला लहानपणापासून बाईक शिकायच होत. मामाने खूप प्रयत्न केला. पण जमलं नाही. " मी म्हणालो.

साहिल मला चल म्हणाला. त्याने मला बुलेट शिकवली. खूप मजा आली. आम्ही नंतर गरम गरम कणसे खाल्ली. शेत फिरत असताना पाऊस सुरू झाला. आम्ही पळत वडाच्या झाडाखाली आलो. पण साहिल परत शेतात गेला. मी त्याला इकडे बोलावत होतो पण त्याला मजा वाटत होती पावसात भिजायला.

" पावसाला कधीच घाबरायचे नाही. त्याला म्हणायचे पड किती पडायचे ते. मी नाही हटणार. " साहिल ओरडला.

ह्याला काय झालं अचानक ?

मी पण मग पावसात भिजायला गेलो. नंतर भिजून आम्ही झाडाखाली आलो. त्याने मला जवळ करून किस केलं.

अधीर मन झाले. मधुर घन आले!!

नंतर खुप उशीर झाला होता. आम्ही निलंग्याला आलो. मामीने गरम चहा पाजवला. मी साहिलचे केस पुसू लागलो. रात्री मामीने माझ्यासाठी खास पावभाजी केली होती. घरची पावभाजी खाऊन मन तृप्त झाले. मला गच्चीवर झोपायचे होते. मी आणि साहिल मग गच्चीवर झोपायला गेलो. लहानपणी खूपदा एकटाच येऊन बसे गच्चीवर. अंतर्मुख होतो मी. मला आवडत असे एकटे राहायला. स्वतःच्या विचारात डुबायला. साहिलने गच्चीचा दरवाजा लावला. मी त्याच्या छातीवर विसावलो. आकाश ताऱ्यांनी भरलेले होते. चंद्र त्या सौंदर्यात भर टाकत होता. आज जणू माझा आणि साहिलचा प्रणय बघायला निसर्ग पण उत्सुक होता. मी साहिलला घट्ट मिठी मारली. तो पण काही कमी नव्हता. त्याच्या उबदार स्पर्शाने माझ्या शरीराला शहारे येत होते.

" ह्या आकाशाकडे बघ. आपण किती खुजे आहोत आणि युनिव्हर्स किती मोठे आहे हे समजते. आपला सर्व अहंकार संपतो. " रात्रभर आम्ही समागम न करता फक्त घट्ट मिठीत होतो. ती माझी सर्वात सुंदर रात्र होती.

दुसऱ्या दिवशी आम्ही किल्ला देखील बनवला , लगोरी देखील खेळलो. जानकी बाई चिटिंग करत.
. माझ्या हातात बॉल होता तेव्हा त्या रागाने बघत. परिणामी मला त्यांना आऊट करता आले नाही.

फेसबुकवर स्वरांग नावाचा लातूरचा मित्र होता. कार्तिक योमिता आणि उरलेले लातूरला पोहोचणार होते. मला योमिता आणि किरणला घेऊन यायचे होते. कार्तिक लातूरमध्ये थांबणार होता त्याच्या मामाकडे. ओनर ( जानकी बाईचा नवरा ) तो पण आला होता. स्वरांगला खुप दिवसाचे भेटायचे होते. आज योग आला. आम्ही सकाळीच लातुरात गेलो. त्याने माझ्या इच्छेप्रमाणे आम्हाला "निलंगा राईस" खाऊ घातले. काय चव आहे त्या राईसची. मन प्रसन्न झाले. तो केशरी भात त्यात मिरची बटाटे. लाजवाब अवर्णनीय निशब्द. असो. स्वरांगने मला आणि साहिलला एक गिफ्ट दिले. राधे कृष्णाची सुंदर रेखीव मूर्ती होती.

" ह्यांना बघितल्यावर जसा पूज्यभाव येतो मनात तसे तुमची जोडी बघून येतो म्हणून हे गिफ्ट. " स्वरांग म्हणाला. खूप काही गप्पा रंगल्या. शेवटी रेल्वे आली. आम्ही तिकडे निघालो. स्वरांगचा निरोप घेतला. कार्तिक आला. मी धावत त्याला मिठी मारली. लग्न होते हरामीचे.

" साले. नाच ना है सबको मेरे शादी मै. " तो म्हणाला. आम्ही योमिता आणि ओनरकाकांना घेऊन आलो. यश कार्तिककडे आणि किरण आमच्या पार्टीत आला. लव्हबर्डसची ताटातूट झाली..

दुसऱ्या दिवशी हळदीचा समारंभ होता. खूप मजा आली. योमिता खूप सुंदर दिसत होती. माझे मामाचे घर जणू वधूपक्षाचे घर झाले. जानकी बाई स्वतःच्या मुलीप्रमाणे सर्व बघत होत्या. माझे बाबा पण आले. मामाला मी सर्व सत्य सांगितले. मामी आणि आजीने शपथा टाकल्या. मग कुठे  मामा आणि बाबामध्ये तह झाला. अबोला फुटला. पण मला कार्तिकला हळदी लावायची होती. मी परत निलंगयाहून लातूरला गेलो. भाईला हळदी लावायला.

दिवाळी सुरू झाली. आम्ही चारला उठलो. मला आजीने उटण्याने चोळले. आंघोळ घातली आणि कानात गरम तेलाचा कापूस घातला. मोती साबणाने आंघोळ केली. साहिलला पण उटणे लावले गेले. मी कपडे घालत होतो तर आला आणि त्याच्या गालाने माझ्या गालाला चोळले. त्याचे उटणे माझ्या गालाला लागले. लईच रोमँटिक आहे माझा शोनू.

लग्नाची तारीख पण तीच होती. लातुरात लग्न होते. ते पण लक्ष्मीपूजनादिवशी. मीना पण पोहोचली. मी पार्टी बदलली. कार्तिकच्या वरातीत मी किरण यश खूप नाचलो. मी कार्तिकवर पैसे उधळले. माझ्या मांडीवर पाऊल ठेवून तो घोड्यावर बसला. माझा भाऊ कार्तिक. इंद्र लाजेल इतका सुंदर दिसत होता. माझ्या डोळ्यात पाणी आले. तो कोमात असताना मी कसे दिवस काढले मला माहिती आहे. खूप जीव लावला होता मी त्याच्यावर. जानकीबाईने त्याचे नाक पकडले. तिकडे मीना योमिताला तयार करत होती. योमिता खूप सुंदर दिसत होती.

" सीतेसमान भासत आहेस. राम आलाय वरात घेऊन. " जानकी बाई तिला म्हणाला.

भूमिजा जानकी जनक सूता सीता!
क्षितिज भामी अवनिजा सुनैना सुधा सीता!!

योमिता लाजली. मंडपात आली. ठरल्याप्रमाणे मला डान्स करावा लागला. मी मेरे यार की शादी है वर डान्स केला. ओनरने योमिताला सुनावले होते. तो पश्चाताप घालावण्यासाठी त्यांनी योमिताचे कन्यादान केले. लग्न धूम धडाक्यात साजरे होते.

मी निलकंठेश्वरला नवस मागितला होता म्हणून आम्ही सर्व निलंग्याला आलो. कार्तिकच्या हातून दुधाचा अभिषेक करवला. दानधर्म करवला. मग आम्ही मामाच्या घरी आलो. मामीने लक्ष्मीपूजनाची तयारी आधीच केली होती. पूर्ण घर दिव्याने सजवले होते. अंगणात सुंदर रांगोळी काढली होती. दारात सुंदर आकाशकंदिल होती. डोळे दिपून गेले.

यश किरणला "म्हातारीच्या खोलीत" घेऊन गेला. म्हणजे आम्ही त्या खोलीला म्हातारीची खोली म्हणत असु कारण आम्हाला खूप भीती वाटे त्या खोलीची. कुणी बदमाशी करत तर त्याला तिथे कोंडवल जात. यश अंधार करतो आणि मेणबत्ती ठेवतो. किरणचा हात धरून कॅडल भोवती रोटेट करतो.

" किरण. मी वचन देतो की तुला कधी दुखावणार नाही. एकट सोडणार नाही. उदास होऊ देनार नाही. तुझा विश्वास तोडणार नाही. माझ्या धनात संपत्तीमध्ये तुझा समान वाटा असेल. माझ्या प्रेमावर शरिरावर फक्त तुझाच हक्क असेल. तुझे आईवडील माझे आईवडील असतील. मी नेहमी तुझा आदर करेल आणि स्वतंत्र देईल. "

मी दोघांचे सुंदर "लग्न" खिडकीतून लपुन बघत होतो. खिशात अक्षदा होत्या. हळूच फेकल्या. " महादेवा यांना नेहमी सोबत ठेव रे. कोणाची नजर नको लागायला यश किरणच्या प्रेमाला " मी म्हणालो.

इकडे उखाना घेतला जाऊ लागला. कार्तिक "भाजीत भाजी " म्हणू लागला. लोक चिडले. मी त्याच्या कानात सांगितले.

\"\"रात्रीच्या भाताला जिऱ्याची फोडणी
योमिताचे नाव घेतो लाल तिची ओढणी!" कार्तिक

योमिता सिक्कीमची. तिला जमेना. मग जानकी बाई समोर आल्या. त्यांनी तिच्या कानात सांगितलं.

" दुःखात खांदा दे. सुखात मिठी दे.
कार्तिकचे नाव घेते आयुष्यभर पूरेल इतकी प्रीती दे " योमिता

लक्ष्मीची आरती झाली. आता आमच्या खानदानी गणपतीची आरती होती. मी ती कार्तिक योमिताच्या हातून करायला सांगितली. साहिलने आधीच घोषणा केली. या दिवाळीत सर्वाना गिफ्ट भेटेल.
सर्वाना उत्सुकता होती. आरती सुरू झाली.

सुख करता दुखहर्ता, वार्ता विघ्नाची
नूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची
सर्वांगी सुन्दर उटी शेंदु राची
कंठी झलके माल मुकताफळांची

दीपानशी आत्या आली. कशी आली फक्त साहिलला माहीत. बाबा खुश झाले. "शूर्पणखा" म्हणून तिला मिठी मारली. हे बाबांचे गिफ्ट.

जय देव जय देव, जय मंगल मूर्ति
दर्शनमात्रे मनःकमाना पूर्ति
जय देव जय देव

मीनाला एक गिफ्ट देण्यात आले. त्यात माझ्या आईचे दागिने आणि साडी होती. आमच्या साखरपुडयाची पत्रिका पण होती. मीनाला तिच्या दिवाळीचे गिफ्ट भेटले.

रत्नखचित फरा तुझ गौरीकुमरा
चंदनाची उटी कुमकुम केशरा
हीरे जडित मुकुट शोभतो बरा
रुन्झुनती नूपुरे चरनी घागरिया

योमिताचे मामा मामी पण आले. त्यांनी माफी मागितली. योमिता खुश झाली. तिला पण गिफ्ट भेटले.

जय देव जय देव, जय मंगल मूर्ति
दर्शनमात्रे मनःकमाना पूर्ति
जय देव जय देव

जानकी बाईचा भाऊ उदगीरहुन आला. म्हणला उद्याची भाऊबीज सोबत साजरी करू. इतक्या धावपळीत पोरांनी जानकी बाईच्या मनाचा विचार केला. वीस वर्षाचा अबोला फुटला. जानकी बाईच्या डोळ्यात पाणी आले आणि त्यांना त्याचे गिफ्ट भेटले.

लम्बोदर पीताम्बर फनिवर वंदना
सरल सोंड वक्रतुंडा त्रिनयना
दास रामाचा वाट पाहे सदना
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना

पार्थची भाची त्याला एक गिफ्ट देते. त्यात पार्थची "दिलबरो"  कादंबरी असते जी साहिलने पब्लिश केली असते. साहिल डोळा मारतो आणि पार्थला गिफ्ट भेटते.

जय देव जय देव, जय मंगल मूर्ति
दर्शनमात्रे मनःकमाना पूर्ति
जय देव जय देव

शेंदुर लाल चढायो अच्छा गजमुख को
दोन्दिल लाल बिराजे सूत गौरिहर को
हाथ लिए गुड लड्डू साई सुरवर को
महिमा कहे ना जाय लागत हूँ पद को

ऋचा येते. कार्तिकला म्हणते. "मी केस जिंकले आणि आता तुझ्या स्टार्टअपला स्पॉन्सर करनारे. " कार्तिक खुश होतो आणि त्याला पण त्याचे गिफ्ट भेटते.

जय जय जय जय जय
जय जय जी गणराज विद्यासुखदाता
धन्य तुम्हारो दर्शन मेरा मत रमता
जय देव जय देव

अष्ट सिधि दासी संकट को बैरी
विघन विनाशन मंगल मूरत अधिकारी
कोटि सूरज प्रकाश ऐसे छबी तेरी
गंडस्थल मद्मस्तक झूल शशि बहरी

किरणचे आईवडिल येतात. "माफ कर पोरा. माझ्या भावाने दारू पिउन कबुल केलं सर्व. मी सर्व संबंध तोडले. तू जसा आहेस तसा रहा. तू गेल्यावर घरात बरबादी आली. पुण्यात्माला दुखावलं अस एक साधू म्हणून गेला. माफ कर लेका. पाप केलं मी. आई आणि पोराची ताटातूट केली. पण आता तुला जस जगायचे तसे जग. आम्हाला अभिमान वाटतो तुझा. " असे बोलून किरणच्या आईवडीलानी त्याला मिठी मारली. किरणच्या डोळ्यांत पाणी आले. त्याने साहिलचे आभार मानले. किरणला त्याचे आईवडील भेटले. त्याला त्याचे गिफ्ट भेटले.

जय जय जय जय जय
जय जय जी गणराज विद्यासुखदाता
धन्य तुम्हारो दर्शन मेरा मत रमता
जय देव जय देव

भावभगत से कोई शरणागत आवे
संतति संपत्ति सबही भरपूर पावे
ऐसे तुम महाराज मोको अति भावे
गोसावीनंदन निशिदिन गुण गावे

यशला मागून कुणीतरी मारले आणि त्याचे वडील आणि आई होती. यशला विश्वास बसेना. तो खूप खुश झाला. त्याला त्याचे गिफ्ट भेटले.

जय जय जी गणराज विद्यासुखदाता
धन्य तुम्हारो दर्शन मेरा मत रमता
जय देव जय देव

" शोनू. सर्वाना गिफ्ट दिले. तुझ्यासाठी पण एक गिफ्ट आहे. " पार्थ

\"\" काय रे नकटु ?" साहिल.

पार्थने त्याला एक सुंदरशी अंगठी दिली. सोन्याची. साहिल पण खुश झाला.

" आपल्या प्रेमाची आठवण " पार्थ म्हणतो.

@दिल्ली

@संध्याच्या घरी

\"\" आई. तू म्हणलं होत की बाबा येतील. पण नाही आले. मी नाही साजरी करणार दिवाळी . धिस इज नॉट फेअर . "संध्याची मुलगी बोलते.

" विक्रमला सांगितले होते की दिवाळीला ये. इतकं काय काम अडले की आला नाही " संध्याची सासू म्हणते.

संध्याचा पती मिलिटरीमध्ये असतो. संध्या नकली मिशी लावते.

" बाबा नसले म्हणून काय झालं ? आई आहे ना. हमारी आई "बाबा" से कम है के ?" अस अमीर खान च्या स्टाईलमध्ये बोलते आणि मुलीला हसवते.

" आई. आज ते सीमेवर उभे आहेत म्हणून आज भारतीय न घाबरता दिवाळी साजरी करत आहेत!!\" ती सासूला म्हणते.

संध्या दिवे लावायला जाते. समोर विक्रम उभा असतो. दाढी वाढलेला आणि बलदंड तरुण. संध्याच्या डोळ्यात पाणी येते. ती त्याला मिठी मारते.

" तुम्ही म्हणाला नाही येणार?" संध्या

"तुला सप्राईज द्यायचे होते. " विक्रम( मागून सासू आणि मुलगी पण हसायला लागतात!! ) 

" अच्छा..सब मिले है!!" संध्या म्हणते.

मुलगी आपल्या वडिलांना मिठी मारते.

" निषादला शिक्षा मिळवून दिली. सैनिकाची बायको शोभते..proud of you " तो संध्याला म्हणतो आणि आनंदाने दिवाळी साजरी करतात.

@जलेबी भाईच्या घरी

जलेबी भाईची बायको हिंदू असते. तिला निषादच्या घरी कामाला ठेवले असते. तिच्यामुळेच ते गुंडे सापडले असतात. जलेबी भाई फटाके आणि पूजेचे सामान घेऊन येतो.

" ऐसे क्यू देखरी है. तू माझ्यासाठी रोजा ठेवते मग मी तुझ्या सुखासाठी दिवाळी का नाही साजरी करू शकत ? आवर लवकर. पंडितला बोलावलं आहे. माझ्या बहिणीला हिंदू लोकांनी उचललं अस ऐकलं होतं म्हणून मला हिंदू लोकांविषयी घृणा. म्हणून तुझ्यावर प्रेम असून तुला सण साजरे करू दिले नाही. पण संध्या मॅडमने समजवल. बलात्कारी हिंदू किंवा मुस्लिम नसतो. मला नोकरी पण दिली त्यांनी. आता कुणी तुला पाकिटमारची बीबी बोलणार नाही. चल आवर लवकर " जलेबी भाई म्हणतो. त्याच्या बायकोला रडू येते. दोघे आनंदाने दिवाळी साजरी करतात.

@निलंगा

सर्वजण रोटेट करतात.

घालीन लोटांगण, वंदीनचरण।
डोळ्यांनीपाहीनरुपतुझें।
प्रेमेंआलिंगन, आनंदेपूजिन।
भावेंओवाळीन म्हणेनामा।।१।।
त्वमेवमाताचपितात्वमेव।
त्वमेवबंधुक्ष्च सखात्वमेव।
त्वमेवविध्याद्रविणं त्वमेव।
त्वमेवसर्वंममदेवदेव।।२।।
कायेनवाचामनसेंद्रीयेव्रा, बुद्धयात्मनावाप्रकृतिस्वभावात।
करोमियध्य्तसकलंपरस्मे, नारायणायेति समर्पयामि।।३।।
अच्युतंकेशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम।
श्रीधरं माधवंगोपिकावल्लभं, जानकीनायकं रामचंद्रभजे।।४।।

आकाशात रॉकेट पेंटाशॉट उडू लागले. आकाश रंगेबेरंगी झाले. सर्वानी आनंदाने दिवाळी साजरी केली. कुणी झाड कुणी अनार उडवले. आकाशात नयनरम्य दृश्य होते. सर्वजण खूप आनंदी होते. झगमगाट निर्माण झाला. साहिलने गरिबांना पण फटाके आणि मिठाया वाटल्या. फराळ वाटला. ते पण खुश झाले.

हरेरामहरराम, रामरामहरेहरे।
हरेकृष्णहरेकृष्ण, कृष्णकृष्णहरेहरे।

योमिता दगडीखान्यात आली. यश पार्थ आणि किरणने आधीच घर सजवले होते आपल्या वाहिनीचे स्वागत करायला. पुढे कार्तिकचा स्टार्टअप खूप वाढला. योमिता आयपीएस झाली. पार्थ आणि मीनाचे लग्न झाले. त्यांनी मुलाचे नाव\" "वरून" ठेवले. यश आणि किरण अजून सोबत आहेत.

नकोसा पुरुषी स्पर्श अंगी होतो
भयाचे शहारे देहभर ते उमटतो
वासना स्त्रीचा खेळणा बनवतो
आजही देशात बलात्कार होतो.

कधी सहा महिन्याची बाळ असते
कधी साठ वर्षाची म्हातारी असते
कळी पूर्णपणे खुललेलीही नसते
नराधमांची क्रूर नजर का ती पडते

ओरडत असते ती हसत असतो तो
विरोधाला तिच्या भीकच घालेना तो
डोळे सुजले रडून वासना ती शमेना
पीडितेत तया आईबहीण का दिसेना ?

पूर्ण झाकलेला देह नग्न त्याने केला
आग पुरुषत्वाची विझे मगच उठीला
पण अजूनही देह तिचा जिवंत होता
पाकळ्या तोडल्या देठ तो बाकी होता

घातला लोखंडी रॉड त्याने त्या योनीत
हसे गालात हिस्त्र पशूंनाही लाजवित
असले कृत्य करणारा कसला तू मर्द ?
जन्म तुझा मानवतेचा झालेला उपमर्द !

~ पार्थ ✍️

समाप्त

🎭 Series Post

View all