दगडीखाना ! पार्ट 9

समलैंगिक स्त्रीविशेष
( सर्वप्रथम सर्वांची माफी मागतो की काल कामाच्या व्यापामुळे भाग पोस्ट करणे जमले नाही. कथेला देत असलेल्या प्रतिसादसाठी मनापासून आभार )


दगडीखाना!! पार्ट 9

@दगडीखाना

किरण सर्वांना जेवायला वाढतो.

" यार. कार्तिकचा फोन लागत नाहीये. उशीर होणार असेल तर तो सांगतो नेहमी. आपण नेहमी सोबतच जेवत असतो ना..!" पार्थ

" सोड यार. फिरत असेल योमिता सोबत. खर सांगू मला त्याच वागणे बिलकुल नाही पटत. आधी ऋचा मग योमिता लगेच. प्रेम वगैरे काही असत का नाही. की फक्त शारीरिक सुखाच्या मागे धावायचे..!!" यश

\"\" ओय यश. शट अप. कार्तिक ऋचासोबत पण सिरीयस होता. ती बया योग्य नव्हती. अँड कार्तिक हवस का पुजारी बिलकुल नाहीये. " पार्थ

तोच पार्थला फोन येतो. कार्तिकला ऍडमिट केल्याच समजते. पार्थ आणि यश निघतात. किरण घरीच थांबतो.

".पेशंट खूप जखमी झालाय. ऑपरेशन करावे लागेल. खूप रक्त वाहून गेले आहे. कदाचित कोमात पण जाऊ शकतो. " 

डॉक्टर असे बोलून निघून जातात. पार्थ कोसळतो.

" सांभाळ स्वतःला पार्थ. काही नाही होणार आपल्या कार्तिकला. " यश पार्थला म्हणतो.

" तो भावासारखा आहे रे माझा. त्याला काही झालं तर या जगात माझं कुणीच नाही. " पार्थचे डोळे पाणावतात. तो पुर्णपणे खचून जातो.

डॉक्टर म्हणतात की आम्हाला ओ निगेटिव्हचे ब्लड पाहिजे आणि ते सध्या कुठेच अवेलेबल नाहीये. पण दुर्दैवाने यश आणि पार्थचे ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह नसते. हा खूप दुर्मिळ ब्लड ग्रुप असतो. मग पार्थ आणि यश आपल्या व्हाट्स अप ग्रुपवर हा मेसेज सरकुलेट करतात. तोच किरणचा फोन येतो. त्या बिचाऱ्याने देव पाण्यात ठेवला असतो. पण किरणचा पण रक्तगट तो नसतो. पण सुदैवाने किरण एक गोष्ट यशला सांगतो.

" जेव्हा ऋतूताई इकडे यायच्या. तेव्हा त्या कार्तिकला म्हणायच्या की आपला ब्लड ग्रुप एक आहे जाणू अस!!"

यावरून यशला एक आशेचा किरण भेटतो. यश आणि पार्थ ऋचाशी संपर्क साधतात. ऋचा तेव्हा झोपली असते.

" ऋचा. पार्थ बोलतोय. तुझा ब्लड ग्रुप कोणता आहे?"

"पार्थ. व्हॉट द फक. रात्रीच्या दीड वाजता तू मला हे विचारतोय की माझा ब्लड ग्रुप कोणता आहे. ओ निगेटिव्ह. नाऊ टेल मी व्हॉट हॅप्नड ?" ऋचा

" ऋचा , कार्तिक ऍडमिट आहे ग. अँड तूच हेल्प करू शकते..!"

ऋचाला पार्थ सर्व हकीकत सांगतो. ती मुलगी परिस्थितीचे गांभीर्य समजते आणि भूतकाळ विसरून लगेच हॉस्पिटलमध्ये पोहोचते. रक्तदान करते. बाजुला कार्तिकला त्या अवस्थेत बघून तिचे पण डोळे पाणावतात. कार्तिक कधीच कुणाशी हाथापायी करत नाही. काहीतरी वेगळेच मॅटर आहे. पण तिला कार्तिकसोबत घालवलेले सर्व क्षण आठवतात. ती रक्तदान करून बाहेर येते.

" कार्तिकला नका सांगू की मी ब्लड डोनेट केले आहे. तो नेहमीच माझ्यासाठी योग्य होता पण मीच त्याला बॉडीगार्ड ड्रायव्हर म्हणून ट्रीट करत राहिले. अजून काही मदत लागली तर सांगा. " ऋचा असे बोलून निघून जाते आणि पार्थ आणि यश तिचे आभार मानतात. कार्तिकचे ऑपरेशन होते. पार्थ मंदिरासमोर देवाला प्रार्थना करत असतो. ती रात्र फार दुःखात जाते. तिकडे योमिता निषादच्या तावडीत आणि इकडे कार्तिक मृत्यूशी झुंज देत असतो. यश आणि पार्थच्या डोक्यात कार्तिक सोबत घालवलेले सर्व प्रसंग जातात.

तू जो रूठा तो कौन हँसेगा
तू जो छूटा तो कौन रहेगा
तू चुप है तो ये डर लगता है
अपना मुझको अब कौन कहेगा
तू ही वजह, तेरे बिना
बेवजह, बेकार हूँ मैं
तेरा यार हूँ मैं, तेरा यार हूँ मैं

आजा लड़ें फिर खिलौनों के लिए
तू जीते मैं हार जाऊँ
आजा करें फिर वही शरारतें
तू भागे मैं मार खाऊँ
मीठी सी वो गाली तेरी
सुनने को तैयार हूँ मैं
तेरा यार हूँ मैं

ओ जाते नहीं कहीं रिश्ते पुराने
किसी नए के आ जाने से
जाता हूँ मैं तो मुझे तू जाने दे
क्यों परेशां है मेरे जाने से
टूटा है तो जुड़ा है क्यों
मेरी तरफ तू मुड़ा है क्यों
हक़ नहीं तू ये कहे
कि यार अब हम ना रहे
एक तेरी यारी का ही
सातों जनम हक़दार हूँ मैं
तेरा यार हूँ मैं...

ऑपरेशन होते. डॉक्टर बाहेर येतात. कार्तिक आउट ऑफ डेंजर आहे सांगतात पण कार्तिक कोमात गेला असतो. पार्थ आणि यश निराश होतात.

◆◆◆

सकाळ होते. जखमी आणि बलात्कार झालेली योमिता घरी पोहोचते. कासावीस मीना तिला विचारते.

" योमिता. काय झाले. मी आणि जानकीबाई अभ्यासिकेत जाऊन आलो तू नव्हती. आम्हाला वाटलं मैत्रिणीकडे गेली आहेस. "

पण योमिताची अवस्था बघून मीनाला समजते काहीतरी अघटित घडले आहे. योमिता मीनाच्या गळ्यात पडते आणि कर्कश असा हंबरडा फोडते. समोरून जानकीबाई येतात. लगेच दार लावतात आणि त्या पण जमीनीवर कोसळतात.

" आम्ही म्हणतो काय गरज होती..स्विमिंगचा जॉब करण्याची. पुरुष जात असतेच मेली हलकट. आता लवकर अंघोळ कर आणि विषय संपवुन टाका. \"\" जानकीबाई

" नाही. आधी एफआयआर आणि मेडिकल टेस्ट. " मीना खंबीरपणे म्हणते.

" मीना. समाज काय म्हणेल ? कोण लग्न करेल हिच्याशी ? हिचे मामा मामीला समजेल तर कस होईल ? " जानकीबाई म्हणतात.

" नाही. मी मीडियामध्ये काम करते. स्वतःच्या डोळ्यासमोर अन्याय नाही बघू शकत. योमिताला न्याय भेटायला हवा. " मीना म्हणते.

" जे करायचे ते करा. आमचे ऐकले नाही म्हणून आज आली रडत आणि अजून पण बोंबलत फिरताय. जे करायचं ते करा. फक्त एवढं लक्षात असू द्या. आता माझे पती गावाकडे गेलेत ते परत आले की दोघांना पण हाकलून देतील. तुमच्यामुळे आमची बदनामी नको. मीना..स्वतःच्या हट्टापायी नको अजून विस्कटू त्या पोरीच नशीब..! बघ..आईच्या वयाची आहे म्हणून कळकळीने सांगत आहे. " जानकीबाई

पण मीना ऐकत नाही. ती योमिताला घेऊन जाते. पोलिसस्टेशनवर गेल्यावर ती रेपची एफआयआर नोंदवायला जाते. पोलीस तिच्याकडे फार लक्ष देत नाहीत.

" थांबा जरा. एक तर तुम्ही रात्रीअपरात्री फिरुन कांड करतात आणि त्रास आम्हाला होतो. " एक पोलीस म्हणतो.

मीनाला राग येतो. ती काही बोलणार त्यातच मागून रुबाबदार असा आवाज येतो.

\"\" ही काय पद्धत आहे बोलण्याची ? " मग तो पोलीस उभा राहतो.

" आयपीस संध्या राठी!" मग सर्वजणच उठून सल्युट ठोकतात.

" पुन्हा नागरिकासोबत अस वागला तर सस्पेंड करीन. " आयपीस संध्या म्हणतात.

तो पोलीस माफी मागतो.

संध्या मीना आणि योमिताला आपल्याकडे बोलवते.

" मॅडम..रेप झालाय योमिता वर. " मीना सर्व हकीकत सांगते.

संध्याला प्रसंगाचे गांभीर्य समजते. ती योमिताला पाणी पाजवते.

" हे बघ योमिता. तुझ्यासोबत जे काही झालं ते सर्व सांग. घाबरू नको. कुणी काही करणार नाही तुला. अश्या नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे. नीट आठव काल काय झालं ?" संध्या मॅडम म्हणतात.

" मी अभ्यासिकेतुन येत होते. मला कार्तिक भेटला. आम्ही बाईकवरून येत होतो. चार गुंड्यानी मला पकडून नेलं आणि कार्तिकसोबत हाणामारी झाली. मला बेशुद्ध अवस्थेत नेण्यात आले. " योमिता

" कोणी केला तुझा बलात्कार ? कुठे नेलं तुला आणि परत कस आणलं ? " संध्या

योमिता आठवायचा प्रयत्न करते. पण त्या कटू आठवणी आठवून तिला अचानक रडू येते. ती रात्र तिच्या आयुष्यातील खूप कठीण रात्र होती. पण निषादचा चेहरा आठवू लागतो आणि बाकीच्यांना तिने स्विमिंग क्लासमध्ये पाहिलेले आठवते. आता तिला सर्व प्रकरणाचा उलगडा होतो.

" निषाद. निषाद आहे तो मॅडम. " योमिता मग सर्व घडलेला प्रकार सांगते की कस निषादने सूड उगवला.

" रडू नको योमिता. निषादला शिक्षा होईल. पण कार्तिक त्याचा नंबर द्या ?\"\" संध्या

बाजूला असलेला त्रिपाठी मॅडमकडे जातो.

" मॅडम. हा निषाद आहे निषाद. या आधी पण खूप केसेस यायचा पण एफआयआर रजिस्टर होत नसत. निषादचे वडील जॉइण्ट सेक्रेटरी पोस्ट वर आहेत. मोठे आयपीस आहेत ते. तुमच करियर संपववायला वेळ नाही लागणार त्यांना. मंत्रीसोबत उठकबैठक असते त्यांची. नका करू एफआयआर रजिस्टर. " त्रिपाठी

संध्याला राग येतो.

" त्रिपाठी. मला माझी ड्यूटी नका शिकवू. लाज नाही वाटत इथं बलात्कार झालाय आणि ह्या गोष्टी करताय. आपल्या जागेवर जा आणि मला शहाणपणा शिकवू नका. " संध्या म्हणतात.

एफआयआर रजिस्टर होते. संध्या मीना आणि योमिताला घरी जायला सांगते. मीनाला योमिताची काळजी घ्यायला सांगते. मीना कार्तिकला फोन लावत असते पण तो लागत नसतो. मग ती पार्थला फोन लावते आणि तिला कार्तिकबद्दल समजते.

@ निषादचे घर

निषादचे वडील पाठक साहेब फार कपटी आणि खुनशी व्यक्ती असतात. निषादने योमितासारखे कांड पहिल्यांदाच केले होते असे नाही. पण सर्व कांड त्याचे वडील दाबून टाकत. निषाद त्यांचा एकुलता एक मुलगा होता. निषादची आई लहानपणीच वारली. त्याला एक लहान बहीण होती. पण निषादचा मामा मंत्री होता. ह्या सर्वांचाच परिणाम निषाद टिनएजपासून कांड करायला घाबरत नसे. कारण वडील सर्व सांभाळून घेतील ही मानसिकता तयार झाली होती. पहिल्यांदाच संध्या सारख्या कुण्या पोलीसाने एफआयआर रजिस्टर करण्याचे धाडस केले होते. पण संध्या इतक्या लवकर स्वस्थ बसणारी नव्हती. आज ती निषादच्या घरापर्यंत पोहोचली. निषादला अटक करायल आली. हे पाहून पाठकची तळपायाची आग मस्तकात जाते. निषाद गांजा ओढत असतो. पाठक संध्याला म्हणतो.

" तुला जरा पण कल्पना आहे का निषादला अटक करून तू तुझ्या बर्बादीला निमंत्रण देत आहेस. मी तुझं पूर्ण करियर खराब करू शकतो. किमान फॅमिली चा विचार कर !" पाठक

" पाठक साहेब. तुम्ही स्वतः आयपीस आहात. ज्याक्षणी हा जॉब स्वीकारला त्या क्षणी संसारावर पाणी सोडले. देशाची सेवा करण्याचे उद्देश आहे ह्या आयुष्याचे. भीती कुणाला घालताय ? माझे वडील कारगिलच्या युद्धात शहीद झाले. माझा नवरा सीमेवर उभा आहे आणि मी इथे उभी आहे कारण त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये म्हणून. पुन्हा मला भीती घालण्याचा प्रयत्न नका करू. " संध्या

निषादला बोलवुन आणतात.

" व्हॉट द फक. डॅड हे काय आहे ? " नशील्या अवस्थेत असलेला निषाद म्हणतो.

" डोन्ट वरी बेटा. मी अर्ध्या तासात तुझी बेल करतो." पाठक साहेब

निषादला अटक होते. पण हवालदार आणि बाकीचे पोलीस अगदी जावयासारख त्याची सेवा करत असतात.

" काय नाटक चालू आहे ? जावई आहे का तो आपला त्याची इतकी खातरजमा करायला ? त्याला पण साध्या आरोपीच्या रांगेत उभे करा. फार पराक्रम नाही केले त्याने. बलात्काराचा आरोप आहे त्याच्यावर. " संध्या

" ओय इनिस्पेक्टर. ज्या वर्दीचा इतका घमंड दाखवत आहेस ना माझे डॅड तुला नोकरीतून काढून टाकतील. " निषाद म्हणतो.

"ही नोकरी मला तुझ्यासारख माझ्या बापाने नाही दिली. बारा बारा तास डोळे फोडून अभ्यास केल्यावर हातात राष्ट्रपतीचे साइनअसलेले पत्र भेटले. " संध्या

पण संध्याचे हे बोलणे ऐकण्याच्या आत निषाद पडतो.

मग "घोसला" येतो. हा महाकपटी. राजकारणी लोकांसोबत त्याची उठकबौठक..दिल्लीचा सर्वात मोठा वकील.

" काढा माझ्या निषादला बाहेर. हे घ्या पेपर. " घोसला

घोसला निषादचा वकील निषादची बेल करवतो.

" खूप चुकीच्या लोकांशी पंगा घेतलाय. सर्वच स्त्रिया झासीच्या राणी नसतात. बाई माणसाने थोडं जपूनच राहावं. मुले आहेत. होत असतात चूका. हॉर्मोनल बदल होत असतात. बायोलॉजी तर शिकला असालच ना. "  घोसला म्हणतो आणि हसतो.

" घोसला. तुमच्या मुलीसोबत कुणी अस केलं तर पण हॉर्मोनल बदल म्हणून सोडून द्याल का ?" संध्या

" ओह मॅडम तोंड सांभाळून बोला. "

" नाही. तुम्ही बायोलॉजी शिकवत होता. मी म्हणलं थोडं सोशओलॉजी शिकवाव. ऑपशनल होता ना माझा. " संध्या

घोसला रागात निघून जातो. पण संध्याला कल्पना येते की लढाई इतकी सोपी नाहीये. घोसला..पाठक.. निषाद हे फार मुरलेले लोक आहेत. हे लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात.

संध्या पुरावा गोळा करण्याचा प्रयत्न करते. ज्या रस्त्यावर योमितावर हल्ला झाला तिथे चौकशी करते. सीसीटीव्हीची फुटेज सापडते. हा एक महत्वाचा पुरावा असतो. पण त्या जिपवर नंबर प्लेट नसते.

तिकडे सर्वजण जानकीबाईच्या घरी भेटतात .जानकीबाई सर्वासाठी चहा नाश्ता करते.

योमिता आत झोपली असते. तिचे अश्रू सुकले असतात. कार्तिकच्या अवस्थेला ती स्वतःला जबाबदार ठरवत असते.

" कार्तिक आणि योमितासोबत हे सर्व करणाऱ्या त्या निषादला शिक्षा झालीच पाहिजे ऍट एनी कॉस्ट साला. एका रात्रीत दोन मित्रांच्या जीवनात रायता पसरला. " पार्थ

" पण वकील कुठून आणणारे ? तुम्हाला वाटतय तितकं सोपं नाहीये. पाठक फार वरच्या पोस्टवर आहे. त्याच्या भीतीने तुम्हाला कुणी वकील भेटणार नाही. " जानकीबाई

आणि होते पण तसेच. यश पार्थ मीना ज्या पण वकीलाशी चर्चा करतात ते पाठक घोसलाचे नाव ऐकून नकार देत होते. आता प्रश्न असतो योमिताची केस लढणार कोण ?

क्रमश..

🎭 Series Post

View all