दगडीखाना ! पार्ट 5

समलैंगिक स्त्रीविशेष कथा
दगडीखाना!! पार्ट 5

दुसऱ्या दिवसापासून यश किरणशी बोलत नव्हता. त्याने केलेले पोहे यश खात नव्हता. शेवटी किरण यशला अडवतो.

"अस नका करू. प्लिज. मी तर चुत्याच आहे. पण तुम्ही सोडून कुणीच नाही हो माझं . " किरण

" मी तुझ्याशी तेव्हाच बोलेल जेव्हा पार्थ तुला माफ करेल. पार्थ माझ्या भावासारखा आहे. त्याच्या आईने सुसाईड केलं होतं. आत्महत्या. का तर त्याच्या वडिलांनी त्याच्या आईला मानसिक त्रास दिला. डिओर्स दिला. म्हणून पार्थला कमकुवतपणा आवडत नाही. म्हणून त्याला तू आवडत नाही.।बालपण पूर्ण एकट्याने काढले त्याने. मनात हृदयात जखम घेऊन. त्यात समलैंगिक आहे. एकटेपणाचा शाप असतो समलैंगिक लोकांना. काही बोलण्याआधी दहा वेळा विचार करावा. तुझ्या कालच्या बोलण्याने तू पार्थला किती दुखावले आहेस याची कल्पना तरी आहे का तुला ? माझ्या पण नजरेतुन उतरला आहेस तू . " यश रागाने बोलून निघून जातो.

त्याच दिवशी हॉटेलमध्ये साहिल आणि पार्थची भेट होती.

" काय झालं ? " साहिल

" काही नाही यार. " पार्थ

" हे बघ. तू मला मित्र मानत असशील तर सांग. " साहिल

पार्थच्या डोळ्यात थोडेसे पाणी आले. कितीही केलं तरी साहिल त्याचा सॉफ्ट कॉर्नर होता.

" यार आजकाल खूप फ्रस्ट्रेट झालोय. बँकेत काम करू वाटत नाही. एकट वाटतय. त्यात ही समलैंगिक लाईफ. इथे प्रेम भेटणे अशक्य. लहानपणापासून प्रेम भेटलं नाही कधी. आईने आत्महत्या केली. वडिलांनी तिला खूप टॉर्चर केलं अस माझा मामा म्हणतो. लहानपण बोर्डिंग स्कूल मध्ये गेलं. सर्वांचे पॅरेन्ट्स भेटायला यायचे. आणि मी मम्मीची फोटो घेऊन  रडायचो रात्रभर. आज पैसा आहे पण मनातील खदखद जगू देत नाहीये सुखाने. एक घट्ट मिठी मारावी वाटते कुणाला आणि जगातला सर्व ताण विसरून जावा वाटतो त्या मिठीत. कुणाच्या तरी विशाल छातीवर डोके टेकवून जगातल्या चिंतापासून मुक्त व्हायचे आहे. कुणीतरी माझ्या पण कपाळावर किस करावे मला लाडिकपणे बोलावे असे वाटते. मी कधीच असा चिडचिडा नव्हतो रे. पण आजकाल खूप विचित वागतोय. झंड लाईफ झालीय. कंटाळा आलाय. " पार्थ

""चिल मार. तुझ्या लाईफच्या प्रॉब्लमचे काही उपाय आहेत माझ्याकडे. पहिल्यांदा माफ करायला शिक. हे बघ तुझी आई तर गेलीय पण देवाच्या कृपेने वडील तर आहेत ना. मामाच्या बोलण्यावर विश्वास नको ठेवू. प्रिज्युडीस काढून टाक. कोर्ट पण गुन्हेगारांचे ऐकून घेतो. एकदा वडिलांची बाजू तर ऐकून घे. नवरा म्हणून चुकले असतील पण वडील म्हणून संधी दे त्यांना. तू किती छान ब्लॉग लिहितो. आता कादंबरी लिही. लेखणीच तुझी खदखद दूर करू शकते. आपापले पॅशन जपावे. आता चल माझ्या घरी. \"\" साहिल

मग साहिल आणि पार्थ साहिलच्या फ्लॅटमध्ये जातात. खूप सुंदर फ्लॅट असतो.

साहिल आणि पार्थ यांच्यात सुंदर समागम होतो. शेवटी पार्थ निवांतपणे साहिलच्या छातीवर झोपतो!!

" किती सुंदर वाटत ना. जीवनातील सर्वात शांत झोप लागते प्रियकराच्या मिठीत आणि त्याच्या छातीवर. " पार्थ

साहिल पार्थच्या कपाळावर किस करतो.

\"\" इतके सुंदर बोलतोस. फक्त मलाच की सर्वाना ? " साहिल

पार्थ हसतो.

" तुलाच रे.. बाकी जग मला खडूस म्हणते!!" पार्थ

" मला आवडेल खडूससोबत जीवन घालवायला!!" साहिल

छुपा भी ना सकेंगे
बता भी ना सकेंगे
हुए हैं यूं तेरे
प्यार में पागल पिया
जो तेरे ना हुए तो
किसी के ना रहेंगे
की अब ना किसी और से लागे जिया

हजारों में किसी को तकदीर ऐसी
मिली है एक रांझा और हीर जैसी
ना जाने ये ज़माना
क्यूं चाहे रे मिटाना
कलंक नहीं इश्क़ है काजल पिया
कलंक नहीं इश्क़ है काजल पिया

पार्थ डोळे मिटतो. थोड्या वेळाने पार्थ हा सुंदर अनुभव घेऊन घरी जातो.

पार्थ त्याच्या बेडरूमकडे जाताच त्याच्या पायात एक चिठ्ठी येते. त्यावर एक कविता असते.

" देवा ऐकतोय का..!" अशी कविता होती. समोर घाबरलेला किरण असतो.

" तू लिहिली का कविता ? " पार्थ

"हो..!" किरण

" छान लिहिलीय. थोड्या शुध्दलेखनाच्या चूका आहेत पण इट्स ओके. अजून शब्दसंपती वाढव. असच लिहीत जा. टॅलेंट है..किप इट अप " पार्थ

पार्थ असे बोलून त्याच्या रूममध्ये जात असतो तेच किरण म्हणतो.

\"\"मला माफ करा. मी चुत्या आहे. असच बचबच बोलत असतो.।तुम्ही दोन थोबाडीत मारा पण माफ करा. मी कितीही केलं तरी गावठी आणि चुत्या राहणार. " किरण

"\" कोई नि. इट्स ओके. माझा एक मित्र होता. मला चुततड चुत्या लाडात म्हणायचा. अपघात होऊन कायमचा सोडून गेला मला. त्याच्या आठवणीत मी शिव्या देतो. बाकी तू तर बिलकुल चुत्या नाहीस. खूप टॅलेंटेड आहेस. खूप शिक आणि स्वतःच्या पायावर उभा हो. म्हणजे उद्या कुणी तुझं शोषण नाही करणार. गूड नाईट " पार्थचे आज बदललेले रूप पाहून किरण खूप खुश होतो.

पार्थ आत जातो तर बाल्कनीत यश असतो.

"काय रे आज माझ्या बाल्कनीत कसकाय?" पार्थ

"सॉरी..काल जे झालं ते!!" यश

"कोई नि रे!!आणि एक सांगू का यश..( यशच्या खांद्यावर हात ठेवून ) तू प्रेम करतोस ना किरणवर?" पार्थ

"हो..पण वय?" यश

"अरे चुत्या , प्रेमाला वयाचे बंधन नसते. प्रेम हे प्रेम असते. तुमचे आमचे सेम असते. किरणला कधी प्रेम भेटले नाही. तू दे त्याला प्रेम. योगायोग बघ ना. कोल्हापूरहुन तो दिल्लीत आला. देवाने स्वप्नात येऊन सांगितले म्हणतोय तो. इथे तुला भेटला. मेड फॉर इच अदर आहेत रे तुम्ही. आणि आपल्या गे जगात असतात का अशी जोडपे ? नशिबाने प्रेम भेटलं आहे तर स्वीकार कर. जा त्याला हग कर. " पार्थ

यश आपली क्युटशी स्माईल देतो आणि पार्थलाच हग करतो आणि तडक किरणकडे जातो.

बेडरूमचे दार लावतो.

" किरण. आय लव्ह यु !" यश

यश गुडघ्यावर टेकतो..किरणचा हात हातात घेतो..

"तुला आजपर्यंत खूप त्रास झालाय माहित्ये मला. पण मला एक चान्स देशील का रे. तुझ्या डोळ्यातुन पुन्हा कधीच अश्रू येऊ देणार नाही. मी तुला शिकविन. जॉब मिळवून देईल. स्वतःच्या पायावर उभा करीन. मी घरी ओपन आहे. आपण आयुष्यभर सोबत राहायचे का रे ? मला कारण नाही माहिती पण तुझ्यातच माझा जोडीदार दिसतो. नाही जगू शकत तुझ्याशिवाय. हा फ्लॅट होता पण तू रोज माझी वाट बघतोस , माझे आवडीचे पदार्थ बनवतोस मला वाटतय हे घर झालंय आता. मला संसार थाटायला आवडेल तुझ्यासोबत. " यश

\"\"तुम्हाला माहित्ये आधी जगाची भीती वाटायची पण जेव्हा तू भेटला तेव्हा भीती वाटत नाहीये. सुंदर वाटतय जग!!" किरण

यश त्याच्या कपाळावर किस करतो.

\"\"कारण तुझं मन सुंदर आहे किरण. " यश

किरणच्या डोळ्यात पाणी येते आणि तो यशला घट्ट मिठी मारतो. रुमचे लाईट्स ऑफ होतात आणि दोघेही एकमेकात विलीन होतात.

ठोकर पे दुनिया है, घर बार है
दिल में जो दिलबर का दरबार है
सजदे में बैठे हैं जितनी दफा
वो मेरे मन्नत में हर बार है
उसी का अब ले रहे हैं नाम हम तो सांसों की जगह
क्यूं जाने एक दिन भी लागे
हमको बारा मासों की तरह
जो अपना है सारा, सजन्निया पे वारा
ना था मेरे किसी और का आंचल पिया

क्रमश...

🎭 Series Post

View all