Oct 18, 2021
कथामालिका

दगडीखाना ! पार्ट 4

Read Later
दगडीखाना ! पार्ट 4
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

दगडीखाना!! पार्ट 4


मीना खुप सुंदर दिसत होती. सर्वांनी तिला विश केले. केक वगैरे कापला गेला. पण केक कापण्याआधी मीना एक अनौअन्समेंट करते."मला एनडीटीव्हीमध्ये रिपोर्टर म्हणून जॉब लागला आहे. आणि लवकरच मी स्क्रीनवर दिसेल. " मीना सर्वजण तिचे अभिनंदन करतात. इकडे कार्तिकला ऋचाचा मेसेज येतो की उद्या बाबांनी भेटायला बोलवले आहे म्हणून . कार्तिक सातव्या अस्मानात जातो. पार्थच्या समलैंगिक डेटिंग अँपच्या अकाउंट वर एक फोटो येऊन धडकते. तो फोटो साहिलचा असतो. दोघांची डेट फिक्स होते. पार्थला आनंद होतो की तो उद्या क्रशसोबत डेट करणार. यश तर किरणच्या प्रेमात पडलेला असतो. पण आज पार्थही खूप खुश असतो. केक कापला जातो. डिनर केले जाते. ते हॉटेल आलिशान असते. बाजूला डानसिंग गार्डन असते. तिथे तरुण मुलांसाठी डिस्को लागत होता. किरण आणि योमिता सोडून सर्वजण डान्स करायला जातात.दिल की मशीनें चलने लगी हैं  उसकी ब्रांडेड चाल देख के  अरमान कमीने लेज़ी थे जो  हैं excited गाल देख के उतनी हैं या इतनी  कुडियां हैं जितनी  पीछा छोड़ दिया सारों का  फेमस कर दो पन्ना पन्ना भर दो  लिख लिख के अख़बारों का  दिल अब यारों का  हो गया पारो का  हाँ दिल अब यारों का  हो गया पारो का  पारो का टैटू चम् चम् करदा  पिस है डायमंड का  ओये लक्क तेरा सोनिये फुल ओन देसी  नखरा इंग्लैंड दा थोड़ा थोड़ा ब्रेक ले  अखियों मे देख ले  फेन हूँ तेरे नजारों का हाँ  पारा चढ़ गया और बिगड़ गया  हाल ये दिल के बीमारों का  दिल अब, दिल अब .. दिल अब यारों का...  हो गया पारो का हाँ दिल अब यारों का..  हो गया पारो का..कार्तिक डान्स करून योमिताकडे जातो." आबे तू डान्स नहीं करती ? " कार्तिक म्हणतो." अच्छा नही लगता डान्स..!" योमिता" वो मीना देख..आंटी के सामने संस्कारी बनती अभी कैसे नाच रही फुदक फुदक के ! तू सुना..क्या बोलता सिक्कीम..!" कार्तिक म्हणतो."सब बडीया. जॉब छोड़ दिया यार मैने. सोचरी स्टेट एग्जाम की तैयारी करु. बजपन से ड्रीम था पोलिस बनने का वो पूरा करु. अभी युपीएसी भी दूंगी. घरवाले भी सपोर्ट कररे और पार्थ के नोट्स और गाईडन्स भी तो है. पार्थ भी बड़े बैंक मैं काम करता है. " योमिता म्हणते. " सही है. पर तु कितनी नाजुक दिखती और पोलिस ? " कार्तिक म्हणतो." आय एम कराटे चॅम्पियन " योमिता म्हणते.कार्तिक आपली क्युटशी स्माईल देतो." तू सांग. ऋचासोबत लग्न करणारे की नाही ! योमिता म्हणते."लग्न तर खूप पुढची गोष्ट  झाली. मला तर आधी माझा बिजनेस सुरू करायचा आहे. गुप्ता शर्मा मध्ये स्वतःच्या आडनावाचा ब्रँड बनवायचा आहे. ऋचाचे वडील खूप श्रीमंत आहेत. मला मदत करतील. " कार्तिक म्हणतो." म्हणजे तू ऋचावर प्रेम करत नाही ? " योमिता म्हणते. " नाही. दगडीखानाचे मेम्बर कुणावर प्रेम करत नाहीत. ऋचा फक्त माझ्यासाठी शिडी आहे गोल ऍचीव्ह करण्यासाठी. पण इतक्या दिवस राहून मला थोडं थोडं आवडू लागलीय ती . " कार्तिक म्हणतो. " हम्म. विचार कर. सेल्फ रिस्पेक्टशी तडजोड करून मिळालेल यश कधीच टिकत नाही. आणि ही तडजोड जमत पण नाही सर्वाना. अजून एक तू ऋचाला दर तासाला स्टेटस सांगतोस ते पण मला नाही पटत. प्रेम अस बांधून नाही ठेवत. छोट्या छोट्या गोष्टीवरून अस इनसेक्युर नाही होतात प्रेमात. उलट प्रेमात दहा मिनिटे जरी दिली ना त्यात पण क्वालिटी टाईम स्पेन्ड करता येतो. मग दिवस भर काय करता कुणी विचारत नाही. ते असत खर प्रेम..!!" योमिता म्हणते." हम्म..पण ऋचा इतकी मॅच्युरड नाहीये ना. " कार्तिक म्हणतो. दोघात गप्पा रंगतात. काही वेळाने मीना येते. कार्तिकला एकांतात बोलावते." यार कार्तिक. मला पार्थला बॉयफ्रेंड बनवायचे आहे. मी प्रेम करते त्याच्यावर. " मीनाकार्तिक दोन मिनिटे टक लावून बघतो मीनाकडे. मग जोरजोरात हसायला लागतो ." त्या खडूसवर प्रेम झाल तुला!!" कार्तिक म्हणतो. " खडूस आहे तरी हँडसम पण आहे. मला असेच अँग्री यंग मॅन आवडतात!" मीना"हम्म..मी मदत करीन तुला चिल्ल!!" कार्तिक म्हणतो. मीना खुश होते. कार्तिक स्वतला म्हणतो. " आसाम आणि महाराष्ट्रचे मिलाफ कठीण आहे. पण पार्थ तर बायसेक्सउल आहे. जर मीनाने पार्थला पटवल तर पार्थला फार प्रॉब्लेम नसेल आणि त्याची पण लाईफ सेट होईल. "◆◆◆@ दुसऱ्या दिवशी पार्थ आज भलताच खुश असतो. मस्त तयार होतो आणि आवडते परफ्युम वगैरे मारतो. कारण आज त्याची डेट असते साहिल गोयल सोबत. त्याचा क्रश. पार्थ मग हॉटेलला जातो आणि साहिलची वाट बघत बसतो. समोरून एक कार थांबते. एक सुंदर तरुण बाहेर पडतो. " एक चित वन मै ज्योती ऐसीमन आंगण हो जगमग जगमगमोह की मारी एक कुमारी के पग होवे डगमग डगमगतार जिया के छेड रही है प्रीत की अठकेलिया..!!"साहिल येऊन पार्थला हँडशेक करतो. पार्थ पण छानशी स्माईल देतो. "\"बँकिंगचे क्लासेस करताना तुम्हीच माझे क्रश होता. मी तुमचं लॅक्चर करण्यासाठी किती वाट बघायचो. पण दुर्दैवाने एकदा पण भेटायचा चान्स नाही भेटला. मग मी तुमच्या नावाने कथा लिहायचो. ब्लॉग वगैरे..आणि आता देवाच्या कृपेने..!!" पार्थ"\"ओह. रिअली. थँक्स बडी. मी इतका पण खास नाहीये. चल कॉफी ऑर्डर करायची का ?" साहिलमग दोघेही कॉफी ऑर्डर करतात. दोघात खूप गप्पा रंगतात. पार्थ खूप खुश होतो. साहिलच्या रुपात त्याला कुणीतरी समजून घेणारा भेटला असतो. साहिलला पण पार्थची पर्सनॅलिटी खूप आवडली असते. साहिल नेक्स्ट डेट पण फिक्स करतो. हे पहिल्यांदा घडत होते. कारण पार्थला वाटलं होतं की आता भेट बेडवर होईल. पण साहिलने मैत्रीत दाखवलेला रस अनपेक्षित होता.पार्थ खुश होऊन घरी येतो.दगडीखान्यात एक फोन असतो. तो फोन जानकीबाईने दिला असतो. पार्थ घरी येताच फोन येतो आणि किरण तो उचलतो. " पार्थ कुलकर्णी. हो आहे ना..!!" तिकडून आवाज येतो." पार्थ. कुणीतरी प्रभात कुलकर्णी आहे !" किरण म्हणतो." पार्थ बाहेर गेलाय म्हणून सांग..!!" पार्थकिरणला आश्चर्यचा धक्का बसतो. पण तो अगदी तसेच बोलतो. "पार्थ घरी आल्यावर त्याला सांग वडिलांना पण बोलत जा म्हणावे. " अस किरणला सांगण्यात येते. किरण खूप विचारात पडतो. का कुणी आपल्याच बापाला बोलत नसेल ? किरणने ठरवले पार्थच्या आतल बाहेर काढायच. रात्री सर्वजण डायनिंग टेबलवर जेवत असतात. किरण म्हणतो , "काय जमाना आलाय. स्वतःच्या बापाला पण बोलायच भान नाही मुलांना. इथं बाप मुलांना चटके देतो. तुमचा बाप कमीत कमी विचारपूस तरी करतो. ज्या बापाच्या जीवावर इतकं शिकलात त्याच बापाला दुर्लक्षित करताय. लाज वाटू द्या !!" पार्थ उठतो. किरणवर हात उगारतो. किरण घाबरतो पण सुदैवाने कार्तिक पार्थला अडवतो." ऐ चुत्या. आपल्या हद्दीत राहायचं. औकात सोडून वागायचं नाही. तू कोण माझ्या पर्सनल लाईफबद्दल कंमेन्ट करणारा आणि यश याचे हेअरस्टाईल बदल कपडे बदल पण गावठी ते गावठीच राहणार. " पार्थपार्थ पाय आपटत बेडरूममध्ये जातो. कार्तिक पण उठतो. " यश. या बाहेरच्यामुळे घरचे रडणार असतील तर उद्या मीच जाईन जानकीबाईकडे तक्रार घेऊन!!" कार्तिक म्हणतो.यश पण चिडून निघून जातो. त्या रात्री कुणीच जेवण केलं नाही. पार्थ आपल्या बेडरूममधल्या बाल्कनीत जाऊन चांदण्याकडे बघत असतो. कार्तिक येताच त्याच्या अश्रूंचा बांध फुटतो. तो कार्तिकला मिठी मारतो.." त्याला काय गरज होती रे खपली काढायची!!" पार्थपार्थ समलैंगिक होता. पण कार्तिकला कधीच प्रॉब्लम नव्हता. ते मित्र होते. कार्तिक पार्थला समजून घेई. यशला मात्र स्वतःशीच लाज वाटत होती. त्याला पण झाल्या प्रकाराने दुःख झाले. तो किरणशी बोलत नव्हता. प्रेमाची पालवी किरणच्या एका चुकीमुळे कोमेजून गेली..दगडीखानाला कुणाची तरी नजर लागली.

क्रमश..

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now